वीज ग्राहकांसाठी योजना' महावितरण सेवासेतू कार्यालय उघडले !!
डोंबिवली, राजू नलावडे
डोंबिवली एमआयडीसीसह ग्रामीण भागातील वीज ग्राहकांसाठी योजना काय आहेत याची माहिती देण्यासाठी महावितरण कल्याण पूर्व विभागीय कार्यालय तर्फे सेवासेतू कार्यालय 20 सप्टेंबर पासून उघडण्यात आले असून ते 17 ऑक्टोबर पर्यंत कार्यान्वीत राहणार आहे. हे तात्पुरते महावितरणचे सेवासेतू कार्यालय केडीएमसीच्या ई वॉर्ड, रिजेन्सी इस्टेट, दावडी, कल्याण शीळ रोड, डोंबिवली पूर्व येथे सकाळी 10.00 ते सायंकाळी 05.30 या वेळेत असणार असून वीजग्राहकांनी त्याच्या लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री गिरीश भगत यानी केले आहे.
वीजग्राहकांसाठी योजना खालील प्रमाणे आहेत.
१) स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रुफटॉप (स्मार्ट) सोलर योजना
२) मागेल त्याला सौर कृषी पंप
३) इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन
४) पीएम सूर्यघर मोफत वीज योजना
५) मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०
वरील योजनेची सविस्तर माहिती या सेतू कार्यालयात पत्रकाद्वारे आणि प्रत्यक्ष मिळणार असून वीजग्राहकांना त्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिवाय वीज सुरक्षेसाठी आवाहन करण्यात आले असून 'कृपया हे करू नये', 'कृपया हे करावे', 'वीज बचतीसाठी सोपे उपाय', 'एवढी खबरदारी घेऊया', या हेडिंग खाली एका माहिती पत्रकाद्वारे ग्राहकांना सर्व माहिती देण्यात येत आहे. तसेच सर्व प्रकाराच्या तक्रार निवारणासाठी टोल फ्री क्रमांक 1800-212-3435/1800-233-3435/1922/19120 तसेच खंडीत वीजपुरवठा तक्रारीसाठी नोंदणीकृत मोबाईल द्वारे मिस्ड कॉल सेवा 022-50897100 असे असल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
ज्या वीजग्राहकांना या योजनेसाठी लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी या सेवासेतू जनजागृती कक्ष कार्यालयात येऊन तेथील अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेट घेऊन माहिती घ्यावी.
*महावितरण सेतू कार्यालय संपर्क :- श्री चेतन तेलगरे (कनिष्ठ अभियंता), मोबाईल क्रमांक 8879626473*
No comments:
Post a Comment