Tuesday, 2 June 2026

डोंबिवलीतील ५२ चाळ रेल्वे मैदानावरील कामाला स्थगिती; नागरिकांना दिलासा !!

डोंबिवलीतील ५२ चाळ रेल्वे मैदानावरील कामाला स्थगिती; नागरिकांना दिलासा !!

डोंबिवली, (संदीप शेंडगे) : डोंबिवली पश्चिमेतील ऐतिहासिक ५२ चाळ रेल्वे मैदानावर उभारण्यात येणाऱ्या गेमिंग झोनचे काम तातडीने थांबवण्यात आले आहे. खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपामुळे आणि आमदार राजेश मोरे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे हा निर्णय झाल्याने नागरिकांमध्ये समाधान आहे.

रेल्वेच्या मालकीच्या या मैदानावर गेमिंग झोन उभारण्याचे काम सुरू झाल्याने स्थानिक खेळाडू, नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांनी तीव्र आंदोलन केले होते. हे मैदान क्रीडा सराव, फेरफटका आणि सामाजिक उपक्रमांचे प्रमुख केंद्र आहे.

खासदार शिंदे यांच्या निर्देशानुसार आमदार मोरे आणि स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर यांनी रेल्वे प्रशासनाची भेट घेऊन मैदानाचे महत्त्व पटवून दिले. नागरीकरणामुळे मोकळ्या जागांची कमतरता असल्याचे सांगून मैदान जतन करण्याची मागणी केली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने सध्या सुरू असले काम थांबवले.

येत्या काळात दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन ५२ चाळ मैदान कायमस्वरूपी जतन करण्याबत आणि क्रीडा व सार्वजनिक हितासाठी विकास करण्याबत प्रयत्न करणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

🇮🇳 *हिंदी दिवस व ६ वे अखिल भारतीय राजभाषा संमेलनात नागरी संरक्षण दलाची उल्लेखनीय कामगिरी* !!!

🇮🇳 *हिंदी दिवस व ६ वे अखिल भारतीय राजभाषा संमेलनात नागरी संरक्षण दलाची उल्लेखनीय कामगिरी* !!! नवी मुंबई, वाशी : केंद्र शासन गृ...