गोरेगाव पूर्वेत महिला विक्रेत्यावर जातीवाचक अत्याचार; रोज ३०० रुपयांच्या खंडणीसाठी टेम्पो आडवा लावून विनयभंग !!
*गोरेगाव (पूर्व) :* संतोषनगर, राहेजा नर्सरी परिसरात एका महिला विक्रेत्याला जातीवाचक आणि अश्लील शिवीगाळ करून विनयभंग आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात FIR No. 1188/2026 दाखल झाला आहे.
तक्रारदार महिला या परिसरात गेल्या दोन वर्षांपासून कपडे विक्रीचा स्टॉल लावून उदरनिर्वाह करतात. याच परिसरात फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या *आरोपी गुप्ता* याच्याशी स्टॉलच्या जागेवरून यापूर्वीही वाद झाले आहेत.
दि. २९ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता आरोपीने आपला टेम्पो (MH 47 BL 2157) महिलेच्या स्टॉलसमोर आडवा लावला आणि "इथे स्टॉल लावायचा असेल तर रोज ३०० रुपये द्यावे लागतील" अशी खंडणीची मागणी केली. महिलेने नकार देताच आरोपीने जातीवाचक आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करून धमकी दिली आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला.
यावेळी तेथे उपस्थित असलेल्या *साक्षीदार प्रमिला दाभोळकर आणि इतर दोन जणांनी* आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने त्यांच्याशीही अरेरावी केली. अखेर महिलेने १०० नंबरवर फोन करून पोलिसांना बोलावले.
या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी BNS कलम 79, 308, 351(2) आणि अॅट्रॉसिटी कायदा कलम 3(1)(r), 3(1)(s), 3(2)(va) अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल शिंदे करीत आहेत.
No comments:
Post a Comment