Friday, 2 August 2024

खादी महोत्सवानिमित्त सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रदर्शनाचे आयोजन !!

खादी महोत्सवानिमित्त सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रदर्शनाचे आयोजन !!

पुणे, प्रतिनिधी :  खादी वस्त्राला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी तसेच खादीचा प्रचार व वापर वाढविण्यासाठी महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांतर्गत ५ ते ९ ऑगस्ट २०२४ या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे खादी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस. आर. खरात यांनी कळविले आहे.

परदेशी मालाचा बहिष्कार करुन असहकार चळवळ ७ ऑगस्ट १९०५ पासून खादी उत्पादन व वापराची मोहिम सुरू झाली. या कारणामुळे ७ ऑगस्ट २०१५ पासून भारत सरकारच्यावतीने आंतरराष्ट्रीय ‘खादी व हातमाग दिवस’ पाळण्यात येतो. या दिनानिमित्त आयोजित खादी महोत्सवात खादी कापड, राष्ट्रध्वज व मंडळाच्या महाबळेश्वर येथील शुद्ध व सेंद्रिय मध उपलब्ध होणार आहे. सर्व नागरिकांनी सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. खरात यांनी केले आहे.

दृष्टीहिन मुलींसाठी धनंजय गावडे बनले देवदुत....

दृष्टीहिन मुलींसाठी धनंजय गावडे बनले देवदुत....

नालासोपारा, प्रतिनिधी :- आपण समाजामध्ये अनेक दिव्यांग व्यक्ती पाहतो. अंध, मूकबधीर, हात किंवा पायाने अधू असलेला अनेक व्यक्ती समाजात आजूबाजूला वावरताना दिसतात. त्यांचं जगणं सर्वसामान्यांसारखं नसतं. अपंगत्वावर मात करुन त्यांना समाजात राहायचं असत नालासोपारातील दृष्टीहीन आदिती केकाणे व यशस्वी शेट्ये या दोन्ही मुलींना शाळेतील प्रवेशासाठी दिव्यांग प्रमाणपत्राची नितांत गरज होती अनेक वर्ष प्रयत्न करून हि दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यास अडचण येत होती. याबाबत स्वराज अभियान अध्यक्ष धनंजय गावडे यांना सांगताच त्या दोन्ही मुलींना दिव्यांग प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आले. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अडचणीच्या वेळी केलेल्या मदतीचे समाजातुन कौतुक होत आहे. ही मदत नक्कीच सर्वांना प्रेरणा देणारी आहे.
दिव्यांग व्यक्तींना दररोज विविध समस्यांना सामोरे जावे लागते.
दिव्यांग नागरिकांना सर्वसामान्य नागरिकांच्या तुलनेत मिळणाऱ्या सोयी सुविधांकडे दुर्लक्ष केले जातं. असं असताना  दिव्यांग बांधवांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहुन 
दिव्यांगानाही सक्षम करून त्या मुख्यजजग प्रवाहात आणण्यासाठी मदत करणार असल्याचे स्वराज अभियान अध्यक्ष धनंजय गावडे यांनी आपली भावना व्यक्त केली.
यावेळी शिवसेना महिला तालुका संघटक अश्विनी चव्हाण, महिला शहरप्रमुख रूचिता नाईक, शहरप्रमुख रोहन चव्हान उपस्थित होते.

कल्याण मधे होर्डिंग्ज दुर्घटना !!!

कल्याण मधे होर्डिंग्ज दुर्घटना !!

*** प्रहार संघटनेचे अध्यक्ष ॲड स्वप्नील पाटील यांचे ठिय्या आंदोलन 


कल्याण, प्रतिनिधी : मुंबईतील घाटकोपरमध्ये काही महिन्यांपूर्वींच एक भलंमोठं होर्डिंग कोसळून अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच आज (2 ऑगस्ट) कल्याण येथील सहजानंद चौकात एक भलं मोठं होर्डिंग थेट उभ्या असलेल्या गाड्यांवर कोसळले यात अनेक दोन चाकी, ऑटो रिक्षा तर चार चाकी वाहनांचे नुकसान झाले तसेच यावेळी तीन जणं जखमी सुध्दा झाले आहेत. 


अपघाताची माहिती मिळताच प्रहार संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्निल पाटील यांनी दुर्घटना स्थळांची पाहणी करून घाटकोपर येथील घटना ताजी असताना कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा दाखवित कोणतीही काळजी घेतली नाही, 


महापालिका आयुक्त यांनी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार अवैध होर्डिंग्ज ची तपासणी करणे तसेच त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून संबंधित दोषी व्यक्तींवर तात्काळ कारवाई करणे आवश्यक होते. तरीपण आता आपण घडलेल्या घटनेची तात्काळ दखल घेत संबंधितांवर कठोर कारवाई करावी.


यावेळी प्रहार पक्ष ठाणे जिल्ह्यातर्फे या घटनेचा निषेध करत अतिरिक्त आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन केले व निवेदन दिले यावेळी जिल्हा पदाधिकारी, कल्याण तालुका प्रतिनिधी तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते, आंदोलनात राष्ट्रकल्याण पार्टीचे अध्यक्ष शैलेश तिवारी, कॉग्रेसच्या कल्याण जिल्हाध्यक्ष कांचनताई कुलकर्णी व त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.




आंगवली मधील आरोग्य उपकेंद्र (आंगवली) येथे सी.एच.ओ पदी डॉ.सौ. पूनम चंद्रकांत सुवारे यांची शासनातर्फे नियुक्ती !!

आंगवली मधील आरोग्य उपकेंद्र (आंगवली) येथे सी.एच.ओ पदी डॉ.सौ. पूनम चंद्रकांत सुवारे यांची शासनातर्फे नियुक्ती !!

कोकण (शांताराम गुडेकर) :

        रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या मु. पो.आंगवली मधील आरोग्य उपकेंद्र (आंगवली) येथ प्रथमच नव्याने (सी.एच.ओ) पदी डॉ.सौ. पूनम चंद्रकांत सुवारे (पूनम प्रथमेश सुर्वे) यांची शासनाने नियुक्ती केली असून त्यांनी आपला पदभार सोमवारी स्वीकारला. आज त्यांचे स्वागत सामाजिक कार्यकर्ते/पत्रकार युयुत्सु आर्ते आणि आंगवली गावातील निर्भीड पत्रकार संदीप गुडेकर यांनी केले. त्यांना यानिमित्ताने  शुभेच्छा दिल्या. या उपकेंद्रमध्ये आता गोळ्या औषधे उपलब्ध आहेत. टीबी किंवा तर आजारावर इलाज उपलब्ध आहेत. आता फक्त इंजेकशन, सलाइन, एक्स-रे, आदी सेवा तात्काळ शासनाने उपलब्ध करून करून द्यावेत. यासाठी शासनाने, लोकप्रतिनिधी यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करावा. याबाबत आज चर्चा करण्यात आली. आमसभामध्ये या बाबत मागणी करण्यात येणार असून त्याचा फायदा आंगवली -सोनारवाडी, बोडये, कासार कोळवण, मारळ, बामणोली, ओझरे बुद्रुक या गावातील रुग्णांना फायदा होईल त्यामुळे निवे खुर्द येथे जाण्याचा प्रवास खर्च, वेळ, पायपीट थांबणार असल्यामुळे या गावातील लोकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी आरोग्य केंद्र मदतनीस मानसी अणेराव, आरोग्यसेविका सौ.स्नेहल सुर्वे, आशा सौ.यशश्री शिंदे, आरोग्यसेविका खेडकर आदी  कर्मचारी उपस्थित होते.

अजित दादा पवार यांनी शहापूर विधानसभेसाठी भरीव निधी दिल्याने मतदार संघातील विकासाला गती - आमदार दौलत दरोडा

अजित दादा पवार यांनी शहापूर विधानसभेसाठी भरीव निधी दिल्याने मतदार संघातील विकासाला गती - आमदार दौलत दरोडा 

🔸 प्रामाणिकपणे केलेल्या कामाची पोचपावती जनता नक्कीच देईल अशी आमदार दरोडा यांची ग्वाही.

वाडा, प्रतिनिधी :  राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित दादा पवार यांनी शहापूर विधानसभेसाठी भरीव निधी दिल्याने मतदार संघातील अनेक कामे मार्गी असून मतदार संघाच्या विकासाला गती मिळाली असल्याचे प्रतिपादन शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांनी केले आहे. 

वाडा तालुका राष्ट्रवादीच्यावतीने ब्लॉसम रिसॉर्ट येथे शुक्रवारी (२ ऑगस्ट) कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. 

सत्तेत सहभागी झाल्यानंतर आम्ही सुचवलेली विकास कामे अजितदादांनी मोठ्या विश्वासाने तात्काळ मंजूर केली असल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत अधिक जोमाने काम करून कार्यकर्त्यांनी अजितदादांनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवावा, असेही यावेळी बोलताना आमदार दरोडा यांनी सांगितले. तर मतदार संघात मोठ्या संख्येने विकास कामे होत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे ते खालच्या पातळीवर उतरून टीकाटिपणी व नको ते उद्योग करत आहेत. विरोधकांच्या व टीकाकरांच्या तिकेकेकडे लक्ष न देता कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली झालेली कामे पोहोचवावीत. आपण प्रामाणिकपणे केलेल्या कामाची पोच पावती जनता आपल्याला नक्कीच देईल, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.

पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी विक्रमगड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची मोठी ताकद असून हा आमचा परंपरागत मतदार संघ आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत  विक्रमगड विधानसभा राष्ट्रवादीलाच मिळावा, अशी मागणी जिल्ह्याच्यावतीने आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे केली असल्याचे प्रतिपादन यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे पालघर जिल्हा अध्यक्ष आनंद भाई ठाकूर यांनी केले आहे.
 

यावेळी राष्ट्रवादीचे पालघर जिल्हाध्यक्ष आनंदभाई ठाकूर,  कार्याध्यक्ष कमळाकर धूम,  जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा जेष्ठ कार्यकर्ते संदीप वैद्य, प्रदेश सदस्य डी. के. विशे, महिला बालकल्याण सभापती रोहिणी शेलार, ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष कल्पना तारमळे, पालघर जिल्हा युवक अध्यक्ष रोहन पाटील, जिल्हा सरचिटणीस सुरेश फडवळे, कमलजीत धानमेहेर, डहाणू तालुका अध्यक्ष विपुल राऊत मोखाडा तालुका अध्यक्ष विलास पाटील जव्हार तालुका अध्यक्ष वैभव अभ्यंकर विक्रमगड तालुका अध्यक्ष प्रकाश भोये यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वाडा तालुका अध्यक्ष जयेश शेलार यांनी मानले. तर प्रास्ताविक संपर्क अध्यक्ष नामदेव साबळे यांनी केले.

यावेळी वाडा तालुका कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांना नियुक्त पत्र देण्यात आले. तर अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. तसेच वाडा तालुक्यातील रस्त्यांसाठी व अन्य विकास कामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार दौलत दरोडा यांचे संबंधित गावातील ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी विशेष आभार मानले आहे.

Thursday, 1 August 2024

राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात 'अंधश्रध्दा निर्मूलन कक्ष' स्थापन होणार !

राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात 'अंधश्रध्दा निर्मूलन कक्ष'  स्थापन होणार !

- पोलीस महासंचालक कार्यालयाचे पत्र
- पोलीस प्रशासनाचे हे आश्वासक पाऊल अंनिसची प्रतिक्रिया

महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणेसाठी 'अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष' स्थापन करावेत असा आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाने 19 जुलै 2024 रोजी काढला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कमिटीने एक प्रसिद्धी पत्रक काढून महाराष्ट्र पोलिसांच्या या आदेशाचे स्वागत केले आहे. 

राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांच्या सहीने असलेल्या आदेशात म्हटले आहे की, 'महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा, जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३' च्या कलम ५ (१) अन्वये, महाराष्ट्र शासनास प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन, महाराष्ट्र शासन, सदर अधिनियमातील कलम ५ (२) मध्ये उद्धृत केलेली कर्तव्ये पार पाडण्याकरीता पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात सहाय्यक आयुक्त (गुन्हे), तसेच पोलीस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रात पोलीस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा) यांची दक्षता अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्याच्या तसेच, शासन पत्र, गृहविभाग, क्र. अधिनियम ०७५१/प्र.क्र.३२४/विशा-६, दि.१८/०३/२०१६ मध्ये नमुद केल्यानुसार 'महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत अधिनियम २०१३ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक कक्ष स्थापन करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना देत आहे. 

 पोलीस महासंचालक कार्यालयाकडून हे आदेश सर्व पोलीस आयुक्त, सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना  पाठवले गेले आहेत. 

अंनिसच्या राज्य कार्यकारी समितीने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ऑगस्ट 2013 मध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानानंतर जादूटोणाविरोधी कायदा राज्यात लागू झाला. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्याच्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये 'अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष' स्थापन करणेबाबत घेतलेल्या निर्णयाचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची गेल्या अनेक दिवसांपासूनची एक मागणी या निमित्ताने पूर्ण झाली आहे. पोलीस प्रशासनास विनंती आहे की, हे कक्ष स्थापन झाल्यावर त्यांची जिल्हावार माहिती पोलिसांनी जनतेसमोर जाहीर करावी, जेणेकरून पीडित लोक   आपली तक्रार निर्भयपणे या कक्षाकडे घेऊन येतील. जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रचारासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मागील वर्षी एक राज्यव्यापी जनप्रबोधन यात्रा काढली होती.अंनिसच्या राज्य कार्यकारणीचे सदस्य मिलिंद देशमुख, डॉ. हमीद दाभोलकर, नंदिनी जाधव, मुक्ता दाभोलकर, अण्णा कडलास्कर, प्रशांत पोतदार, राहुल थोरात, रामभाऊ डोंगरे, फारुक गवंडी, विनोद वायंगणकर, सम्राट हटकर, मुंजाजी कांबळे, प्रविण देशमुख, डॉ. अशोक कदम, प्रकाश घादगिने यांनी हे पत्रक काढले आहे.

चौकट :
अंनिसच्या समितीच्या राज्य कमिटी सदस्य मुक्ता दाभोलकर, नंदिनी जाधव याबाबत म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या पोलीस प्रशासनाने राज्याच्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्याचे जे आदेश दिले आहेत त्याबद्दल संघटनेच्या वतीने पोलीस प्रशासनाचे मनःपूर्वक अभिनंदन. अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये स्थापन करणे हे महाराष्ट्र पोलिसांचे आश्वासन पाऊल आहे. यामुळे जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होईल. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या कक्षातील अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना जादूटोणाविरोधी कायद्याचे मोफत प्रशिक्षण देण्यास तयार आहे.

शिवसेना (उबाठा) ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर पश्चिमतर्फे शिधावाटप केंद्र येथे ग्राहकांना होणाऱ्या ई -पॉस मशीनच्या अडथळ्यामुळे धान्य मिळत नाही यावर चर्चा !!

शिवसेना (उबाठा) ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर पश्चिमतर्फे शिधावाटप केंद्र येथे ग्राहकांना होणाऱ्या ई -पॉस मशीनच्या अडथळ्यामुळे धान्य मिळत नाही यावर चर्चा !!
 

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

             शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर पश्चिम ग्रा.स.क. विधानसभा संघटक श्री. अमित भाटकर यांच्या नेतृत्वाखाली आज घाटकोपर शिधावाटप केंद्र येथे ग्राहकांना होणाऱ्या ई  - पॉस मशीनच्या अडथळ्यामुळे धान्य मिळत नाही तसेच गणेशोत्सव सणा निमित्त आनंदाचा शिधा वाटप बद्दल चर्चा करण्यात आली. शिधावाटप केंद्रामधील मुख्य अधिकारी श्री.वानखेडे  याची भेट घेऊन उपरोक्त बाबींवर चर्चा करण्यात आली. त्याचवेळी मुख्य अधिकारी यांनी निर्णय घेतला की प्रत्येक रेशन दुकानदार यांनी मशीन बंद असल्यास ग्राहकांना रेशन कार्ड चेक करून ऑफलाईन पद्धतीने धान्य देण्यात येईल. त्यावेळी ग्राहक संरक्षण कक्षाच्या माध्यमातून निवेदन पत्र देण्यात आले. यावेळी घाटकोपर पश्चिम विधानसभा संघटक श्री. अमित भाटकर, उपसंघटक विश्वनाथ जाधव, वार्ड संघटक १२८ प्रशांत शिंदे, वार्ड संघटक १२९  शंकर तेली, वार्ड संघटक १२३ राजेंद्र पेडणेकर, वार्ड संघटक १२४ यशवंत खोपकर आदी मान्यवर आणि शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सौ.वसुधा वैभव नाईक (पुणे) यांच्या 'आईचे हळवे मन' लघु कथासंग्रहास पुरस्कार !!

सौ.वसुधा वैभव नाईक (पुणे) यांच्या 'आईचे हळवे मन' लघु कथासंग्रहास पुरस्कार !!     'शिक्षण संजीवनी' मासिका तर्फे द...