*चोपडा, प्रतिनिधी :* चोपडा येथे आयोजित मराठा प्रीमियर लीग (MPL) पर्व ४ क्रिकेट स्पर्धेचा उत्साहपूर्ण वातावरणात दिमाखदार समारोप झाला. विविध संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत क्रिकेटप्रेमींची मने जिंकली.
अंतिम सामन्यात व्हेरिटो इंजिनिअरिंग संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले, तर ग्रीन ग्लोब बायो टेक्नॉलॉजी संघ उपविजेता ठरला.
*स्पर्धेतील विजेत्या संघांचा क्रम :*
*🥇 प्रथम क्रमांक – व्हेरिटो इंजिनिअरिंग*
संघ मालक – श्री. भूषण बाविस्कर
*🥈 द्वितीय क्रमांक – ग्रीन ग्लोब बायो टेक्नॉलॉजी*
संघ मालक – ॲड. रुपेश पाटील
*🥉 तृतीय क्रमांक – प्रगती हॉस्पिटल*
संघ मालक – डॉ. अमोल पाटील
*🏅 चतुर्थ क्रमांक – राजे संभाजी मित्र मंडळ*
संघ मालक – प्रा. दिव्यांक सावंत
*उद्घाटन आणि बक्षीस वितरण*
स्पर्धेचा उद्घाटन सोहळा खासदार पद्मश्री ॲड. उज्वल निकम, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, महाराष्ट्र पणन महासंघाचे अध्यक्ष रोहित निकम, ॲड. अनिकेत निकम, मुख्य प्रायोजक वसंतराव पाटील, म. गांधी शिक्षण संकुलाच्या सचिव स्मिताताई पाटील, विजय पाटील, नायब तहसीलदार योगेश पाटील, पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्यासह सर्व प्रायोजक व सहप्रायोजक यांच्या उपस्थितीत पार पडला.
बक्षीस वितरण समारंभ गुरुवार, दि. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ९ वाजता आयोजित करण्यात आला होता. यासाठी प्रमुख प्रायोजक म्हणून घुमावल बुद्रुकचे लोकनियुक्त सरपंच मा. भैय्यासो. श्री. वसंतराव प्रेमराज पाटील यांनी सहकार्य केले. तर जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी मा. श्री. निलेश देविदास पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पंकज शिंदे यांनी केले.
MPL पर्व ४ च्या माध्यमातून चोपडा परिसरातील खेळाडूंना आपले क्रीडाकौशल्य दाखविण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळाले. क्रिकेटच्या माध्यमातून संघभावना, एकजूट, खिलाडूवृत्ती आणि सामाजिक सलोखा यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.
विजेत्या व्हेरिटो इंजिनिअरिंगसह सर्व संघांचे आणि सहभागी खेळाडूंचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. MPL च्या माध्यमातून चोपड्याच्या क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा आणि नवी दिशा मिळत असून आगामी पर्वांसाठीही क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
No comments:
Post a Comment