नवीनकुमार कारेमोरे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान !!
*कोल्हापूर, प्रतिनिधी : शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय व बहुमोल कामगिरीची दखल घेत राजर्षी शाहूनगर मनपा हिंदी शाळा तसेच विज्ञान कुतूहल भवन, मुंबई येथील प्रशिक्षित शिक्षक श्री. नवीनकुमार सेवकराम कारेमोरे यांना 'राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2026' ने सन्मानित करण्यात आले.
आनंदगंगा फाउंडेशन, मिणचे, कोल्हापूरच्या वतीने रविवार, दि. 4 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथील संजय घोडावत युनिव्हर्सिटीच्या सेमिनार हॉल, अतिग्रे, ता. हातकणंगले येथे भव्य पुरस्कार सोहळा पार पडला.
महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांना 'राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार' आणि आदर्श भावी पिढी घडविणाऱ्या शाळांना 'आदर्श शाळा पुरस्कार' या सोहळ्यात प्रदान करण्यात आले.
या सोहळ्याचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक तथा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक डॉ. गोविंद नांदेडे यांनी भूषविले. त्यांच्याच हस्ते कारेमोरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि.प. कोल्हापूरच्या अर्थ व शिक्षण समितीच्या सभापती सौ. शितल यादव, सभापती प्रविण यादव, संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर प्रा. डॉ. विराट गिरी, यशवंत व्यसनमुक्ती केंद्र शिराळाच्या संचालिका डॉ. साधना पाटील उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंदगंगा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. तानाजी पवार यांनी केले, तर सूत्रसंचालन श्री. नवीनकुमार कारेमोरे व दीपाली भोसले यांनी केले.
वृत्त - विनोद गिरी (डोंबिवली)
No comments:
Post a Comment