पत्रकार संजय कांबळे यांच्या बातमीची दखल, रायते पिपंळोली ग्रामपंचायतीकडून विसर्जन घाटांची साफसफाई !
कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यात,तालुका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत जवळपास सुमारे ९३ सार्वजनिक आणि ४ हजार ५०० घरगुती गणेशोत्सव साजरे होणार असून यासाठी १९ गणेशघाटावर 'श्री, चे विसर्जन होणार आहे. या करिता ८६ अंमलदार, १० पोलीसअधिकारी, होमगार्ड, पोलीस पाटील हा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सज्ज झाले आहेत, परंतु विसर्जन घाट, रस्त्यावरील खड्डे चिखल पाहता इतर विभागाचे काय? असा प्रश्न उपस्थित करून पत्रकार संजय कांबळे यांनी 'एस न्यूज महाराष्ट्र, तसेच दैनिक सागर, माझा बातमीदार, आदी विविध दैनिकामधून प्रसिद्ध करताच याची दखल तालुक्यातील 'रायते पिपंळोली ग्रुप ग्रामपंचायतीने घेऊन तात्काळ या घाटांची साफसफाई केली, त्यामुळे पत्रकार श्री कांबळे यांनी त्यांचे आभार मानून सन्मान केला.
महाराष्ट्रात विशेष:त मुंबई, ठाण्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, शिवाय शासनाने हा महाराष्ट्र उत्सव म्हणून घोषित केला आहे. यावेळी पोलीस यंत्रणेवर प्रंचड ताण येतो, केवळ कल्याण तालुक्याचा विचार केला तर ८ ते १० लाख लोकसंख्येसाठी ८० ते ९० कर्मचारी आहेत, अशातच आता गणेशोत्सव तोडांवर आला आहे, या पोलीस ठाण्यातंर्गत ९३ सार्वजनिक तर ४ हजार ५०० घरगुती गणेशाची स्थापना होणार आहे, बाप्पाच्या विसर्जनासाठी उल्हास, काळू, भातसा आणि बारवी नदीच्या काठावर तसेच काही ठिकाणी गाव तलावात विसर्जन घाट तयार करण्यात आले आहेत, असे १९ घाट आहेत, परंतु या घाटांची सध्याची परिस्थिती पाहिली तर हे विसर्जन घाटआहे की एखादे दलदल खाडी, अशी स्थिती दिसून येत आहे. काही ठिकाणी या घाटाच्या लाद्या तुटलेल्या, फुटलेल्या, उखडलेल्या दिसून येत आहेत, मागील काही वर्षाचा विचार केला तर गणेश विसर्जन दरम्यान अनेक गणेशभक्त बुडवून मरण पावल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत असेल अथवा महसूल विभाग असेल यांनी गणेशोत्सवापूर्वी या घाटांची दुरुस्ती, दिवाबत्ती ची सोय, जीवरक्षक नेमणे, तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवने, वाहतूक व्यवस्था सुधारणे आदी उपाययोजना वेळीच केल्या तर यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडू शकतो, अशा प्रकारे बातमी एस न्यूज महाराष्ट्र, दैनिक सागर, बातमीदार माझा, अशा विविध माध्यमातून प्रसिद्ध केली होती. याची दखल ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी राजाभाऊ सुरोशे, सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी घेऊन जेसीबीच्या माध्यमातून हा चिखल बाजूला केला आहे, शिवाय नदीमध्ये मोटार लावून पाण्याने संपर्क घाट स्वच्छ करणार असल्याचे ग्रामपंचायत अधिकारी राजाभाऊ सुरवसे यांनी सांगितले. त्यामुळे पत्रकार कांबळे यांनी त्यांचे कार्यालयात जाऊन आभार मानले व त्यांचा सन्मान केला. तसेच असेच काम इतरही यत्रणांनी करावे असे कांबळे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment