Sunday, 18 October 2026

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे नवरात्रौत्सवानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान !!

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे नवरात्रौत्सवानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान !!

विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ महिलांचा गौरव ; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

उरण दि. १८ (विठ्ठल ममताबादे) : नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला होता. उरण मधील कोप्रोली चौक येथे  शिक्षक प्रतिक मुंबईकर यांच्या रँकऑन अकॅडेमी क्लासेसच्या ठिकाणी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

समाजाच्या जडणघडणीत महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. सामाजिक, वैद्यकीय, पत्रकारिता, कृषी, प्रशासकीय, शैक्षणिक तसेच इतर विविध क्षेत्रांत महिला आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर समाजात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आदर्श शिक्षक सुधीर मुंबईकर, आदर्श शिक्षिका साधना मुंबईकर, पंचायत समिती सदस्य कविता पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते महेश पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ महिलांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.

या सर्व महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. महिलांच्या कार्याचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे उत्तम असे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुनील वर्तक व चेतन पाटील यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी सदर उपक्रमाचे विशेष कौतुक केले.या कार्यक्रमाला आदर्श शिक्षक सुधीर मुंबईकर,आदर्श शिक्षिका साधना मुंबईकर, शिक्षक प्रतिक मुंबईकर यांचे विशेष सहकार्य लाभले.


कोट (चौकट ):- 

विविध क्षेत्रांतील नऊ कर्तृत्ववान महिलांचा गौरव करून या सन्मान सोहळ्यात महिलांचा त्यांच्या कार्यक्षेत्रातील योगदानाबद्दल गौरव करण्यात आला.

१. सौ. कविता रुपेश पाटील — सामाजिक क्षेत्र
२. श्रीमती चैताली केसरीनाथ घरत — वैद्यकीय क्षेत्र
३. श्रीमती सायली साळुंके — पत्रकारिता क्षेत्र
४. सौ. कुसुम भानुदास पाटील — शेतकरी क्षेत्र
५. सौ. जयश्री पवन म्हात्रे — प्रशासकीय क्षेत्र
६. सौ. संध्या पांडुरंग ठाकूर — अंगणवाडी सेविका
७. सौ. माधुरी शेलार — न्यायदान क्षेत्र (वकिली व्यवसाय)
८. सौ. ज्योती गणेश पाटील — शिक्षण क्षेत्र
९. सौ. रोहिणी प्रकाश जाधव — पोलीस प्रशासन.

No comments:

Post a Comment

*मैत्री माणुसकी प्रतिष्ठान आणि उत्तम क्लिनिकचे पहिले मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी‌ !

*मैत्री माणुसकी प्रतिष्ठान आणि उत्तम क्लिनिकचे पहिले मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी* घाटकोपर येथे ६० जणांनी घेतला आरोग्य तपासणीचा लाभ; २५ म...