'साप्ताहिक आम्ही मुंबईकर' व्दारा पुरस्कार सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न झाला !!
मुंबई, कांदिवली, (भारत कवितके) :
साप्ताहिक आम्ही मुंबईकर व्दारा पुरस्कार सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. रविवार दिनांक ८ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजलेपासून दुपारी २ वाजेपर्यंत पुणे येथील काकडे देशमुख यांच्या उत्कर्ष शाळेत महिला दिनाचे औचित्य साधून आम्ही मुंबईकर वर्तमानपत्र व्दारा महाराष्ट्र राज्यातील साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांसाठी साहित्य सांस्कृतिक पुरस्कार २०२६ देऊन सन्मानित करण्यात आले, सुरुवातीला सरस्वती पूजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले, आम्ही मुंबईकर व्दारा अध्यक्ष, उद्घाटक, स्वागताध्यक्ष, प्रमुख पाहुणे यांचे सत्कार करण्यात आले, या प्रसंगी उद्घाटक सौ.वसुधा नाईक यांनी सांगितले की, ' आम्ही मुंबईकर मार्फत सकारात्मक पत्रकारिता जपू या, १ पानांचा अंक १० पानावर पोहचला, 'तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले 'ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके' यांनी सांगितले की, 'महाराष्ट्र राज्यातील अनेक पत्रकार व साहित्यिक यांना आम्ही मुंबईकर व्दारा संपादक प्रमोद सूर्यवंशी यांनी संधी प्राप्त करून दिली असल्याने प्रमोद सूर्यवंशी यांचे आभार " प्रमुख पाहुणे निलेश दातार यांनी गंगाधर टिपरे यांच्या अभिनयाची नक्कल करून दाखवली, प्रिया दामले यांनी आम्ही मुंबईकर वर्तमानपत्राचे कौतुक करुन शब्द ही कविता सादर केली, अध्यक्ष शरदचंद्र काकडे देशमुख यांनी शाळा काढल्या तेव्हा आलेल्या अडचणी सांगितल्या, प्रास्ताविकात संपादक प्रमोद सूर्यवंशी यांनी सांगितले की," हा पेपर काढला तेव्हा मला जेष्ठ पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके आणि ग्राफिक डिझायनर अंगद दराडे यांनी अत्यंत मोलाचे सहकार्य केले, तसेच तुमच्या सर्वांच्या सहकार्याने मी आम्ही मुंबईकर वर्तमानपत्र चालू ठेवले आहे, किती ही संकटे आली तरी मुंबईकर मागे हटत नाही, म्हणून हे नाव ही सार्थ आहे."या वेळी योगिता कोठेकर यांच्या संस्कार शिदोरी या चारोळी संग्रहाचे प्रकाशन व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, सूत्रसंचालन गौरव पुंडे यांनी केले, या प्रसंगी श्रीराम घडे, विजय सातपुते, अशोक मोहिते, नंदा सावंत, अनुपमा जाधव, दुर्गा पवार, सूत्र संचालन युवराज्ञी सोनवणे,गौरव पुंडे यांनी केले.
योगिता कोठेकर, भारत कवितके, स्वाती ताई तोंडे पाटील,तेज न्यूज चे संपादक प्रशांत माळवदे, सुनील इंगळे, यांनी मनोगत व्यक्त करुन कविता सादर केल्या. मान्यवरांच्या हस्ते साहित्य सांस्कृतिक पुरस्कार तसेच युवा खेळाडू पुरस्कार २०२६ चे वितरण
प्रज्ञा सिद्धार्थ घोरपडे, श्री .अरुण बुंदेले, प्रदीप पंढरीनाथ जोशी, श्री सुनिल इंगळे, श्री दुर्गाप्रसाद मिताराव हटवार, श्री अशोक मोहिते, सुभाष बोराडे, सौ.अनुपमा जाधव, डॉ सुरेश भिवाजी पाटील, कु.श्रुती चौधरी, दुर्गा पवार, निवघेकर, श्री .राकेश साहेबराव वाघ, कवयित्री सौ.स्वाती वाल्मिकराव तोंडे पाटील, रफीक इमानदार मधुकर पुर्णाजी तराळे, गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई बबन विठोबा आराख, प्रा.डॉ. सत्येंद्र संगाप्पा राऊत मंगेश मुरलीधर दौंडकर, राहूल शिवाजी हांडगर, डॉ. सौ.अलका नाईक, सौ.नंदा विजय सावंत, ओंकार शरदचंद्र काकडे देशमुख यांना करण्यात आले.
आयोजक मंडळाने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.शेवटी योगेश हरणे यांनी सर्वांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment