Monday, 2 November 2026

महापालिकेचे स्वतःचे मोरबे धरण असताना दिघ्यावर अन्याय का? दिघ्याला मोरबे धरणाचे पाणी द्या !

महापालिकेचे स्वतःचे मोरबे धरण असताना दिघ्यावर अन्याय का? दिघ्याला मोरबे धरणाचे पाणी द्या !

सामाजिक कार्यकर्ते योगेश शिंदे यांचे आयुक्त व महापौरांना निवेदन दिघावासीयांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याची  मागणी

दिघा, प्रतिनिधी :-  नवी मुंबई महानगरपालिकेचे स्वतःच्या मालकीचे मोरबे धरण असताना दिघा विभागातील नागरिकांना मोरबे धरणाचे शुद्ध पाणी का दिले जात नाही? दिघा विभागावर अन्याय का केला जात आहे? असा सवाल उपस्थित करत दिघा विभागाला मोरबे धरणाचे पाणी तातडीने उपलब्ध करून द्या, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते योगेश शिंदे यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त व महापौर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेचे स्वतःचे मोरबे धरण असताना त्याचा लाभ दिघा विभागातील नागरिकांनाही मिळणे अपेक्षित आहे. मात्र, दिघा विभागातील नागरिकांना शुद्ध व मुबलक पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याची परिस्थिती आहे. महापालिकेच्या मालकीचे धरण असतानाही दिघा विभागातील नागरिकांना त्याचा लाभ मिळत नसेल, तर हा दिघा विभागातील नागरिकांवर अन्याय नाही का? असा प्रश्न योगेश शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

दिघा विभागातील काही परिसरांत होणारा पाणीपुरवठा अत्यंत खराब दर्जाचा असून पाण्याचा रंग पिवळसर आहे. तसेच पाण्याची चव रासायनिक पदार्थ मिसळल्याप्रमाणे जाणवत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासून दूषित पाणीपुरवठ्याचे कारण शोधावे आणि तातडीने सुरक्षित पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

दिघा विभागातील नागरिकांनाही नवी मुंबईतील इतर नागरिकांप्रमाणे शुद्ध, सुरक्षित आणि मुबलक पाणी मिळण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मोरबे धरणाचे पाणी दिघा विभागाला उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक तांत्रिक सर्वेक्षण, निधीची तरतूद व प्रशासकीय मंजुरी तातडीने पूर्ण करावी. याबाबत केवळ आश्वासने न देता निश्चित कालमर्यादा जाहीर करून प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, अशी आग्रही मागणी योगेश शिंदे यांनी केली आहे.

"महापालिकेचे स्वतःचे मोरबे धरण असताना दिघा विभागातील नागरिकांना शुद्ध पाण्यापासून वंचित का ठेवले जात आहे? दिघ्यावर अन्याय नको, दिघ्याला मोरबे धरणाचे पाणी द्या!" अशी  भूमिका सामाजिक कार्यकर्ते योगेश शिंदे यांनी निवेदनातून मांडली आहे.

एव्हरेस्टच्या कुशीत डोंबिवलीचा झेंडा; नगरसेविका डॉ. सुनीता पाटील यांनी सर केला ५,३६४ मीटरवरील एव्हरेस्ट बेस कॅम्प !!

एव्हरेस्टच्या कुशीत डोंबिवलीचा झेंडा; नगरसेविका डॉ. सुनीता पाटील यांनी सर केला ५,३६४ मीटरवरील एव्हरेस्ट बेस कॅम्प !!

*कल्याण डोंबिवली, दीपक इंगळे*

*डोंबिवली, दिनांक : ०२ नोहेंबर २०२६* वैद्यकीय सेवा आणि नगरसेविका म्हणून सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळतानाच डोंबिवलीतील भाजपच्या नगरसेविका डॉ. सुनीता पाटील यांनी साहसाची नवी उंची गाठली आहे. हिमालयातील प्रतिकूल हवामानावर मात करत त्यांनी ५,३६४ मीटर उंचीवरील एव्हरेस्ट बेस कॅम्पची यशस्वी चढाई केली आहे.

माऊंटेनिअर्स असोसिएशनच्या तिसऱ्या मोहिमेअंतर्गत २४ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या कालावधीत ही मोहीम पार पडली. मोहिमेपूर्वी असोसिएशनचे अनुभवी प्रशिक्षक सतीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी सदस्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. हिमालयातील सतत बदलणारे हवामान, तेथील जीवनशैली, हिमवर्षावाच्या काळात घ्यावयाची खबरदारी आणि सुरक्षा साधनांचा योग्य वापर याबाबत सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

वैद्यकीय व्यवसायासोबतच नगरसेविका म्हणून प्रभागातील नागरिकांच्या समस्या, सामाजिक उपक्रम, विकासकामे तसेच महापालिकेच्या सभा आणि बैठकांमध्ये सक्रिय सहभाग घेणाऱ्या डॉ. सुनीता पाटील यांनी आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढत या साहसी मोहिमेत सहभाग घेतला. त्यांच्या या यशामुळे डोंबिवलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या मोहिमेत डॉ. सुनीता पाटील यांच्यासह देवदत्त दिगवडेकर, प्रतीक दिगवडेकर, मनीष खरात, ज्योती जोशी, माया दिगवडेकर, अभिजीत कुलकर्णी, राम गणपती, विश्वास जोशी, कैवल्य मोडक, सदानंद दांडेकर आणि पद्माकर गायकवाड सहभागी झाले होते.

कल्याण स्टेशन परिसरातील समस्यांवरून रिक्षा असोसिएशन आक्रमक; २६ ऑक्टोबरला धरणे आंदोलनाचा इशारा !!

कल्याण स्टेशन परिसरातील समस्यांवरून रिक्षा असोसिएशन आक्रमक; २६ ऑक्टोबरला धरणे आंदोलनाचा इशारा !!

*कल्याण डोंबिवली, दीपक इंगळे*

*कल्याण, दिनांक : ०२ नोव्हेंबर २०२६* कल्याण पश्चिमेकडील रेल्वे स्थानक परिसरातील प्रलंबित समस्यांवरून रिक्षाचालक-मालक असोसिएशनने आक्रमक भूमिका घेतली आहे. या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी असोसिएशनच्या वतीने २६ ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यासंदर्भात महापौर अॅड. हर्षाली थवील-चौधरी यांना निवेदन देण्यात आले आहे.

कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात वाढती वाहतूक कोंडी, बेशिस्त पार्किंग आणि अनधिकृत प्रवासी वाहतुकीमुळे विविध समस्या निर्माण होत असल्याचे असोसिएशनने निवेदनात नमूद केले आहे. रखडलेला सॅटिस प्रकल्प तातडीने पूर्ण करावा, वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढावा आणि अनधिकृत वाहतुकीवर कठोर कारवाई करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

याशिवाय, गर्दीच्या वेळेत वाहतूक पोलिस तैनात करणे, महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस गस्त वाढवणे, दामिनी पथक कार्यान्वित करणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि आधुनिक एलईडी प्रकाशयोजना सुरू करण्याची मागणीही करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी स्वच्छ सार्वजनिक प्रसाधनगृहे आणि ई-टॉयलेटची सुविधाही उपलब्ध करून देण्याची मागणी असोसिएशनने केली आहे.

दरम्यान, या मागण्यांची दखल घेत महापौर अॅड. हर्षाली थवील-चौधरी यांनी संबंधित विभागांची लवकरच बैठक घेऊन समस्यांवर चर्चा करण्याचे आश्वासन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे.

गोरेगाव पूर्वेत महिला विक्रेत्यावर जातीवाचक अत्याचार; रोज ३०० रुपयांच्या खंडणीसाठी टेम्पो आडवा लावून विनयभंग !!

गोरेगाव पूर्वेत महिला विक्रेत्यावर जातीवाचक अत्याचार; रोज ३०० रुपयांच्या खंडणीसाठी टेम्पो आडवा लावून विनयभंग !!

*गोरेगाव (पूर्व) :* संतोषनगर, राहेजा नर्सरी परिसरात एका महिला विक्रेत्याला जातीवाचक आणि अश्लील शिवीगाळ करून विनयभंग आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात FIR No. 1188/2026 दाखल झाला आहे.

तक्रारदार महिला या परिसरात गेल्या दोन वर्षांपासून कपडे विक्रीचा स्टॉल लावून उदरनिर्वाह करतात. याच परिसरात फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या *आरोपी गुप्ता* याच्याशी स्टॉलच्या जागेवरून यापूर्वीही वाद झाले आहेत.

दि. २९ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता आरोपीने आपला टेम्पो (MH 47 BL 2157) महिलेच्या स्टॉलसमोर आडवा लावला आणि "इथे स्टॉल लावायचा असेल तर रोज ३०० रुपये द्यावे लागतील" अशी खंडणीची मागणी केली. महिलेने नकार देताच आरोपीने जातीवाचक आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करून धमकी दिली आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला.

यावेळी तेथे उपस्थित असलेल्या *साक्षीदार प्रमिला दाभोळकर आणि इतर दोन जणांनी* आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने त्यांच्याशीही अरेरावी केली. अखेर महिलेने १०० नंबरवर फोन करून पोलिसांना बोलावले.

या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी BNS कलम 79, 308, 351(2) आणि अॅट्रॉसिटी कायदा कलम 3(1)(r), 3(1)(s), 3(2)(va) अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल शिंदे करीत आहेत.

जुनी पेन्शनसाठी तालुक्यात काळा दिवस ! शेकडो कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून केला निषेध !!

जुनी पेन्शनसाठी तालुक्यात काळा दिवस !!

*शेकडो कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून केला निषेध*
 
     विरार (पालघर) : दि.०२ नोव्हेंबर - शासकीय कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना बंद करण्याच्या निर्णयाला २१ वर्षे पूर्ण होत असताना, या निर्णयाच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्यावतीने सोमवारी संपूर्ण वसई तालुक्यात 'काळा दिवस' पाळण्यात आला. तालुक्यातील शेकडो शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज करत शासनाच्या पेन्शन धोरणाचा निषेध नोंदवला. जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली, अशी माहिती जुनी पेन्शन संघटनेचे पालघर जिल्हा खाजगी शाळा प्रमुख किरण गायकर यांनी दिली.

     शासनाने ३१ ऑक्टोबर २००५ रोजी जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन अंशदानावर आधारित पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शासकीय सेवेत आयुष्यभर योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वृद्धापकाळात सन्मानाने जगण्यासाठी निश्चित निवृत्तीवेतन आवश्यक असून जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी यावेळी मांडली.

प्रसिद्धीसाठी - 
श्री. किरण गायकर
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना - पालघर जिल्हा खाजगी शाळा प्रमुख (9765656180)

Sunday, 1 November 2026

ठाण्यात महायुतीची 'लोकशाही वाचवा पदयात्रा'; फडणवीस-शिंदेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल !!

ठाण्यात महायुतीची 'लोकशाही वाचवा पदयात्रा'; फडणवीस-शिंदेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल !!

*ठाणे, ०१,११,२०२६ :* महायुतीने ठाण्यात 'लोकशाही वाचवा पदयात्रा' काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या पदयात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी आणि विरोधकांवर संविधानाचा अपमान केल्याचा आरोप केला.

भाजप आणि मित्रपक्षांच्या वतीने रविवारी ठाणे महानगरपालिका मुख्यालयाजवळ या भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्यासह महायुतीचे असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मोर्चापूर्वी झालेल्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "गेल्या ५५ वर्षांत काँग्रेस सरकारांनी अनेक वेळा SIR लागू केला आहे, परंतु २००२ पासून एनडीए सरकारच्या काळात राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्ष SIR ला विरोध करून संविधानाचा गळा घोटत आहेत. त्यांच्यापासून देशाला वाचवण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागत आहे."

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विरोधकांवर निशाणा साधला.

प्रमुख बंदरगाह प्राधिकरण (Major Port Authorities) मधील कंत्राटी कामगारांच्या मागण्यांचे संयुक्त निवेदन !!

प्रमुख बंदरगाह प्राधिकरण (Major Port Authorities) मधील कंत्राटी कामगारांच्या मागण्यांचे संयुक्त निवेदन !!

महासंघाच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण मागण्यावर सकारात्मक निर्णय .-:VOC पोर्ट तुतीकोरीन तामिळनाडू येथे बैठक संपन्न.

उरण दि २९, (विठ्ठल ममताबादे) : VOC पोर्ट तुतीकोरीन तामिळनाडू येथे कामगारांच्या प्रश्नावर महत्वाची बैठक संपन्न झाली.भारतातील १२ प्रमुख बंदर प्राधिकरणांमधील (Major Port Authority) कंत्राटी कामगारांसाठी समान वेतन, सामाजिक सुरक्षा आणि योग्य सेवा शुर्तींची मागणी करण्यासाठी ६ मान्यताप्राप्त कामगार महासंघांनी संयुक्त निवेदन दिले आहे. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या भरती बंदीमुळे बंदरांवर कंत्राटी व आऊटसोर्सिंग कामगारांचे प्रमाण वाढले आहे. परंतु, त्यांना अद्यापही योग्य वेतन आणि कायदेशीर सुविधा मिळालेल्या नाहीत. कंत्राटी कामगारांचे किमान मासिक वेतन ४५,००० रुपये किंवा समान श्रेणीतील नियमित कर्मचाऱ्यांच्या सुरुवातीच्या वेतनाएवढे असावे.अशी मागणी करण्यात आली होती.

 हा करार १ जानेवारी २०२७ ते ३१ डिसेंबर २०३१ पर्यंत ५ वर्षांसाठी असावा. नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाई भत्ता (त्रैमासिक) आणि मूळ वेतनाच्या ३% वार्षिक वाढ मिळावी. नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणेच समान कामासाठी समान वेतन लागू करावे. भविष्य निर्वाह निधी (EPF), आरोग्य विमा, ग्रॅच्युइटी, मातृत्व लाभ आणि अपघात भरपाई यांसारख्या वैधानिक सुविधा मिळवल्या जाव्यात. दररोज ८ तासांची ड्युटी, ओव्हरटाइमचा मोबदला, वार्षिक १२ नैमित्तिक रजा (Casual Leave) आणि १५ आजारपणाच्या रजा (Sick Leave) मिळाव्यात. गणवेश, सेफ्टी किट (PPE), हजेरी रजिस्टर, पेन्शन/निवृत्ती वय ६० वर्षे, हजेरी भत्ता आणि सणासुदीसाठी १०,००० रुपयांपर्यंत व्याजमुक्त आगाऊ रक्कम (Festival Advance) द्यावी.  

हा प्रस्ताव कामगारांचे शोषण थांबवण्यासाठी आणि त्यांच्या न्याय मागण्या पूर्ण करण्यासाठी १ जानेवारी २०२७ पासून लागू करावा, अशी विनंती महासंघांनी केली आहे. अशी माहिती बी एम एस फेडरेशनचे राष्ट्रीय महासचिव सुरेश पाटील यांनी दिली

पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न सोडवा; मंत्रालयीन संघटनेची संसदीय समितीकडे मागणी !!

पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न सोडवा; मंत्रालयीन संघटनेची संसदीय समितीकडे मागणी !! *मुंबई (महेंद्र उर्फ अण्णा पंडीत) :* म...