Sunday, 28 June 2026

मुरबाड-कल्याण मार्गावर १० नवीन बसेस दाखल; ३० फेऱ्या वाढणार !!

मुरबाड-कल्याण मार्गावर १० नवीन बसेस दाखल; ३० फेऱ्या वाढणार !!

*मुरबाड, प्रतिनिधी* : मुरबाड-कल्याण मार्गावरील हजारो दैनंदिन प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. परिवहन विभागाने मुरबाड बस आगाराला अत्याधुनिक सुविधांनी सज्ज १० नवीन बसेस सुपूर्द केल्या आहेत. 

यापैकी ५ बसेस मुरबाड आगारात तर ५ बसेस कल्याण आगारात दाखल झाल्या आहेत. या सर्व बसेस केवळ मुरबाड-कल्याण मार्गावरच धावणार आहेत. आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते या बसेसचा लोकार्पण सोहळा पार पडला.

नवीन १० बसेसमुळे या मार्गावर दैनंदिन ३० अतिरिक्त फेऱ्या वाढणार असून प्रवासी वाहतूक क्षमता ३० ते ३५ टक्क्यांनी वाढेल. त्यामुळे नोकरदार, विद्यार्थी व व्यावसायिकांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे.

“प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नोव्हेंबरपर्यंत मुरबाड बस डेपोचे नूतनीकरणही पूर्ण होईल,” असे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

कल्याण तालुका पोलीस ठाण्यातंर्गत साडेचार हजार घरगुती व शंभरच्या आसपास सार्वजनिक गणेशोत्सव, विसर्जन घाटांची 'बिकट, अवस्था ?

कल्याण तालुका पोलीस ठाण्यातंर्गत साडेचार हजार घरगुती व शंभरच्या आसपास सार्वजनिक गणेशोत्सव, विसर्जन घाटांची 'बिकट, अवस्था ? क...