Monday, 14 September 2026

समाजजोडो अभियान गतिमान करा - अण्णासाहेब कटारे

*समाजजोडो अभियान गतिमान करा - अण्णासाहेब कटारे*

*राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या प्रमुख उपस्थित पुण्यात भव्य प्रवेश व पत्रकार परिषद संपन्न..*

पुणे (प्रतिनिधी): राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे पुणे दौऱ्यावर आले होते त्यांच्या उपस्थितीत पुण्यातील अनेक पक्ष संघटनेतील कार्यकर्ते महिलांनी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. 

प्रवेश सोहळ्यानंतर पुणे येथील श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन भाऊ साबळे यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. पत्रकार परिषदेत बोलताना अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले की राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावात संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत जोमाने वेगाने सुरू आहे दररोज महाराष्ट्रातील सर्वच क्षेत्रातील अनेक नामावंत व्यक्ती विविध पक्ष संघटनेतील पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात दाखल होत आहे. राज्यातील सर्वच प्रस्थापित पक्षाने नेहमीच गोरगरीब/ दलित /बौद्ध/मागासवर्गीय/ अल्पसंख्यांक /आदिवासी/ ओबीसी/ भटके विमुक्त समूहाच्या जीवन मरणाच्या प्रश्नांकडे नेहमीच डोळे झाक केलेली दिसते. स्वातंत्र्याच्या ८० वर्षानंतरही या घटकांची कोणत्याही क्षेत्रात सर्वांगीण प्रगती नाही अजूनही त्यांना मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी संघर्ष करावा लागत आहे म्हणून राज्यातील आता हे सर्व समाज घटक प्रस्थापित पक्षांना कंटाळले असून ते पर्यायच शोधत आहे त्यांच्या सर्वच प्रश्नांना न्याय देण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष मैदानात उतरला आहे असेही कटारे यांनी शेवटी सांगितले.

राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात प्रवेश केलेले नामवंत खालील प्रमाणे - उदय खांडके (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अल्पसंख्यांक आघाडी) संगीता ननावरे (परीट धोबी पुणे जिल्हा अध्यक्षा), नम्रता अहेर, (अध्यक्षा रणरागिणी प्रतिष्ठान), शुभांगी बहुलेकर (शिंपी समाज प्रमुख पुणे जिल्हा), परेशभाई कटारीया (जैन समाज नेते व व्यापारी असोसिएशन), मनोज अष्टेकर (साळी समाज अध्यक्ष पुणे), मुदस्सर भाई (मदारी समाज नेते पुणे), अभिषेख वैराट (सामाजिक कार्यकर्ते), सचिन बतूल (तेलगू संघटना),धनंजय मालुसरे (सामाजिक कार्यकर्ते) गणेश काची (शिवसेना नेते पुणे), येशुराज बेल्ली (मेरी चर्च मुंबई रिजनल कॉन्फरन्स)

प्रामुख्याने या प्रवेश सोहळ्यास व पत्रकार परिषदेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश जनसंपर्कप्रमुख सचिनभाऊ नांगरे, येवला युवा नेते तुषार वाघ, युवा संपर्कप्रमुख संतोष राजगुरू, युवा नेते बबन वाघ, युवा नेते प्रशांत कटारे, अभिनव निकम, सिद्धांत कटारे आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुणे जिल्हा संघटक अक्षय वाघमारे, पुणे जिल्हा सचिव कुणाल चव्हाण, पुणे जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी प्रीती जगताप, पुणे जिल्हा सचिव महिला आघाडी प्राजक्ता शिंदे माधवीताई अवसरकर, कल्पना जोशी, रेश्मा ताई पोकळे, प्रतिभा आजबे, संतोष निरगुडे, नम्रता अहिरे आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

धोबीघाट रोडवरील अनधिकृत बांधकामावर कारवाईची मागणी; पालिका आयुक्तांसह विशाखा मोटघरे यांना तक्रारदाराचे पत्र !!

धोबीघाट रोडवरील अनधिकृत बांधकामावर कारवाईची मागणी; पालिका आयुक्तांसह विशाखा मोटघरे यांना तक्रारदाराचे पत्र !! वसई (प्रतिनिधी) : ...