Saturday 31 August 2024

पालकमंत्री सफाई कर्मचारी आंदोलनाबाबत सकारात्मक, जिल्हाधिकाऱ्यांचे मनोरुग्णालय प्रशासनास आदेश !!

पालकमंत्री सफाई कर्मचारी आंदोलनाबाबत सकारात्मक, जिल्हाधिकाऱ्यांचे मनोरुग्णालय प्रशासनास आदेश !!

ठाणे, दि. ३१,

ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील सफाई कामगारांनी उपोषणाच्या अठराव्या दिवशी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे प्रदर्शन करुन किमानवेतन व गेल्या ५ वर्षाची थकबाकी रक्कम त्वरीत अदा करा या मागण्या जोरदारपणे मांडल्या. या वेळी ठाण्याचे पालक मंत्री मा. शंभुराज देसाई यांनी कामगारांना धरणेस्थळी भेट देउन त्यांचे प्रश्न ऐकून घेतले. या बद्दल आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घालून देण्याचे आश्वासन त्यावेळी त्यांनी कामगारांना दिले. न्यायालयाने आदेश देऊनही अजून कामगारांना किमान वेतन मिळत नसल्याने १३ ऑगस्ट पासून बेमुदत साखळी उपोषण आंदोलन सुरू आहे.

धरणे प्रदर्शनाच्यावेळी कामगारांचे शिष्टमंडळ ठाण्याचे जिल्हाधिकारी मा. अशोक शिंगारे यांना भेटले आणि आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांना दिली. या वेळी कामगारांचे प्रश्न ऐकून घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांना फोन करुन सफाई कामगारांना त्यांच्या हक्काचे किमान वेतन अधिनियमानुसार मिळणारे वेतन लगेच अदा करण्याचे आदेश दिले, त्याच प्रमाणे कामगारांना पीएफ आणि ESIC ची सुविधा लगेच उपलब्ध करुन द्या असेही सांगितले. तसेच जॉइंट डायरेक्टर मार्फत या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले. टेंडर मध्ये काहीही ठरवले असले तरी किमान वेतन कायद्या नुसार वेतन अदा कारणे बंधनकारक आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले. शिष्टमंडळात श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया, सचिव सुनील कंद, कामगार प्रतिनिधी अनिता कुमावत, सोनी चौहान, दीनानाथ देसले, संजय सेंदाणे, महेश निचिते आदी होते. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आदेश आंदोलक सफाई कामगारांच्या दृष्टीने दिलासादायक आहेत, पण ठाणे औद्योगिक न्यायालयाने ११ जून २०२४ रोजी किमान वेतन अदा करण्याचे स्पष्ट आदेश देऊनही रुग्णालय प्रशासन आणि कंत्राटदार त्याची अंमल बजावणी अजून करत नाही. १३ ऑगस्ट पासून सुरु असलेले या सफाई कामगारांच्या साखळी उपोषण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी १९ ऑगस्ट रोजी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आल्या होत्या. त्यांच्या उपस्थितीत उपसंचालक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी जुलै महिन्याचे वेतन किमान वेतन कायद्यानुसार देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु रुग्णालय प्रशासनाने ते पाळलेले नाही. त्यामुळे मागण्या प्रत्यक्षात पदरात पडल्याशिवाय उपोषण आंदोलन मागे घेणार नसल्याचे श्रमिक जनता संघ यूनियनचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी सांगितले. 

या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी श्रमिक जनता संघाचे उपाध्यक्ष डॉ. संजय. मं. गो, खजिनदार अविनाश नाईक, कल्याणचे घंटागाडीचे सफाई कामगार सदस्य तसेच राष्ट्र सेवा दलाचे साथी जवाहर नगोरी, समता विचार प्रसारक संस्थेच्या कोषाध्यक्ष मीनल उत्तूरकर, घर बचाओ आंदोलनाचे संतोष थोरात, सुनिल दिवेकर, अजय भोसले, लोक कामगार संघाचे कार्यकर्ते गिरीश भावे, धर्मराज पक्षाचे सचिव नितीन देशपांडे, बहुजन विकास संघ नरेश भगवाने, नरेश बोहित, रस्ते साफसफाई विभाग चे भास्कर शिगवण, पाणी पुरवठा विभाग चे गणेश चव्हाण, घंटा गाडी सचिन कर्डिले, मनोरुग्णालयातील अनिता कुमावत, शर्मिला लोगडे, सोनी चव्हाण, दिनानाथ देसले, संजय सैदाणे, व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


जगदीश खैरालिया 
महासचिव, श्रमिक जनता संघ  
9769287233

Friday 30 August 2024

लोकनिर्माण वृत्तपत्राच्या आरती संग्रहाचे मंगळवारी देवरुख येथे होणार प्रकाशन !!

लोकनिर्माण वृत्तपत्राच्या आरती संग्रहाचे मंगळवारी  देवरुख येथे होणार प्रकाशन !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
                  दरवर्षी प्रमाणे यंदाही लोकनिर्माण वृत्तपत्राचे आरती संग्रह प्रकाशित करण्यात येणार आहे. या अंकात पर्यावरण विषयी माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली असून पर्यावरण विषयी जनजागृती व्हावी हा या मागचा हेतू आहे.गेली तीन वर्षं आम्ही अंकाचे प्रकाशन चिपळूण येथे मान्यवरांचे हस्ते केलेले आहे.‌   
       या वर्षी  या अंकाचे प्रकाशन देवरुख येथे मंगळवार दिनांक ३/९/२०२४ रोजी सकाळी ११ वाजता देवरुख येथील हाॅटेल पार्वती पॅलेस सभागृहात मान्यवरांचे हस्ते करणार आहोत.तरी या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन वृत्तपत्राच्या संपादकिय मंडळाच्या वतीने सहसंपादक युयुत्सु आर्ते यांनी केले आहे.

मासूम संस्था व मॉर्गन स्टॅनली यांच्याकडून संत ज्ञानेश्वर नाईट शाळेच्या विद्यार्थ्यांना मिळाला गणवेश (ड्रेस) !!!

मासूम संस्था व मॉर्गन स्टॅनली  यांच्याकडून संत ज्ञानेश्वर नाईट  शाळेच्या विद्यार्थ्यांना मिळाला गणवेश (ड्रेस कोड) !!!
मुंबई प्रतिनिधी- विश्वनाथ राऊत तारीख -31, पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ, भिवंडी संचालित संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल कुर्ला पश्चिम येथील रात्र शाळेच्या विद्यार्थ्यांना 26 ऑगस्ट 2024 रोजी मासूम संस्था व मॉर्गन स्टॅनली यांच्याकडून गणवेश वाटप करण्यात आले.  त्यावेळी स्वतः मासूम संस्थेचे एसएससी डिपार्टमेंटचे प्रमुख श्री शशिकांत गवस सर तसेच मॉर्गन स्टॅनलीच्या प्रतिनिधी प्रीती लाड मॅडम, मासूमच्या प्रोजेक्ट हेड सायली मॅडम उपस्थित राहून त्यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना ड्रेसचे वाटप करण्यात आले. ड्रेस मध्ये त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला दोन टी-शर्ट देण्यात आले या टि - शर्टवर समोरील बाजूस मासूम संस्थेचा लोगो व पाठीमागच्या बाजूस शाळेचे नाव संस्थेचा लोगो व संस्थेचे नाव याची छपाई करण्यात आली आहे. ड्रेसचे वाटप करताच विद्यार्थ्यांनी तो टी-शर्ट परिधान करून आनंद व्यक्त करत ड्रेस मिळवून देणाऱ्या संस्थांचे विद्यार्थ्यांनी व शाळेने आभार मानले. 
रात्र शाळेच्या विद्यार्थ्यांना गणवेश (ड्रेस) नसल्यामुळे कोणत्याही गणवेशात विद्यार्थी शाळेमध्ये हजर राहायचे रात्र शाळा ही दिवसाच्या शाळेप्रमाणे वाटावी व  रात्र शाळेच्या विद्यार्थ्यांना आपण शिस्तबद्ध रात्र शाळेत शिकत आहोत. याचा आनंद त्यांना मिळावा या उद्देशाने ड्रेस कोड रात्री शाळेच्या विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे.
तसेच श्री राजेश सावंत  यांच्या प्रयत्नातून वात्सल्य ट्रस्ट मुंबई यांच्याकडून 30 डझन वह्या रात्र शाळेच्या विद्यार्थ्यांना देण्यात आल्या त्याबद्दल गणवेश व वह्या वाटप देणाऱ्या संस्थेचे शाळेच्या मुख्याध्यापक श्री विश्वनाथ राऊत यांच्याकडून आभार व्यक्त करण्यात आले.
त्याचबरोबर रात्र शाळा ही एक गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे आतापर्यंत राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते.
मागच्या पाच वर्षापासून एसएससी बोर्ड परीक्षेचा  निकाल 100% लावण्यात येत आहे. संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूलमध्ये येणारा विद्यार्थी हा गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन एसएससी परीक्षा पास होऊन, पास झाल्याचा दाखला घेऊन पुढील वाटचालीसाठी बाहेर पडावा असाच उद्देश रात्र शाळेचे मुख्याध्यापक श्री विश्वनाथ राऊत तसेच शिक्षक वर्ग श्री  समाधान खैरनार सर, वीरकर सर व सेवक पदी काम करणारे श्री प्रमोद गीते  यांनी ठेवला आहे. 
संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल ही मराठी माध्यमाची रात्र शाळा बैल बाजार कुर्ला पश्चिम या ठिकाणी नावारूपाला आली आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, अशा 8वी 9वी व 10वीचे वर्ग असलेल्या रात्रशाळेत आपण प्रवेश घेऊन आपलं भवितव्य उज्वल करावं असे मत मुख्याध्यापकांनी व्यक्त केले.

Thursday 29 August 2024

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन जनकल्याण सेवांसाठी सर्वात प्रभावशाली एनजीओ म्हणून सन्मानित !!

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन जनकल्याण सेवांसाठी सर्वात प्रभावशाली एनजीओ म्हणून सन्मानित !!

दिल्ली, प्रतिनिधी :- सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली कार्यरत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनला ११व्या सी.एस.आर.शिखर संमेलनात यू.बी.एस. फोरमकडून वर्षातील सर्वात प्रभावशाली एनजीओ (स्वयंसेवी संस्था) म्हणून सन्मानित करण्यात आले. विवांता हॉटेल, द्वारका, दिल्ली येथे २८ ऑगस्ट, २०२४ रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 

फाउंडेशनच्या वतीने हा गौरवशाली सन्मान पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेलेले संत निरंकारी मंडळाचे सचिव परम आदरणीय श्री.जोगिंदर सुखीजा यांनी या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, की संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनला प्राप्त झालेले अशा स्वरूपाचे अनेक विशेष पुरस्कार हे फाउंडेशनमार्फत केल्या जाणाऱ्या विविध सामाजिक व धर्मादाय स्वरुपाच्या कार्यांची पावतीच असते जो सतगुरु माताजी व निरंकारी राजपिता जी यांच्या अमूल्य व प्रेरणादायी शिकवणूकीचाच सुपरिणाम होय. नि:संशयपणे आम्हा सर्वांसाठी हा गौरवपूर्ण क्षण आहे.

ते म्हणाले, की सन् २०१० मध्ये स्थापित संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन समाजाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कल्याणकारी परियोजना कार्यान्वित करुन सकारात्मक भूमिका निभावत आहे. त्यामध्ये आरोग्याच्या क्षेत्रात अनेक धर्मादाय इस्पितळे, दवाखाने, फिजियोथेरेपी, दंत चिकित्सा, नेत्र चिकित्सा केंद्रे, डायग्नोस्टिक लॅब इत्यादि सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत ज्याचा लाभ आतापर्यंत लाखो लोकांनी प्राप्त केला आहे. याच सेवांमध्ये संत निरंकारी हेल्थ सिटी प्रोजेक्ट या महत्वपूर्ण प्रकल्पाच्या निर्मितीचे कार्य प्रगतिपथावर आहे जो मानवता व एकत्वाच्या सुंदर भावनांना समर्पित आहे. 

शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यालये, कॉलेज व युवकांसाठी विविध प्रकारची प्रशिक्षण केंद्रे; जसे निरंकारी इन्स्टिट्यूट ऑफ म्यूझिक आणि आर्टस, मोफत शिक्षण केंद्रे, लायब्ररी इत्यादिंचा समावेश आहे. 

संयुक्त राष्ट्रांच्या सतत विकास लक्ष्य (Sustainable Development Goals) कार्यक्रमा अंतर्गत लक्ष्य क्र.06 नुसार सर्वांना पाणी व स्वच्छता बहाल करण्याच्या उद्देशाची पुर्ती करण्याच्या हेतूने फाउंडेशनकडून महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील सायवन आदिवासी भागात संत निरंककारी चॅरिटेबल फाउंडेशनमार्फल राबविण्यात येत असलेल्या जल संरक्षण परियोजने अंतर्गत तीन सीमेंट नाला बांध तयार करण्यात आले आहेत ज्याद्वारे या भागातील आदिवासींसाठी अनेक कार्ये सुरु करण्यात आली आहेत. त्यांचे सर्वात मोठे पाण्याचे दुभिक्ष्य दूर करण्यात आले आहे ज्याचा लाभ जवळपास ३० हजार स्थानिक आदिवासींना होत आहे. 
प्रकृति संरक्षणार्थ एस.एन.सी.एफ. कडून अनेक परियोजना कार्यान्वित करण्यात येत आहे ज्यामध्ये जल रक्षणासाठी ‘प्रोजेक्ट अमृत’ तर पर्यावरण संतुलनासाठी ‘वननेस वन’ यासारख्या योजना राबविण्यात येत आहे ज्यायोगे पृथ्वीरक्षण होऊ शकेल. 

या कार्यक्रमामध्ये एस. एन. सी. एफ. च्या स्वयंसेवकांनी एका इंटरॅक्टिव डिस्प्लेच्या माध्यमातून संत निरंकारी मिशनकडून केली जाणारी विविध प्रभावशाली कार्ये प्रदर्शित करण्यात आली. 

राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पुन्हा सन्मानपूर्वक उभारणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, वाडा तालुका यांचे निवेदन‌ !!

राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पुन्हा सन्मानपूर्वक उभारणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, वाडा तालुका यांचे निवेदन‌ !!

वाडा, प्रतिनिधी : सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व शिवस्मारक पुन्हा नव्याने सन्मानपूर्वक उभारण्यात यावा या मागणीसाठी वाडा तालुका राष्ट्रवादी (अजितदादा) यांच्या वतीने गुरुवार (दि. 29 ऑगस्ट) रोजी वाडा तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना निवेदन देण्यात आले. 

यावेळी पालघर जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती रोहिणीताई शेलार, राष्ट्रवादी वाडा तालुका अध्यक्ष जयेश शेलार, माजी सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य रघुनाथ माळी, विधानसभा संपर्क अध्यक्ष नाना साबळे, युवक अध्यक्ष प्रफुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले.

यावेळी पूर्व विभाग अध्यक्ष उमेश दळवी, युवक उपाध्यक्ष वैभव पठारे, उपाध्यक्ष सुधीर भोईर, आदिवासी आघाडी तालुका उपाध्यक्ष प्रीतम वाघ, विभाग अध्यक्ष कौशिक पाटील, समीर वेखंडे, महिला आघाडी वैशाली म्हसरे, वैशाली पवार, जेष्ठ कार्यकर्ते कुमार सुतार, प्रकाश भानुशाली यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

सिंधुदुर्ग येथील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला हा आपल्या दैवताचा व महाराष्ट्राचा अपमान झाला असून हा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळतो ही अत्यंत लाजीरवाणी बाब असल्याची तमाम शिवप्रेमींची संतप्त भावना आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत आणि आमच्या दैवताचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही. या घटनेमुळे राज्यभरातील शिवप्रेमी जनतेमध्ये तीव्र संताप आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच महाराजांचा पुतळा पुन्हा नव्याने सन्मानपूर्वक उभारण्यात यावा, ही  वाडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने जाहीर मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

शिवसेना (उबाठा) महाराष्ट्र रिक्षा चालक सेनातर्फे मोफत नेत्र तपासणी व दंतचिकित्सा शिबिर अंधेरी येथे संपन्न !

शिवसेना (उबाठा) महाराष्ट्र रिक्षा चालक सेनातर्फे  मोफत नेत्र तपासणी व दंतचिकित्सा  शिबिर अंधेरी येथे संपन्न !

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
         शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) 
अंधेरी पश्चिम विधानसभा प्रमुख मार्गदर्शक मान.अनिल परब व सरचिटणीस राजेंद्र देसाई यांच्या मार्गदर्शना नुसार महाराष्ट्र रिक्षा चालक सेना सहचिटणीस प्रशांत घोलप, विश्वास तेली व दिनेश उप्पल यांच्या आयोजनात मोफत नेत्र तपासणी व दंतचिकित्सा  शिबिर पार पडले. शिबिर संजीवनी ममता हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर यांच्या विशेष सहकार्याने रविवारी घेण्यात आले.नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी व दंत चिकित्सा तसेच मोतीबिंदू असलेल्याची मोफत शस्त्रक्रिया शिबिर महाराष्ट्र रिक्षाचालक सेना जनसंपर्क कार्यालय दाऊद बाग, अंधेरी पश्चिम येथे होते. यावेळी उपविभाग प्रमुख हारुन खान, प्रसाद आयरे,उपविभाग संघटिका संजीवनीताई घोसाळकर, शाखा प्रमुख दयानंद कड्डी, शाखासंघटीका सुनंदाताई नांदगावकर, उपविभाग प्रमुख (मालवण) शशिकांत आंगणे, या मान्यवरांनी शिबिराला भेट दिली. तसेच महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे कार्यकर्ते राजेश इंगळे, दीपक मगर, अशोक मगर, रमेश निवाते, कृष्णा ठोंबरे, अर्जुन माईन, संदीप चव्हाण व रविंद्र कड्डी या सर्वांच्या सहकार्याने सदर शिबिर पार पडले. या शिबिरामध्ये शिवसैनिक पदाधिकारी व नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

Wednesday 28 August 2024

देवरुख शहरात शिवसेना (उबाठा) गटाची अधिकृत शाखा उपलब्ध व्हावी अशी निष्ठावंत शिवसैनिकांची मागणी !!

देवरुख शहरात शिवसेना (उबाठा) गटाची अधिकृत शाखा उपलब्ध व्हावी अशी निष्ठावंत शिवसैनिकांची मागणी !!

कोकण, (संदीप गुडेकर) :
           रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या गटातर्फे एक अधिकृत शाखा उपलब्ध व्हावी अशी माफक इच्छा काही निष्ठावंत शिवसेना कार्यकर्ते यांची आहे. जेणेकरून या शाखेतर्फे किंवा शाखेतून सर्व सामान्य जनतेला भेडसावणाऱ्या समस्या, निवेदन किंवा अन्य जनहित असलेली कामे ऐकून घेऊन ती करता येतील.शिवाय शिवसेना (उबाठा) तर्फे विविध कार्यक्रम करणे सोपे होईल. येथील निष्ठावंत शिवसैनिक देवरुख शहरात शाखा व्हावी अशी मागणी करत आहेत. यासाठी उपनेते भास्कर जाधव आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी मनावर घेऊन कार्यकर्ते यांच्या भावनांना महत्व देऊन लवकरच विधानसभा निवडूकापूर्वी देवरुख शहरासह गाव तेथे शाखा निर्माण करून कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करावे. जर गावा -गावात शाखा निर्माण झाल्या तर पक्ष पण वाढेल आणि जनतेची कामे पण करता येतील. तालुका प्रमुख बंडया बोरुकर यांनी तालुकाच्या वतीने सह संपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा प्रमुख विलास चाळके यांच्याकडे लेखी पत्र देऊन निष्ठावंत शिवसैनिक यांच्या मागणीचा विचार करावा. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन देवरुखसह गावा -गावात शाखा मान्य करून शिवसेना कशी वाढेल यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी तालुका प्रमुख यांनी विशेष प्रयत्न केले तर शिवसेना पक्ष बळ घेऊन येणाऱ्या विधानसभा निवडणूक मध्ये त्याचा चांगलाच फायदा होईल.

Tuesday 27 August 2024

चिपळूण -संगमेश्वर मतदार संघातून वाशिस्ट मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस प्राव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष प्रशांत यादव यांना मतदारांचा पाठिंबा !!

चिपळूण -संगमेश्वर  मतदार संघातून वाशिस्ट मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस प्राव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष प्रशांत यादव यांना मतदारांचा पाठिंबा !!

कोकण (शांताराम गुडेकर) :
             चिपळूण संगमेश्वर या मतदार संघातून वशिस्ट मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस प्राव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष प्रशांत बबन यादव यांना शहरी, ग्रामीण भागात वाढता पाठिंबा मिळत असल्याने मतदार, तरुण युवक यांच्यामध्ये  नव चैतन्य निर्माण झाले आहे. गेल्या आठ दिवसा पूर्वी देवरुख, चार दिवसा पूर्वी चिपळूण येथे शेतकरी मेळावे पार पडले. त्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
             यादव यांनी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी पक्षात अधिकृत प्रवेश केलेला आहे. गेल्या वर्षभरा पूर्वी ते राष्ट्रवादी मध्ये सहभागी झाले आहेत. तेव्हापासून पवार साहेब यांना सात देत आले आहेत. त्यांचा पक्ष अडचणीत असताना पक्षाला उभारी देण्याची, पक्ष वाढवण्यासाठी दिलेली साथ आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे यांचे उपनेते भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे  यांना पडत्या काळात दिलेली साथ असेल ती आज वाखान्या जोग आहे.कारण ज्या-ज्या वेळी पक्ष अडचणीत असेल त्या -त्या वेळी भास्कर जाधव गुहागर आमदार आणि आता इच्छुक असलेले आघाडी कडून प्रशांत यादव यांनी पक्षाला दिलेली साथ लक्षात घेता गुहागर मधून पुन्हा भास्कर जाधव आणि चिपळूण -संगमेश्वर मधून  प्रशांत यादव  विधानसभासाठी आघाडी कडून निवडून येथील असे चित्र आहे.कारण वासिस्ट मिल्क मार्फत घरा -घरा मध्ये यादव यांनी रोजगार देण्यासाठी पुढचे पाऊल टाकत आहेत. कारण आज दहावी- बारावी,पदवीधर युवक -युवती झाले की, शहरात, मुंबई किंवा इतर ठिकाणी जात असतात. कुठेतरी तरी भाड्याच्या खोलीत राहायचे. कसे तरी जीवन जगायचे अशी सुरुवात होते. तरुण पीडीची ही व्यथा वासिस्ट मिल्क अध्यक्ष यांच्या लक्षात आल्याने आणि दुध डेरीकडे शेतकरी यांचे दूर लक्ष झालेले असल्याने परत सर्व तरुण पिडीला शेती कडे प्रवृत्त करून दुध डेरी च्या माध्यमातून तरुण वर्ग यांना त्यांच्या हाताला काम मिळेल रोजगार मिळेल या साठी धडपड पाहता तरुण वर्ग आज यादव यांच्या मेहनती कडे आणि त्यांच्या विचारसरणीकडे वळला आहे. चिपळूण -संगमेश्वर मतदार संघमधून त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे.कारण त्यांनी ज्या प्रकारे २०२१ मध्ये वासिस्ट मिल्क ची स्थापना केली. आज दररोज ७ हजार शेतकरी त्यांच्या चिपळूण -संगमेश्वरमधील वासिस्ट मिल्क दुध डेरीवर नेहमीत दुध घालत आहेत. चांगल्या दर्जाचे, उत्तम दुध त्यांच्या मिल्क मार्फत मार्केट मध्ये विकले जात आहे. पुण्यात आणि सर्व मुंबई उपनगरात सर्व ठिकाणी उत्तम प्रकारे त्यांचे वासिस्ट मिल्क चे प्रॉडक्ट विकल्या जात असल्याने तरुण पिडीला त्यांच्या हाताला काम मिळत आहे. आज यादव यांच्या रूपाने चिपळूण संगमेश्वर मध्ये  विकासासाची गंगा नक्कीच येईल असा विश्वास तरुण वर्गाला वाटत आहे.
              आज तरुण वर्ग  मुंबई, पुणे किंवा अन्य ठिकाणी  जात आहे तो कोकण मध्ये राहून गावा गावात दुध व्यवसाय करून आपले कुटुंब चांगल्या पद्धतीनी चालवू शकतो.आज शेतकरी यांची मुले शेती कडे किंवा दुध व्यवसायात दुर्लक्ष  करीत आहेत त्यांना प्रवाहात आणण्यासाठी तरुण पिडीला हाताला काम देण्यासाठी आज प्रशांत यादव यांच्या सारखा  एक देवदूतच मिळाला आहे असे म्ह्टले तर ते वावगं ठरणार नाही.कारण आज देशात शेतकरी शेतीकडे, दुध व्यवसायात लक्ष देत नाही. आपली हक्काची शेती सोडून देत आहे. पूर्वी गावो- गाव दुध डेरी असायच्या.गावात दुध डेरी असायच्या. मात्र मधल्या वीस -पंचवीस वर्षात शेती आणि दुग्ध व्यवसाय याकडे दुर्लक्ष  झालेले बघायला मिळाले. दुध डेरी गावा गावातून गायब झाल्या होत्या. आता मात्र यादव यांच्या पुढाकारणे पुन्हा गावा -गावात, प्रत्येक खेड्या -पाड्यात दुध डेरी असो किंवा शेतीपूरक व्यवसाय असो याला सुरुवात झाली आहे. चिपळूण -संगमेश्वर असो किंवा ग्रामीण भागात असो शेती आणि दुग्ध व्यवसाय पुन्हा उभारी घेऊन तरुण पीडीला शेतीवषयी आणि दुध डेरी विषयी आवड निर्माण होईल यात काहीही शंका नाही असं चित्र दिसत आहे. त्यामुळे जनतेच्या मनातील आमदार म्हणून चर्चेत असलेल्या प्रशांत यादव यांना महाविकास आघाडीच्या मार्फत उमेदवारी जाहीर होईल असे चित्र निर्माण झालेले आहे. कारण वर्षभर चिपळूण- संगमेश्वर मतदार संघात यादव खूप मेहनत घेत आहेत. आज त्यांच्या रूपाने चिपळूण- संगमेश्वर मधून आघाडीचा विधानसभासाठी आमदार म्हणून निवडून यावे अशी मागणी होत आहे. त्याच बरोबर महाविकास आघाडी चे सरकार महाराष्ट्रात यावे अशी सर्व सामान्य मतदार यांची मनापासून इच्छा आहे. पुन्हा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री व्हावा आणि यादव आमदार असावेत अशी जनतेच्या मनात इच्छा असून नाक्या-नाक्यावर चर्चा रंगत आहे.

कळंबट गावचे ज्येष्ठ नागरीक महादेव सोमा कोकमकर यांचं दुःखत निधन !

कळंबट गावचे ज्येष्ठ नागरीक महादेव सोमा कोकमकर यांचं दुःखत निधन !

मुंबई - निलेश कोकमकर 

कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा चिपळूण मुंबई आणि कुणबी शिक्षण मंडळ चिपळूण - मुंबई चे विद्यमान अध्यक्ष मा श्री.चंद्रकांत कोकमकर सर आणि कुणबी शिक्षण मंडळ चिपळूण चे माजी संचालक श्री. विजय कोकमकर सर यांचे वडील आणि कळंबट गावाचे जेष्ठ विचारवंत तसेच गावातील प्रत्येक कार्यक्रमात जबाबदारीने सहभाग घेणारे नागरिक कै. श्री. महादेव सोमा कोकमकर यांचे सोमवार दि. २६ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले. गावासाठी झटणारे एक व्यक्तिमत्त्व, रोखठोक हजरजबाबीपणा असणारी व्यक्ती हरपला. कळंबट गाव आणि पंचक्रोशीत दुःख व्यक्त केलं जातं आहे. त्यांच्या जाण्याने कोकमकर परिवारात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन सूना, नातवंड असा मोठा परिवार आहे. 

त्यांचा अंत्यसंस्कार विधी कळंबट गाव, तालुका चिपळूण या ठिकाणी होणार. त्यांच्या पवित्र आत्म्यास चिर शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दु:खातून सावरण्यासाठी बळ मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना, भावपूर्ण शोकाकुल समस्त कोकमकर परीवार कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा चिपळूण 
कुणबी शिक्षण मंडळ चिपळूण.

Monday 26 August 2024

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत करंबळे दिल्ली येथे अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हरसिटी (AIU)ची मानद डॉक्टरेट पदवी पुरस्काराने सन्मानित !!

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत करंबळे दिल्ली येथे अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हरसिटी (AIU)ची मानद डॉक्टरेट पदवी पुरस्काराने सन्मानित !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
          लांजा तालुका मधील गवाणे गावचे सुपुत्र मुंबई उच्च न्यायालयाचे कर्मचारी तसेच गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक श्री.चंद्रकांत शिवराम करंबळे यांना शुक्रवार दि. २३ ऑगस्ट २०२४ रोजी कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया दिल्ली येथे नेल्सन मंडेला फेलोशिप अवॉर्ड आणि ग्रेट इंडियन पार्लमेंट अवॉर्ड -२०२४ वितरण समारंभात अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हरसिटी (AIU)ची मानद डॉक्टरेट पदवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर डॉ.अविनाश सकुंडे, श्रेयांश मेहता (आय.एस), रमेश कुमार (उच्च न्यायालय- न्यायमूर्ती), सानीपिना जय लक्ष्मी राव- सोशल वर्कर, राजेश मुनोत - अँटी पक्राईम चीफ, दिल्ली आदी मान्यवर उपस्थित होते. आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रममध्ये विविध क्षेत्रातील लौकिक प्राप्त व्यक्ती यांचा पुरस्कार देऊन शानदार गौरव करण्यात आला. गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत नुकतीच करण्यात आली होती. याशिवाय गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक श्री.चंद्रकांत शिवराम करंबळे आणि परिवार व पदाधिकारी, सदस्य, सभासद, हितचिंतक यांच्यातर्फे कोकणात दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येतात. शिक्षण, समाजसेवा, ग्रामसेवा, तंटामुक्त, कृषीसेवा, शेती विकास, कामगार, उद्योग, साहित्य, कला, क्रीडा, ग्रंथपालन, पर्यावरण आदी क्षेत्रात गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद आहे. फळाची अपेक्षा न ठेवता सतत कार्य करत रहाणे हे गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक श्री.चंद्रकांत शिवराम करंबळे यांचा मूळ उद्देश आहे. गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत करंबळे अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हरसिटी (AIU)ची मानद डॉक्टरेट पदवी पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल लांजा तालुक्यातील अनेक मान्यवर, सामाजिक संस्था, समाज मंडळ, कुणबी समाज शाखा, पत्रकार, वृत्तपत्र लेखक, करंबळे परिवार नातेवाईक यांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

आंगवली (लाखणवाडी)ची सुकन्या कु. आश्लेषा रमेश गुडेकर वेस्ट बंगाल येथे झालेल्या वेटल्फीटींग स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ पदकाची मानकरी !!

आंगवली (लाखणवाडी)ची सुकन्या कु. आश्लेषा रमेश गुडेकर वेस्ट बंगाल येथे झालेल्या वेटल्फीटींग स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ पदकाची मानकरी !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
          रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या मु.पो.आंगवली (लाखणवाडी) येथील सुपुत्र सध्या मुंबई पूर्व उपनगर मधील भांडुप येथे राहत असलेल्या श्री.रमेश श्रीपत गुडेकर यांची सुकन्या कुमारी असलेश्या रमेश गुडेकर हिने वेस्ट बंगाल येथे झालेल्या वेटल्फीटींग स्पर्धेमध्ये आपल्या कमी वयात मनाचा तुरा रोवून बेंच प्रेस मध्ये ब्रॉन्झ पदक पटकवात आंगवली गावचे नाव रोशन केले. यापूर्वी तीने डेडलीफ्ट मध्ये गोल्ड, इन्टर स्टेट सिल्वर, ऑलव्हर ब्रॉन्झ, पार्टीसिपशन मेडल असे पाच पदके जिंकली आहेत. २०-२५ ऑगस्ट २०२४दरम्यान झालेल्या सिनियर नॅशनल पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप -कोलकाता पॉवरलीफिटिंग इंडिया असोसिएशनमध्ये चांगले यश संपादन केल्याने तिच्यावर आंगवली (लाखणवाडी) येथील चैतन्य युवा मंडळ आंगवली लाखणवाडी या मंडळाचे सदस्य रमेश गुडेकर आणि परिवार तसेच आश्लेषा हिचे कौतुक होत असून अनेकांनी तिला अभिनंदन सह शुभेच्छा दिल्या आहेत.तीचे प्राथमिक शिक्षण सुभाष बने यांच्या पराग विद्यालय मध्ये झाले असून ती मुंबई मधील रुईया कॉलेजमधून पदवीधर (बी.एम.एम) झाली आहे.आत्तापर्यंत तिला गोल्ड -२७, सिल्व्हर -९, ब्राँझ-२ अशी एकूण-३८ पदके मिळालेली आहेत. यामध्ये ज्युनिअर ग्रुपमधून गोल्ड, सिल्व्हर, ब्राँझचा समावेश आहे. नॅशनल, स्टेट, डिस्ट्रिक्ट लेवलला ती खेळली आहे. तर सिनियर ग्रुप मधून (जुलै२०२४) पासून स्टेट लेव्हल- १ गोल्ड मेडल, नॅशनल लेव्हल ब्राँझ मेडल ची मानकरी आहे.
               भावी आयुष्यात तिने तुकाराम मुंडे यांच्यासारखे निर्भीड, एक स्वच्छ प्रतिमा असलेले अधिकारी बनण्याचा तिचा मानस आहे. तो लवकरच पूर्णही होईल यात शंका नाही. कारण तिने गेल्या चार -पाच वर्षात एक डझन पेक्षा जास्त पदक या स्पर्धामध्ये मिळवली आहेत. तिचे स्वप्न लवकर पूर्ण होईल असे मत यानिमित्ताने मंडळाचे अध्यक्ष संदीप लाखन यांनी व्यक्त केले आहे. त्याच बरोबर माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, माजी आमदार सदानंद चव्हाण, विद्यमान आमदार शेखर निकम, वशिस्ट मिल्क अध्यक्ष प्रशांत यादव, स्मिता लाड, माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद संतोष थेराडे, उद्धव ठाकरे गट यांचे संगमेश्वर तालुका प्रमुख बंडया बोरुकर, जिल्हा प्रमुख विलास चाळके, महिला जिल्हा प्रमुख वेदा ताई फडके,माजी जिल्हा परिषद सदस्य मुग्धा ताई जागुष्टे, सह संपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, माजी सभापती संतोष डावल, माजी सभापती मधुकर गुरव, संगमेश्वर तालुक्यातील पत्रकार बंधू यांनी आश्लेषा रमेश गुडेकर हिला पुढील आयुष्यासाठी चांगला आदर्श डोळ्यासमोर ठेऊन सचिन तेंडुलकर,सानिया नेहवाल, आकांक्षा कदम यांच्या सारखे उत्कृष्ट खेळाडू बनवून तिने आपल्या गावाचे, वाडीचे, मंडळाचे नाव रोशन करावे अशा शुभेच्छा देत अभिनंदन केले.
               आपल्या कमी वयात यश संपादन केल्यानं तिच्यावर रत्नागिरी जिल्हा, संगमेश्वर तालुक्यातील सर्व सामाजिक संस्था, मंडळ, समाज शाखा यांच्यातर्फे अभिनंदन केले जात आहे. सचिन तेंडुलकर, सानिया नेहवाल, आकांशा कदम यांचा आदर्श डोळ्या समोर ठेऊन उत्तम खेळाडू तर तुकाराम मुंडे यांच्यासारखा निर्भीड अधिकारी यांचा आदर्श ठेवून तिने उंच भरारी घेण्याचे तिचे स्वप्न उराशी बाळगले आहे. तिला एक आय.पी.एस अधिकारी बनायचे तिचे स्वप्न आहे. तिचे ते स्वप्न लवकरच पूर्ण व्हावे या साठी लागेल ती मदत तिला करणासाठी आंगवली ( लाखणवाडी)चे निर्भीड पत्रकार संदीप गुडेकर यांनी सांगितले आहे. तिच्या या यशा मागे तिचे कोच निलेश गराटे यांनी तिला चांगले मार्गदर्शन केल्यामुळे त्याचबरोबर तिचे आई -वडील यांनी वेळो वेळो चांगले सहकार्य केल्यामुळे तिने एक डझन पेक्षा जास्त पदक मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. तिला कोणत्याही क्रीडा क्षेत्रात जी काही मदत लागेल ती मदत करू असे शशांक घडशी, सामाजिक कार्यकर्ते युयूत्सु आर्ते यांनी सांगितले. लवकरच गणपती उत्सवमध्ये तिचा चैतन्य युवा मंडळ यांच्यावतीने सत्कार मु. पो.आंगवली (लाखणवाडी) येथे केला जाईल  असे मंडळाचे अध्यक्ष अध्यक्ष संदीप लाखन यांनी सांगितले. तिच्या या यशा मागे तिचे वडील -आई भाऊ, क्रीडा कोच निलेश गराटे यांची विशेष मेहनत आहे. त्याचबरोबर मंडळातील सर्व सदस्य यांचे बहुमूल्य मार्गदर्शन असल्याने तिने हे यश संपादन केले आहे असे आश्लेषा रमेश गुडेकर हिने बोलताना सांगितले.तिने आपल्या आई- वडील यांच्या बरोबर आंगवली गावाचे, लाखणवाडीचे त्याच बरोबर रत्नागिरी जिल्हा, संगमेश्वर तालुकाचे नाव जगाच्या नकाशा वर नेऊन ठेवत उंच भरारी घेतली आहे.

Sunday 25 August 2024

रेशनिंग अधिकारी यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात कल्याण येथे सुरु असलेले भीमसेनेचे आंदोलन प्रशासनाकडून दडपण्याचा प्रयत्न - प्रकाश पवार (जिल्हाध्यक्ष, ठाणे - भिम सेना)

रेशनिंग अधिकारी यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात कल्याण येथे सुरु असलेले भीमसेनेचे आंदोलन प्रशासनाकडून दडपण्याचा प्रयत्न - प्रकाश पवार (जिल्हाध्यक्ष, ठाणे - भिम सेना)
 
** शिधावाटप अधिकारी यांच्यावर खाते निहाय चौकशी व विभागीय चौकशी करा

ठाणे (प्रतिनिधि) : कल्याण पश्चिम रेशन ऑफिस समोर कल्याण रेशन अधिकारी, उल्हासनगर अधिकारी  आणि भिवंडी अधिकारी यांनी चालवलेला भ्रष्टाचार संदर्भात ठाणे जिल्हा सचिव श्री. बालाजी पात्रे यांनी दिनांक २३/०८/२०२४ रोजी रेशन ऑफिस कल्याण समोर आमरण उपोषणास बसले असता अधिकारी वर्ग, पोलिस प्रशासन व आरोग्य विभाग हे आरोग्याचे कारण सांगून त्यांना जबरदस्तीने वडापाव चारून त्यांचे उपोषण संपवण्याचा बेत आखत आहेत. अशा प्रशासनाच्या विरोधात भीम सेना रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही. आमचा भीम सैनिक जर आज जनहितार्थ आपल्या जिवाची पर्वा न करता केवळ भ्रषटाचारा विरुद्धच्या भूमिकेत ठाम आहे तर मग त्याला उपोषणातून उठवणे करिता योजना का? तेव्हा शासन प्रशासनाने या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर तातडीने खातेनिहाय चौकशी व विभागीय चौकशी करून त्यांना निलंबित करण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी भीमसेनेकडून करण्यात आलेली आहे. भ्रष्ट अधिकारी यांचेवर भीम सेने कडून तुमचा भ्रष्टाचार विरोधी आंदोलन अधिक उग्र करण्यात येईल, असा इशारा भीम सेना ने दिला आहे.
 -  भीम सेना - ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री. प्रकाश पवार.

संपर्क -
भीम सेना - ठाणे जिल्हा अध्यक्ष:- श्री. प्रकाश पवार
भ्रमणध्नी:- ८४२२०४१६५५.

आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

▪️अडीच हजार कोटी रुपयांच्या फिरत्या निधीचे वितरण
▪️पाच हजार कोटींची बॅंक कर्जे वितरित
▪️लखपती दीदी संमेलनाला हजारो महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

जळगाव, प्रतिनिधी : भारताची वाटचाल विकसित देशाकडे सुरू असून २०४७ पर्यंत आपल्याला हे लक्ष्य गाठावयाचे आहे. हे लक्ष्य साधताना देशातील प्रत्येक महिलेच्या सुरक्षिततेसोबतच आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. महिलांच्या सर्वांगीण प्रगतीमुळे आपण विकसीत भारताचे ध्येय नक्कीच गाठू, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी येथे व्यक्त केला. स्वयंसहायता गटाला आर्थिक ताकद देतानाच गरीबांसाठी घरकूल बांधण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. आतापर्यत चार कोटी घरकूल वाटप करण्यात आली असून आगामी काळात ३ कोटी घरे बांधण्यात येतील, त्यात महिलांचे नाव प्रथम असेल, असे त्यांनी सांगितले. 

जळगाव येथील प्राईम इंडस्ट्रीअल पार्क येथे (विमानतळ परिसर) देशपातळीवरील लखपती दीदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी बोलत होते. राज्यपाल डॉ. सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री डॉ. चंद्रशेखर पेन्नासानी, केंद्रीय राज्यमंत्री कमलेश पासवान, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ, आमदार सर्वश्री संजय सावकारे, सुरेश भोळे, किशोर पाटील, मंगेश चव्हाण, आमदार लता सोनवणे यांच्यासह मान्यवरांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती. तसेच, कार्यक्रमास राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते. 

प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, महाराष्ट्र ही राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जन्मभूमी आहे. या राज्याला मातृशक्तीचा समृध्द आणि गौरवशाली वारसा लाभला आहे. त्याचा परदेश दौऱ्यात वेळोवेळी प्रत्यय येतो. अलीकडेच पोलंड दौऱ्यात या संस्कृतीचे दर्शन घडले. जळगाव जिल्हा सुद्धा संत मुक्ताबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांची गोडी आजही प्रत्येकाच्या ओठावर असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. 

आपल्या देशाची विकसित राष्ट्राकडे वाटचाल सुरू आहे. यामध्ये महिलांचा सहभाग महत्वपूर्ण आहे. लखपती दीदी योजना ही त्यासाठी महत्वपूर्ण आहे. मागील एक महिन्यात ११ लाख दीदी लखपती बनल्या. यात १ लाख दीदी महाराष्ट्रातील आहेत. त्यासाठी राज्य शासन ही पुढाकार घेत आहेत. ही अभिनंदनीय बाब आहे. लखपती दीदी हे संपूर्ण परिवाराला सशक्त बनविण्याचे अभियान आहे. महिला लखपती दीदी बनने हे संपूर्ण कुटुंबाचे जीवन बदलण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

एकीकडे विकसित राष्ट्र म्हणून त्या दिशेने काम सुरु असताना महिलांच्या समस्या सोडविण्याचा संकल्प केंद्र शासनाने केला असल्याचे सांगून प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, महिलांसाठी ३ कोटी घरे बांधताना ती त्यांच्या नावावर केली जातील. याशिवाय केंद्र सरकारने जनधन खाते उघडले. मुद्रा योजना सुरू केली. विना तारण कर्ज दिले. यात ७० टक्के महिला आहेत. महिलांच्या कर्तृत्वावर संपूर्ण देशाला विश्वास आहे. त्यांच्यासाठी  स्व- निधी योजना सुरू केली. विश्वकर्मा परिवार अंतर्गत महिलांना जोडले. सखी मंडळ मार्फत १० कोटी महिला जोडल्या गेल्या आहेत. बचत गटांना गेल्या दहा वर्षांत ९ लाख कोटीची मदत केली, असे त्यांनी नमूद केले. 
प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, महिला बचतगटांना ड्रोन पायलट बनविणार असल्याचे सांगून  त्यासाठीचे प्रशिक्षण त्यांना देण्यात येईल. आधुनिक शेतीसाठी महिलांना प्रेरित कऱण्यात येईल. यासाठी महिलांना कृषी सखी करून रोजगार वाढविण्यावर भर राहील. महिलांसाठी अर्थसंकल्पात ३ लाख कोटी रूपयांची तरतूद केली आहे. सेनादलात महिलांचा समावेश केला गेला आहे. स्टार्टअप क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. 

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांबाबत कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणी दोषींना कडक शासन व्हावे, यासाठी भारतीय न्याय संहिते अंतर्गत कायद्याचा वापर केला जाईल. महिलांवर अन्याय आणि अत्याचार करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. महिलांचे सामर्थ्य वाढविण्याबरोबरच त्यांची सुरक्षितता महत्वाची आहे. यासाठी आवश्यक ती मदतही प्रत्येक राज्यांना केली जाईल, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत राहील, असा विश्वास प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे. रोजगार आणि गुंतवणूकदार यांचे लक्ष येथे असते. त्यामुळे या प्रयत्नांसाठी राज्य शासनाला सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

भाविकांना आदरांजली 

दरम्यान, आपल्या भाषणात प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी, नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या यात्रेकरूंबाबत दु:ख व्यक्त केले. याप्रकरणी केंद्र आणि राज्य शासनाने तातडीने पावले उचलली. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना तातडीने नेपाळला पाठविले. या दुर्घटनेत जखमींवर चांगले उपचार सुरू आहेत. मृतांच्या कुटूंबियांना केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करणार -एकनाथ शिंदे
राज्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत १ कोटी महिलांच्या खात्यात दोन हप्ते जमा करण्यात आले. अन्नपूर्णा योजने अंतर्गत तीन गॅस सिलिंडर देण्याची योजना सुरु केली. मुलींना उच्च शिक्षण मोफत, महिलांना प्रवासात सवलत या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचे काम राज्य शासन करत आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानातून प्रधानमंत्री महोदयांचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प आपण केला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. 

देशाच्या ३ कोटी लखपती दीदी बनवण्याच्या प्रक्रियेत महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल. देशातील तीन कोटी दीदी मध्ये राज्यातील ५० लाख दीदींचा समावेश राहील. अनेक भगिनी पुढाकार घेऊन छोटे छोटे उद्योग करून कुटूंबाला पुढे नेत आहेत. राज्यात २५ हजार स्वयंसहायता गटांना ३० कोटींची कर्जे देण्यात आली आहे. त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जात असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.  

देशाला महाशक्ती बनवण्यासाठी महिलांची भागीदारी आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र शासनाचे सहकार्य मिळत आहे. केंद्र शासनाने ७६ हजार कोटींच्या वाढवण बंदर विकासाला सहाय्य केले. मेट्रो प्रकल्पाला मदत केली. राज्यातील कांदा, कापूस, दूध, सोयाबीन यांना चांगला दर मिळण्याच्या दृष्टीने आणि सिंचन प्रकल्पांना निश्चितपणे मदत करेल, असा विश्वासही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला. 

नेपाल येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना राज्य शासनाच्या वतीने पाच लाख रुपयांची मदत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी योजना – 

शिवराजसिंह चौहान
लखपती दीदी ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी आणि विकासाला वेग देणारी अशी योजना आहे. महिलांना त्यांच्या व्यवसायासाठी आर्थिक मदत उपलब्ध करुन त्यांना स्वावलंबी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. 

भरपावसात एवढ्या मोठ्या संख्येने महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याबद्द्ल त्यांनी सर्व भगिनींचे आभार मानले.  महाराष्ट्रात ११ लाख लखपती दीदी झाल्या आहेत.त्यांनी इतरांना प्रेरित करावे, असेही त्यांनी नमूद केले. 

देशाच्या विकासात नारीशक्तीचे मोठे योगदान – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

महिला विकासाच्या प्रवाहात आल्यास देशात प्रभावी आणि विकासात्मक बदल घडू शकतो. त्यामुळेच विकासाच्या प्रक्रियेत महत्वाचे स्थान असणाऱ्या नारीशक्तीच्या आर्थिक बळकटीकरणासाठी राज्य शासन सर्वोतोपरी साहाय्य करत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

आज नारीशक्ती विविध क्षेत्रात आपले नाव कमावत आहे. देशाच्या या विकासाच्या भागीदारीत महाराष्ट्र कुठेच कमी पडणार नाही.  संत मुक्ताई आणि कवयित्री बहिणाबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. अशा ठिकाणी हे लखपती दीदीचे संमेलन होत आहे. राज्यात बचतगटामार्फत ७५ लाख कुटूंब जोडली गेली असून दोन कोटी कुटूंब जोडण्याचा संकल्प आपण केला आहे. जळगाव जिल्हा सुजलाम सुफलाम करण्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या नार-पार सिंचन योजनेला आपण गती दिली. मंत्रीमंडळाच्या मान्यतेनंतर निविदा आणि इतर प्रक्रिया सुरु होईल, अशी माहिती त्यांनी दिली. 

राज्य शासन नेहमीच महिला भगिनींच्या पाठिशी - उपमुख्यमंत्री अजित पवार

संपूर्ण देशात सुरू असलेला विकासाचा रथ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या रुपाने जळगाव जिल्ह्यात आला आहे. केळी,  कांदा उत्पादन साठी जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनविण्याचा संकल्प केला आहे. राज्यात ५० लाख लखपती दीदी बनविण्यात येणार आहे, त्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. 

राज्य शासनाचे प्राधान्य नेहमीच महिलांना सजग, सक्षम आणि सुरक्षित बनविण्याचे राहिले आहे. राज्य शासन नेहमीच महिलांच्या पाठिशी राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

लखपती दीदींचा प्रधानमंत्री मोदी यांच्याकडून सन्मान
दरम्यान, आजच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील वंदना पाटील, मनीषा जगताप, ज्योती तागडे, सीमा कांबळे, रमा ठाकूर यांच्यासह शीतल नारेट (हिमाचल प्रदेश), महबूबा अख्तर (जम्मू काश्मीर), गंगा अहिरवार (मध्य प्रदेश), एस. कृष्णावेण्णी (तेलंगणा) आणि नीरज देवी (उत्तर प्रदेश), सेरिंग डोलकर (लडाख) यांना यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते लखपती दीदी झाल्याबद्दल सन्मानपत्र देण्यात आले. 
यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते बचतगटाच्या ४८ लाख महिलांना २५०० कोटी रुपयांच्या फिरत्या निधीचे वितरण करण्यात आले. 

उघडया जीपमधून प्रधानमंत्री मोदी यांचे भगिनींना अभिवादन
प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे कार्यक्रमस्थळी उघड्या जीपमधून आगमन झाले. यावेळी त्यांनी उपस्थित हजारो भगिनींना अभिवादन केले आणि त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. कार्यक्रमस्थळी उभारलेल्या मंडपामधून प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी फेरी मारली. यावेळी उत्साहाने भारलेल्या वातावरणात उपस्थित भगिनींनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्यासोबत उपस्थित होते.

शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांना वसई तालुका गौरव २०२४ पुरस्कार प्रदान.....

शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांना वसई तालुका गौरव २०२४ पुरस्कार प्रदान.....

मुंबई, प्रतिनिधी :- समाजकार्यात भरीव कामगिरी करणाऱ्या शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांना टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनेल चा वर्धापनदिन निमित्त उत्कृष्ठ समाजसेविका म्हणुन वसई तालुका गौरव २०२४ पुरस्कार  देऊन सन्मानित करण्यात आले.

एक महिला आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर खूप काही करु शकते हे जिवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे रूचिता नाईक आहेत. आपल्या विचारांतून  एक समाजसेवेची ज्योत प्रोज्योलित करुन आज ही ती अखंड पणे सुरुच ठेवली आहे.
हजारो महिलांना मोफत शिवणकाम, मेहंदी, ब्युटी पार्लर, केक मेकींग प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात आले.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे मोफत २००० फॉर्म महिलांना वाटप करण्यात आले. शेकडो दिव्यांग बांधवांना मोफत दिव्यांग प्रमाणपत्र, साहित्य व पेन्शन मिळवुन दिली.
संजय गांधी योजने मधुन विधवा महिलांना दर महिना पेन्शन सुरू करून दिली. तहसिलदार येथुन गरीब गरजू नागरीकांना मोफत दाखले उपलब्ध करून देण्यात आले. शेकडो नागरीकांचे मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया करून देण्यात आली.
शिवसेना कार्यालयात दर महिन्याला आधार कार्ड शिबीर, आरोग्य शिबीर, मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीर, मोफत आयुष्यमान कार्ड, ई श्रम कार्ड, आभा कार्ड नागरीकांचे शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले.

महिलांवरील अत्याचार थांबावे यासाठी विशाखा समिती स्थापन करण्याबाबत महिला आयोग अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्याकडे सतत पाठपुरावा करत आदेश काढले. समेळगाव स्मशानभूमीतील लाकडे ठेवण्यासाठी शेडचे काम केले. सोपारा सामान्य रुग्णालयातील रिक्त जागे वरील भरती व साहित्य हॉस्पिटल मध्ये उपलब्ध करून दिले. नालासोपारात दरवर्षी पावसामुळे घरात पाणी शिरलेल्या नागरीकांना शासना कडुन मदत मिळवुन दिली.

पाणी समस्या, अनधिकृत बांधकाम, नैसर्गिक नाले, रस्त्यावरील खड्डे अनधिकृत मोबाईल टॉवर, अशा अनेक समस्या शिवसेना महिला शहर प्रमुख रूचिता नाईक यांनी मार्गी लावले. यासाठी आमरण उपोषण हि केले होते. बदलत्या काळानुसार विविध क्षेत्रांमध्ये महिला प्रभावी कामगिरी करत असून, समाजकार्य व राजकारणात जास्तीत जास्त महिला सक्रियपणे सहभागी झाल्यास महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी मदत होईल, असे प्रतिपादन शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांनी केले

शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांनी केलेल्या भरीव कामगिरीची टॉप टेन महाराष्ट्र न्युज चॅनेल ने दखल घेत त्यांना वसई तालुका गौरव २०२४ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी टॉप टेन महाराष्ट्र न्युज चॅनेलचे सर्वेसर्वा दिपक कोटेकर यांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमास आगरी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील, प्रहार संघटनेचे हितेश पाटील, मा.महापौर रूपेश जाधव, मान्यवर उपस्थित होते.

Saturday 24 August 2024

छत्रपती शिवाजी महाराज चौक, कल्याण येथे दहिहंडी उत्सवाचे आयोजन !

छत्रपती शिवाजी महाराज चौक, कल्याण येथे दहिहंडी उत्सवाचे आयोजन !!

** शिवसेना शहर शाखा व रवी पाटील फाउंडेशन तर्फे 


कल्याण, प्रतिनिधी : शिवसेना शहर शाखा व रवी पाटील फाउंडेशन आयोजित दहीहंडी उत्सवाचे आयोजन मंगळवारी (ता.२७) सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज चौक, कल्याण येथे केले आहे.

गेली अनेक वर्ष शिवसेना शहर शाखेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक, कल्याण येथे दहिहंडी उत्सवाचे आयोजन केले जात आहे, दरवर्षी हजारो नागरिक या उत्सवात सामील होत असतात. पण या वर्षी रवी पाटील फाउंडेशन तर्फे सोशल मीडिया रिल स्पर्धेचे आयोजन केले आहे, यात शिवसेना शहर शाखा आयोजित दहिहंडी उत्सवाची रिल शुट करून दुसऱ्या दिवशी २८ तारेखाला सायंकाळी ७ वाजेपर्यंत फेसबुक, इंस्टाग्रामवर पोस्ट करा. रिल पोस्ट करताना रवी पाटील, कल्याण यांच्या अधिकृत पेज सोबत कोलॅब करावी. नाव नोंदणी केल्यानंतर आपणास एक व्हिडिओ टेम्प्लेट देण्यात येणार असून ते व्हिडिओ टेम्प्लेट रिल एडिट करताना वापरणे बंधनकारक आहे.  

आपल्या रिल ३० तारखेपर्यंत मिळालेले व्ह्यू, कॉमेंट व परिक्षकांचे गुण यावर निकाल ठरविला जाईल, या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांसाठी बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येणार असून यात सहभागी होण्यासाठी वरील क्यू आर कोड स्कॅन करून २६ ऑगस्ट २०२४ पर्यंत सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी आपण मोबाईल नंबर 7377374334 अथवा शिवसेना शहर शाखा, भोईरवाडी, बिर्ला कॉलेज रोड येथे संपर्क साधावा. 

.  


.

देवरूखमध्ये शिवसेना ठाकरे गट व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून काळ्या फिती बांधून बदलापूर घटनेचा निषेध !

देवरूखमध्ये शिवसेना ठाकरे गट व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून काळ्या फिती बांधून बदलापूर घटनेचा निषेध !

कोकण (शांताराम गुडेकर)
         मान. उच्च न्यायालयाचा आदर ठेवून शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले व महाविकास आघाडीच्या प्रमुखांनी  महाराष्ट्र बंद चा निर्णय मागे घेतला. महाराष्ट्र बंद मागे घेतला असला तरी बदलापूर घटना अतिशय निंदनीय व संतापजनक असल्याने या घटनेचा निषेध करण्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील देवरूख शहरात शिवसेना ठाकरे गट व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून काळ्या फिती बांधून आज (दि.२४ ऑगस्ट) बदलापूर घटनेचा निषेध केला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा निषेध करण्यात आला.यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख बंड्याशेठ बोरुकर, माजी उपसभापती अजित गवाणकर, शहरप्रमुख दादा शिंदे, मुन्ना थरवळ, युवासेना उप तालुकाप्रमुख तेजस भाटकर, सचिन शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष निलेश भुवड, संदेश जाधव, शाखाप्रमुख विनोद माने, मुबीन पटेल, संतोष शिंदे व शिवसैनिक उपस्थित होते.

Friday 23 August 2024

वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.तर्फे देवरुख येथील शेतकरी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.तर्फे देवरुख येथील शेतकरी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

कोकण (शांताराम गुडेकर) :
              कोकणात "दूध प्रकल्प" घडवण्याचं स्वप्न उराशी बाळगून, इथल्याच मातीतल्या भूमिपुत्रांना घेऊन वाशिष्टी प्रकल्प सुरू झाला. आज त्याचा विस्तार होऊन आपण गावकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना रोजगार देऊ शकलो याचं समाधान आहे. माझी माणसं आणि माझे शेतकरी बंधू यांच्या सहकार्यामुळेच वाशिष्टी आज दिमाखात उभी आहे. असे मत वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.अध्यक्ष प्रशांत यादव ( नेते - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -शरद पवार /२६५ चिपळूण -संगमेश्वर विधानसभा मतदार संघ ) कायमस्वरूपी व्यक्त करतात. कोकणातील पहिला दुग्ध भव्य प्रकल्प म्हणजे वाशिष्ठी....! "कोकणातील दुग्ध क्रांती"... अनेक प्रयोग करून उत्तम दर्जाचे दुग्ध पदार्थ तुमच्यापर्यंत पोहोचवले जात आहेत. वाशिष्टीचे कोकणातील प्रत्येक माणसाशी  नाते आहे. विधानसभा शेत्र प्रमुख दत्ताराम लिंगायत यांनी प्रास्तावना केली.
             चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी सहकाराच्या माध्यमातून सामाजिक नावलौकिक मिळवला आहे. तो वारसा वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून पुढे नेत असताना शेतकऱ्यांच्या हितासाठी जे-जे करता येईल. तिथे वाशिष्ठी डेअरी कमी पडणार नाही, अशी ग्वाही वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव यांनी देताना वाशिष्ठी डेअरी प्रकल्प भविष्यात शेतकऱ्यांचा प्रकल्प झाल्याशिवाय राहणार नाही, असे स्पष्ट करतांना रत्नागिरी जिल्हा दुग्ध क्षेत्रात आर्थिक संपन्न प्रगतीवर नेण्याचे काम तुमच्यासारख्या मंडळींच्या सहकार्यातून करणार आहोत, असे प्रतिपादन यादव यांनी देवरुख येथे माटे-भोजने सभागृहात वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित शेतकरी मेळावा व कृषी कार्यशाळा प्रसंगी केले.

              यावेळी व्यासपीठावर एडवेटा मॅनेजर प्रतीक माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बारक्याशेठ बने, देवरुख तालुकाध्यक्ष बाबा साळवी, विधानसभा क्षेत्राध्यक्ष दत्ताराम लिंगायत, देवरुख शहराध्यक्ष निलेश भुवड, माजी सभापती छोट्या गव्हाणकर, उबाठा गटाचे तालुकाप्रमुख बंड्या बोरुकर, मुन्ना थरवळ, सी. एल. एफ. मॅनेजर सौ. ज्योती जाधव, देवरुख व्यापारी संघटना अध्यक्ष बाबा सावंत, मोहन वनकर, माजी सभापती संतोष लाड, पशुसंवर्धनच्या मानसी लोटणकर आदी उपस्थित होते. शिवाय शिवणे पोलीस पाटील मनोज शिंदे यांच्यासहित तालुक्यातील बहूसंख्य सरपंच, पोलीस पाटील, महिलावर्ग उपस्थित होता. यावेळी पत्रकार संदीप गुडेकर, सचिन मोहिते, सुरेश करंडे, मीरा शेलार, सुरेश सप्रे यांचा सत्कार अध्यक्ष प्रशांत यादव, स्वप्ना यादव यांच्या हस्ते करण्यात आला. शेतकरी बांधवांना दुध किटली यानिमित्ताने देण्यात आल्या.
          यावेळी प्रशांत यादव पुढे म्हणाले की, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाची उभारणी झाली आहे. तत्पूर्वी कोकणातील शेतीपूरक दुग्ध व्यवसायासाठी चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाष राव चव्हाण यांनी नेहमीच पाठबळ दिले आहे. मात्र, शेतकऱ्यांची दुधाची योग्य विक्री होत नव्हती. यामुळे आम्ही वाशिष्ठी डेअरी प्रकल्प सखोल अभ्यासांती उभारण्याचा निर्णय घेतला आणि अल्पावधीतच हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या सेवेत रुजू देखील झाला आहे, असे सांगताना या प्रकल्पाच्या वाटचालीचा आढावा घेतला.
           यावेळी प्रशांत यादव यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना शंभर टक्के रोजगार मिळेल अशी यानिमित्ताने ग्वाही दिली. आज तरुण वर्ग मुंबई शहरात जात आहे तो खेड्यातच राहिला पाहिजे. गाव तेथे वशिष्ठ मिल्कची डेरी उपलब्ध करून देऊन रोजगार दिला  जाईल. मारळ, बामणोली, ओझरे, आंगवली, सोनारवाडी या गावांसहित तालुक्यातील आणि चिपळूण तालुक्यातील सर्व शेतकरी, शेतकरी दुध व्यवसाय करणारे सर्व बंधू उपस्तित होते. कृषी कन्या श्रद्धा ढवण -ढोरमले यांनी चांगले मार्ग दर्शन केले. आपला अनुभव व्हिडीओच्या माध्यमातून स्क्रीनवर दाखवून शेतकरी काय करावे. काय करू नये याबाबत सखोल माहिती दिली. त्याच्या या अनुभवाचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. त्यांचा गाव हा कोकणमधील नसून पण त्यांनी सकाळी गाईना कोणता चारा द्यावा. नेमके काय खाद्य घालायचे ते सांगितले. गायकडे फक्त आपण व्यवसाय दृष्टीने न पाहता आपल्या घरातील एक व्यक्ती, सदस्य आहे असं समजून पालन पोषण करावे. प्रेमाने त्या गायीला जोपासले, तिची चांगली निगा राखाली तर तिच्या पासून आपल्याला खूप फायदा होणार हे नक्की. तसेच गाईच्या शेणापासून सेंद्रिय खत तयार करा. सकाळी चारा देता तो चांगला द्या. त्यामुळे मिळणारे दुधही चांगले मिळेल. ते चांगल्या भावाने मार्केटमध्ये जाईल. यासाठी सर्वांनी मेहनत घ्या. तसेच माझ्या अनुभवाचा फायदा घ्या. रोजगार निर्मितीवर भर द्या. हाताला काम मिळेल. आपण प्रगतशील शेतकरी बना असे कृषी कन्या श्रद्धा ढवण -ढोरमले यांनी सांगितले. शेवटी दुध डेरीच्या प्रमुख स्वप्ना यादव यांनी आभारप्रदर्शन करून मेळाव्याची सांगता केली.

शिवसागर गोविंदा पथक मालाड (पुर्व) तर्फे दरवर्षी विविध जनजागृती करणारे दिले जातात संदेश !!

शिवसागर गोविंदा पथक मालाड (पुर्व)तर्फे दरवर्षी विविध जनजागृती करणारे दिले जातात संदेश !!

** यावर्षी दादर पश्चिम आयडियल येथे मंडळ तर्फे संदेशसह पाहता येणार दहीहंडीचा थरार 

मुंबई (शांताराम गुडेकर) :

        मुंबई पश्चिम उपनगर मधील शिवसागर गोविंदा पथक मालाड (पुर्व) हे गेली ९ वर्ष दहीहंडी माध्यमातून चौथ्या थरावर एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करत असतात. २ वर्षापूर्वी अफजल खानाचा वध दाखवला आणि आताच्या सध्याच्या परिस्तिथीमध्ये महिलांवर आणि मुलींवर होणारे अत्याचार यावर त्यांनी देखावा सादर केला. यावर्षी पण नवीन संदेश दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

        शिवसागर गोविंदा पथकाचे प्रशिक्षक सेनापती श्री. प्रतीक बोभाटे यांची दरवर्षी संकल्पना असते. नवीन दाखवण्याचे आणि त्यांना नेहमी साथ देणारे खजिनदार किशोर कदम आणि संदीप कोलप, सहकारी वर्ग यांचे याकामी मोलाचे सहकार्य असते. हे सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी  त्या हंडीला असणारे मावळे यांचा उत्साह असतो. म्हणूनच सगळे शक्य होते असे मंडळ पदाधिकारी सांगतात. चिपळूणचे सुपुत्र संदीप शिंदे दादांनी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकला. तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजला. चिपळूणचे सुपुत्र घाटकोपर येथील रहिवाशी समाजसेवक नितीन जाधव यांनी हा व्हिडीओ कोणत्या मंडळ आणि कुठला आहे  त्यांचा नंबर घेऊन माहिती मिळवली. त्यामुळे एका चांगल्या गोविंदा पथकची सविस्तर माहिती उपलब्ध होऊन लोकांमध्ये चांगली जनजागृती झाली.

कल्याण, भिवंडी उल्हास नगर येथील शिधावाटप अधिकारी यांच्या भ्रष्टाचारची तात्काळ कारवाई न झाल्यास भीम सेना तीव्र आंदोलन करेल - श्री. प्रकाश पवार

कल्याण, भिवंडी उल्हास नगर येथील शिधावाटप अधिकारी यांच्या भ्रष्टाचारची  तात्काळ  कारवाई न झाल्यास भीम सेना तीव्र आंदोलन करेल - श्री. प्रकाश पवार  
_____________________________
कल्याण शिधावाटप अधिकारी यांच्या कार्यालयापुढे २३ ऑगस्ट २०२४  पासून भिम सेनेचे ठाणे जिल्हा सचिव बालाजी पात्रे यांचे उपोषण सुरु

ठाणे, (प्रतिनिधी) : ठाणे जिल्ह्यामध्ये दलित, मागासवर्गीय, मजूर, कामगार तसेच चाळीमध्ये मध्ये राहणाऱ्या गोरगरीब कुटुंबांना शासनाच्या वतीने सरकारी राशन दुकानाच्या मार्फत स्वस्त भावामध्ये शिधापत्रिकेच्या नोंदणी नुसार अन्नधान्य पुरविणाऱ्या योजनेमध्ये तसेच नवीन शिधापत्रिका नोंदणी  करताना कल्याणचे दत्तात्रेय नांगरे, भिवंडीचे रवि गर्गे, उल्हासनगरचे होलमाने हे शिधावाटप अधिकारी हे त्यांच्या शासकीय पदाचा दुरुपयोग करून कार्यालयीन कामकाजामध्ये प्रचंड प्रमाणात भोंगळ कारभार, भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार करत आहेत, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे, तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या हक्क व अधिकारापासून वंचित राहण्याची पाळी आली आहे. तेव्हा कल्याण, भिवंडी, उल्हासनगर येथील शिधावाटप अधिकारी यांच्या भ्रष्टाचाराची आणि भोंगळ कारभाराची कसून चौकशी करण्यात यावी अशी मागणी भीमसेनेचे ठाणे जिल्हा सचिव श्री. बालाजी पात्रे यांनी माननीय ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे दिनांक १९/०८/२०२४ रोजी एका निवेदनातून  केलेली आहे. कल्याण, भिवंडी, उल्हासनगर येथील भ्रष्टाचारी शिधावाटप अधिकारी  यांचेवर त्वरित कारवाई न झाल्यास दिनांक २३/०८/२०२४ पासून कल्याण शीधावाटप अधिकारी  यांचे कार्यालय क्रमांक ३८ मुरबाड रोड कल्याण पश्चिम यांचे कार्यालय पुढे सदर भोंगळ कारभार, भ्रष्टाचाराचे निषेधार्थ बेमुदत आमरण उपोषण आंदोलनास भीम सेनेचे ठाणे जिल्हा सचिव श्री बालाजी पात्रे हे बसले  आहे.

शिधावाटप अधिकारी ३८, राणी मेन्शन, मुरबाड रोड कल्याण, शिधावाटप अधिकारी ३७ कार्यालय भिवंडी, शिधावाटप अधिकारी ४०(फ) शिधावाटप कार्यालय उल्हासनगर यांनी आपल्या शासकीय पदाचा करून या कार्यालया अंतर्गत येणाऱ्या कामकाजामध्ये भोंगळ कारभार ,‌भ्रष्टाचार खुलेआम राजरोसपणे करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार चालविलेला आहे. सदर शिधावाटप अधिकारी हे एकाच  ठिकाणी गेल्या अनेक वर्ष पासून आहेत, शिधापत्रिका बनवण्याकरता येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना नवीन शिधापत्रिका देण्यासाठी चिरिमिरी घेतल्याशिवाय शिधापत्रिका बनवून दिल्या जात नाहीत. तसेच सदर शिधावाटप अधिकाऱ्यांमार्फत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. तेव्हा या तिन्ही शिधावाटत अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन कामकाजाची भोंगळ कारभाराची, आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराची कसून चौकशी करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून  निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी भीमसेनेने दिलेल्या निवेदनातून केली आहे .सदर तीनही भ्रष्टाचारी शिधावाटप अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने कल्याण शिधावाटप अधिकारी कार्यालय क्रमांक ३८(फ) मूरबाड रोड कल्याण पश्चिम  यांच्या कार्यालयापुढे भ्रष्टाचार व भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ  दिनांक २३/०८/२०२४ पासून बेमुदत आमरण उपोषण आंदोलनाला भीमसेनेचे ठाणे जिल्हा सचिव श्री. बालाजी पात्रे  हे बसले आहे. सदर प्रकरणी विभागीय चौकशी न केल्यास गोरगरिबांना न्याय न मिळाल्यास भिमसेना ठाणे जिल्हाचे वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा भीमसेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रकाश पवार यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.

अधिक माहितीसाठी, संपर्क -
प्रकाश पवार, जिल्हा अध्यक्ष भीम सेना ठाणे,
मोब.8422041655


 

देवरुख -बोंड्ये एस. टी सुरु, सहा महिन्यांपासून होती बंद !!

देवरुख -बोंड्ये एस. टी सुरु, सहा महिन्यांपासून होती बंद !!

** गावकऱ्यांची प्रतीक्षा संपली.. आता होणार सुखाचा प्रवास 

कोकण (शांताराम गुडेकर) :
                   रत्नागिरी जिल्ह्यामधील  संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर मार्गांवरील बोंड्ये गावातील नागरिकांची एस. टी ची प्रतीक्षा संपली असून आजपासून पुन्हा देवरुख -बोंड्ये  एस. टी. ही देवरुख  एस. टी आगार मधून सोडण्यात आली.ही एस. टी सहा महिन्यांपासून खड्डे आणि झाडांच्या वाढलेल्या फांदया, चिखल असं कारण देत बंद करण्यात आली होती.बोंडये बससाठी पत्रकार संदीप गुडेकर, माजी सरपंच ललिता गुडेकर, विद्यमान सरपंच नम्रता पांचाळ यांनी देवरुख आगार व्यवस्थापक यांना पत्रव्यवहार करून झाडीची असलेली अडचण तसेच पडलेले खड्डे ही समस्या मार्गी लागली असून देवरुख -बोंड्ये एस. टी सुरु करावी अशी मागणी केली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामस्थ यांनी वाढलेली झाडे, फांदया तोडून मार्ग मोकळा केला. पडलेले खड्डे भरले.झालेल्या मागणीचा विचार करून तसेच सतत होत असलेला पाठपुरावा लक्षात घेऊन  देवरुख आगार व्यवस्थापक यांनी एस. टी सुरु केली. त्यामुळे बोंड्ये गावच्या नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले असून  लोकप्रतिनिधी, संबंधिक अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रसिद्धी माध्यम यांचे आभार मानले आहेत. कारण काही दिवसांवर गणपती उत्सव आहे. हजारो मुंबईकर, अन्य भागातील पाहुणे, दिव्यांग, गरोदर महिला, या मार्गांवरून ये -जा करणार असून त्यांनाही या समस्याला तोंड द्यावे लागणार होते. विद्यार्थी, चाकरमनी (मुंबईकर), नोकरदार वर्ग यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागणार होता. मात्र लोकप्रतिनिधी, देवरुख आगार- रत्नागिरी विभाग यांनी मागणीची दाखल घेत एस. टी. सुरु त्यामुळे संभाव्य त्रासातून बोंड्ये गावातील लोकांची सुटका झाली आहे

Thursday 22 August 2024

वस्तू खरेदीवेळी भ्रमणध्वनी क्रमांक देणे बंधनकारक नाही- जिल्हा पुरवठा अधिकारी !!

वस्तू खरेदीवेळी भ्रमणध्वनी क्रमांक देणे बंधनकारक नाही- जिल्हा पुरवठा अधिकारी !!

पुणे,  प्रतिनिधी : वस्तू खरेदी केल्यानंतर तसेच हॉटेल, रेस्टॉरंट किंवा कॉफी दुकानात देयक तयार करताना ग्राहकांनी आपल्या भ्रमणध्वनी क्रमांकाची माहिती देणे बंधनकारक नसून कोणीही आपली वैयक्तिक माहिती देऊ नये, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश तावरे यांनी केले आहे.

ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या २६ मे २०२३ रोजीच्या सुचनेप्रमाणे ग्राहकांनी शॉपिंग मॉल, किरकोळ व्यापाऱ्यांकडे वस्तू खरेदी केल्यानंतर तसेच हॉटेल, रेस्टॉरंट किंवा कॉफीच्या दुकानात ग्राहकांनी सेवा घेतल्यानंतर शेवटी देयक तयार करताना भ्रमणध्वनी देणे बंधनकारक नाही. 

माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ७२ अ अंतर्गत वस्तू विक्रीच्यावेळी मिळालेल्या भ्रमणध्वनी क्रमांकाचा ग्राहकाच्या संमतीशिवाय इतरत्र वापर करणे ही व्यक्तीशी असलेल्या कायदेशीर कराराचा भंग आहे. ग्राहकाची वैयक्तिक माहिती उघड करणे हा दंडनीय गुन्हा आहे. असे केल्याने ग्राहकांचे नुकसान झाल्यास तीन वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा अथवा पाच लाख रुपयांपर्यंतचा दंड करण्याबाबत कायद्यात तरतूद आहे, अशीही माहिती श्री. तावरे यांनी दिली.

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांना संगणक कौशल्य विकासाचे प्रशिक्षण !!

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांना संगणक कौशल्य विकासाचे प्रशिक्षण !!

पुणे, प्रतिनिधी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनीच्या (अमृत) लक्षित गटातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवकांना संगणक कौशल्यात विकसित व प्रशिक्षित करण्याकरीता अमृत आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.

अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी, विशेष कार्यकारी अधिकारी उदय लोकापल्ली, एमकेसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक वीणा कामत, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे, वरिष्ठ महाव्यवस्थापक अमित रानडे आदी यावेळी उपस्थित होते.  

या करारानुसार एमकेसीलएमार्फत राबविण्यात येणाऱ्या निवडक प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या युवकांना निवडीनंतर लाभ  देण्यात येणार आहे. कोणत्याही विभाग, संस्था, महामंडळाच्यामार्फत लाभ मिळत नसलेल्या युवकांना आवश्यक कौशल्य, ज्ञान आणि पाठबळ देऊन सक्षम करणे, तसेच उद्योगाभिमुख रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून त्यांनी स्वावलंबी करणे हे या प्रशिक्षण योजनेचे उद्दिष्ट आहे. 

अमृततर्फे प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या युवकांना महामंडळाच्या नियमानुसार सुरुवातीस सुरक्षा शुल्क स्वतः भरावयाचे आहे. योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्या प्रशिक्षणाचे शैक्षणिक शुल्क अमृतसंस्थेमार्फत महामंडळाला परस्पर दिले जाणार आहे. याबाबत अधिक माहितीकरीता https://www.mahaamrut.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, अमृतच्या लक्षित गटातील अधिकाधिक युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेच्या निबंधक प्रिया देशपांडे यांनी केले आहे.

दहा हजार कुशल बेरोजगार युवकांना जर्मनीत रोजगाराची संधी !!

दहा हजार कुशल बेरोजगार युवकांना जर्मनीत रोजगाराची संधी !!

युरोपियन युनियन मधील बहुतांशी देश औद्योगिकदृष्ट्या संपन्न असून मागील काही वर्षापासून या देशांना कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. ही बाब विचारात घेवून राज्यातून पहिल्या टप्प्यात १० हजार कुशल मनुष्यबळ जर्मनीतील बाडेन-वुटेनबर्ग राज्यास उपलब्ध करुन देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे कुशल युवक-युवतींना रोजगाराची संधी निर्माण होणार आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यापूर्वी उच्च माध्यमिक शिक्षणाचे व्यावसायीकरण ही केंद्र पुरस्कृत योजना राबविली जात असे. या योजनेनुसार शिक्षणातून रोजगार, स्वयंरोजगार, उद्योग व व्यवसाय यासाठीच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले होते. या योजनेचा विस्तार करून हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे.  

या पथदर्शी प्रकल्पासाठी जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती, राज्यस्तरीय सनियंत्रण समिती व तांत्रिक समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीचे मुख्य समन्वयक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य असतील. जिल्हा शल्य चिकित्सक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त, औद्यागिक प्रशिक्षण संस्था व तंत्रनिकेतन संस्थेचे प्राचार्य, सहायक कामगार आयुक्त व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) हे सदस्य असतील. 

बाडेन-वुटेनबर्ग राज्यास पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवांमधील व्यावसायिक मनुष्यबळ, ज्यामध्ये परिचारिका (रुग्णालय), वैद्यकीय सहाय्यक (एमएफए), प्रयोगशाळा सहायक, रेडियोलॉजी सहायक, दंतशल्य सहाय्यक, आजारी व वृद्ध व्यक्तींसाठी शुश्रूषा सेवक, फिजिओथेरपीस्ट, दस्तऐवजीकरण आणि संकेतीकरण (डॉक्युमेंटेशन अँड कोडींग) /तृतीय पक्ष प्रशासन (थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रेशन), लेखा व प्रशासन मधील कर्मचारी यांचा समावेश असेल.

आतिथ्य सेवांमधील वेटर्स, सर्व्हर्स, स्वागत कक्ष संचालक (रिसेप्शनिस्ट), आचारी (कुक), हॉटेल व्यवस्थापक, लेखापाल, हाऊसकीपर, स्वच्छक, कारागीर तंत्रज्ञांमध्ये विद्युततंत्री (इलेक्ट्रीशियन), नविनीकरण उर्जेमधील विशेष विद्युततंत्री (रिन्यूएबल एनर्जी, सोलर आदी),  औष्णिक वीजतंत्री (हिटिंग तंत्रज्ञ), रंगारी, सुतार, वीटकाम, टाईल्स बसविणारे, प्लंबर्स, हलक्या व जड वाहनांची दुरुस्ती करणारे तंत्रज्ञ या पदांचा समावेश असेल.

याशिवाय बस, ट्राम, ट्रेन, ट्रक आदींचे वाहन चालक, सुरक्षा रक्षक, टपाल कर्मचारी, सामान बांधणी व वाहतूक करणारे (पॅकर्स व मुव्हर्स), विमानतळावरील सहाय्यक, स्वच्छताकर्मी, सामान हाताळणारे (बॅगेज हँडलर्स), हाऊसकीपर, विक्री सहाय्यक व गोदाम सहाय्यक आदी कुशल मनुष्यबळ पुरविण्यात येणार आहे. या पदांशी संबंधित कौशल्यवृद्धीच्या अतिरिक्त प्रशिक्षणाच्या अनुषंगाने संबंधित विभागाच्या आयुक्त, संचालक यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

जर्मन भाषेचे किमान पर्याप्त प्रशिक्षण:

युवक-युवतींना जर्मन भाषेचे प्रशिक्षण  गोएथे या  प्रख्यात  संस्थेकडून देण्यात येणार असून या संस्थेमार्फत पथदर्शी तत्त्वावर विविध क्षेत्रातील किमान १० हजार उमेदवारांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या अनुषंगाने गोएथे संस्था, मॅक्समुलर भवन व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर जर्मन भाषा शिकवणीचे ५ वर्ग पहिल्या टप्प्यात सूरू करण्यात येणार आहेत. वर नमूद केलेले अभ्यासक्रम पूर्ण केलेले आणि जर्मनीत रोजगारासाठी जाऊ इच्छिणारे विद्यार्थी https://www.maa.ac.in/GermanyEmployment/ या संकेतस्थळावर आपली नोंदणी करून शकतात.  

क्षेत्रनिहाय कौशल्य वृद्धीसाठी अतिरिक्त प्रशिक्षण

बाडेन वुटेनबर्ग राज्यास उपलब्ध करुन द्यावयाच्या मनुष्यबळास त्या राज्यातील अनुरुप कौशल्याशी संबंधित पात्रतेच्या अनुषंगाने आवश्यक अतिरिक्त तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठी सुयोग्य यंत्रणेची उभारणी करण्यात येणार आहे. शासनाच्या अटी शर्ती प्रमाणे सुयोग्य प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शविलेल्या शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित संस्थांना प्रति महिना प्रति विद्यार्थी ग्रामीण भागासाठी ७ हजार व शहरी भागासाठी (सर्व महानगरपालिका कार्यक्षेत्रे) १० हजार रूपये इतके अनुदान देण्यात येणार आहे. 

देशांतराच्या अनुषंगाने करावयाची कृती

प्रशिक्षणार्थीचा पासपोर्ट, व्हिसा व अन्य आवश्यक कागदपत्रे यांच्या पूर्ततेसाठी निश्चित अशी कार्यपद्धती करण्यात येणार आहे. जर्मनीत पोहोचल्यानंतर उमेदवार योग्यप्रकारे स्थीरस्थावर होतील यासाठी तेथील संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून व त्यांच्या सहकार्याने आवश्यक ती उपाययोजना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने करण्यात येणार आहे. 

प्रकल्पाच्या अनुषंगाने अधिक माहितीसाठी उमेदवारांनी राज्य शैक्षणिक  संशोधन  व प्रशिक्षण परिषद येथे संपर्क करावा. तसेच https://maa.ac.in  या संकेतस्थळावर  माहिती भरून या योजनेचा लाभ घेता येईल.

राहूल रेखावार, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे- या प्रकल्पांतर्गत राज्यातील कुशल, अकुशल बेरोजगार युवक-युवतींना जर्मनी येथे नोकरी मिळविण्यासाठी राज्यातच निवड प्रक्रिया व नोकरीच्या नियुक्तीचे वाटप, व्हिसा आणि पासपोर्ट साठी संपूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे. ही राज्यातील युवा- युवतींना त्यांचे आर्थिक, सामाजिक स्थान तसेच जीवनमान उंचावण्याची  मोठी संधी आहे.
 
संकलन- जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

कळंबटच्या माजी विद्यार्थ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी ; शाळेला दिली प्रेमरुपी अनोखी भेटवस्तू !!

कळंबटच्या माजी विद्यार्थ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी ; शाळेला दिली प्रेमरुपी अनोखी भेटवस्तू !!

कोकण - ( दिपक कारकर )

"ही आवडते मज मनापासुनी शाळा, लाविते लळा ही जसा माऊली बाळा" अशी खऱ्या अर्थाने शैक्षणिक जडणघडण घडून आलेली शाळा विद्यार्थीरुपी पाखरांना कायमच आठवणीत राहते. शाळा सोडून कितीही वर्षे झाली तरी शाळेच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात कायम ताज्या असतात. तसेच शाळेतील मित्र-मैत्रिणींची आठवणही मनात असते. या आठवणी पुन्हा ताज्या व्हाव्यात, या उद्देशाने जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा कळंबट, ब्राह्मण-घवाळ ( ता. चिपळूण, जि.रत्नागिरी ) येथील सन - १९९८-९९ इ. सातवी बॅचसचे माजी विद्यार्थी एकत्र आले. 

तब्बल २४ वर्षांनी शाळेतील आपल्या वर्गात मित्र-मैत्रिणींसमवेत शाळेमध्ये एकत्र येत अनोखा उपक्रम हाती घेत जुने ऋणानुबंध पुन्हा ताजे केले. नुकतेच १५ ऑगस्ट २०२४ रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत शाळेसाठी भेटवस्तू म्हणून अत्यावश्यक असणाऱ्या अहुजा कंपनीचा परिपूर्ण साऊंड सिस्टम भेट दिला. शाळेतर्फे सर्व माजी विद्यार्थ्यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले, माजी विद्यार्थ्यांनी देखील शिक्षकांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सदर उपक्रमाला विद्यार्थी, पालकवर्ग, शिक्षक वृंद व वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते. ह्या स्तुत्य उपक्रमाचे पंचक्रोशीतून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

Wednesday 21 August 2024

कुणबी समाज तळवडे विभाग आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !!

कुणबी समाज तळवडे विभाग आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !!

*१०० रक्तदात्यांनी रक्तदान करून जपली सामाजिक बांधिलकी*

मुंबई - ( दिपक कारकर )

"रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान" ह्या बोधवाक्याने प्रेरित असणाऱ्या व आपले रक्तदान हे कोणाला तरी जीवनदान देऊ शकते,अशा सामाजिक भावनेच्या विचारधारेने कुणबी समाजोन्नती संघ,मुंबई - शाखा तालुका म्हसळा संलग्न तळवडे विभाग कमिटी, युवक मंडळ महिला मंडळ आणि श्री कृष्ण मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.१८ ऑगस्ट २०२४ रोजी  श्रीकृष्ण हॉल, बोरिवली ( पूर्व ) येथे विभागीय अध्यक्ष राकेशजी पेंढारी यांच्या मातोश्रींचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्यामुळे उपाध्यक्ष सतेजजी शिगवण यांच्या अध्यक्षतेखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन घेण्यात आले होते. सदर शिबिराला तळवडे विभागातील १० गावातून जवळपास १०० रक्तदात्यांनी रक्तदान करून या कार्यक्रमाला यशस्वी केले आहे. यासाठी युवक मंडळ अध्यक्ष विश्वास गायकर, सचिव ओमकार धावडे, खजिनदार किरण पवार तसेच संपूर्ण युवक मंडळ कमिटी यांनी घेतलेली मेहनत सोबत विभागीय कमिटी, क्रिडा समिती आणी महिला मंडळानी महत्वाची भूमिका बजावली.

अनेक क्षेत्रात प्रतिवर्षाला नावीन्य उपक्रम घेणाऱ्या उपरोक्त मंडळाच्या रक्तदान ह्या स्तुत्य उपक्रमाला तालुका सल्लागार अशोकजी भुवड यांनी सपत्नीक आणि ठाकरोली विभागाचे माजी अध्यक्ष रमेशजी शिंदे आणी रक्तदान करून विशेष सहकार्य  केले. दरम्यान तालुका कार्यकारिणी उपाध्यक्ष  महेशजी शिर्के यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. तालुका अध्यक्ष - महेंद्र टिंगरे , सचिव - राजुजी धाडवे, उपाध्यक्ष अनिलजी बांद्रे, हेमंतजी रामाने, सहचिटणीस - कल्पेशजी जाधव, सहखजिनदार - जयदेश चव्हाण, प्रवीण भोगल, युवक कमिटी सचिव- उमेशजी पोटले, सल्लागार - बबनरावजी उंडरे,नामदेवजी धोकटे  मनोहरजी पाटील, राजारामजी कासरुंग, अशोकजी भुवड, तालुका महिला मंडळ अध्यक्षा नेहाताई खापरे उपाध्यक्षा-शिल्पा रामाने, सुविधा कासरुंग व रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे शिलेदार ही उपस्थित होते. सदर उपक्रमाचे अनेक स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

भिम सेनेच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी श्री. प्रकाश पवार यांची नियुक्ती !!

भिम सेनेच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी श्री. प्रकाश पवार यांची नियुक्ती !!

ठाणे जिल्हा, (प्रतिनिधी) : स्थानिक न्यू शिवाजीनगर कळवा (पूर्व), ठाणे येथील प्रतिष्ठित नागरिक तथा सामाजिक कार्यकर्ते  श्री. प्रकाश अंकुश पवार यांची  भिम सेनेच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. दिनांक २१/०८/२०२४ रोजी कल्याण येथील शासकीय विश्रामगृह येथे भिम सेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या एका बैठकीमध्ये  सदर नियुक्ती करण्यात आली.

भिम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. दादासाहेब खडसे यांच्या हस्ते करण्यात आली आहे. याप्रसंगी भिम सेनेचे नवनियुक्त ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री. प्रकाश अंकुश पवार यांना  यावेळी निळी टोपी परिधान करून आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. भीम सेनेचे  नवनियुक्त ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री. प्रकाश अंकुश पवार यांना भीम सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्तीपत्र देण्यात आले. श्री प्रकाश अंकुश पवार हे गेल्या पंधरा वर्षापासून फुले शाहू आंबेडकरी आंदोलनात सक्रिय असून त्यांनी ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक समस्यांना वाचा फोडण्याचे कार्य केलेले आहे. त्यांचे पत्रकार म्हणून सुद्धा सामाजिक कार्यामध्ये मोलाचे योगदान आहे, ते महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चैनल ठाणे रिपोर्टर, सम्यक वर्तमानपत्र, बहुजन शासक आदी वर्तमानपत्रात सुद्धा त्यांनी काम केलेले आहे, त्यांच्या निवडीबद्दल भीम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. दादासाहेब खडसे, भीम सेनेचे महाराष्ट्र संघटक सुरेश सोनवणे, भीम सेनेचे मुंबई विभाग महासचिव स्वप्नालीताई सोनावणे, भीम सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष बालाजी पात्रे, शाहू सवाई, दैनिक बातमीदार वर्तमानपत्राचे ठाणे जिल्हा प्रतिनिधी श्री सचिन बुटाला, भीमसेनेचे कायदेविषयक सल्लागार एडवोकेट नरेंद्र गजभिये, एडवोकेट बेला तिबडेवाल, साप्ताहिक क्राईम चक्र चे संपादक राजेश बिवलकर, वंदनाताई सोनवणे, प्रमोद कटारनवरे, चंद्रकांत गोकुले, रमेश तायडे इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या निवडीने ठाणे जिल्ह्यातील आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे व उल्हासाचे वातावरण निर्माण झाले असुन सामाजिक राजकीय व पत्रकारिता क्षेत्रातील गणमान्य व्यक्तींनी त्यांच्या पुढील कार्यास व वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. 
_____________________________
दादासाहेब खडसे
संस्थापक अध्यक्ष - भीम सेना
(रजी न. महा -३३३/२०१९)
mob. 8855002911
________________________________

शिवसेना (उबाठा) शिव आरोग्य सेना ठाणे जिल्ह्याच्या वतीने शिवसेना भवन दादर येथे रुग्णांना मोफत औषध व वैद्यकीय उपकरणे वाटप !!

शिवसेना (उबाठा) शिव आरोग्य सेना ठाणे जिल्ह्याच्या वतीने शिवसेना भवन दादर येथे  रुग्णांना मोफत औषध व वैद्यकीय उपकरणे वाटप !!

मुंबई (शांताराम गुडेकर)
              शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, मा.परिवहन मंत्री श्री.दिवाकर रावते, उपनेते श्री.रविंद्र मिर्लेकर तसेच शिवसेना पश्चिम महाराष्ट्र समन्वयक, मा.आमदार श्री. दगडू दादा सकपाळ यांच्या शुभहस्ते शिव आरोग्य सेना कार्याध्यक्ष डॉ. किशोरजी ठाणेकर यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य समन्वयक जितेंद्र दगडु (दादा) सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या मागणीनुसार शिव आरोग्य सेना ठाणे जिल्हा व हेल्प मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने शिवसेना भवन दादर या ठिकाणी माहीम येथे राहणाऱ्या श्रीमती.सविता शेटकर (वय- ७४वर्ष) या कॅन्सर ग्रस्त रूग्ण महिलेस लागणारी विविध औषधे तसेच वैद्यकीय उपकरणे मोफत, त्यामध्ये प्रामुख्याने नेब्युलायझर मशिन तसेच आरोग्य सेनेचे फार्मसी सेलचे बांद्रा विधानसभा अध्यक्ष राधेश्याम ठाकुर यांच्याकडुन ग्लुकोमीटर मशीन आणि पल्स ऑक्सीमीटर ही उपकरणे रुग्णाचे नातेवाईक अभय शेटकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. तसेच अंधेरी येथे राहणाऱ्या काशीबाई बाबुराव नटवे (वय-७६ वर्षे) यांना कानाची मशीन मोफत देण्यात आली. याप्रसंगी आरोग्य सेनेचे ठाणे जिल्हा संपर्क समन्वयक डॉ. प्रशांत भुईंबर, ठाणे जिल्हा समन्वयक व अध्यक्ष हेल्प मेडिकल चॅरिटेबल ट्रस्टचे एकनाथ अहिरे समन्वयक सह सचिव सचिन त्रिवेदी, देवशी राठोड, उल्हास शिवणेकर, अझीम शेख, राजेंद्र भोसले उपस्थित होते. तद्प्रसंगी पेशंटच्या नातेवाईकांनी शिव आरोग्य सेनेचे मनःपुर्वक आभार मानले  व आम्ही सदैव शिवसेनेच्या सोबत ठामपणे आहोत असे उदगार काढले.

राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी) चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांनी केली वर्षा निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणेशाची मनोभावे आरती !!

राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी) चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांनी केली वर्षा निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणेशाची मनोभावे आरती !! ...