Monday 16 September 2024

राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी) चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांनी केली वर्षा निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणेशाची मनोभावे आरती !!

राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी) चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांनी केली वर्षा निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणेशाची मनोभावे आरती !!

मुंबई (समीर खाडिलकर /शांताराम गुडेकर) :
              राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी) चालक वाहक आणि इतर शेकडो कर्मचाऱ्यांनी आज वर्षा निवासस्थानी येऊन विराजमान झालेल्या श्री. गणेशाची मनोभावे आरती केली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांनी सर्वांसोबत संवाद साधत या सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
           आजपर्यंतच्या इतिहासात एस.टी. कर्मचाऱ्यांना कोणत्याही मुख्यमंत्र्याने वर्षा बंगल्यावरती गणपतीच्या आरतीचा मान दिला नव्हता. त्याचप्रमाणे यंदा राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना (एस.टी.) भरघोस पगारवाढ देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी (एस.टी.) मान. मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांचे आभार मानले आणि गणपती बाप्पा कडे साकडे घातले की मा. एकनाथजी शिंदे हेच मुख्यमंत्री आम्हाला कायमस्वरूपी लाभोत. याप्रसंगी शिवसेना सचिव/प्रवक्ते, राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा. आ. श्री. किरण पावसकर उपस्थित होते.

Sunday 15 September 2024

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन !!

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन !!

 राज्यामध्ये मेंढी पालन व्यवसायास प्रोत्साहन देणे तसेच राज्यातील भटकंती करणान्या भटक्या जमाती व तत्सम समाजामधील पशुपालकांना त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करणे या उद्देशाने यशवंतराव होळकर महामेष योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून मेंढ्यासाठी चराई अनुदान, मेंढी -शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान तसेच कुक्कुट पक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान दिले जाणार आहे. यासाठी १२ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२४ या कालावधीत www.mahamesh.org या संकेतस्थळावर केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज मागविण्यात येत आहेत. 

यशवंतराव होळकर महामेष योजनेमध्ये स्थायी आणि स्थलांतरित पद्धतीने मेंढीपालनासाठी पायाभूत सोई- सुविधेसह २० मेंढ्या तसेच मेंढानर अशा मेंढीगटाचे ७५% अनुदानावर वाटप, सुधारित प्रजातीच्या नर मेंढाचे ७५% अनुदानावर वाटप, मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान दिले जाईल, मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान, हिरव्या चाऱ्याचा मुरघास करण्याकरिता गासड्या बांधण्याचे यंत्र खरेदी करण्यासाठी ५०% अनुदान तसेच पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी ५०% अनुदान इ. घटकांचा समावेश केला आहे.

 मेंढयासाठी चराई अनुदान या योजनेमध्ये ज्या मेंढपाळ कुटुंबाकडे किमान २० मेंढया व १ नर मेंढा एवढे पशुधन आहे, अशा कुटुंबांना माहे जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीसाठी प्रतिमाह रु. ६,०००/- असे एकूण २४,०००/- चराई अनुदान वाटप केले जाईल.

मेंढी -शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान या योजनेमध्ये भुमिहीन मेंढपाळ कुटुंबातील कोणत्याही एका सदस्यास अर्थ बंदिस्त, बंदिस्त मेंढीपालन करण्याकरिता जागा खरेदी करण्यासाठी जागेच्या किंमतीच्या ७५% अथवा किमान ३० वर्षासाठी आडेकरारावर जागा घेण्यासाठी भाड्यापोटी ‌द्यावयाच्या रक्कमेच्या ७५% रक्कम एकवेळेचे एकरकमी अर्थसहाय्य म्हणून कमाल रु. ५०,०००/- एवढे अनुदान दिले जाईल.

कुक्कुट पक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान या योजनेमध्ये चार आठवडे वयाच्या सुधारित देशी प्रजातीच्या १०० कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपना साठी कमाल रु. ९०००/- मर्यादेत ७५% अनुदान याबाबींचा समावेश आहे.

सदर योजनेचे मार्गदर्शक सूचना अटी शर्ती, अर्ज योजेनेचे वेळापत्रक इ. www.mahamesh.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे या योजेने संबंधी अधिक माहिती साठी नजीकच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांचेशी संपर्क साधावा.

सदर योजना केवळ भटक्या जमाती (भज क) या प्रवर्गातीलच इच्छुक उमेदवारांसाठी आहे.

औंध येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ !!

औंध येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ !!

पुणे, प्रतिनिधी :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परीहार चौक, औंध, पुणे येथे एकूण ३३ व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये एक हजार सहाशे शहाण्णव  उमेदवारांसाठी प्रवेश प्रक्रियेतील शेवटचा टप्पा सुरु आहे. संचालनालयाने प्रवेशाची मुदत वाढवून दिलेली असुन १७ सप्टेंबर, २०२४ पर्यंत विद्यार्थ्यांनी संस्थेमध्ये प्रत्यक्ष येवून अभ्यासक्रमांची माहिती घ्यावी. १९ ते ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत रिक्त जागांवर प्रवेश होणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरावेत. 

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी इयत्ता दहावी पास अथवा नापास शैक्षणिक अर्हता आहे. अभ्यासक्रम   एक व दोन वर्ष मुदतीचे आहेत. त्यासाठी प्रतिवर्षी साधारणपणे दोन हजार रुपये शुल्क आहे. प्रत्येक व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये तीस टक्के जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. पुणे परीसरातील औद्योगिक आस्थापनांमध्ये महिलांना नोकरीच्या भरपुर संधी उपलब्ध असल्याने महिलांना या संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी विशेष आवाहन करण्यात येत आहे.  प्रवेश घेण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना मार्गदर्शन हवे असल्यास त्यांनी आय.टी.आय, औंध, पुणे येथे प्रत्यक्ष येवून किंवा संस्थेच्या हेल्पलाईन क्रमांक ८८५७९८४८२२ वर संपर्क साधुन माहिती घ्यावी. रिक्त जागांचा तपशिलासाठी संस्थेस भेट द्यावी. प्रवेशासाठी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन उपसंचालक आर. बी. भावसार यांनी केले आहे.

१३६ इन्फंट्री बटालियन (टीए) (इको) महारमध्ये सशस्त्र दलातील माजी सैनिकांना भरती होण्याचे आवाहन !

१३६ इन्फंट्री बटालियन (टीए) (इको) महारमध्ये सशस्त्र दलातील माजी सैनिकांना भरती होण्याचे आवाहन !

पुणे, प्रतिनिधी : मराठवाडा पर्यावरण बटालियन अंतर्गत १३६ इन्फंट्री बटालियन (टीए) (इको) महारमध्ये सशस्त्र दलातील माजी सैनिक, पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभाग व राज्य वन विभागाच्या माजी महिला कर्मचाऱ्यांतून एकूण ५३ पदे भरावयाची असून संबंधितांनी भरती रॅलीत भाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या भरतीअंतर्गत उमेदवारांनी छत्रपती संभाजी नगर मिलिटरी कँट, (सर्वत्र स्टेडियम) येथे २३ ते २८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत शारीरिक पात्रता तपासणीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे. 

या बटालियन मध्ये सोल्जर जीडी (सामान्य कर्तव्य) ४२, लिपिक ६, घरकाम पाहणारी व्यक्ती (हाऊस कीपर), लोहार (ब्लॅकस्मीथ), मेस कीपर, कारागीर (आर्टिसन) तसेच स्टीवार्ड ही प्रत्येकी एक पदे भरण्यात येणार आहे. भरती झालेल्या उमेदवारांना वृक्षारोपण उपक्रमात मराठवाडा विभागात तसेच संपूर्ण देशात कर्तव्य बजावावे लागेल.  

या पदासाठीच्या पात्रता पुढीलप्रमाणे आहेत. माजी सैनिक, पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभाग व राज्य वन विभागाच्या माजी महिला कर्मचारी (अकाली सेवानिवृत्तांसह) यांना किमान वयोमर्यादेची अट नाही. माजी सैनिकांचा सेवानिवृत्त झाल्याचा कालावधी हा ५ वर्षांच्या आत असावा. माजी सैनिक (ओआर) वयाच्या ५० वर्षापर्यंत सेवा करू शकतात, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे लेफ्टनंट कर्नल एस. डी. हंगे (नि.) यांनी कळविले आहे.

चोपड्यातील १७ शिक्षकांना रोटरीचा 'नेशन बिल्डर अवॉर्ड !!

चोपड्यातील १७ शिक्षकांना रोटरीचा 'नेशन बिल्डर अवॉर्ड !!

चोपडा, प्रतिनिधी - 
    राष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या पर्यायाने समाजाला सुसंस्कृत व विकासाच्या मार्गाने घेऊन जाण्यासाठी तत्पर असणाऱ्या व विद्यार्थी घडवण्यासाठी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या गुणवंत शिक्षकांना दरवर्षी नॅशनल लिटरसी मिशन अंतर्गत रोटरी क्लब तर्फे नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो. या अंतर्गत रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे दि.१४ रोजी सायंकाळी पाच वाजता जुन्या शिरपूर रोडवरील रोटरी भवन येथे नेशन बिल्डर अवॉर्ड २०२४ वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

     यावेळी मंचावर रोटरी क्लबचे अध्यक्ष तथा समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य रोटे डॉ. ईश्वर सौंदांणकर, सचिव भालचंद्र पवार, प्रकल्प प्रमुख जगदीश महाजन, सह प्रकल्प प्रमुख अमित बाविस्कर यांच्यासह पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून क. ब. चौ. उ. म. वि. चे कुलसचिव डॉ. विनोद प्रभाकर पाटील तसेच डॉ. जयेंद्र लेकुरवाळे (संचालक, विद्यार्थी विकास विभाग, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव) हे उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. लेकुरवाळे यांनी विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षक कशा पद्धतीने आपले कार्य करत असतो हे त्यांनी समाजातील अनेक उदाहरणे देऊन सांगितले. त्याचप्रमाणे डॉ. विनोद पाटील यांनी प्रशासकीय कामकाज हे कशा पद्धतीने करावे लागते तसेच शिक्षक व प्रशासन यांच्यात समन्वय कसा साधला जातो याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन करत पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा गौरव केला.

नेशन बिल्डर अवॉर्ड २०२४ चे पुरस्कारार्थी :

सौ. शुभांगी मंगेश भोईटे, विवेक रामभाऊ पाटील, भागवत उत्तमराव जाधव, दिपाली विनायक पाटील, चंद्रकांत दगडू पाटील, महेशकुमार चंद्रशेखर शिंदे, दौलत परशा पावरा, जितेंद्र मुरलीधर पाटील, अरुणा सुहास देवराज, सोनाली मधुकर साळुंखे, नुसरतजहां रियाझोद्दीन, सुनील बाजीराव पाटील, प्रीती आशिष गुजराथी, प्रमोद गंगाराम भालेराव, प्रा. डॉ. अनंत विनायकराव देशमुख, डॉ. अनिल बाबुलाल सूर्यवंशी व दीपावली विनायक पाटील या सोहळ्यासाठी प्रकल्प प्रमुख जगदीश महाजन, सह प्रकल्प प्रमुख अमित बाविस्कर यांच्यासह डिस्ट्रिक्ट जॉइंट सेक्रेटरी नितीन अहिरराव, व्ही. एस. पाटील, पंकज बोरोले, चेतन टाटीया, रुपेश पाटील, चंद्रशेखर साखरे, प्रदीप पाटील, आशिष जयस्वाल, महेंद्र बोरसे, शिरिश पालीवाल, विश्वास दलाल, चंद्रशेखर पाटील, अनुराग चौधरी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास पी. पाटील व लीना पाटील यांनी तर आभारप्रदर्शन भालचंद्र पवार यांनी केले. यावेळी तालुक्यातील शिक्षक, पुरस्कारार्थींचे परिवारजन, रोटरी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१० वर्ष गणेश उत्सवांची भोसले पाटील परिवाराची !!

१० वर्ष गणेश उत्सवांची भोसले पाटील परिवाराची !!

ठाणे, प्रतिनिधी : दरवर्षी प्रमाणे वेगवेगळे विषय घेऊन आम्ही गणपती उत्सव साजरे करीत असतो. ह्या वर्षी समता विचार प्रसारक संस्थेच्या माध्यमातून संविधानातील महत्त्वाचा भाग असलेली उद्देशिका व सध्य परिस्थितीला सामोरे जाताना आपण काय करू शकतो ? या विषयवार छोटस अहवाल गणेश भक्तांना देत आहोत. 

समता विचार प्रसारक संस्थेचे संस्थापक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ संजय मंगला गोपाळ, श्रमिक जनता संघ चे सरचिटणीस जगदीश खैरालिया, कोषाध्यक्ष मीनल उत्तूरकर, सहकोषाध्यक्ष निलेश दंत कार्यकर्ते इनोक कोलियार, दर्शन पडवळ, वयम् मासिकेचे राजेंद्र गोसावी, चिंतामणी सोसायटीचे सह सचिव सौ. श्री. रमेश कदम, पोलिस मुख्यालय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.अमोल पाटील व विध्यार्थी, नव्याने आपल्या जिद्दीने प्रयत्नांना साथ देत नवीन कवी होणारी मैत्रीण ऐश्वर्या जगदाळे, आम्हीं सायकल प्रेमी फाउंडेशनचे सदस्य गजानन दांगट, गिरीश, ॲड. वृषाली काकडे, ॲड. साहिल गायकवाड, श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष रुपेश शिंदे, किरण घोटाळे, मंगेश निकम, सुनिल गंद्रे, कवी, लेखक विनोद पितळे ह्यांनी गणेश भेट घेत त्यांनी लिहलेले वारकरी अनुभवाचे होय होय वारकरी हे पुस्तक दिले जणू आज पांडूरंग घरी दर्शनास आले कारण त्या पुस्तकावर अप्रतिम असे पांडुरंगाचे चित्र होते. तसेच मराठा बटालियनचे मेजर संदीप  साळुंखे दादा, अष्टविनायक मित्र मंडळाचे सदस्य अमित मंडलिक, प्रशांत मांजरेकर, कुणाल सोनवणे, अरविंद रणशिंगे, राकेश बनसोडे, शिवराम, मंगेश गुप्ता, आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्याम पांडे, छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलचे शैलेश यादव व सहकारी हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार संघटना चे मुबारक शेख, भाजपचे SEO तेजस चंद्रमोरे, आदि मान्यवरांनी घरी येऊन गणेशाचे दर्शन घेतले व उपक्रमात सहभागी होऊन उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

घाटकोपरमध्ये शिवसेना (शिंदे गट) तर्फे राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध !!

घाटकोपरमध्ये शिवसेना (शिंदे गट) तर्फे राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
          परदेशात आरक्षण रद्द करण्या संदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्य विरोधात गेल्या तीन दिवसापासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी निषेध आंदोलन सुरू आहे. आज घाटकोपर विक्रोळी अग्निशमन केंद्र येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. घाटकोपर पश्चिम विधानसभा प्रमुख डॉ. सुबोध बावदाने यांच्या वतीने घेण्यात आलेल्या या आंदोलनात माजी नगरसेवक दीपक बाबा हांडे, डॉ. भारती बावदाने, महिला विधानसभा प्रमुख संगीता ताई हुले, उप विभाग प्रमुख हरेश धांदृत, मनीष कळंबे, दत्ता केसरकर, मंगेश भोर, ज्योती शेळके, विजय कोईलकर, शंकर व्हराडी, युसुफ खान, पूजा पवार, सुवर्णा वाळुंज, शाहीन शेख आदी सर्व शिवसैनिक उपस्थित होते.
            परदेशात एका मुलाखतीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या विषयी केलेले वक्तव्य चांगलेच तापले असून देशभरात त्याचा निषेध केला जात आहे. भाजपा, शिवसेना शिंदे गटाकडून या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला जात आहे. आज सकाळी पावसाचे वातावरण असतानाही शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आरक्षण रद्द करण्याचे वक्तव्य बाबत राहुल गांधी यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. राहुल गांधी यांचे वक्तव्य म्हणजे संविधानाचा अपमान आहे आणि त्याचा विरोध हा झालाच पाहिजे असे घाटकोपर पश्चिम विधानसभा प्रमुख डॉ. सुबोध बावदाने यांनी सांगितले.

Friday 13 September 2024

राज्यातील गोर-गरीब, कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीचे मार्ग समृद्ध व्हावेत - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्री गणेशाला प्रार्थना

राज्यातील गोर-गरीब, कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीचे मार्ग समृद्ध व्हावेत - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्री गणेशाला प्रार्थना

▪️नागपुरातील विविध गणेश मंडळांना भेट देवून फडणवीस यांनी घेतले दर्शन
▪️मंडळांमध्ये लाडक्या बहिणींचा उत्साह

नागपूर, दि. १३ :-  राज्यातील गोर-गरीब, कष्टकरी आणि शेतकऱ्यांना चिंतामुक्त करुन त्यांच्या उन्नतीचे मार्ग समृद्ध कर अशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना केली. नागपूर येथील विविध गणेश उत्सव मंडळाच्या गणपती बाप्पाचे त्यांनी मनोभावे दर्शन घेतले. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आज शहरातील  विविध  सार्वजनीक गणेशोत्सव  मंडळांना  भेट दिली आबाल वृद्धांशी संवाद साधला. 

प्नागपूर येथील प्रियदर्शनी नगर, गेडाम ले-आऊट, त्रिमूर्ती नगर, एल.आय.जी. कॉलनी, लोकसेवा नगर, न्यू सोनेगाव, पॅराडाईज सोसायटी,  एच. बी. इस्टेट, भेंन्डे ले-आऊट, कैकाडी नगर, जयताळा, अमल तास  लेआऊट, पूजा लेआऊट व विविध श्री गणेश मंडळांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट देवून मंडळांनी हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेतली.

गणेशोत्सव निमित्त नागपूर महानगरात मोठ्या प्रमाणात उत्साह दिसत असून विविध गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरण जागृतीचे देखावे तयार केले आहेत. शासनाने दिलेल्या कायदा व सुव्यस्थेच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याला मंडळांनी प्राधान्य दिले आहे. 

शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरणास १८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ !

शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरणास १८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ !

पुणे, प्रतिनिधी : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आधार प्रमाणीकरण न केलेल्या जिल्ह्यातील ६४८ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी १८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील १ हजार १२१ शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची सुविधा १२ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत उपलब्ध करून देण्यात आली होती. तथापि, जिल्ह्यातील अद्याप ६४८ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले नसल्याने सहकार आयुक्त तथा सहकारी संस्थांचे निबंधक यांच्या सूचनेनुसार ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

योजनेच्या कालावधीत बँकांकडून पीक कर्ज घेऊन, नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या काही शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यापूर्वीच, निधन झाल्याने त्यांना प्रोत्साहनपर लाभ रक्कम अदा करता आली नाही, अशा मयत शेतकऱ्यांच्या कर्जखात्याची माहिती योजनेच्या संगणकीय प्रणालीवरुन काढून टाकण्याची सुविधा १७ सप्टेंबर २०२४ पर्यंत उपलब्ध राहील. तसेच वारसांची नोंद संबंधीत कर्जखात्यास करून त्याबाबतची माहिती मयत शेतकऱ्यांच्या संगणकीय प्रणालीवर सादर करण्याची सुविधा दिनांक १८ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर या कालावधीत उपलब्ध राहील.

उर्वरित पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आपले सरकार केंद्र, सीएसी केंद्र, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आपल्या जवळच्या शाखेत जावून आपले आधार प्रमाणीकरण लवकरात लवकर करून घ्यावे तसेच मयत शेतकऱ्यांच्या वारसांनी त्यांचे कागदपत्रे संबंधित बँकेत विहित कालावधीत सादर करून वारस नोंद करावी, असे आवाहन पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, प्रकाश जगताप यांनी केले आहे.
00000

ग्रामपंचायत कर्मचारी चे अनेक प्रश्न चर्चेत मार्गी..फरक साठी ४४३ कोटी वितरीत!...

ग्रामपंचायत कर्मचारी चे अनेक प्रश्न चर्चेत मार्गी..फरक साठी ४४३ कोटी  वितरीत!...

चोपडा, प्रतिनिधी.. मुंबई येथे.दिनांक 11/09/2024 रोजी ग्राम विकास मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या सेवा सदन निवासस्थानी मीटिंग घेण्यात आली त्यात सांगण्यात आले  ग्रामविकास विभाग ने जिल्हा परिषदांना 5 सप्टेंबर रोजी 200 कोटी दिले तसेच 15 मे 24 ला 243 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आलेला आहे. ते कर्मचाऱ्यांपर्यंत वितरित करण्याची कारवाई सुरू आहे होईल दोन दिवसांत पगार होतील व लवकरच 19 महिन्याच्या किमान वेतनाचा फरक मिळेल अशी माहिती नामदार गिरीश महाजन यांचे पीए श्री देशमुख साहेब यांच्या मध्यस्थीने घेण्यात आलेल्या ग्राम विकास विभागाचे सजीव उपसचिव अधिकारी यांचे व ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे प्रतिनिधी यांचे झालेल्या चर्चेनंतर झाले अशी माहिती महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे सचिव कॉम्रेड अमृत महाजन यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात माहिती दिली आहे.

याबाबत सविस्तर असे की, या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची चर्चा करण्यात आली यात ठरलेली असे की.

१. यावलकर समिती च्या अंमलबजावणी साठी जिल्हा परिषद कडुन 8 दिवसांत अहवाल मागविण्यात येईल निशिक वगळता तात्काळ कारवाई करण्याचे पत्र जिल्हा परिषदला पाढविण्यात येईल व अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येईल.
२. कर्मचाऱ्यांच्या पगाराचे अनुदानासाठीवसुलीची अट कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.
३. किमान वेतन समिती गठीत करण्याबाबत उद्योग ऊर्जा व कामगार विभाग कडे तात्काळ कळविण्यात येईल.
४. अनुकंपा तत्त्वावर रिक्त जागेवर ग्रामपंचायत कर्मचारी याची भरती करण्याबाबत विचार व अभ्यास करून निर्णय करण्यात येईल.
५) लोकसंख्येची जाचक अट कमी करण्याचा शासनाचा प्रयत्न  आहे व नवीन आकृतीबंध बाबत माहिती मागवलेली आहे 
६) राहणीमान भत्ता ग्रामनिधीतून द्यावा म्हणून ग्रामपंचायतींना कलम 154 खाली सूचना देण्यात येतील तो शंभर टक्के शासनाच्या तिजोरीतून द्यावा याबाबत सरकार सकारात्मक आहे 

वसुलीची अट रद्द करण्यासाठी सरकार पॉझिटिव्ह आहे  परंतु वित्त खात्याने निगेटिव रिमार्क दिलेला आहे. हा प्रश्न मंत्रिमंडळासमोर ठेवावा. निर्णय घेण्यात आली  विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत उपसचिव. त्यांचे स्विय सहायक देशपांडे तसेच ग्रामपंचायत विभागाचे मुख्य सचिव श्री गांगुर्डे साहेब, आवर सचिव श्रीमती शेटे... व उपसचिव पांढरे, निकुंभ... तसेच महासंघाचे राज्य सचिव का, नामदेव चौहान, सखाराम दुगूडे, मंगेश म्हात्रे, अमरूत महाजन, गोविंद म्हात्रे, चत्रुगण लांजेवार, उज्वल गांगुर्डे, शाम चिचने, विनोद तोर, उपस्थित होते.

महिलांच्या स्वतंत्र स्वच्छतागृहासाठी स्वराज अभियान आक्रमक !!

महिलांच्या स्वतंत्र स्वच्छतागृहासाठी स्वराज अभियान आक्रमक !!

**शहरात महिलांसाठी स्वच्छतागृहांचा अभाव....

नालासोपारा, प्रतिनिधी :- वसई  विरार नालासोपारा शहरात २५ लाखाहुन अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात  महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे नाहीत व महापालिकेने विविध ठिकाणी बांधलेल्या ९४ सार्वजनिक स्वच्छतागृहांमधूनच महिलांची व्यवस्था करण्यात आली आहे.

यामध्ये महिला व पुरूषांसाठी समसमान जागा देण्यात आली आहे म्हणजे एकाच स्वच्छतागृहांमध्ये एका भिंतीआड पुरूष आणि महिला दोघाःसाठी जागा आहे मात्र असे असले तरी महिलांसाठी वेगळे व स्वतंत्र स्वच्छतागृह आवश्यक आहे. त्यामुळे महिलांना स्वतंत्र स्वच्छतागृहेच नाही आहेत. हि अतिशय धक्कादायक व लाजिरवाणी बाब आहे,

*आमदारांची पत्नी मनपात प्रथम महापौर होऊन गेल्या तरी त्यांचा काळात फक्त या विषयावर चर्चाच झाल्या अशी टिका  स्वराज अभियान च्या रूचिता नाईक यांनी केली.*

अनेकदा पुरुषी मानसिकतेचा सामना महिलांना करावा लागतो. संघर्ष करावा लागतो. आजही आमच्या भगिनींना अनेक ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागते. कामासाठी बाहेर पडणाऱ्या महिलांची संख्याही वाढत आहे परंतु शहरात स्वतंत्र सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव असल्याने महिलांची कुचंबणा होत आहे.घराबाहेर पडल्यानंतर सुरक्षित स्वच्छतागृहांची सुविधा नसल्याने महिलांना कार्यालय वा घरी जाईपर्यंत उत्सर्जन विधी रोखुन ठेवावे लागते. त्याचा त्यांचा आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम होत असतो यामुळे महिलांना मूत्रपिंड, लैंगिक आजार, त्वचाविकार, पोटदुखी अशा विविध आजार संभवतात.

परिसरात एकत्र स्वच्छतागृह आसल्याने पुरुषांची नेहमी गर्दी असल्याने महिला जाण्यास टाळाटाळ करतात. बस स्थानक, रेल्वे स्थानक आणि इतर ठिकाणी काही सामाजिक संस्थेकडून स्वच्छतागृह ठेकेदार पध्दतीने चालवले जातात. बहुतांश ठेकेदार हे स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेकेडे दुर्लक्ष करतात व त्याठिकाणी पैसै घेण्यास पुरूष च असल्याने महिलांची कुचंबणा होते. महापालिकेने फक्त महिलांसाठीच स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारलेली नाहीत.

वसई-विरार- नालासोपारा या शहरांमध्ये स्वच्छतागृहे बांधण्याची जबाबदारी ही महापालिकेची आहे, परंतु याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. स्वच्छतागृहे उपलब्ध करून देणे आणि ती स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने अर्थसंकल्पीय तरतूद असताना हि वसई विरार महानगरपालिकेचा महिलांबाबत एवढा निष्काळजीपणा का? 

----महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बाधण्याबाबत स्वराज अभियान च्या रूचिता नाईक यांची आयुक्तांकडे मागणी..

बॅनर्स लावून सार्वजनिक मालमत्ते चे विद्रुपीकरण करणाऱ्या लोकप्रतिनिधिवर गुन्हे घ्यावेत.:- पॅन्थर डॉ. राजन माकणीकर

बॅनर्स लावून सार्वजनिक मालमत्ते चे विद्रुपीकरण करणाऱ्या लोकप्रतिनिधिवर गुन्हे घ्यावेत.:- पॅन्थर डॉ. राजन माकणीकर

*(उच्च न्यायालयच्या आदेशाचे उल्लंघन)*

मुंबई दि (प्रतिनिधी) : शहराच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी, रस्ते, चौकांमध्ये राजकीय व्यक्तींकडून शुभेच्छा, विविध कार्यक्रम धर्मोत्सवाचे मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे बॅनर लावले जातात. याबाबत उच्च न्यायालयाने सर्व महापालिकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बॅनरवर असलेल्या लोकप्रतिनिधींच्या विरोधात थेट गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे लेखी पत्र महापालिका व बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांना विद्रोही पत्रकार पॅन्थर डॉ. राजन  माकणीकर यांनी दिले आहे.

शहरात कोणत्याही स्वरूपाची जाहिरात करण्यासाठी स्वतंत्र जाहिरात व फलक नियंत्रण नियम २०१३ तयार केले आहेत. यानुसार सार्वजनिक ठिकाणी, रस्ते, चौक आदी ठिकाणी बॅनर लावण्यास प्रशासनाकडून कोणत्याही स्वरूपाची परवानगी देण्यात येत नाही.

तरीही शहरामध्ये मोठ्या प्रमाणात चौका-चौकांत, काही मोक्याच्या ठिकाणी विविध वाढदिवस, निवड-नियुक्ती अभिनंदन, विविध धार्मिक कार्यक्रम, राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या-पुण्यतिथी तर गणेशोत्सवानिमित्त संपूर्ण शहरभर अनधिकृतपणे बॅनर लावून जाहिरातबाजी केली जात आहे. 

यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण होत असून, संबंधित व्यक्तींच्या विरोधात महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपीकरण कायदा १९९५ अतंर्गत थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. प्रशासनाने या कायद्याची अंमलबजावणी तात्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहे. 

शिवाय महापुरुष व देवी देवतांचे फोटो बॅनर वर छापले जातात नंतर तेच बॅनर फाटून तुटून कचर्यात पडून महा विटंबना होते,  अश्यावेळी धार्मिक भावना दुखावल्या जातं नाहीत का? असा सवाल करून यापुढे अशा प्रकारची जाहिरातबाजी करणाऱ्यावर थेट गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी समाजभूषण डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहे

Tuesday 10 September 2024

साखळी उपोषणाच्या २८ व्या दिवशी मनोरूग्णालय सफाई कर्मचारी आंदोलनाला यश !!

साखळी उपोषणाच्या २८ व्या दिवशी मनोरूग्णालय सफाई कर्मचारी आंदोलनाला यश !!

ठाणे दि. १० - 

ठाणे प्रादेशिक मनोरूग्णालयातील सफाई कर्मचारी साखळी उपोषणाच्या २८ व्या दिवशी किमान वेतन अधिनियमा नुसार वेतन मिळावण्यात यशस्वी झाले. त्यामुळे २८ दिवस सुरु असलेले साखळी उपोषण आंदोलन श्रमिक जनता संघाने स्थगित केले आहे. ९ सप्टेंबर रोजी किमान वेतन अधिनियमा नुसार कामगारांच्या बॅंक खात्यात वेतन जमा झाल्या नंतरच कामगारांच्या सहमतीने श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया व उपाध्यक्ष डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी १३ ऑगस्ट पासून सुरू असलेले बेमुदत साखळी उपोषण आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. युनियनच्या अध्यक्ष मेधा पाटकर यांनी लढाऊ कामगारांचे अभिनंदन केले. ठाणे प्रादेशिक मनोरूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक आणि प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीमती रानडे यांनी उपोषणकर्त्यांना फळाचा रस पाजून उपोषण सोडवले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांनी सांगितले की, किमान वेतन अधिनियमा नुसार वेतन अदा केले आहे. आणि किमान वेतनाच्या फरकाच्या रकमेचा प्रस्ताव वरिष्ठांकडे मंजुरी साठी पाठवले आहे. तेही लवकरच मिळेल त्यामुळे आता आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती करत आहे. रूग्णालय प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्याने पाच वर्षाच्या किमान वेतनाच्या फरकाची थकीत रक्कम मिळण्यासाठी मार्ग मोकळा झाला असल्याचे युनियनचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी सांगितले आहे.

ठाणे प्रादेशिक मनोरूग्णालय येथे एप्रिल २००८ च्या आगोदर १८७ कायमस्वरूपी सफाई कर्मचारी सेवेत होते. शासनाने रूग्णालयातील कायमस्वरूपी सफाई कामगारांना इतरत्र समावून घेऊन कंत्राटदारांमार्फत सुमारे शंभर सफाई कामगारांना तुटपुंजे वेतनावर राबविले जात होते.  गेली पाच वर्षे विशेष भत्त्याची दर सहा महिन्यांनी वाढणारी रक्कम कामगारांना पगारात दिली जात नव्हती. श्रमिक जनता संघ युनियनच्या वतीने कोर्टात धाव घेतल्यानंतर मा. ठाणे औद्योगिक न्यायालयाने ११ जून २०२४ रोजी केस नं युएलपी १२६/ २०२१ मध्ये किमान वेतन अधिनियम नुसार वेतन अदा करण्याचे आदेश दिले होते. परंतु मेंटल हॉस्पिटल प्रशासनाने आणि ठेकेदाराने कोर्टाचे आदेश पाळले नाही म्हणून श्रमिक जनता संघ युनियनने अठ्ठावीस दिवस बेमुदत साखळी उपोषणाचा लढा देत शेवटी आता किमान वेतन कायद्यानुसार वेतन लागू करून घेण्यात यश मिळाले आहे.

२८ दिवसांत रोज चार सफाई कामगार चौवीस तास उपोषण करत होते. आंदोलनात जवळजवळ सर्व सफाई कामगार सहभागी झाले होते. महिला कर्मचाऱ्यांनी आंदोलनात उत्साहाने सहभाग घेतला.  

आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी युनियनच्या अध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, स्वराज अभियानचे सुभाष लोमटे, एन.ए.पी.एम व समता विचार प्रसारक संस्थेच्या मीनल उत्तूरकर, धर्म राज्य पक्षाचे नितीन देशपांडे, अन्न अधिकार अभियानच्या मुक्ता श्रीवास्तव, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वंदनाताई शिंदे, अखिल भारतीय छावा संघटनेच्या रितू जतिंदर सेंखों, माजी नगरसेवक विकास रेपाळे,  सुहास देसाई, भारत जोडो अभियानचे राजेंद्र चव्हाण,  युनियनचे सचिव सुनील कंद, अजय भोसले, संघटक सुनील दिवेकर, बहुजन विकास संघाचे नरेश भगवाने, नरेश बोहित, घर बचाओ घर बनाओ आंदोलनचे नंदू शिंदे, पुजा पंडित, श्रमजीवी कामगार संघटनेचे किरण कांबळे आदींनी आंदोलनाला पाठींबा देऊन कामगारांचे मनोबल वाढवले. श्रमिक जनता संघाचे ठाणे महानगरपालिका व कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विविध खात्यांचे कामगार प्रतिनिधी यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन मनोरूग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला. 

श्रमिक जनता संघाच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलन यशस्वी होण्यासाठी युनियनच्या संघटक, अनिता कुमावत, शर्मिला लोगडे, दीनानाथ देसले, महेश निचिते, संजय सेंदाणे, पुष्पा भद्रे, सुविधा बांदल, सोनी चौहान, किशोर खर्डीकर, किशोर शिराळ, गीता झेंडे, रंजना मोरे आणि नंदकुमार गोतारणे आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी विशेष श्रम घेतले.

Saturday 7 September 2024

ज्या बौद्धांनी गणपती बसवला असेल अश्यानीं जातीच्या सवलती घेऊ नयेत‌ - पॅन्थर डॉ. राजन माकणीकर

ज्या बौद्धांनी गणपती बसवला असेल अश्यानीं जातीच्या सवलती घेऊ नयेत‌ - पॅन्थर डॉ. राजन माकणीकर 

मुंबई दि (प्रतिनिधी) : बौद्धा साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिल्या असताना ज्या बौद्धांनी घरात गणपती बसवला असेल अश्या गद्दारांनी जातीच्या सवलती घेऊ नये. किंवा कोणतेही विधी व सोपस्कार बौद्ध पद्धतीने करू नयेत असे मत पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारून कर्मकांड व मनुवादाला तिलांजली दिली आहे. बौद्धांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या सवलती व बौद्ध धम्म जवाबदार आहे. म्हणून आंबेडकर विचाराशी प्रामाणिक राहणे हे कर्तव्य आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गद्दार झालेल्या हरामखोरांनी सरळ सरळ मनुवाद स्वीकारून घंटानाद करत बसावा असा सल्ला डॉ. माकणीकर यांनी बेईमान बौद्धाना दिला आहे.

डॉ. माकणीकर असेही म्हणाले की, सवलती मिळवून नोकऱ्या मिळवल्या शिक्षण घेतलं पोरं पोरींना शिक्षण देत आहात मग बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा न पाळता बौध्द घरात गणपती बसवत असतील तर त्यांनी. खुशाल धम्म, नोकऱ्या सोडव्या व सवलती न घेता आपला संसार थाटावा तसेच घंटा वाजवत मंदिराबाहेर भीक मागत बसावे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बेईमान झालेली मनुवादी नाजायज पिलावळ गणपती घरात गणपती बसवते आणि सांगते... बायकोचा अट्टाहास होता, मुलांची जिद्द होती. अरे असल्या बायका सोबत कशाला संसार करता ज्या भारत भाग्य विधाता, बहुजनांचे उद्धारकर्ता तसेच आपल्या बापाच्या बापाला बेईमान होऊन येणारी पुढची सारी पिढी बरबाद करून आंबेडकर वादाला सुरुंग लावतेय. बाल, तरुण आणि युवा भारताला कर्मकांडात धाडतेय. अश्या बायकांना सरळ दया. मंदिरात सेवेकरी म्हणून रुजू करा. नाहीतर बौद्ध संस्काराचे धडे देऊन तिच्याच बदल घडवा.

गणेशोत्सव हा हिंदू बांधवांचा मोठा उत्सव माणला जातो. तो त्यांना हर्ष उल्हासात साजरा करू द्या. त्यांना शुभेच्छा द्या. त्यांच्या उत्साहात सामील व्हा. पण आपल्या घरात तसें वातावरण निर्माण करून जुनाट चाली रीतीनां प्रोत्साहन देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बेईमान होऊ नका. आणि असे बौद्ध घरात गणपती बसवत असतील तर त्यांना इतर बौद्धानी विरोध करून त्यांचे परिवर्तन करा. शेवटी आयकत नसतील तर त्यांच्या कोणत्याही विधी व सोपस्काराला ला बौद्ध व नातेवाईकांनी जाऊ नये. असे आवाहन पॅन्थर माकणीकर यांनी केले आहे.

+91 90045 45045 

संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी पद्मश्रीअण्णासाहेब जाधव व डाॅ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची संयुक्त जयंती उत्सव साजरा करत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक होऊन साजरा केला शिक्षक दिन !!!


संस्थापक शिक्षण महर्षी पद्मश्रीअण्णासाहेब जाधव व डाॅ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची संयुक्त जयंती उत्सव साजरा करत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक होऊन साजरा केला शिक्षक दिन !!


मुंबई प्रतिनिधी : विश्वनाथ राऊत: पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नति मंडळ, भिवंडी संचालित संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल कुर्ला पश्चिम या रात्र शाळेमध्ये संस्थेचे संस्थापक व शिक्षण महर्षी पद्मश्री परमपूज्य श्री पांडुरंग धर्माजी जाधव (भूतपूर्व राज्य सभा सदस्य) आणि डाॅ सर्वपल्ली राधाकृष्णन (भूतपूर्व राष्ट्रपती) यांची संयुक्त जयंती सोहळा व गुणवंत विद्यार्थी, शिक्षक गौरव समारंभा गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी  सायंकाळी 06:30 वाजता रात्र शाळेचे मुख्याध्यापक श्री विश्वनाथ राऊत सर यांच्या अध्यक्षतेखाली रात्र शाळेचे शिक्षक श्री समाधान खैरनार सर, मासूम संस्थेचे स्कूल लीडर श्री योगेश वीरकर सर, श्री प्रमोद गीते या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी रात्र शाळेचे मुख्याध्यापक यांनी शिक्षण महर्षी पद्मश्री अण्णासाहेब जाधव व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जीवन विषयी संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच शिक्षक दिनी  गुणगौरव समारंभात दहावीच्या प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, गुलाब पुष्प देऊन गुणगौरव करण्यात आले. मार्च 2024 एसएससी परीक्षेचा निकाल 100% लावणाऱ्या शिक्षकांचे उल्लेखनिय योगदानाबद्दल शिक्षकांना प्रमाणपत्र, गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्ताने इयत्ता 10 वीचे विद्यार्थी  शिक्षक होऊन त्यांनी संपूर्ण रात्र शाळा सांभाळत शिक्षिक होण्याचा अनुभव घेतला. शिक्षकांचे कार्य किती अवघड असते हे त्यांनी त्यांच्या सांगितलेल्या अनुभवातून दिसून आले. शिक्षक झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन गुलाब पुष्प देऊन मुख्याध्यापकांनी केले. 


रात्र शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत उपाययोजना म्हणून दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी विशाखा समिती व सखी सावित्री समितीची स्थापना करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या संपूर्ण शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी बीएमसीकडे मागणी करण्यात आली. त्याचबरोबर तक्रार पेटी बसवण्यात आली आहे त्याचा वापर कसा करायचा याबद्दल सुद्धा मार्गदर्शन समिती कडून विद्यार्थ्यांना करण्यात आले.


आरोग्यविषयक मार्गदर्शन डॉ. अंजली तलवलकर मॅडम तसेच सुरक्षिततेविषयी मार्गदर्शन विनोबा भावे पोलिस स्टेशन, कुर्ला येथील API विजया गावडे मॅडम तसेच PSI हिना कचरे मॅडम यांनी केले. तसेच समुपदेशक म्हणून कविता कांबळे या ह्या उपस्थित होत्या. तसेच माजी विद्यार्थी राकेश राक्ष व विद्यार्थी प्रतिनिधी या सर्वांचा समावेश समितीमध्ये करण्यात आला आहे.


शिक्षक दिनानिमित्ताने घेतलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रात्र शाळेचे शिक्षक श्री समाधान खैरनार सर यांनी केले. शेवटी सर्व उपस्थित मान्यवरांचे व समिती सदस्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी) चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांनी केली वर्षा निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणेशाची मनोभावे आरती !!

राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी) चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांनी केली वर्षा निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणेशाची मनोभावे आरती !! ...