Wednesday, 6 November 2024

भाजप पदाधिकारी प्रकाश शेलार यांच्यावर महायुतीच्या विरोधात काम केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी !!

भाजप पदाधिकारी प्रकाश शेलार यांच्यावर महायुतीच्या विरोधात काम केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी !!

वाडा, प्रतिनिधी :  वाडा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तथा वरसाळे ग्रामपंचायतचे माजी सरपंच प्रकाश शेलार यांनी शहापूर विधानसभा महायुतीचे उमेदवार दौलत दरोडा यांच्या विरोधात ऐन निवडणुकीत  महायुतीला तडा जाईल अशा प्रकारची सातत्याने वक्तव्य केले असून यासाठी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या प्रकाश शेलार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. 

प्रकाश शेलार हे वरसाळे ग्रामपंचायतचे सरपंच असताना त्यांनी निकृष्ट अंगणवाड्यांचं बांधकाम केल्याचा त्यांच्यावर आरोप असून या अंगणवाड्यात कधीही कोसळतील,  अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि या विरोधात स्थानिकांनी तक्रारी केल्या होत्या. या रागापोटी व स्थानिक विरोधापोटी प्रकाश शेलार हे सातत्याने निवडणुकीत महायुतीचे उमेदवार दौलत दरोडा यांच्या विरोधात जाहीर वक्तव्य करीत असल्याने त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे पालघर जिल्हा अध्यक्ष भरत रजपूत व तालुका अध्यक्ष मंगेश पाटील तसेच वरिष्ठांकडे करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

घाटकोपर एन विभागामध्ये घाटकोपर पश्चिम मधील विकास कामांसाठी ४२७ कोटी रुपयाचा निधी आला होता तो गेला कुठे ?

घाटकोपर एन विभागामध्ये घाटकोपर पश्चिम मधील विकास कामांसाठी ४२७ कोटी रुपयाचा निधी आला होता तो गेला कुठे ?  ** घाटकोपर पश्चिम मध्ये बदल मी घडव...