Sunday, 8 March 2026

अंबरनाथ रेल्वे स्थानकावर महिला दिनानिमित्त महिला प्रवाशांना गुलाब व मिठाई वाटप !

अंबरनाथ रेल्वे स्थानकावर महिला दिनानिमित्त महिला प्रवाशांना गुलाब व मिठाई वाटप !

प्रतिनिधी, (विशल कुरकुटे)

आज दिनांक ०८ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने Railway Protection Force (RPF) अंबरनाथ चौकीच्या प्रभारी सोनाली नंदेश्वर यांच्या पुढाकाराने Ambarnath Railway Station येथे विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला.

या वेळी महिला प्रवाशांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत गुलाब पुष्प व मिठाई वाटप करून महिला दिन साजरा करण्यात आला. तसेच महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी RPF सदैव तत्पर आहे, याची माहिती देत महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध सुरक्षा उपक्रमांबाबत जनजागृती करण्यात आली.

या वेळी विशेष उपस्थिती म्हणून जगदीश देसले साहेब व रमेश पाटील साहेब यांनी चौकी प्रभारी सोनाली नंदेश्वर मॅडम यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

तसेच कार्यक्रमाला दिनेश बुचडे, दिपक तेली, संजय गुप्ता सौ रेखा उत्तरदे  आशा डिसोझा कांचन कुलकर्णी  तसेच मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष प्रवासी उपस्थित होते.

या उपक्रमामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये महिला सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढविण्याचा संदेश देण्यात आला.

No comments:

Post a Comment

शिवसेना प्रणित जय महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार सेनेच्या मावळ लोकसभा क्षेत्राच्या उपाध्यक्ष पदी जगदीश ठाकूर !!

शिवसेना प्रणित जय महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार सेनेच्या मावळ लोकसभा क्षेत्राच्या उपाध्यक्ष पदी जगदीश ठाकूर !! उरण दि २१, (व...