Wednesday, 21 May 2025

लांजा तालुक्यातील गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनतर्फे कोकण कन्या सृष्टी कुळये यांचा सत्कार !!

लांजा तालुक्यातील गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनतर्फे कोकण कन्या सृष्टी कुळये यांचा सत्कार !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

           सृष्टी कुळये ही मूळची रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामधील शिरवली (पलीकडचीवाडी )येथील राहणारी, सध्या ती मुंबईत राहते. तिचे वडील सुरेश कुळये हे मुंबईत एका प्रिंटिंग प्रेसमध्ये मशीन ऑपरेटर म्हणून काम करतात, तर आई गृहिणी आहे. सृष्टी हिला दोन भावंडे असून, ती या सर्वात मोठी आहे. घरची परिस्थिती बेताची आहे, तरीही सृष्टी हिने केवळ जिद्द, चिकाटी आणि प्रचंड मेहनत या त्रिसूत्रीच्या जोरावर सृष्टी हिने यूपीएससीमध्ये यश संपादन करत देशात ८३१ रँक मिळवली.

            लेकीने (सृष्टी) मिळविलेल्या यशानंतर आई-वडिलांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कु.सृष्टी कुळये हिचे तिच्या मानखुर्द येथे राहत्या घरी जाऊन लांजा तालुक्यातील शिक्षण, समाजसेवा, ग्रामसेवा, तंटामुक्त, कृषीसेवा, शेती विकास, कामगार, उद्योग, साहित्य, कला, क्रीडा, ग्रंथपालन, पर्यावरण आदी क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक डॉ.श्री. चंद्रकांत शिवराम करंबळे, वकील श्री. मनोहर मांडवकर, गुरुमाऊली फाउंडेशनच्या सदस्य सौ. दिपाली करंबळे, कुमारी निशा मांडवकर व सृष्टीचे आई वडील यांच्याकडून पुष्पगुछ, शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच तिच्याशी आणि तिच्या परिवाराशी सुसंवाद साधण्यात आला. तिच्या UPSC स्पर्धा परीक्षेबद्दलचा प्रवास, तिने केलेली मेहनत इ. गोष्टीची माहिती घेऊन उपस्थित सभासदांनी तिला मंडळातर्फे अभिनंदन आणि शुभेच्छा व्यक्त केल्या.

           हा कार्यक्रम श्री.चंद्रकांत करंबळे यांच्या माध्यमातून पार पडला. त्यामुळे उपस्थित सभासद यांचे यानिमित्ताने आभार व्यक्त करण्यात आले. सृष्टीला यश, कीर्ती आणि दीर्घ आयुष्य देवो हीच प्रार्थनाही या सत्कार दरम्यान करण्यात आली. समाजाची मुलगी म्हणून समाजसेवक चंद्रकांत करंबळे यांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले होते.

              सध्या सृष्टी मुंबईतील मानखुर्द शिवनेरीनगर येथील झोपडपट्टीत राहत असल्याने या ठिकाणी तिचा अभ्यास होत नव्हता. त्यामुळे तिने सन २०२२ मध्ये गोवंडी येथील एम.पॉवर लायब्ररीत प्रवेश घेतला. घरात कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक वातावरण नाही. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे कोणतीही शिकवणी नाही. अशा परिस्थितीतही सृष्टी हिने केवळ इच्छाशक्ती आणि अभ्यासाच्या जोरावर गरुडझेप घेतली. तिने मिळविलेल्या या यशानंतर त्याच्या परिवारातर्फे आणि अनेक ग्राम मंडळ, मुंबई मंडळ यांच्यातर्फे तिचा सत्कार करण्यात आला.

            घरच्या परिस्थितीची कल्पना होती. आई-वडिलांचे कष्ट पाहत होते. त्यामुळे चांगले शिकायचे आणि मोठे व्हायचे हे मनाशी ठरविले होते. त्यासाठी आई- वडील, माझे मार्गदर्शक शिक्षक, मला प्रोत्साहन देणारे हितचिंतक यांचे पाठबळ मिळाले. या सर्वांच्या प्रोत्साहनामुळे मी हे यश मिळवू शकले असे सृष्टी कुळये यांनी सत्कारला उत्तर देताना स्पष्ट केले. या यशा बद्दल लांजा तालुका मधील अनेक मंडळ, समाज शाखा यांच्या तर्फे सृष्टी यांना अनेकांकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

महेंद्र उर्फ अण्णा पंडित "भीमयोद्धा" पुरस्काराने सन्मानित...

महेंद्र उर्फ अण्णा पंडित "भीमयोद्धा"  पुरस्काराने सन्मानित...

उल्हासनगर, प्रतिनिधी - स्वराज्य संघटनेच्या वतीने महापुरुषांचा संयुक्त जयंती उत्सव नुकताच साजरा करण्यात आला जयंती उत्सवाचे औचित्य साधून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा *भीम रत्न* व *भीम योद्धा* पुरस्कार देऊन त्यांना सदर कार्यक्रमात गौरविण्यात आले. महेंद्र उर्फ अण्णा पंडित यांनी सामाजिक अत्याचाराच्या विरोधात निर्भिडपणे आवाज उठवुन शोषीत पिडीतांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देत सामाजिक जबाबदारी पार पाडल्याबद्दल या अभ्यासु समाजसेवकाचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भीमयोद्धा पुरस्काराने गौरव करण्यात आला. महेंद्र उर्फ अण्णा पंडीत हे श्रमिक मुक्त पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष असुन अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे प्रदेश सरचिटणीस या पदावर कार्यरत आहेत. पिडीत, शोषितांच्या मदतीला रात्री बेरात्री धावुन जाणारा, त्यांना कायदेशीर मार्गदर्शन व मदत करणारा एक अभ्यासू सामाजिक कार्यकर्ता अशी त्यांची ओळख असुन त्यांच्या कार्याची महती पंचक्रोशीत लपुन राहीलेली नाही. 

अण्णा पंडीत यांच्या सामाजिक कार्याची दखल स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड.जय गायकवाड यांनी घेतली असून ज्येष्ठ विचारवंत, संपादक, पत्रकार आणि ८४ व्या आखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मा.उत्तम कांबळे आणि पत्रकार व्याख्याते किरण सोनावणे यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ व स्मृतिपदक देवुन *भीम योद्धा* पुरस्काराने अण्णा पंडीत यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी  विचारमंचावर धम्म अभ्यासिका शीलाताई जाधव, लताबाई पडघान, कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.गोपाळ भगत स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड.जय गायकवाड इत्यादी मान्यवर  उपस्थित होते.

अण्णा पंडीत यांना भीमयोद्धा पुरस्कार प्राप्त झाल्याने समाजातील प्रत्येक स्तरातुन त्यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Monday, 19 May 2025

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल कुर्ला (प), मुंबई या शाळेचा निकाल 87.5% टक्के !!

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल कुर्ला (प), मुंबई या शाळेचा निकाल 87.5% टक्के !!

मुंबई, प्रतिनिधी - पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ भिवंडी संचालित - *संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल,* बैल बाजार, कुर्ला पश्चिम, मुंबई -400070 या रात्र शाळेचा फेब्रुवारी-2025  एस.एस.सी. परीक्षेचा निकाल 87.5% लागला असून विद्यार्थी पालक व शिक्षक वर्गांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येते. 

या रात्र शाळेची स्थापना 1971 ची असून शासन अनुदानित मान्यता आहे. रात्र शाळेच्या स्थापनेपासून आजपर्यंत रात्र शाळेचे शैक्षणिक कार्य यशस्वीपणे राबवले जात आहे. आज रात्र शाळा परिसरामध्ये नावारूपाला येत आहे. मराठी माध्यमाची रात्र शाळा ही ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण अपूर्ण आहे किंवा नोकरी मध्ये प्रमोशन घेण्यासाठी अधिक शिक्षणाची आवश्यकता लागत आहे असे विद्यार्थी व नियमित विद्यार्थी रात्र शाळेत येऊन आपले शिक्षण पूर्ण करत आहेत. रात्र शाळेत वयाची अट नसल्याकारणाने 14 वयोगटाच्या पुढील कितीही वयापर्यंतचा विद्यार्थी रात्र शाळेत प्रवेशित होऊ शकतो व त्याचे शिक्षणाचे राहिलेले स्वप्न तो पूर्ण करू शकतो. 
 
रात्र शाळेचे मुख्याध्यापक श्री विश्वनाथ राऊत व सहकारी शिक्षक श्री समाधान खैरनार सर तसेच मासूम संस्थेकडून इंग्रजी विषय शिकविण्यासाठी देण्यात आलेले श्री शहाजी ओव्हाळ सर गणित विज्ञान विषयासाठी श्री योगेश विरकर सर यांनी एसएससी परीक्षेचा निकाल शंभर टक्के कसा लावता येईल त्यासाठी खूप प्रयत्न केले. मागील पाच वर्ष रात्र शाळेचा निकाल शंभर टक्के देण्यात आलेला आहे. परंतु या शैक्षणिक वर्षात एसएससी परीक्षेचा निकाल *87.5%* देण्यात आला आहे. 
 
एसएससी परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त झालेला विद्यार्थी प्रवीण सुधाकर साळवे -61.8% द्वितीय क्रमांक स्वप्निल संतोष साळवे- 60 %, तृतीय क्रमांक साक्षी दीपक मानकर -53.4% गुण प्राप्त करून यश संपादित केले आहे.* पास झालेले सर्व विद्यार्थी आपले पुढील शिक्षण चालू ठेवणार आहे. 
 
रात्र शाळेला सपोर्ट करणारी मासूम संस्था रात्र शाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचे करिअर घडवण्यासाठी मदत करत असते. त्याबद्दल मासूम संस्थेच्या संस्थापिका माननीय निकिता केतकर मॅडम व त्यांचे कार्य सांभाळणारी संपूर्ण टीम यांचे आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री विश्वनाथ राऊत व संस्थेने मानले आहेत.* पास झालेल्या प्रत्येक विद्यार्थी यापुढे चांगलं कौशल्यपूर्ण शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा विचार करत आहे. 

आपले शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच आठवी, नववी व दहावीच्या वर्गात प्रवेश घेण्याचे आवाहन मुख्याध्यापक राऊत सर यांनी केले आहे.

अनुसूचित कल्याण समितीच्या माध्यमातून मागासलेल्या जनतेच्या विकासासाठी काम करणार - आमदार दौलतजी दरोडा !!

अनुसूचित कल्याण समितीच्या माध्यमातून मागासलेल्या जनतेच्या विकासासाठी काम करणार - आमदार दौलतजी दरोडा !!

* वाडा येथे राष्ट्रवादी जिल्हा बैठक व आमदार दरोडा यांचा सन्मान सोहळा संपन्न

शहापूर, प्रतिनिधी : राज्यातील मागास जनतेच्या अनेक समस्या प्रलंबित असून अनुसूचित कल्याण समितीच्या माध्यमातून त्या समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्य अनुसूचित कल्याण समितीचे अध्यक्ष तथा शहापूर विधानसभेचे आमदार दौलत दरोडा यांनी केले आहे. 

वाडा येथे रविवारी (18 मे) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पालघर जिल्हा बैठक व अनुसूचित कल्याण समितीच्या अध्यक्ष पदावर नियुक्त झाल्याबद्दल आमदार दरोडा यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आमदार दरोडा यांनी पुढे सांगितले की, राज्य सरकारकडून आदिवासी समाजासाठी विविध योजनांसाठी भरीव निधी देण्यात येत असून त्या निधीचा योग्यप्रकारे विनियोग झाला पाहिजे, तरच त्याचा खरा फायदा मागास भागातील जनतेला होईल, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केले.

यावेळी राष्ट्रवादीचे पालघर जिल्हा अध्यक्ष आनंदभाई ठाकूर, ज्येष्ठ नेते संदीप वैद्य, प्रदेश सचिव संतोष मराठे, महिला जिल्हा अध्यक्षा रोहिणी शेलार, जिल्हा सरचिटणीस मुकणे सर, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष नितीन जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश कासट, शैलेश कर्मोडा यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष जयेश शेलार यांनी केले.

-------------------------------
या कार्यक्रमात जव्हार येथील बहुजन विकास आघाडीचे तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांच्या समवेत तालुक्यातही सरपंच - उपसरपंच व अन्य कार्यकर्त्यांनी मोठ्याप्रमाणात राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.
-------------------------------
या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या वाडा तालुका महिला अध्यक्ष पदावर जान्हवी जगदीश पाटील (आबिटघर) यांची नियुक्ती करण्यात आली असून महिला जिल्हा उपाध्यक्ष पदावर चित्रा पाटील व तालुका सरचिटणीस पदावर रंजना भागडे यांची नियुक्ती करण्यात आली.

आमदार दौलतजी दरोडा यांनी अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला‌ !!

आमदार दौलतजी दरोडा यांनी अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला‌ !!

मुंबई, प्रतिनिधी : शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दौलत जी दरोडा यांनी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष पदाची पदभार सोमवारी (दि.19) रोजी विधानभवन मुंबई येथे स्वीकारला.

आमदार दौलत दरोडा हे ज्येष्ठ विधानसभा सदस्य असून तब्बल पाच वेळा शहापूर विधानसभा मतदारसंघात निवडून आले असून उच्चशिक्षित व अभ्यासू आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. सध्या ते अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये कार्यरत असून अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्षपद देऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांना न्याय दिल्याची भावना व्यक्त होत आहे.

विधानसभा अधिनियम 235 अन्वये स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष म्हणून आमदार दौलतजी दरोडा यांची नियुक्ती करण्यात आली असून या समितीत आमदार हरिचंद्र भोये, आमदार डॉ.मिलिंद नरोटे, आमदार केवलराम काळे, आमदार  राजू तोडसाम, आमदार राजेश पाडवी,  आमदार शांताराम मोरे, आमदार मंजुळा गावित, आमदार हिरामण खोसकर, आमदार आदित्य ठाकरे, आमदार रामदास मसराम, आमदार विनोद निकोले आदी आमदारांचा समावेश आहे.

Sunday, 18 May 2025

१०० दिवसांच्या उपक्रमात अमळनेर प्रांत कार्यालय नाशिक विभागात प्रथम !!

१०० दिवसांच्या उपक्रमात अमळनेर प्रांत कार्यालय नाशिक विभागात प्रथम !!

मुंबई (शांताराम गुडेकर) : मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या उपक्रमात अमळनेर उपविभागीय कार्यालयाने नाशिक विभागात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

भौतिक सुविधांसह जनतेला तत्पर सेवा, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा, कर्मचाऱ्यांची वागणूक असे काही निष्कर्ष देण्यात आलेले होते. यात उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी पिण्याचे शुद्ध पाणी, रेकॉर्ड रूम अद्ययावत करून त्याचे संगणकीकरण करणे, जेष्ठ नागरिकांची प्रकरणाचा तात्काळ निपटारा केल्याने आणि जनहिताच्या निर्णय घेतल्याने अमळनेर उपविभाग नाशिक विभागात प्रथम आला आहे. 

उपविभागीय कार्यालय नाशिक विभागात प्रथम आल्याने प्रांत नितीनकुमार मुंडावरे यांच्यासह कर्मचाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

स्वतंत्र कोकण राज्याची ३१ मे रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद !!

स्वतंत्र कोकण राज्याची ३१ मे रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :

            स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वतंत्र कोकण राज्याची मागणी विषय असणारी पत्रकार परिषद शनिवार दिनांक ३१ मे २०२५ रोजी दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत मुंबई मराठी पत्रकार संघ (नोंदणीकृत) पहिला मजला पत्रकार भवन, आझाद मैदान, बाळशास्त्री जांभेकर चौक, महापालिका मार्ग, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. या पहिल्याच ऐतिहासिक पत्रकार परिषदेकडे अनेक राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. तसेच अनेक जणांची उत्सुकता वाढली आहे. कोकणातील जनतेच्या आशा- आकांशा, स्वप्ने, निराशा या सगळ्यांचा सामूहिक उध्दार म्हणजे स्वतंत्र कोकण राज्य अभियान असुन कोकणची वैचारिक परंपरा, सहिष्णुतेची उदरतेची असली तरी कोकणचे सर्वच क्षेत्रात अधः पतन झाले आहे. जोपर्यंत कोकण प्रांत महाराष्ट्रात अंतर्भूत आहे तोपर्यंत कोकणचा विकास होणार नाही. तसेच अविकसित काळ हा काळ गुलामगिरीचा काळ म्हणून भविष्यात ओळखला जाईल. त्यासाठी स्वतंत्र कोकणराज्याचा एल्गार पुकारला आहे. यासाठी कोकणातील अनेक सामाजिक संघटना, विविध समवैचारिक प्रतिष्ठित व्यक्ती एकत्र येऊन व अनेक उद्योजकांनी या अभियानाचे स्वागत करून पाठिंबा दिला आहे. या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर ....

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर .... *चाळीसगाव, दि. ११ सप्टेंबर २०२६ :* ...