Wednesday, 9 September 2026

एमएमआरडीएचे उपकार्यालय डोंबिवलीत व्हावे; नागरिकांची मागणी !!

एमएमआरडीएचे उपकार्यालय डोंबिवलीत व्हावे; नागरिकांची मागणी !!

*डोंबिवली, राजू नलावडे* :

एमएमआरडीएचे उपकार्यालय डोंबिवलीत असणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे, कारण डोंबिवली आणि २७ गावांमध्ये मेट्रो, रस्ते आदी अनेक विकासकामे एमएमआरडीएकडून सुरू आहेत.

या कामांच्या संदर्भात जनतेच्या अनेक तक्रारी आहेत. ठेकेदाराकडून अनेक चुका व हलगर्जी होत असल्याने कधीतरी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकतीच मंगळवारी (०८/०९/२०३६)  कल्याण-शीळ रोडवरील सोनरपाडा येथे बांधकाम गॅलरी कोसळण्याची घटना घडली आहे. मागील वर्षभरात मेट्रोच्या कामात दोन दुर्घटना झाल्या असून सुदैवाने त्यात जीवितहानी झाली नाही. या मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या उद्भवली आहे. एमएमआरडीएकडून काँक्रीट रस्ते बनविताना अनेक चुका झाल्या असून त्या दुरुस्त करणे आवश्यक आहे.

जर एमएमआरडीएचे उपकार्यालय डोंबिवली किंवा २७ गावांत आणले गेले तर उपरोक्त संदर्भातील तक्रारी जनतेला थेट देता येतील, तसेच केडीएमसी, एमआयडीसी, वाहतूक पोलीस आदी सरकारी प्रशासनाला त्यांच्याशी समन्वय साधून काम करता येईल.

सध्या २७ गावांमध्ये भूसंपादनाचा तिढा निर्माण झाला आहे. ग्रामस्थांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे. त्यासाठी ग्रामस्थांना आपली कैफियत मांडण्यासाठी आणि कागदपत्रे देण्यासाठी जवळच एखादे कार्यालय असेल तर एमएमआरडीए आणि ग्रामस्थ या दोघांसाठीही ते सोयीचे होईल असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे (डोंबिवली) यांनी केले.

सध्या एमएमआरडीएचे मुख्य कार्यालय वांद्रे, मुंबई येथे आहे. ठाणे येथे जसे उपकार्यालय सुरू केले आहे, तसे उपकार्यालय डोंबिवली किंवा २७ गावांत सुरू केल्यास अनेक प्रश्न तातडीने सोडविता येतील. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

No comments:

Post a Comment

सौ.वसुधा वैभव नाईक (पुणे) यांच्या 'आईचे हळवे मन' लघु कथासंग्रहास पुरस्कार !!

सौ.वसुधा वैभव नाईक (पुणे) यांच्या 'आईचे हळवे मन' लघु कथासंग्रहास पुरस्कार !!     'शिक्षण संजीवनी' मासिका तर्फे द...