विष्णुनगर पोलिसांची कामगिरी; मोबाईल दुकान फोडणाऱ्या तिघांना अटक, ९ मोबाईल जप्त !!
*विष्णुनगर / डोंबिवली (विनोद गिरी)
विष्णुनगर पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. २४६/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४), ३०५(a), ३(५) अन्वये दि. १७/०९/२०२६ रोजी दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात एका मोबाईल दुकानाचे शटर उचकटून ३०,००० रुपये किमतीचे ०९ मोबाईल फोन व चार्जर आणि ६,५०० रुपये रोख रक्कम चोरीस गेल्याची तक्रार दाखल होती.
घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला असता पोलिसांनी या गुन्ह्यातील तिघा आरोपींना अटक केली आहे.
*अटक आरोपींची नावे -*
*१.* तजुमल कमरुल खान, वय २४ वर्षे, मूळ रा. जिल्हा किशनगंज, पो. ठाणे ठाकुरगंज, राज्य बिहार
*२.* अशफाक असिरुद्दीन आलम, वय ३२ वर्षे, रा. इ/८१९ शब्बीर शेख यांचा गाडा, एपीएमसी मार्केट, तुर्भे, नवी मुंबई
*३.* नजीम मोहम्मद जलाल शेख, वय २१ वर्षे, रा. इ/८१९ शब्बीर शेख यांचा गाडा, एपीएमसी मार्केट, तुर्भे, नवी मुंबई
आरोपींकडून चोरीस गेलेले एकूण ९ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
सदर आरोपींना रिमांडकामी दि. १९/०९/२०२६ रोजी मा. न्यायदंडाधिकारी सो, ५ वे न्यायालय, कल्याण येथे हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर केली असून त्यांना आधारवाडी कारागृह, कल्याण पश्चिम येथे जमा करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment