कासार्डे, धुमाळवाडी ग्रामस्थ व मुंबई मंडळ, आयोजित श्री सत्यनारायण महापूजा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन !
कणकवली, (केतन भोज) : कासार्डे, धुमाळवाडी ग्रामस्थ व मुंबई मंडळ, आयोजित प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी श्री इसवटी महापुरुष देवालय, कासार्डे (धुमाळवाडी), ता.कणकवली याठिकाणी शनिवार दि.१० मे २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्त शनिवार दि.१० मे २०२५ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी ८ ते १० वा. श्री गांगेश्वर मंदिरात अभिषेक होणार असून त्यानंतर पुन्हा सकाळी १०.३० ते १ वा. श्री सत्यनारायण महापूजा होणार आहे. तसेच दुपारी १.३० ते ३.३० वा.महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे आणि सायंकाळी ४ ते ६ वा. वाडीतील महिलांचे व मुलांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तद्नंतर रात्री ८ वा.स्थानिक भजन होणार आहे. आणि शेवटी रात्री १० नंतर निमंत्रित वारकरी भजने आयोजित करण्यात आली असून, (श्री गांगेश्वर प्रासा. भजन मंडळ, गडमठ) (वरचा आवाट)- बुवा श्री.विलास सुतार, (श्री कुलस्वामिनी प्रासा. भजन मंडळ. नागसावंतवाडी- बुवा श्री.अतुल सावंत), (श्री गणेशकृपा प्रासा.भजन मंडळ, पियाळी-वंजारेवाडी, बुवा श्री.संदेश वंजारे), (प्रासा. भजन मंडळ दक्षिण गांवठण) (शेट्ये आवाट)- बुवा श्री.प्रमोद शेट्ये), (श्री इसवटेश्वर प्रासा. भजन मंडळ, दाबवाडी- बुवा श्री.अशोक पांचाळ) इत्यादी भजने होणार आहेत.तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थ, कासार्डे, धुमाळवाडी /मुंबई यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment