डोंबिवली, राजू नलावडे
डोंबिवली एमआयडीसी निवासी मधील शिवप्रतिमा मित्र मंडळाचे सभासद आणि त्यांच्या कुटुंबीयांचे शैक्षणिक शिबिर हे रविवार दिनांक 15/11/2026 रोजी वांगणी येथील पार्वती आंगण फॉर्म व कृषी पर्यटन केंद्रात संपन्न झाले. या शिबिराला एकूण 35 जणांनी हजेरी लावली होती. हे सर्वजण एका खाजगी बसने निघून सकाळी 09.30 वाजता वांगणी येथील पार्वती आंगण फॉर्म व कृषी पर्यटन केंद्रात पोहचल्यावर नाश्ता/चहा झाल्यावर या कृषी पर्यटन केंद्रात असलेल्या विविध झाडांची ओळख या फार्मचे मालक श्री अविनाश बनोटे यानी करून दिली. मुख्यते येथे विविध जातीचे आंबे, फणस, काजू, चिकू, नारळ इत्यादी झाडे लावली गेली असल्याने आपण कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर आलो नाही ना असे वाटते. विशेष म्हणजे येथील सर्व झाडे सेंद्रिय खते वापरून वाढवली गेली आहेत. या झाडांचे संगोपन, फळांची विक्री कशी होते याची माहिती अविनाश बनोटे यानी दिली. या फार्म मध्ये काम करण्यासाठी आणि फळांच्या विक्रीतून येथील आदिवासी जमातीला व स्थानिक तरुणांना रोजगार मिळतो असे त्यानी सांगितले. शिवाय शिवप्रतिमा मित्र मंडळाच्या सभासद आणि त्यांच्या कुटुंबीयांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यानी नीट समजावून सांगितली. यानंतर काहींनी तेथे असलेल्या स्विमिंग पूल आणि म्युझिक रेन डान्स याचा आनंद घेतला तर काहींनी या फार्म वर चालत फेरफटका मारून नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेतला. दुपारी दोन वाजता चवीष्ट शाकाहारी/मांसाहारी भोजनाचा आस्वाद घेतल्यावर आराम करून या फार्म व कृषी पर्यटन केंद्राची इतर माहिती घेतली. सर्वजण सायंकाळी साडेपाच वाजता चहा घेऊन परत डोंबिवलीला येण्यास निघाले.
या शैक्षणिक आणि कृषी पर्यटन शिबिर मध्ये श्री दिलीप साळवी, सौ रजनी कुचे, जयसिंग आयरे, विजय कुलकर्णी, मंदार स्वर्गे, निहाल आंबेरकर या पदाधिकाऱ्यांनी तर भालचंद्र म्हात्रे, प्रभाकर चौधरी, राजू नलावडे, भरत सावंत, मनोहर पाटील, कृष्णा जाधव, विनोद खानविलकर, विनोद रूपवते, तुषार देवकुळे, सखाराम नांदगावकर, श्वेता मयेकर, विनिता सावंत, माया प्रताप , जयश्री मांडवकर, स्वाती शिंदे व इतरांनी सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment