आंतरराष्ट्रीय युवा दिन : साकेत महाविद्यालयात जिल्हास्तरीय ‘रेड रन’ स्पर्धा आणि जनजागृती रॅली उत्साहात संपन्न !!
*कल्याण, प्रतिनिधी* : आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त साकेत महाविद्यालय, कल्याण येथे जिल्हास्तरीय ‘रेड रन’ स्पर्धा आणि HIV/AIDS जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. क्रीडा आणि सामाजिक संदेश यांचा संगम असलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
*221 विद्यार्थ्यांचा रेड रनमध्ये सहभाग*
ठाणे जिल्ह्यातील 60 महाविद्यालयांमधील एकूण 221 विद्यार्थ्यांनी ‘रेड रन’ स्पर्धेत भाग घेतला. तर HIV/AIDS प्रतिबंध आणि सुरक्षिततेचा संदेश देणाऱ्या जनजागृती रॅलीमध्ये तब्बल 450 विद्यार्थी सहभागी झाले होते.
*जनजागृतीचा मुख्य संदेश*
या रॅलीच्या माध्यमातून HIV/AIDS प्रतिबंध, सुरक्षित वर्तन, नियमित HIV तपासणी, उपचारांची उपलब्धता आणि HIV संदर्भातील गैरसमज व भेदभाव दूर करणे, असे महत्त्वाचे संदेश देण्यात आले.
*"अचूक माहिती हेच संरक्षण"*
या उपक्रमाच्या निमित्ताने “अचूक माहिती, सुरक्षित वर्तन आणि संवेदनशील दृष्टिकोन” याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. युवा पिढीला आरोग्याबाबत जागरूक करणे आणि समाजात सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमामुळे क्रीडा, युवकांचा सहभाग आणि सामाजिक जनजागृती यांचा उत्तम मिलाफ साधला गेला.
No comments:
Post a Comment