Wednesday, 4 November 2026

कल्याण-डोंबिवलीकरांना दिवाळीपूर्वी दिलासा; ३६ तासांची पाणी कपात २४ तासांवर, सणासुदीला कपात रद्द !!

कल्याण-डोंबिवलीकरांना दिवाळीपूर्वी दिलासा; ३६ तासांची पाणी कपात २४ तासांवर, सणासुदीला कपात रद्द !!

*कल्याण डोंबिवली दीपक इंगळे*

*कल्याण-डोंबिवली :* कल्याण-डोंबिवलीकरांसाठी दिवाळीपूर्वी आनंदाची बातमी आहे. शहरातील ३६ तासांची पाणीपुरवठा कपात आता २४ तासांवर आणण्यात आली असून दिवाळीच्या सणासुदीच्या काळात ही कपात रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

पावसाळ्यानंतर कमी पाऊस, एल-निनोचा प्रभाव आणि मान्सूनने लवकर माघार घेतल्यामुळे बारवी धरणातील पाणी साठ्याचे ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत नियोजन करण्यासाठी शासन निर्णयानुसार पाणी कपात करण्याचे नियोजित होते. मात्र ऐन दिवाळीत ही कपात महिलांना, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना त्रासदायक ठरणार असल्याची बाब लक्षात घेऊन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती.

दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी उद्योगमंत्री उदय सामंत यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या उपस्थितीत शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, महापौर हर्षाली थविल, अरुण आशान, राजेश कदम, गजानन पाटील, प्रभाकर जाधव आदी उपस्थित होते. ही मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती.

या निवेदनाची तातडीने दखल घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक निर्णय घेत पाणी कपात कमी करण्यास आणि सणाच्या काळात रद्द करण्यास मान्यता दिली.

या जनहिताच्या निर्णयाबद्दल उद्योगमंत्री उदय सामंत आणि सहकार्याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment

कल्याण-डोंबिवलीकरांना दिवाळीपूर्वी दिलासा; ३६ तासांची पाणी कपात २४ तासांवर, सणासुदीला कपात रद्द !!

कल्याण-डोंबिवलीकरांना दिवाळीपूर्वी दिलासा; ३६ तासांची पाणी कपात २४ तासांवर, सणासुदीला कपात रद्द !! *कल्याण डोंबिवली दीपक इंगळे* ...