*ठाणे, दि. 6 :* महसूल सेवक म्हणजेच कोतवाल पदाच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांच्याकडून जाहिरात क्र. 01/2026 अन्वये जिल्ह्यातील एकूण *111 रिक्त पदांसाठी* भरती जाहीर करण्यात आली आहे.
शासनाच्या महसूल व वन विभागाच्या 20 ऑगस्ट 2025 च्या पत्रानुसार या भरतीला विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली असून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. पात्र उमेदवारांना *https://thane.kotwal.org* या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करावा लागणार आहे.
*तालुकानिहाय पदांचे वितरण :*
- ठाणे - 24 पदे
- अंबरनाथ - 21 पदे
- मुरबाड - 19 पदे (नॉन-पेसा 11, पेसा 0-25% - 4, पेसा 25% पेक्षा जास्त - 4)
- शहापूर - 19 पदे (पेसा 25% पेक्षा जास्त - 11, पेसा 0-25% - 8)
- कल्याण - 14 पदे
- भिवंडी - 14 पदे (नॉन-पेसा 11, पेसा 3)
या भरतीमध्ये सामाजिक आरक्षण लागू असून महिलांसाठी 30 टक्के समांतर आरक्षण ठेवण्यात आले आहे.
*महत्त्वाचे वेळापत्रक (2026) :*
- *ऑनलाईन अर्ज :* 7 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर सायं. 5 वाजेपर्यंत
- *परीक्षा शुल्क भरण्याची मुदत :* 22 ऑक्टोबर सायं. 5 वाजेपर्यंत
- *अर्ज छाननी :* 22 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर
- *प्रवेशपत्र :* 4 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर
- *परीक्षा दिनांक :* रविवार, 15 नोव्हेंबर
- *उत्तरसूची व निकाल :* 16 नोव्हेंबर
- *कागदपत्र पडताळणी :* 17 ते 27 नोव्हेंबर
- *नियुक्तीपत्र वाटप :* 28 नोव्हेंबर
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संकेतस्थळावरील सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि केवळ अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज व शुल्क भरावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
No comments:
Post a Comment