Tuesday, 20 October 2026

बीपीसीएल घरगुती गॅस सुरक्षा तपासणीच्या नावाखाली ग्राहकांची लूट थांबवा; पंचायत समिती सदस्य कविता रूपेश पाटील यांचे प्रशासनाला आवाहन !!

बीपीसीएल घरगुती गॅस सुरक्षा तपासणीच्या नावाखाली ग्राहकांची लूट थांबवा; पंचायत समिती सदस्य कविता रूपेश पाटील यांचे प्रशासनाला आवाहन !!

उरण दि १९, (विठ्ठल ममताबादे) : बीपीसीएल घरगुती गॅस धारक ग्राहकांच्या गैस जोडणीची सुरक्षा मोहीम सुरू आहे . त्यासाठी बीपीसीएल गॅस वितरक व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या पत्राआधारे वितरकाकडून  जी सरसकट लूट सुरू आहे ती तत्काळ थांबवावी. वितरकाने तपासणी शुल्क माफ करावे तसेच ग्राहकांना आधी घरपोच सिलेंडर सेवेचे पालन करावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उरण पंचायत समितीच्या सदस्या कविता रूपेश पाटील यांनी प्रशासनाकडे केली आहे. तसेच ग्राहकांनी तपासणी शुल्क न भरण्याचे आवाहनही बीपीसीएल गॅस धारक ग्राहकांना केले आहे.

बीपीसीएल घरगुती गॅस वितरकाकडून  गॅस जोडणी सुरक्षा तपासणीची सरसकट २३६ रुपये शुल्क आकारले जात असून   रबरी नळी व अन्य उपकरणांसाठीही अतिरिक्त शुल्क सुरू आकारले जात असल्याचे काही ग्राहकांनी पंचायत समिती सदस्य कविता पाटील यांच्या निदर्शनास आणले होते. याबाबत उरण तहसीलदार उद्धव कदम यांना संपर्क केला असता त्यांनी याबाबत माहिती नसल्याचे उत्तर देत पुरवठा अधिकाऱ्यांशी बोलून घेतो असे सांगितले. भारत पेट्रोलियमचे विक्री अधिकारी राहुलकुमार कन्नोजिया यांना संपर्क करून हे शुल्क ग्राहकांना माफ करावे असे सांगितले. त्यांनी सुरक्षतेची ही तपासणी दर पाच वर्षात एकदा होते जी अनिर्वाय आहे. शुल्क माफी करण्याबद्दलची आपली विनंती पेट्रोलियम मंत्रालयाला निश्चित कळवू असे सांगितले. 

महागाई आणि सिलेंडरच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण आहेत. त्यात सुरक्षा तपासणीच्या नावाखाली आणखी लूट कशाला हवी. विमा सुरक्षा कवच म्हणून प्रत्येक ग्राहकांकडून पैसे घेतले जात असताना सशुल्क तपासणी केली नाही म्हणून विमा नाकारण्याची भीती घालणे योग्य आहे का ?  वस्तुतः ही सुरक्षा तपासणी गॅस उत्पादक बीपीसीएलने आपल्या वितरकाकडून ग्राहकांना मोफत द्यायला हवी.  जोडणी दिल्यानंतर ठरावीक काळासाठी उपकरणांची हमी वितरकाने घेतली पाहिजे. ती नादुरुस्त किंवा निकृष्ट असतील तर त्याची सर्वस्वी जबाबदारी वितरकांचीच पाहीजे. मुदतबाह्य रबरी पाइप, होज पाईप, रेग्युलेटर इत्यादी साठीचे शुल्क आकारणी समजू शकतो परंतु सर्व ग्राहकांकडून सुरक्षा तपासणीच्या नावाने सरसकट शुल्क आकारणी योग्य नाही ती त्वरीत थांबवावी अशी मागणी प्रशासनाला कविता पाटील यांनी केली आहे. तसेच जनतेला सुरक्षा तपासणी शुल्क न भरण्याचे आवाहन केले आहे. शिवसेनेचे  एड. पर्जन्य म्हात्रे, कोप्रोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच नीरज पाटील, विपुल म्हात्रे,, सामाजिक कार्यकर्ते निलेश म्हात्रे यांनी तपासणी पथकाला विरोध दर्शविला शुल्क भरू नये असे आवाहन केले आहे .

No comments:

Post a Comment

पत्रकार उत्कर्ष समिती तर्फे उरण मध्ये "नवदुर्गा सन्मान सोहळा" उत्साहात संपन्न !!

पत्रकार उत्कर्ष समिती तर्फे उरण मध्ये "नवदुर्गा सन्मान सोहळा" उत्साहात संपन्न !! उरण दि १९, (विठ्ठल ममताबादे) : पत्रका...