*डोंबिवली (एमआयडीसी निवासी) :* मिलापनगर येथे भूखंड क्रमांक आर.एल. ७३ बंगलो समोर आणि डॉ. यू. प्रभाकर राव स्पोर्ट्स अकॅडमी जवळ असलेला स्ट्रीट लाईट पोल एका वाहनाच्या धडकेत वाकून तिरपा झाला आहे. तो केव्हाही पडून एखादी मोठी दुर्घटना होऊ शकते.
या घटनेला तीन दिवस होऊन गेले असून याबद्दल केडीएमसी स्ट्रीट लाईट देखभाल-दुरुस्ती विभागाला कळवूनही अद्याप यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही.
याच ठिकाणी स्पोर्ट्स अकॅडमी असल्याने लहान मुले, तरुण मुले येथून सतत जात-येत असतात. शिवाय या अंतर्गत रस्त्यावर वाहने व लोकांची वर्दळ दिवसभर चालू असते. त्यामुळे केडीएमसी प्रशासनाने त्वरित या पोलची दुरुस्ती करून तो सुरक्षित राहील अशी व्यवस्था करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment