दसऱ्याच्या मुहूर्तावर निर्माल्य खत प्रकल्पाचे आधुनिकीकरण; महिन्याला ५ टन कंपोस्ट खत निर्मिती !!
*डोंबिवली, राजू नलावडे :* एमआयडीसी निवासी मधील श्री गणेश मंदिर संस्थानच्या निर्माल्य खत प्रकल्पाचे नूतनीकरण आणि आधुनिकीकरण करण्यात आले आहे.
या प्रकल्पासाठी काही दानशूर व्यक्तींनी खत बनविण्यासाठी तीन आधुनिक मशिन्स दिल्या असून, आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर त्यांचे विधिवत पूजन करून निर्माल्यापासून खत बनविण्यास सुरुवात झाली. यामुळे या प्रकल्पाची सेंद्रिय कंपोस्ट खत बनविण्याची क्षमता तीन टनांवरून पाच टनांवर गेली आहे. तयार झालेले कंपोस्ट खत माफक, सवलतीच्या दरात नागरिकांना आणि संस्थांना दिले जाते.
या खत प्रकल्पात रोज अंदाजे १२०० ते १५०० किलो निर्माल्य येते. यावर्षी गणपती उत्सवादरम्यान विसर्जन स्थळांवरून सुमारे ७५ मेट्रिक टन निर्माल्य आले होते, त्यामुळे खत निर्मितीचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. आता तीन नवीन मशिन्स आल्याने प्रकल्पावरील भार कमी होणार आहे.
या प्रकल्पाबाबत आणि नवीन मशिन्सबाबत पर्यावरण तज्ज्ञ आणि प्रकल्पाचे सल्लागार विजय घोडेकर यांनी माहिती दिली. हा प्रकल्प पर्यावरणपूरक असून निर्माल्यापासून कंपोस्ट खत निर्मितीत त्याचा मोठा वाटा आहे.
No comments:
Post a Comment