Tuesday, 17 November 2026

महाराष्ट्र भूषणसह विविध मानाच्या पुरस्कारांच्या निवडीसंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक !!

महाराष्ट्र भूषणसह विविध मानाच्या पुरस्कारांच्या निवडीसंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक !!

*मुंबई, प्रतिनिधी :* राज्य शासनातर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषणसह विविध सांस्कृतिक व कलाक्षेत्रातील मानाच्या पुरस्कारांच्या निवडीसंदर्भात सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी विविध पुरस्कारांसाठी गठित तज्ज्ञ समित्यांच्या सदस्यांशी प्राथमिक चर्चा करण्यात आली.

बैठकीत महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी २०२५-२६ आणि २०२६-२७ या वर्षांतील निवडीसह तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार, भारतरत्न पं. भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार, ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार आणि संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारांच्या निवडीबाबत चर्चा झाली. तसेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार आणि स्वरसम्राज्ञी आशा भोसले पुरस्कार २०२६-२७ या वर्षासाठी प्रदान करण्यासंदर्भातही विचारविनिमय करण्यात आला.

विविध राज्यस्तरीय पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी १० लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे असून, महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी २५ लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येते.

बैठकीस सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर, कार्यक्रम अधिकारी निलेश धुमाळ आणि मिलिंद बिर्जे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी तसेच विविध पुरस्कारांसाठी गठित तज्ज्ञ समित्यांचे सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कल्याण रेल्वे स्थानकावर ‘मिशन झिरो रेल्वे एक्सीडेंट डेथ’ व ‘जीवन रक्षा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

कल्याण रेल्वे स्थानकावर ‘मिशन झिरो रेल्वे एक्सीडेंट डेथ’ व ‘जीवन रक्षा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद !! *(दिपक मागाडे- प्रतिनिध...