*मुंबई, पी. डी. पाटील :* कांजूरमार्ग (पूर्व) येथील वरची पाखाडी येथे बाळ गोपाल मित्र मंडळ - (राजांचे मावळे) यांच्यावतीने दिवाळी सणाचे औचित्य साधून ऐतिहासिक देखावा साकारण्यात आला आहे.
हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला किल्ले रायगड, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसा दिमाखात उभा होता, त्याच ऐतिहासिक वैभवाची अनुभूती देण्याचा सुंदर प्रयत्न मंडळाच्या मावळ्यांनी केला आहे.
रायगडावरील ऐतिहासिक वास्तू, स्वराज्याचा अभिमान आणि शिवकालीन इतिहासाची आठवण करून देणारी ही भव्य प्रतिकृती पाहण्यासाठी शिवप्रेमींची गर्दी होत आहे.
No comments:
Post a Comment