Tuesday, 2 February 2021

मुरबाड येथील टेक्नो कंपनी मधील कामगारांना न्याय द्या- "कृष्णकांत तुपे"

मुरबाड येथील टेक्नो कंपनी मधील कामगारांना न्याय द्या- "कृष्णकांत तुपे"


मुरबाड, (मंगल डोंगरे) :
मुरबाड तालुक्यातील टेक्नो क्राफ्ट  कंपनीमधील कामगार दिनांक २० डिसेंबर २०२० पासून भारतीय ट्रेड युनियन यांच्या नेतृत्वाखाली उपोषणास बसले आहेत आज गेले च्याळीस दिवस उपोषण चालू आहे सदर उपोषणाला महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष यांचा मुरबाड दौऱ्यावर असताना कृष्णकांत तुपे यांच्या निवेदनाची दखल घेऊन उपोषणस्थळी भेट दिली व कामगारांचे  म्हणणे ऐकून तात्काळ मुरबाड तहसीलदार अमोल कदम यांना संपर्क करुन कारवाईचे आदेश दिले त्यानुसार अमोल कदम यांनी बैठक ठेवली परंतु बैठकी मध्ये कोणताही ठोस निर्णय न झाल्यामुळे तालुका काँग्रेस अध्यक्ष श्री कृष्णकांत तुपे  यांनी विधान भवनात जाऊन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची भेट घेऊन कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी व 54  कामगारांना कामावर रुजू करून घेण्यासाठी निवेदन व  चर्चा केली त्याची दखल घेऊन विधानसभा अध्यक्ष नामदार श्री.नानाभाऊ पटोले साहेब  यांनी विधानभवन येथे मंगळवार  दिनांक 2/2/21रोजी तात्काळ बैठक बोलावली व तात्काळ कंपनी प्रशासनावर कार्यवाही करून संबधीत प्रशासकीय अधिकाऱ्यांना कामगारांना कामावर रुजू करून  न्याय देण्याकरता आदेश दिले सदर चर्चा करताना श्री. कृष्णकांत तुपे मुरबाड तालुका अध्यक्ष काँग्रेस कामगार प्रतिनिधी कराळे ,मदन तरे, भरत दळवी. रुपेश भोइर, जिल्हाधिकारी ठाणे, कामगार आयुक्त, वन विभाग अधिकारी ठाणे हे विधान भवन येथे उपस्थित होते.

जंगलाला लागलेल्या आगित झोपडी खाक ! ! **वनकर्मचारी जखमी **

जंगलाला लागलेल्या आगित झोपडी खाक ! !     **वनकर्मचारी जखमी ** 


मुरबाड - (मंगल डोंगरे) :  मुरबाड तालुक्यातील आस्कोत गावच्या जंगलाला लागलेल्या आगित आदिवासीची झोपडी जळून खाक झाली आहे. तर एक मेंढी भस्म झाली असून 'आग विझवताना महिला वन कर्मचारी' भाजल्याने  त्या दवाखान्यात उपचार घेत आहेत.

 
             संगम आस्कोत गावच्या जंगलात आदिवासींच्या झोपड्या आहेत त्यातील शंकर सेवक मुकणे आपल्या झोपडीत राहत होता. अचानक जंगलाला लागलेल्या आगित त्याच्या झोपडीसह एक मेंढी जळून भस्म झाली असून, घरातील पाच माणसे सुरक्षित आहेत. वनवा इतरञ पसरू नये म्हणून महिला वनकर्मचारी "अल्पना घोलप" या आग विझवताना भाजल्या असल्याने त्यांना दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आल्याची माहिती मिळते.

             मुरबाड तालुक्यात दरवर्षी मोठ्याप्रमाणात वनवे लागून प्राणी, वनसंपदा व छोटी रोपटी नष्ट होत असते. शासन वृक्ष लागवडीसाठी व सर्वंधानासाठी लाखो रुपये खर्च करत आहे. मग हे वनवे मानव निर्मित आहेत का ? कि अजून कशाने याचा शोध वनविभागाने घेऊन त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. अशी मागणी नागरिक करत आहेत .

पुणे शहराचे सहपोलीस आयुक्त डॉ रविंद्र शिसवे यांचे कडून एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस चे पत्रकार संजय कांबळे यांचे कौतुक!

पुणे शहराचे सहपोलीस आयुक्त डॉ रविंद्र शिसवे यांचे कडून एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस चे पत्रकार संजय कांबळे यांचे कौतुक!


कल्याण, (संजय कांबळे) : अंत्यत खडतर परिस्थितीतून मार्ग काढत शिक्षण पूर्ण करून कल्याण, मुरबाड, शहापूर, अंबरनाथ आदी तालुक्यातील ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून चमकण्याची संधी उपलब्ध करून देणा-या पत्रकार संजय कांबळे यांचे पुणे शहराचे सहपोलीस आयुक्त डॉ रविंद्र शिसवे यांनी कौतुक केले. यावेळी त्यांच्या हस्ते मराठी गाण्यांच्या अल्बम च्या पोस्टर चे अनावरण करण्यात आले.

कल्याण तालुक्यातील आपटी गावचे सुपूत्र डॉ रविंद्र शिसवे यांचे संजय कांबळे हे बालमित्र असून त्यांचे बालपण आपटी गावातच गेले, दिनेश शिसवे, आपा शिसवे, भास्कर शिसवे, भाऊ शिसवे, आणि आताचे सहपोलीस आयुक्त डॉ रविंद्र शिसवे हे यांचे बालमित्र होय. अंत्यत अडचणीच्या काळात या सर्वांनी मदत केल्याने संजय कांबळे आपले शिक्षण पूर्ण करु शकले. पुढे रविद्र शिसवे हे डाॅक्टर झाले व यानंतर आयपीएस अधिकारी.
तर कांबळे पत्रकारितेकडे वळले. गेली २०/३० वर्षे पत्रकारिता करत असताना अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक शैक्षणिक कामात लोकांना मदत केली. याची माहिती डॉ रविंद्र शिसवे यांचे पर्यंत कोणाच्या तरी माध्यमातून पोहचत होती. परंतू आपल्या कल्याण, मुरबाड, शहापूर अंबरनाथ आदी तालुक्यातील ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांना संधी उपलब्ध व्हावी म्हणून त्यांनी एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस या नावाची संस्था स्थापन करून त्यायोगे या कलाकारांना मराठी हिंदी चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अभिनेते, अभिनेत्री यांची भेट घडवून त्यांचेपासून प्रेरणा, मार्गदर्शन घेऊन काही मराठी गाणी रेकॉर्डिंग व त्यावर या नवोदित कलाकारांना घेऊन विडिओ शुट केले होते. सध्या ही गाणी पश्चिम महाराष्ट्रातील कित्येक जिल्ह्य़ातील विविध टिव्ही चॅनल वर गाजत वाजत आहेत. 
याच निमित्ताने तसेच सहपोलीस आयुक्त डॉ रविंद्र शिसवे यांना प्रशासकीय कामात उत्कट सेवा केल्याबद्दल भारताचे राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याने त्यांचे अभिनंदन करण्यासाठी पत्रकार संजय कांबळे हे सहकुटुंब डॉ रविंद्र शिसवे यांच्या निवासस्थानी व पुणे पोलीस कमिशनर कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांच्या हस्ते मराठी गाण्यांच्या अल्बमचं पोस्टरचे अनावरण करण्यात आले. जेव्हा त्यांना या प्रोजेक्ट बदल माहिती दिली तेव्हा त्यांनी टिम प्रमुख संजय कांबळे यांचे विशेष कौतुक केले. व पाठिवर" शाब्बास " अशी थाप मारली आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी 'साहेबांच्या' मातोश्री श्रीमती शुंभागी अंनता शिसवे, वडील अंनता शिसवे यांनी देखील कामांचे कौतुक केले. यावेळी पत्रकार संजय कांबळे यांच्या पत्नी सौ शितल कांबळे, मुलगा आन्शू कांबळे, बालकलाकार हिंमाशू कांबळे, कोरिओग्राफ आकाश सोरटे उपस्थित होते. 

Monday, 1 February 2021

मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश, शिवसेनेचे पक्षप्रमुख व माननीय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बांधले शिवबंधन !

मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश, शिवसेनेचे पक्षप्रमुख व माननीय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बांधले शिवबंधन !


'डोंबिवलीत मनसेला मोठा हादरा'

डोंबिवली : मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा शहराध्यक्ष तसेच राज ठाकरे यांचे जवळीक असलेले खंदे समर्थक राजेश कदम यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधित त्यांचा पक्षात प्रवेश करुन घेतला. यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि नगरसेवक राजेश मोरे उपस्थित होते. राजेश कदम यांच्यासोबत डोंबिवली मनविसे शहराध्यक्ष सागर जेधे, दिपक भोसले, राहूल गणपुले, कौस्तुभ फडके, सचिन कस्तुर, स्वप्निल वाणी, राजेश मुणगेकर आणि काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यांच्यासोबतच मनसेचे कल्याण ग्रामीणचे कार्यकर्ते अर्जुन पाटील यांनीसुद्धा प्रवेश केला. तसेच अंबरनाथ मधील भाजप नगरसेवक सुनील सोनी, तुळशीराम चौधरी, भाजप जिल्हा सरचीटणीस सरीता चौधरी, बळीराम पालांडे यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्याचे शिवसेनेच्यावतीने सांगण्यात आले. 

प्रवेश झाल्यानंतर राजेश कदम यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जो कामाचा धडाका लावलेला आहे, ते मेहनत घेत आहेत. ही जमेची बाजू वाटली, विरोधी पक्षात असताना त्यांचे काम पाहीले सुद्धा त्यामुळे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की प्रवेश करणाऱ्यांचे आम्ही स्वागत करतो. कल्याण डोंबिवली आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी शिवसेना वाढत आहे. त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी वाव दिला जाईल. आता शिवसेना राजेश कदम यांना कोणती जिमेदारी देतात हे पाहावे लागेल.

माणगांव येथील ''गो कोरोना'' या ऑनलाईन विडियो स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न !

माणगांव येथील ''गो कोरोना'' या ऑनलाईन विडियो स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न !


       बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : माणगांव तालुक्यातील आयटी कंप्युटर एज्युकेशन क्षेत्रातील सुप्रसिद्ध उद्योजक डॉ अजय आत्माराम मोरे आणि त्यांच्या सौभाग्यवती अंकिता अजय मोरे यांचे चिरंजीव कुमार जय मोरे याच्या पाचव्या वाढदिवसा निमित्त जय चे वडील डॉ अजय मोरे यांनी रविवार दिनांक ३१ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी  माणगांव येथील रिव्हरलॅन्ड रिसॉर्ट अँड लॉन्स, वाकडाई मंदिर समोर, उतेखोल गांव, येथे '' गो कोरोना '' ऑनलाईन विडियो स्पर्धा आयोजित केल्या होत्या. 
     या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व जेष्ठ समाज सेवक मा. श्री. अण्णा साबळे, माणगांव तालुका व्यापारी असोसिएशन अध्यक्ष - मा.श्री.लक्ष्मण दळवी, कारोना च्या काळात रात्रंदिवस जनतेची सेवा करणारे कर्तव्यदक्ष ट्रॅफिक पोलीस मा. श्री. विशाल येवले तसेच पुण्याहून आलेले सुप्रसिद्ध एकपात्री कलाकार मा. श्री. महेंद्र गणपुले तसेच माणगांव येथील विशेष निमंत्रित पाहुण्यांची उपस्थिती लाभली होती. 
       सदर ऑनलाईन विडियो स्पर्धेत माणगांव मधील कु.सिद्ध घाडगे (ई - आठवी), प्रथम क्रमांक, अनम सलीम शेख (ई- सातवी), द्वितीय क्रमांक आणि कु. राकेश शिकवण (पंधरावी) तृतीय क्रमांक पटकावला विजेत्यांना रोख रक्कम, ट्रॉफी, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले...
     कार्यक्रमाची सुरवात सुप्रसिद्ध एकपात्री कलाकार श्री.महेंद्र गणपुले  यांनी अनेक संमेलनात आपला गाजलेला कार्यक्रम '' हास्य नगरी '' सादर करून उपस्थित पाहुण्यांना मंत्रमुग्ध करून सुखद अनुभव दिला व टाळ्यांनी व हास्यानी दाद मिळवली, त्यानंतर प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते व विशेष आमंत्रित पाहुण्यांच्या उपस्थित गो कोरोना !... ऑनलाईन विडियो स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. 
     कार्यक्रमाच्या शेवटी डॉ.अजय आत्माराम मोरे यांच्या मोठा मुलगा कु .जय अजय मोरे याचा ५ वा वाढदिवस लहान मुलांच्या सोबत व मोरे फॅमिली सह मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला, शेवटी भोजन समारंभ कार्यक्रमाचा आस्वाद घेत माणगांव मध्ये अतिशय निसर्गरम्य ठिकाणी मुंबई व पुण्यासारख्या रिव्हरलॅन्ड रिसॉर्ट अँड लॉन्स या ठिकाणी कार्यक्रम उत्कृष्ट नियोजन, फार वेगळा व हटके कार्यक्रम पहायला मिळाल्याबदल सर्व पाहुणे व विशेष उपस्थित पाहुण्यांना एक सुखद अनुभव दिल्याची जबरदस्त प्रतिक्रिया मिळाल्या.

आमदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते गोवेले येथील मारुती मंदिर सभागृहाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न !

आमदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते गोवेले येथील मारुती मंदिर सभागृहाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न !


       बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : माणगांव महाड चे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार माननीय भरत शेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते गोवेले येथील मारुती मंदिर सभागृहाचा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत भूमीपूजन समारंभ संपन्न करण्यात आला. 
      माणगांव, महाडचे सर्वांचे लाडके लोकप्रिय कार्यसम्राट आमदार माननीय श्री भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नाने गोवेले येथील मारुती मंदिरासमोर मंजूर करण्यात आलेल्या सभागृहाचा आज दिनांक ३१ जानेवारी २०२१ रोजी आमदार भरतशेठ गोगावले माजी आमदार तुकाराम काते, माणगाव पंचायत समिती मा सभापती सुजित शिंदे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर मारुती मंदिराच्या सभागृहाचा भूमिपूजन शुभारंभ करण्यात आला. 
      यावेळी या विभागातील विभाग प्रमुख शरीफ भाई हारगे, डॉक्टर हरणेकर विभाग प्रमुख भरत कदम गोवेले ग्रामपंचायतीच्या सरपंच दिव्या जाधव शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख आणि शिवसैनिक ग्रामस्थ इत्यादी उपस्थित होते. 
      या कार्यक्रमात ग्रामस्थांच्या वतीने आमदार भरतशेठ गोगावले व माजी आमदार तुकाराम काते यांचा सन्मान करण्यात आला.

चोपड्यात नगरपालिका व रोटरी व तर्फे पोलिओ लसीकरण कार्यक्रमास सुरुवात. !

चोपड्यात नगरपालिका व रोटरी व तर्फे पोलिओ लसीकरण कार्यक्रमास सुरुवात. !


चोपडा, वार्ताहर- भारतात राष्ट्रीय पोलिओ लसीकरण कार्यक्रम रविवारी, 31 जानेवारी 2021 पासून सुरू करण्यात आला त्या अनुषं गाने नगरपरिषद रुग्णालय चोपडा येथे सकाळी 8.00 वाजता काही मुलांना पोलिओ थेंब देऊन नगराध्यक्षा सौ. मनीषा ताई चौधरी यांच्या हस्ते तसेच आरोग्य सभापती सौ सुप्रिया सनेर, रोटरी अध्यक्ष नितीन अहिरराव, डॉ चंद्रकांत बारेला वैद्यकीय अधिकारी न.पा.चोपडा यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरूवात झाली.  
सदर लसीकरण कार्यक्रम 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाईल .
पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम म्हणून ओळखल्या जाणार्‍या राष्ट्रीय लसीकरण दिन (एनआयडी) यापूर्वी 17 जानेवारीपासून ठरविण्यात आला होता परंतु देशभरातील कोरोनव्हायरस लसीकरण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांची पोलिओ लसीकरण मोहीम १ जानेवारीपासून सुरू होऊन ती २ फेब्रुवारीपर्यंत चालु राहील यात वय वर्ष 0 ते 5 वयोगटातील मुलांना पोलिओ थेंब दिले जातात. पोलिओ लसीकरण कार्यक्रम वर्षातून दोनदा घेण्यात येतो, सहसा सुरुवातीच्या महिन्यात. नियमीत पोलिओ लस प्रत्येक जन्माच्या वेळी एकदा, 6 आठवड्यात, १० आठवड्यात आणि 14 आठवड्यांनी दिली जाते आणि त्यानंतर वयाच्या 5 वर्ष पर्यंत आवश्यक असल्यास अधिक दिले जाते.
पोलिओ रविवार म्हणून ओळखल्या जाणार्‍या पल्स पोलिओ कार्यक्रमाची सुरुवात रविवारी होते, ज्याला राष्ट्रीय लसीकरण दिन देखील म्हटले जाते.
शासनाचा कोविड  प्रोटोकॉल  प्रमाणे शारीरिक अंतर, फेस मास्क आणि हँडवॉशिंग सारखे सावधगिरीचे उपाय बाळगून पोलिओ लसीकरण मोहीम आयोजित केली त्यात चोपडा रोटरी चे सचिव रुपेश पाटील, एम डब्लू पाटील, चंद्रशेखर साखरे, भालचंद्र पवार, आशिष जैस्वाल सोबत फार्मासिस्ट अजय जयस्वाल, लॅब टेक्नीशियन पल्लवी देशमुख, कीर्ती महाजन, अधीपरिचालक सचिन शिंदे, फार्मासिस्ट नदीम शेख तसेच सर्व आशा वर्कर्स, बूथ वरील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर ....

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर .... *चाळीसगाव, दि. ११ सप्टेंबर २०२६ :* ...