Tuesday, 27 January 2026

जेएनपीए विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये पंचांग वर्ष 2025 दरम्यान 26.86% निर्यात-आयातमध्ये प्रमाणवाढ !!

जेएनपीए विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये पंचांग वर्ष 2025 दरम्यान 26.86%  निर्यात-आयातमध्ये प्रमाणवाढ !!

** आर्थिक व्यापारगतीचे प्रतिबिंब

उरण दि 27 (विठ्ठल ममताबादे) : भारताचे पहिले बहुउत्पादन, बंदराधारित विशेष आर्थिक क्षेत्र (विआक्षे) असलेल्या जेएनपीए विआक्षे ने पंचांग वर्ष 2025 मध्ये कंटेनर हाताळणीत भक्कम कामगिरी नोंदवली असून, यामुळे वाढलेली व्यापारगतिविधी आणि निर्यात-आयात भागधारकांमधील वाढता विश्वास स्पष्टपणे दिसून येतो.

पंचांग वर्ष 2025 दरम्यान जेएनपीए विआक्षे ने एकूण 20,693 टीईयू इतका निर्यात-आयात कंटेनर व्यवहार हाताळला, जो पंचांग वर्ष 2024 मधील 16,312 टीईयूच्या तुलनेत असून, यामध्ये सुमारे 26.86% वर्ष-दर-वर्ष वाढ नोंदवली गेली आहे. एकूण कंटेनर हाताळणीत झालेली ही लक्षणीय वाढ औद्योगिक कार्यक्षमता, सुधारित लॉजिस्टिक्स कार्यक्षमता तसेच विआक्षेमधून होणाऱ्या मालवाहतुकीतील वाढ अधोरेखित करते.

कामगिरीवर प्रतिक्रिया देताना गौरव दयाल, भा. प्र. से., अध्यक्ष, जेएनपीए, म्हणाले, “पंचांग वर्ष 2025 दरम्यान जेएनपीए विआक्षे मध्ये एकूण निर्यात-आयात व्यवहारात झालेली मजबूत वाढ ही विआक्षेच्या पायाभूत सुविधा आणि सुलभीकरण क्षमतेवर व्यापार व उद्योग क्षेत्राने दाखवलेल्या वाढत्या विश्वासाचे प्रतीक आहे. जेएनपीए विआक्षे पारंपरिक टर्मिनल-केंद्रित भूमिकेपलीकडे जाऊन, एकात्मिक बंदर परिसंस्था म्हणून आपले स्थान अधिक दृढ करत आहे. हा सर्वसमावेशक आराखडा उद्योगांसाठी मूल्यनिर्मितीला चालना देण्यासाठी, पुरवठा साखळीतील प्रवाहीपणा वाढवण्यासाठी आणि संपूर्ण हितधारक समुदायासाठी दीर्घकालीन लाभ निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.”

जेएनपीए विशेष आर्थिक क्षेत्र एकूण 277.38 हेक्टर क्षेत्रफळावर पसरलेले आहे. यापैकी 129.73 हेक्टर क्षेत्र आधीच भाडेपट्ट्यावर देण्यात आले असून, भविष्यातील भाडेपट्ट्यासाठी 34.16 हेक्टर क्षेत्र उपलब्ध आहे. सध्या या विआक्षेमध्ये 11 कार्यरत युनिट्स तसेच एक फ्री ट्रेड वेअरहाऊसिंग झोन (एफटीडब्ल्यूझेड) कार्यरत असून, यामुळे सातत्यपूर्ण औद्योगिक हालचाल आणि पुढील विकासासाठी मोठी संधी अधोरेखित होते.
निर्यात-आयात व्यवहारातील सातत्यपूर्ण वाढ जेएनपीए विआक्षे ची एक महत्त्वपूर्ण व्यापार व लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून असलेली भूमिका अधिक दृढ करते. रणनीतिक स्थान, बंदराशी अखंड जोडणी तसेच उद्योगस्नेही वातावरणाच्या बळावर जेएनपीए विआक्षे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी एक विश्वासार्ह केंद्र म्हणून पुढे येत आहे.

उरण महाविद्यालयात रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद !!

उरण महाविद्यालयात रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद !!

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, लायन्स क्लब उरण, लिओ क्लब उरण, टायगर ग्रुप, राजे शिवाजी मित्र मंडळ उरण यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले. यावेळी महात्मा गांधी मिशन कामोठे नवी मुंबईच्या ब्लड बँकेचे सहाय्य घेण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही व्ही गर्जे, एम जे एफ ला.मा. सदानंद गायकवाड, लायन्स क्लबचे अध्यक्ष रावसाहेब ओहोळ , उपाध्यक्ष ला. संदीप सदानंद गायकवाड, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष  विशाल पाटेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. 

महाविद्यालयाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये दुसऱ्यांदा रक्तदान शिबिर आयोजित केले गेले, या रक्तदान शिबिरात एकूण ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले व आपली सामाजिक बांधिलकी त्या माध्यमातून जपण्याचा प्रयत्न केला, महात्मा गांधी मिशनचे डॉ. शुभम शिंगारे, डॉ. नम्रता भोईर, डॉ. प्राची घरत, डॉक्टर निकिता चोरट आदींनी मोलाचे सहकार्य केले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील  सदस्य,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी रक्तदान शिबिराच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.

आई-वडिलांप्रती सदैव प्रेमाची भावना ठेवा : महेंद्रशेठ घरत

आई-वडिलांप्रती सदैव प्रेमाची भावना ठेवा : महेंद्रशेठ घरत

**पनवेलच्या वधू-वर परिचय मेळाव्याला उदंड प्रतिसाद

उरण दि २७,(विठ्ठल ममताबादे) : "आई-वडिलांची सेवा केली आणि त्यांच्याप्रती सदैव प्रेमभावना ठेवली तर आयुष्यात काहीही कमी पडत नाही, हे मी स्वानुभवावरून सांगतो. विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सुखद प्रसंग आहे. लग्नानंतर एकमेकांना समजून-उमजून घेणे ही कला आहे. आमचे मोठे कुटुंब होते, पण पत्नी शुभांगीने आई-वडिलांना आणि मला दिलेली साथ कल्पनातीत आहे. त्यामुळेच मी आज जगाच्या कानाकोपऱ्यांत बिन्धास्त फिरतो. आताची तरुण पिढी उच्च शिक्षण घेतलेली आहे; परंतु उच्च शिक्षणाच्या वाढत्या प्रमाणामुळे मुला-मुलींचे लग्नाचे वय तिशीच्या पुढे चालले आहे. त्यामुळे वेळेवर लग्न होणे, ही काळाची गरज आहे. त्यासाठी वधू-वर परिचय मेळाव्याची कल्पना उत्तम आहे. बारा बलुतेदारांसाठी विशेषतः भूमिपुत्रांसाठी दिबांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांच्याच पुढाकाराने सुरू झालेला वधू-वर परिचय मेळावा गेली सुमारे ३० वर्षे पनवेल-उरण आगरी समाज मंडळ आयोजित करीत आहे. हे कौतुकास्पद आहे. त्यामुळे या मंडळाच्या मागे मी खंबीरपणे उभा आहे," असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत पनवेल येथे म्हणाले. रविवारी (ता. २५) आगरी वधू-वर परिचय मेळावा पनवेल येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 
.
यावेळी दिबांचे पुत्र अतुल पाटील म्हणाले, "आम्ही वधू-वर मेळावा दरवर्षी आयोजित करतो. त्यात कुणाला फसविण्याचा, लुटण्याचा आमचा धंदा नाही. अतिशय उदात्त भावनेने गेली ३० वर्षे आम्ही काम करतोय. वधू-वर मेळाव्याद्वारे अनेकांची लग्न जमलेली आहेत. त्यामुळे कुणीही गैरसमज करून घेऊ नये."

पनवेल येथील आगरी समाज सभागृहात वधू-वर मेळाव्याला उदंड प्रतिसाद लाभला. ३०० वधू-वर आणि ५०० पालकांनी उपस्थिती लावली. त्यांना पनवेल-उरण आगरी समाज मंडळाने स्नेहभोजनही दिले. यावेळी माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, माजी नगरसेवक जगदीश गायकर, भिंगारीचे माजी उपसरपंच संजय गायकर, मेघा तांडेल, बी. पी. म्हात्रे, ए. बी. पाटील, स. क. पाटील गुरुजी, दत्तात्रेय जाधव, काशिनाथ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विजय गायकर यांनी सुंदर असे सूत्रसंचालन केले, तर जे. डी. तांडेल यांनी प्रास्ताविक केले.


प्रा.डॉ.हन्नत शेख यांना पीएचडी प्राप्त !!

प्रा.डॉ.हन्नत शेख यांना पीएचडी प्राप्त !!

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालय, उरण रायगड येथील अकाउंट अँड फायनान्स विभागातील प्रा.हन्नत शेख यांना मुंबई विद्यापीठाच्या वतीने पीएचडी (विद्या वाचस्पती) प्रदान करण्यात आली.उरण महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ.पि.आर.कारुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी व्यापार धोरण आणि प्रशासन या विषयातून मुंबई विद्यापीठाची (विद्या वाचस्पती) संशोधन पदवी (Ph.D.)  पदवी प्राप्त केली आहे. 
त्यांच्या संशोधनाचा विषय "An Analysis of Corporate Social Responsibility Activities of Companies with Special Reference to Raigad District". रायगड जिल्ह्याच्या विशेष संदर्भात: कंपन्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी उपक्रमांचे विश्लेषण" होता.

उरण महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातील संशोधन केंद्रातून त्या पीएचडी प्राप्त प्रथम विद्यार्थिनी ठरल्या आहेत. तसेच मार्गदर्शक म्हणून लाभलेले डॉ. पी. आर. कारुळकर यांच्याही त्या पीएचडी संशोधन करणाऱ्या प्रथम विद्यार्थिनी आहेत.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाल्मिक गर्जे, वडील युसुफ ताहीर शेख व आई मिनाज शेख, पती समिर अहमद, संस्थेचे अध्यक्ष तथा उपाध्यक्ष तसेच सर्व व्यवस्थापन समिती सदस्य, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दारू व अंमली पदार्थांच्या व्यसनमुक्ती संदर्भात उरण पोलीस स्टेशन येथे मार्गदर्शन !!

दारू व अंमली पदार्थांच्या व्यसनमुक्ती संदर्भात उरण पोलीस स्टेशन येथे मार्गदर्शन !!

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : प्रजासत्ताक दिनाच्या पावन निमित्ताने उरण पोलीस विभागाच्या सहकार्याने उरण पोलीस स्टेशन येथे जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात दारू व अंमली पदार्थांच्या व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्यरत असलेले दार्शनिक दृष्टीकोनातून काम करणारे दर्शन नाईक व त्यांच्या व्यसनमुक्ती समुदायातील काही सहकारी सहभागी झाले होते.या प्रसंगी दर्शन नाईक यांनी उरण परिसरात वाढत चाललेल्या अंमली पदार्थांचे सेवन, मद्यपानाचे व्यसन तसेच स्क्रीन (मोबाईल/डिजिटल) व्यसन याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. या व्यसनांचा युवकांवर, कुटुंबव्यवस्थेवर आणि सामाजिक सुरक्षिततेवर होणारा परिणाम त्यांनी सविस्तरपणे मांडला.

कार्यक्रमादरम्यान पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना Alcoholics Anonymous (AA) आणि Narcotics Anonymous (NA) यांसारख्या स्वयं-सहाय्य गटांची माहिती देण्यात आली.व्यसनमुक्तीसाठी उपलब्ध असलेली मदत, बैठकींची रचना, गोपनीयता, तसेच गरजूंना योग्य दिशेने मार्गदर्शन कसे करता येईल याबाबत उपयुक्त माहिती व दृष्टिकोन देण्यात आला.हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलानी यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. तसेच संपूर्ण उरण पोलीस विभागाने दिलेल्या सहकार्याबद्दल व सकारात्मक प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करण्यात आले.अशा प्रकारचे जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्यास व प्रतिबंधात्मक उपाययोजना बळकट करण्यास निश्चितच उपयुक्त ठरतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

यु. ई. एस. स्कूल, ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स ॲण्ड कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजी मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !

यु. ई. एस. स्कूल, ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स ॲण्ड कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजी मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) :
सोमवार दिनांक २६  जानेवारी  २०२६ रोजी यु. ई. एस. स्कूल, ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स ॲण्ड कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजी मध्ये ७७ वा  प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यु. ई. एस. संस्थेचे अध्यक्ष  चंद्रकांत ठक्कर यांनी आपल्या पवित्र राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करुन त्यास मानवंदना दिली. त्यानंतर माध्यमिक विभागाच्या विदयार्थ्यांनी संगीत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली भारतमातेला समर्पित असे जोशपूर्ण समूहगीत सादर केलं. आजच्या ह्या प्रजासत्ताक दिनी व्यासपीठावर यु. ई. एस. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत ठक्कर, उपाध्यक्ष मिलिंद पाडगांवकर, मानद सचिव ॲड. राजेंद्र भानुशाली, खजिनदार ॲड. अपूर्वा ठाकूर, सदस्य व माजी अध्यक्ष आर्किटेक्ट तनसुख जैन, सिनिअर कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉ. मिनाक्षी गुप्ता, स्कूल व ज्यु. कॉलेजच्या प्राचार्या सिमरन दहिया, समन्वयक,  सिनिअर कॉलेजच्या विभाग प्रमुख तसेच माध्यमिक, प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागातील पर्यवेक्षिका, केंद्रप्रमुख श्री. शंकर म्हात्रे,  पीटीए सदस्य, शिक्षकगण, शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी तसेच हा सोहळा पाहण्यासाठी मोठया संख्येने पालक उपस्थित होते. 
प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून पूर्व प्राथमिक ते ज्यु. कॉलेजच्या काही विदयार्थ्यांनी भाषणाद्वारे आपले मनोगत व्यक्त केले, तर यु. ई. एस. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत ठक्कर हयांनीही आपल्या भाषणाद्वारे सर्व उपस्थितांसमोर मौलिक विचार मांडले. त्यानंतर प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या विदयार्थ्यांनी पी.टी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नयनरम्य अशी प्रात्यक्षिक सादर केली, ज्यास उपस्थितांनी भरभरुन दाद दिली.  
त्यानंतर परिक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व विभागातील विदयार्थ्यांचा तसेच कला, क्रीडा व इतर विभागात विशेष कामगिरी करुन शाळा व कॉलेजचं नावलौकिक वाढवणाऱ्या विदयार्थ्यांचं उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम संपल्यानंतर माध्यमिक विभागाच्या  विदयार्थ्यांनी नयनरम्य अशी कवायत सादर केली .

 सर्व कार्यक्रमाची तयारी, उपस्थितांचं स्वागत, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन यु. ई. एस. परिवारातील शिक्षकांनी सुत्रबध्द पध्दतीने केले. अशा रितीने यु. ई. एस. स्कूल, ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स ॲण्ड कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजी मध्ये प्रजासत्ताक दिनाचा हा सोहळा अत्यंत शिस्तबद्धपणे व दिमाखात पार पडला.

आनंद नगर मधील नागरी समस्या प्राधान्याने सोडवा शहर चिटणीस शेखर पाटील यांची मागणी !

आनंद नगर मधील नागरी समस्या प्राधान्याने सोडवा शहर चिटणीस शेखर पाटील यांची मागणी !         

उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील आनंदनगर मधील नागरी सुविधा बाबत उरण नगर परिषदेचे गटनेते अतुल ठाकूर यांच्यामार्फत नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर यांना शेतकरी कामगार पक्षाचे शहरचिटणीस शेखर पाटील यांनी निवेदन दिले.या निवेदनावर आनंद नगर मधील रहिवाशांनी १२७ जनाचे सह्यांचे निवेदन दिले आहे. त्यामध्ये आनंद नगर मध्ये गेले सात-आठ वर्षापासून पिण्याच्या पाण्याची खूप टंचाई आहे, गरजेपुरते देखील पाणी रहिवाशांना मिळत नाही, पाण्याचे प्रेशर अत्यल्प असल्यामुळे नियमित गरजा देखील भागत नाही. नागरिकांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी, पाणीपुरवठा अधिकारी यांना सातत्याने निवेदन भेटी देऊन देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही.यासंदर्भात आनंदनगर रहिवाशांच्या महिलांनी देखील नगरपालिकेकडे पाठपुरावा करून समस्या सुटल्या नाहीत. या प्रभागामध्ये रिडे व्हलपमेंट मोठ्या प्रमाणात होत असून त्यामुळे पाण्याची जुनी लाईन बदलून त्या क्षमतेची नवीन पाईपलाईन आवश्यक आहे,नवीन गटारे बनवणे अत्यावश्यक आहे.त्याचबरोबर स्ट्रीट लाईटचे दिवे बसवावेत.आनंदनगर महालक्ष्मी सोसायटीमध्ये  मागील काही महिन्यात चोरीची घटना घडलेली आहेत म्हणूनच स्ट्रीट लाईट बसवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आनंद नगर मध्ये सुशोभीकरणासाठी गेटवर कमान बांधणी व आनंद नगरच्या रहिवाशांसाठी गार्डनची व्यवस्था करणे महत्त्वाचे आहे. आनंद नगर ते राजपाल नाका या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे या बाबीकडे ही प्राधान्याने लक्ष देणे आवश्यक आहे. असे शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस व लिबर्टी पार्क गृहनिर्माण संस्था चे अध्यक्ष शेखर पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे. यावेळी  गटनेते अतुल ठाकूर म्हणाले लिबर्टी पार्क आनंदनगरचे निवेदन  समस्या नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर यांना देण्यात येऊन पाठपुरावा करून या समस्या सोडवण्यासाठी आग्रही राहू अशी ग्वाही दिली. यावेळी  पत्रकार संघांचे अध्यक्ष घनश्याम कडू, ग्राहक संरक्षण कक्षाचे रमेश म्हात्रे, माजी नगरसेविका  लता शेखर पाटील, उरण विधानसभा शहराध्यक्ष  नयना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मंगेश कांबळे, शिवसेनेच्या कमल अशोक पाटील, शिवसेनेच्या विना तलरेजा, रसिका मिश्रा, शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष संजय गावंड, क्राइम ब्रांच असोसिएशनचे अध्यक्ष नारायण पाटील, सामाजिक कार्यकर्ते दिलीप पाटील, लिबर्टी पार्कचे सभासद व आनंद नगर वासीय उपस्थित होते

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...