Tuesday 19 September 2023

पुण्यात दोन तोतया पत्रकारांच्या विरोधात गुन्हा दाखल तर सोलापूर जिल्ह्यात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट !!

पुण्यात दोन तोतया पत्रकारांच्या विरोधात गुन्हा दाखल तर सोलापूर जिल्ह्यात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट !!

पुणे क्राईम :-  विकास जगताप

  दैनिक साम्राज्यला मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील येरवाडा विभागात टँकर व्यावसायिकाला ३० हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी दोन पत्रकारांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी विलास गुलाबराव देशमुख (वय ६४, रा. वडगावशेरी) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.उदय पोवार (वय ४०, रा. लोहगाव) आणि शब्बीर शेख (वय ३९, रा. विश्रांतवाडी) अशी गुन्हा झालेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देशमुख यांचा टॅंकरद्वारे पाणी विक्रीचा व्यवसाय आहे. पोवार आणि शेख या दोघांनी देशमुख यांच्याकडे ३० हजार रुपयांची मागणी केल्याने त्यांनी पैसे दिले.

मात्र त्यांनी पुन्हा पैशांची मागणी केली. देशमुख यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर शेखने टॅंकरचालक संजय मुधोळकर यांना फोन करून टॅंकरचा व्यवसाय बंद पाडण्याची धमकी दिली. याबाबत देशमुख यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच दैनिक साम्राज्यला गोपनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील अनेक विविध भागात तोतैया पत्रकारांनी बऱ्याच ठिकाणी अश्या प्रकारे वसुलीचा धंदाच मांडलेला आहे, त्यामुळे खरे पत्रकार बदनाम होत आहेत, त्यामुळे हा विषय प्रत्येक जिल्ह्यातील अधिकारी पत्रकार यांनी गांभीर्याने घेतला पाहिजे,

No comments:

Post a Comment

उमेश महाराज शेडगे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार प्रदान !!

उमेश महाराज शेडगे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार प्रदान !! मुंबई (शांताराम गुडेकर) :              परमपूज्य श्री समर्थ सद्ग...