आर.आर.पाटील फाऊंडेशन संलग्न पँथर राजाभाऊ गांधले सामाजिक संस्था,मायक्रोलिंक फाऊंडेशन तर्फे ज्ञानमूर्ती,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन !
मुंबई, (प्रतिनिधी) ; आर.आर.पाटील फाऊंडेशन संलग्न पँथर राजाभाऊ गांधले सामाजिक संस्था व मायक्रोलिंक फाऊंडेशने ज्ञानमुर्ती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त वत्कृत्व स्पर्धा आयोजित केली असून, स्पर्धेचे विषय सावित्रीबाई फुले आणि सार्वत्रिक शिक्षण, स्त्री पुरुष समानता आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार, पहिल्या स्त्रीवादी विचारवंत : सावित्रीबाई फुले हे आहेत. या स्पर्धेत प्रत्येक स्पर्धकाला वरील कोणत्याही एका विषयावर पाच मिनिटांचे भाषण करायचे आहे. तत्पुर्वी स्पर्धकाला आपला विषय, नाव व पत्ता सांगणे आवश्यक आहे. तसेच स्पर्धेची अंतिम तारीख १० जानेवारी पर्यंत असून आपला रेकॉर्डिंग केलेला व्हिडीओ ८८७९५४४५४० या व्हॉट्सएप नंबर पाठवायचा आहे. स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या प्रथम तीन स्पर्धकांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. अशी माहिती आयोजक केतन भोज, सचिन मनवळ, शरद गांधले यांनी दिली. या स्पर्धेला शंत्ताराम गुडेकर(पत्रकार), हनुमंत टाव्हरे (पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते), प्रितेश चांदे (आयडियल क्लासेस), रुपेश कांबळे(मायक्रोटोक अकॅडमी), शंकर खंडागळे (तेजस मागासवर्गीय सेवाभावी संस्था), निलेश फलके, मंगेश मांडवकर (कुणबी युवा खेड-युवाध्यक्ष), सुजित चव्हाण, योगेश सर कॉमर्स अकॅडमी या सर्वांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.

No comments:
Post a Comment