Monday, 1 June 2026

६ जून रोजी उरण मध्ये माहिती अधिकार कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन. !

६ जून रोजी उरण मध्ये माहिती अधिकार कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन. !


** सजग नागरिक म्हणून एकत्र येण्याचे आवाहन.

उरण दि १, (विठ्ठल ममताबादे ) : माहिती अधिकार कार्यकर्ता संघ — उरण तालुकाच्या वतीने उरण तालुक्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता संघाच्या सदस्यांसाठी तसेच नवीन नोंदणीसाठी फॉर्म भरलेल्या कार्यकर्त्यांसाठी शनिवार दिनांक ६ जून रोजी संध्याकाळी ठिक ५ वाजता एकदंत अपार्टमेंट उरण शहर येथे विशेष विचारविनिमय बैठक व प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यशाळेमध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.माहिती अधिकार कायद्याचा प्रभावी वापर, कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी व त्यांचे निराकरण, अर्ज, अपील व तक्रार प्रक्रियेबाबत मार्गदर्शन, संघटनात्मक कामकाज व पुढील नियोजन, नवीन कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन अशा विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे .तरी उरण तालुक्यातील सर्व माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी व इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा व जास्तीत जास्त मोठया संख्येने या कार्यशाळेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
शेळके दत्तात्रय  8369111167, सुनील जोशी 8286442067, विश्वास पटवर्धन 8452085330

No comments:

Post a Comment

तिसऱ्या मुंबई विरोधात ७ जून रोजी चिरनेर येथे शेतकऱ्यांचा जाहीर मेळावा !!

तिसऱ्या मुंबई विरोधात ७ जून रोजी चिरनेर येथे शेतकऱ्यांचा जाहीर मेळावा !! ** जमीन, घरे, गावे, समाज वाचविण्यासाठी तिसऱ्या मुंबई विरोधी आंदोलना...