Wednesday, 4 November 2026

बी. के. बिर्ला स्कूलच्या अब्दुल राफे राठोडची किक बॉक्सिंगमध्ये चमक; जिल्हास्तरीय स्पर्धेत कांस्यपदकाला गवसणी !!

बी. के. बिर्ला स्कूलच्या अब्दुल राफे राठोडची किक बॉक्सिंगमध्ये चमक; जिल्हास्तरीय स्पर्धेत कांस्यपदकाला गवसणी !!

*कल्याण डोंबिवली दीपक इंगळे*

*कल्याण, दिनांक ०३ नोव्हेंबर २०२६* कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत बी. के. बिर्ला स्कूलचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अब्दुल राफे राठोड याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कांस्यपदक पटकावले आहे. त्याच्या या यशामुळे ठाणे जिल्ह्यासह कल्याण-डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील खेळाडूंनी सहभाग घेत आपले क्रीडा कौशल्य दाखवले. चुरशीच्या लढतींमध्ये अब्दुल राफे राठोड याने आत्मविश्वास, जिद्द आणि उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तृतीय क्रमांक मिळवला आणि कांस्यपदकावर आपले नाव कोरले.

स्पर्धेतील यशानंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते अब्दुल राफे राठोड याला कांस्यपदक प्रदान करून गौरव करण्यात आला.

अब्दुल राफेच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे बी. के. बिर्ला स्कूलचाही गौरव वाढला आहे. त्याच्या यशाबद्दल शाळेचे शिक्षक, पालक, मित्रपरिवार आणि क्रीडाप्रेमींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून भविष्यातही असेच यश संपादन करावे, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

No comments:

Post a Comment

कल्याण-डोंबिवलीकरांना दिवाळीपूर्वी दिलासा; ३६ तासांची पाणी कपात २४ तासांवर, सणासुदीला कपात रद्द !!

कल्याण-डोंबिवलीकरांना दिवाळीपूर्वी दिलासा; ३६ तासांची पाणी कपात २४ तासांवर, सणासुदीला कपात रद्द !! *कल्याण डोंबिवली दीपक इंगळे* ...