Monday, 2 November 2026

जुनी पेन्शनसाठी तालुक्यात काळा दिवस ! शेकडो कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून केला निषेध !!

जुनी पेन्शनसाठी तालुक्यात काळा दिवस !!

*शेकडो कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून केला निषेध*
 
     विरार (पालघर) : दि.०२ नोव्हेंबर - शासकीय कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना बंद करण्याच्या निर्णयाला २१ वर्षे पूर्ण होत असताना, या निर्णयाच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्यावतीने सोमवारी संपूर्ण वसई तालुक्यात 'काळा दिवस' पाळण्यात आला. तालुक्यातील शेकडो शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज करत शासनाच्या पेन्शन धोरणाचा निषेध नोंदवला. जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली, अशी माहिती जुनी पेन्शन संघटनेचे पालघर जिल्हा खाजगी शाळा प्रमुख किरण गायकर यांनी दिली.

     शासनाने ३१ ऑक्टोबर २००५ रोजी जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन अंशदानावर आधारित पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शासकीय सेवेत आयुष्यभर योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वृद्धापकाळात सन्मानाने जगण्यासाठी निश्चित निवृत्तीवेतन आवश्यक असून जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी यावेळी मांडली.

प्रसिद्धीसाठी - 
श्री. किरण गायकर
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना - पालघर जिल्हा खाजगी शाळा प्रमुख (9765656180)

No comments:

Post a Comment

डोंबिवलीच्या Rule The Ropes चा नांदेडमध्ये डंका; २४ पदकांसह ऐतिहासिक कामगिरी !!

डोंबिवलीच्या Rule The Ropes चा नांदेडमध्ये डंका; २४ पदकांसह ऐतिहासिक कामगिरी !! *डोंबिवली, राजू नलावडे :* डोंबिवलीच्या Rule The ...