Wednesday, 3 March 2021

जुन्या वाहनांनाही आता बारकोड, होलोग्राम असलेल्या पाटय़ा.....

जुन्या वाहनांनाही आता बारकोड, होलोग्राम असलेल्या पाटय़ा.....
 

मुंबई : वाहनाच्या सुरक्षेच्यादृष्टीने अधिक काटेकोर अशा वाहन क्रमांक पाटय़ा (हाय सिक्युरिटी नंबर प्लेट) नव्या वाहनांबरोबर आता जुन्या वाहनांनाही लावण्यात येणार आहेत. बारकोड, होलोग्राम असलेल्या या पाटय़ा जुन्या वाहनांनाही बसवण्याची तयारी परिवहन विभागाने सुरू केली आहे. त्यामुळे १ एप्रिल २०१९ पूर्वी खरेदी केलेल्या वाहनचालकांनाही येत्या काळात क्रमांक पाटय़ा बदलून घ्याव्या लागणार आहेत. 

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने डिसेंबर २०१८ मध्ये वाहनांच्या सुरक्षेच्यादृष्टीने अधिक काटेकोर असलेल्या क्रमांक पाटय़ा बसवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उत्पादकांनी किंवा वितरकांनी नव्या वाहनांना बारकोड, होलोग्राम असलेल्या पाटय़ा बसवून देणे बंधनकारक करण्यात आले.
 
१ एप्रिल २०१९ पासून नव्या नियमाची अंमलबजावणी करण्यात आली. १ एप्रिलनंतरच्या वाहनांना नव्या पद्धतीच्या क्रमांक पाटय़ा नसल्यास वाहन नोंदणी न करण्याची सूचना राज्याच्या परिवहन आयुक्त कार्यालयाने दिल्या होत्या. आता नव्या वाहनांबरोबरच एप्रिल २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांनाही हा नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवी पाटी कायमस्वरूपी पोलिसांपासून पळ काढण्यासाठी वाहनांच्या क्रमांक असलेल्या पाटय़ा किंवा क्रमांक बदलण्यात येतात. त्यामुळे क्रमांक बदलल्यामुळे अनेकदा वाहन सापडत नाही आणि चोर पकडणे अशक्य होते. नव्या पद्धतीची पाटी ही अ‍ॅल्युमिनियमची असून ती वाहनाला कायमस्वरूपी लावण्यात आल्याने बदलली जाऊ शकत नाही. नवीन पाटी ही बदललेल्या जागीच लावू शकतो.

No comments:

Post a Comment

खाजगी शिकवणी नियमन मसुदा : शासनाकडून अखेर १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; ११,४१० कायदेशीर हरकतींची नोंद !!

खाजगी शिकवणी नियमन मसुदा : शासनाकडून अखेर १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; ११,४१० कायदेशीर हरकतींची नोंद !! *कोल्हापूर, दि. ७ सप्टेंबर...