Saturday, 15 August 2026

जर्मनीत भारतीयांनी मोठ्या उत्साहात साजरा केला 80 वा स्वातंत्र्यदिन !!

जर्मनीत भारतीयांनी मोठ्या उत्साहात साजरा केला 80 वा स्वातंत्र्यदिन !!

*म्युनिक, दि. 15 ऑगस्ट 2026*

भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जर्मनीतील म्युनिक, बर्लिन, फ्रँकफर्टसह विविध शहरांमध्ये भारतीय वाणिज्य दूतावास कार्यालयांच्या वतीने ध्वजारोहण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

भारतीय वाणिज्य दूतावासाच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमांना जर्मनीत वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. सकाळी राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. त्यानंतर राष्ट्रगीत गायन, देशभक्तीपर गीते आणि सांस्कृतिक सादरीकरणे झाली.

या निमित्ताने परदेशात असलेल्या भारतीयांना एकमेकांना भेटण्याची आणि स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्याची संधी मिळाली. वातावरण देशभक्तीच्या भावनेने भारलेले होते.

दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी भारताच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि परदेशात असूनही देशाशी असले नाते घट्ट ठेवण्याचे आवाहन केले. 

जर्मनीतील भारतीय समुदायाने हा 80 वा स्वातंत्र्यदिन अभिमानाने आणि उत्साहात साजरा केला.

वृत्त - समाजसेवक राजू नलावडे (डोंबिवली)

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह, ठाणे यांच्याकडून अंबरनाथ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह, ठाणे यांच्याकडून अंबरनाथ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा !! अंबरनाथ | १५ ऑगस्ट २०२६ : भा...