Tuesday, 17 November 2026

ठाणे जिल्ह्यातील महसूल सेवक (कोतवाल) भरती परीक्षा सुधारित वेळापत्रक जाहीर !!

ठाणे जिल्ह्यातील महसूल सेवक (कोतवाल) भरती परीक्षा सुधारित वेळापत्रक जाहीर !!

*ठाणे, प्रतिनिधी :* जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे अंतर्गत ठाणे, कल्याण, मुरबाड, अंबरनाथ, भिवंडी आणि शहापूर या सहा तालुक्यांतील रिक्त महसूल सेवक (कोतवाल) पदांच्या भरतीसाठी दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी नियोजित असलेली लेखी परीक्षा तूर्त पुढे ढकलण्यात आली असून प्रशासनाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.

शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार या भरती प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, आता लेखी परीक्षा रविवार, दि. १७ जानेवारी २०२७ रोजी होणार आहे, अशी माहिती महसूल सेवक निवड समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी (उपविभाग उल्हासनगर) विजयानंद शर्मा यांनी कळविले आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्हताधारक उमेदवारांकडून https://thane.kotwal.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, महाराष्ट्र शासनाचे सहसचिव (महसूल व वन विभाग) यांच्या दि. १२ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या पत्रान्वये दि. १५ नोव्हेंबरची परीक्षा पुढे ढकलून नवीन वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

*सुधारित भरती वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे :*

- *तालुकानिहाय रिक्त जागांची यादी बनविणे :* दि. २३ नोव्हेंबर २०२६ ते दि. ३० नोव्हेंबर २०२६ (८ दिवस)
- *रिक्त जागांनुसार बिंदुनामावली तयार करणे :* दि. ०१ डिसेंबर २०२६ ते दि. १५ डिसेंबर २०२६ (१५ दिवस)
- *परीक्षा भरतीकरिता समिती स्थापना :* दि. १५ डिसेंबर २०२६
- *जाहिरातीचा कालावधी :* दि. १६ डिसेंबर २०२६ ते दि. ३१ डिसेंबर २०२६
- *अर्जांची छाननी :* दि. ०१ जानेवारी २०२७ ते दि. ०७ जानेवारी २०२७
- *प्रवेशपत्र उपलब्ध करून देणे :* दि. ०८ जानेवारी २०२७ ते दि. १६ जानेवारी २०२७
- *लेखी परीक्षा :* दि. १७ जानेवारी २०२७
- *उत्तरसूची व निकाल घोषणा :* दि. १८ जानेवारी २०२७
- *दस्तऐवज पडताळणी :* दि. १८ जानेवारी २०२७ ते दि. २४ जानेवारी २०२७
- *अंतिम नियुक्तीपत्र निर्गमित करणे :* दि. २७ जानेवारी २०२७

या सुधारित वेळापत्रकाची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच, भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यांबाबत अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांनी https://thane.kotwal.org या अधिकृत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण रेल्वे स्थानकावर ‘मिशन झिरो रेल्वे एक्सीडेंट डेथ’ व ‘जीवन रक्षा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

कल्याण रेल्वे स्थानकावर ‘मिशन झिरो रेल्वे एक्सीडेंट डेथ’ व ‘जीवन रक्षा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद !! *(दिपक मागाडे- प्रतिनिध...