Thursday, 15 October 2026

हिंदू खाटिक समाज आर्थिक विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजनांसाठी अर्ज सादर करावेत

हिंदू खाटिक समाज आर्थिक विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजनांसाठी अर्ज सादर करावेत

ठाणे, प्रतिनिधी : हिंदू खाटिक समाजातील पात्र नागरिकांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. हिंदू खाटिक समाज आर्थिक विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा कार्यालय, ठाणे यांच्यामार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी विविध कर्ज योजनांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

    समाजातील गरजू घटकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणे, हा या योजनांचा प्रमुख उद्देश आहे.   

      प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजना (PM AJAY) अंतर्गत ५० टक्के अनुदान योजना, बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना तसेच राष्ट्रीय महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना घेता येणार आहे.

    ५० टक्के अनुदान योजना (PM AJAY) अंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंतच्या प्रकल्पासाठी प्रकल्प किमतीच्या ५० टक्के, कमाल २५ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते. उर्वरित रक्कम बँकेमार्फत उपलब्ध करून दिली जाते. बँक कर्जावरील व्याजदर आणि परतफेडीच्या अटी बँकेच्या नियमानुसार असतील. कर्जाची परतफेड सर्वसाधारणपणे तीन वर्षांत करावी लागते.

   बीज भांडवल योजनेंतर्गत ५०,००१ ते पाच लाख रुपयांपर्यंतच्या प्रकल्पांसाठी आर्थिक सहाय्याची तरतूद आहे. प्रकल्प किमतीच्या २० टक्के बीज भांडवल महामंडळामार्फत चार टक्के वार्षिक व्याजदराने देण्यात येते. या रकमेत PM AJAY अंतर्गत मिळणाऱ्या कमाल ५० हजार रुपयांच्या अनुदानाचा समावेश असल्याचे योजनेच्या तपशिलात नमूद आहे. उर्वरित ७५ टक्के रक्कम बँकेमार्फत कर्ज स्वरूपात दिली जाते, तर लाभार्थ्याला पाच टक्के स्वतःचा सहभाग भरावा लागतो. महामंडळ व बँकेच्या कर्जाची परतफेड निर्धारित मासिक हप्त्यांनुसार तीन ते पाच वर्षांच्या कालावधीत करावी लागते.

   थेट कर्ज योजनेंतर्गत एक लाख रुपयांपर्यंतच्या प्रकल्पासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध आहे. यामध्ये महामंडळाचा सहभाग ४५ हजार रुपये, PM AJAY अंतर्गत नियमानुसार ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान आणि अर्जदाराचा स्वतःचा सहभाग पाच हजार रुपये असा तपशील देण्यात आला आहे. या योजनेतील कर्जावर चार टक्के वार्षिक व्याजदर आकारण्यात येतो.

      राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (NSFDC), नवी दिल्ली यांच्या विविध योजनाही महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येतात. अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना लघुउद्योग, व्यवसाय आणि शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे हा या योजनांचा उद्देश आहे. या योजनांची पात्रता, कर्जमर्यादा आणि इतर अटींबाबत जिल्हा कार्यालयातून माहिती घेता येईल.

     इच्छुक लाभार्थ्यांनी आपले कर्ज मागणी अर्ज हिंदू खाटिक समाज आर्थिक विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा कार्यालय, ठाणे येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी 

कार्यालयाचा पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दत्तवाडी, श्री स्वामी समर्थ मठासमोर, सह्याद्री शाळेजवळ, दुसरा मजला कळवा, जिल्हा ठाणे.
संपर्क क्रमांक : 022- 25408478
ई-मेल :  mpphulethane@gmail.com
dm.thane@mpbcdc.in
  येथे संपर्क साधावा.

     विविध योजनांची सविस्तर माहिती, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि पात्रतेच्या अटी जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहेत. त्यामुळे इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित योजनेच्या अटींची माहिती घ्यावी आणि निर्धारित मुदतीत अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित यांची उप कंपनी हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मर्यादित च्या जिल्हा व्यवस्थापक श्रीमती रितिका पेडणेकर यांच्याकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

डोंबिवली स्टेशन परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईत कसूर; पथक प्रमुख कादर रेवडी निलंबित !

डोंबिवली स्टेशन परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईत कसूर; पथक प्रमुख कादर रेवडी निलंबित ! *डोंबिवली, विनोद गिरी :* दि. 16 ऑक्ट...