Monday, 25 January 2021

माणगांव येथील नुतन मध्यवर्ती प्रशासकीय जलसंपदा भवनाचा जलसंपदा मंत्री मा. जयंत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न !

माणगांव येथील नुतन मध्यवर्ती प्रशासकीय  जलसंपदा भवनाचा जलसंपदा मंत्री मा. जयंत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न !


      बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : माननीय लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्या अथक प्रयत्नाने रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यात साकारलेल्या भव्य दिव्य मध्यवर्ती प्रशासकीय जलसंपदा भवनाचा लोकार्पण सोहळा सोमवार दिनांक २५ जानेवारी २०२१ रोजी महाराष्ट्र राज्याचे विद्यमान जलसंपदा मंत्री माननीय जयंत पाटील साो यांच्या  हस्ते सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय लोकप्रिय खासदार सुनील तटकरे साो यांच्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय कुमारी अदिती ताई तटकरे, लोकप्रिय आमदार भरत शेठ गोगावले, माननीय आमदार अनिकेत तटकरे, रा. कॉ. जिल्हा अध्यक्ष, मा आ सुरेश लाड, जलसंपदा मुख्य अभियंता मा श्री तिरमनवार, रायगड जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती माननीय सौ गीताताई जाधव, पंचायत समिती सभापती माननीय अलका ताई जाधव, माणगांव नगराध्यक्षा माननीय योगिता चव्हाण, मा प्रभाकरदादा उभारे, जलसंपदा विभागाचे अभियंते, कर्मचारी वर्ग, माणगांव, तळा, रोहा, अलिबाग, म्हसळा, श्रीवर्धन इत्यादी तालुक्याचे सभापती, नगराध्यक्ष, नगरसेवक, रा. काँ. चे मान्यवर पदाधिकारी आणि माणगांव तालुक्यातील प्रतिष्ठित नागरीक, पत्रकार यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या लोकार्पण सोहळ्यास अनेक प्रतिष्ठित दिग्गजांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाच्या सुरवातीला सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. 
       सदर लोकार्पण सोहळा कार्यक्रम प्रसंगी मुख्य अभियंता माननीय श्री तिरमनवार यांनी प्रास्ताविक केले. त्या नंतर माननीय लोकप्रिय आमदार भरत शेठ गोगावले यांनी माननीय जलसंपदा मंत्री जयंत पाटील साो यांचे कुंभे काळ प्रकल्प आणि प्रकल्प ग्रस्तांच्या विस्थापितांच्या व्यथा आणि प्रश्नांकडे लक्ष वेधून घेतले. या नंतर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय कुमारी अदिती ताई तटकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, आजचा दिवस आपल्या साठी अभिमानाचा आहे. कारण आज माणगांव येथे दक्षिण रायगड च्या प्रशासकीय तथा जलसंपदा भवनाच्या भव्य वास्तूचे लोकार्पण होत असून या जलसंपदा भवनाच्या माध्यमातून लोकहिताचे प्रशासकीय कामकाज सुरू होणार आहे. या नंतर  लोकप्रिय खासदार माननीय सुनील तटकरे साो यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, या मध्यवर्ती प्रशासकीय जलसंपदा भवनाची ही सुंदर भव्य दिव्य वास्तू माणगांव च्या सौंदर्यात भर टाकणार आहे. या मध्यवर्ती प्रशासकीय जलसंपदा भवनाच्या माध्यमातून दक्षिण रायगड मधील पिण्याच्या पाण्या बरोबर भविष्यातील उद्योगांसाठी लागणार्या पाण्याची तरतूद करण्यात येईल. या नंतर त्यांनी माणगांव शहरातून जाणाऱ्या सुमारे एक किलोमीटर कालव्याच्या दुरुस्ती चे काम, माणगांव तालुक्यातील कुंभे काळ प्रकल्प, जिल्ह्यातील विविध तालुक्यातून बारमाही वाहणाऱ्या नद्या उदाहरणार्थ काळनदी, सावित्री नदी, कुंडलिका नदी, रायगड जिल्ह्यातील डोळवहाळ बंधारा, पन्हळघर धरण, दक्षिण काशी तिर्थक्षेत्र श्री हरिहरेश्वर, सांबर कुंड इत्यादी क्षेत्रांच्या विकासा संदर्भात धावता परामर्श घेऊन सह्याद्री पर्वतरांगेतील कडे कपारीतून नैसर्गिक रित्या रायगड जिल्ह्यात नद्यांच्या माध्यमातून वाहणारे आमच्या हक्काचे पाणी आम्हाला संवर्धन करून ठेवता येईल यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजे. या साठी माननीय जलसंपदा मंत्री जयंत पाटील साो यांच्या कडे अर्जव केली. 
      या नंतर माननीय जलसंपदा मंत्री जयंत पाटील साो आपल्या भाषणात उपस्थितांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही सगळे भाग्यवान आहात. कारण सुनील तटकरे यांच्या सारखे कार्यक्षम खासदार तुम्हाला लाभले आहेत. जर आम्हाला सुनील तटकरे यांच्या सारखे कार्यक्षम खासदार लाभले असते तर आम्ही अजून प्रगती केली असती.  नंतर त्यांनी माननीय लोकप्रिय खासदार सुनील तटकरे साो यांनी रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी उच्च स्तरावर वारंवार केलेले प्रयत्न, पाठपुरावा आणि माणगांव तालुक्यातील या भव्य दिव्य प्रशासकीय जलसंपदा भवन वास्तूचे सर्व श्रेय माननीय खासदार सुनील तटकरे यांना जाते. पुढे आपल्या भाषणात ते म्हणाले की, निसर्गाची सर्वात मोठी देण कोणाला मिळाली असेल तर म्हसळा, श्रीवर्धन आणि संपूर्ण रायगड जिल्ह्याला. रायगड जिल्ह्याच्या विकासा संदर्भात माननीय आमदार भरत शेठ गोगावले, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय अदिती ताई तटकरे आणि माननीय खासदार सुनील तटकरे यांनी सुचविले ल्या सर्व सूचनांची दखल घेऊन माझ्या माध्यमातून शासनस्तरावर सर्व प्रयत्न केले जातील अशी हमी देऊन त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. 
      माणगांव तालुक्यातील सदर प्रशासकीय जलसंपदा भवनाच्या अंतर्गत पाच उप विभागांचे प्रशासकीय कामकाज सुरू राहणार आहे. या वास्तूचे कामकाज सन २०१४ ते २०१८ या कालावधीत सुरु होते. हे भव्य दिव्य प्रशासकीय जलसंपदा भवन माणगांव तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी माणगांव तहसील कार्यालयाच्या आणि माणगांव पंचायत समितीच्या शेजारी असल्याने नागरिकांना खूप सोईस्कर होणार आहे.

नवीन पत्रीपुलाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण !

नवीन पत्रीपुलाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण !


कल्याण - येथील जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या व कल्याण पूर्व – पश्चिमेला जोडणाऱ्या नव्या पत्री पुलाचे लोकार्पण आज मा. मुख्यमंत्री ना.श्री. उद्धव ठाकरे यांच्या शुभ हस्ते ऑनलाईन पद्धतीने तसेच राज्याचे पर्यावरण, पर्यटन तथा राजशिष्टाचार मंत्री ना.श्री.आदित्य ठाकरे तसेच नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.


या लोकार्पण सोहळ्यासमयी नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री ना एकनाथ शिंदे यांच्या नेत्तृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली या पत्री पुलाचे बांधकाम पुर्णत्वास नेण्याकरिता अनेक समस्या आणि अडचणींवर मात करत अहोरात्र मेहनत करणारे एमएसआरडीसी विभाग तसेच रेल्वे प्रशासन अधिकारी व कर्मचारी, पोलीस दल, कंत्राटदार आणि कामगार यांचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी मन:पूर्वक आभार व्यक्त केले.

कल्याण व डोंबिवली शहरांतर्गत वाहतुकीच्या दृष्टिने अतिशय महत्वाचा असलेला हा पूल नागरिकांकरिता खुला झाल्याने आता पूल परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटणार असून नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

याप्रसंगी कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे, खासदार कपिल पाटील, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड, आमदार प्रमोद पाटील, आमदार डॉ. बालाजी किणीकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.राधेश्याम मोपलवार, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, रेल्वे प्रशासन तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे वरीष्ठ अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळास दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची दुर्गा फाउंडेशनची मागणी !

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळास दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची दुर्गा फाउंडेशनची मागणी !


प्रकाश संकपाळ, नवी मुंबई - कुळ कायद्याचे जनक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व नारायण नागु पाटील यांनी देशात पुकारलेल्या आंदोलनामुळे १९५७-६० या काळात कष्टकरी गरीब शेतकऱ्यांना 'कसेल त्याची जमीन' या कुळकायद्यानुसार जमिनीचा हक्क मिळवून दिला होता.
नवी मुंबईतीलआगरी, कोळी,कराडी,कुणबी व आदिवासी या समाजाचे शेती व मासेमारी हेच पारंपरिक व्यवसाय होते.कुळ कायद्यानुसार मिळालेल्या हक्काच्या जमिनी १९७० च्या दशकात शासनाने सिडकोमार्फत कवडीमोलाच्या बाजारभावाने संपादीत केल्या त्यामुळे नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त भूमिहीन झाले, पर्यायाने प्रकल्पग्रस्ताचे रोजगार, व्यवसाय, उत्पन्नाचे साधन नष्ट झाले.
शासनाने सिडकोमार्फत प्रकल्पग्रस्ताना देशोधडीला लावले असताना नवी मुंबईतून तत्कालीन खासदार दि.बा.पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाखाली  पुकारलेल्या आंदोलनाची व या आंदोलनात शेतकऱ्यांनी दिलेल्या बलिदानाची शासनाने गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्यात विकास योजना राबविण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला.
प्रकल्पग्रस्ताना न्याय मिळवून देण्यासाठी खासदार दि.बा. पाटील यांचे मोठे योगदान असल्यामुळे त्यांना प्रकल्पग्रस्ताचे कैवारी म्हणून संबोधले जाते.
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्ताच्या संपादित जमिनीवर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आलेल्या विमानतळास 'दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ' असे नाव देण्यात यावे अशी मागणी दुर्गा फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा शोभाताई भोईर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीतील राजकारण? पिण्याच्या पाण्यात टाकले औषध, मुरबाड तालुक्यातील घोरले गावातील प्रकार !!

ग्रामपंचायत निवडणुकीतील राजकारण? पिण्याच्या पाण्यात टाकले औषध, मुरबाड तालुक्यातील घोरले गावातील प्रकार !!


कल्याण (संजय कांबळे) : गाव तसं चांगलं पण वेशीला टांगल, या सत्तर ऐंशीच्या दशकातील मराठी सिनेमात राजकारणामुळे एका समृद्ध गावाची कशी वाट लागते हे अंत्यत मार्मिकपणे दाखवले आहे. नेमके असेच राजकारण मुरबाड तालुक्यातील घोरले गावात घडले आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांच्या भागात जाणाऱ्या पाईपलाईन मध्ये "कॅनाल" नावाचे औषध टाकल्याचा आरोप गावातील सामाजिक कार्यकर्ते अंनता भोईर, नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य संजय भोईर, अलका घायवट आणि कविता मुकणे यांनी केला असून याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी भोईर ग्रामस्थांनी केली आहे. तर घटनास्थळी, पोलिस, आरोग्य कर्मचारी, मुरबाड पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामसेवक पोहचले आहेत. पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.


मुरबाड तालुक्यातील घोरले हे गाव मुरबाडी नदीच्या काठावर वसलेले आहे. पोटगाव, बरडपाडा आणि घोरले अशी तीन गावांची मिळून ग्रुप ग्रामपंचायती तयार झाली असून या गावांची लोकसंख्या सुमारे २ ते ३ हजाराच्या आसपास आहे. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी बोअरचे पाणी १० हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या साठवण टाकीत जमाकरुन पाईपलाईन नळकनेक्शन द्वारे गावाला पुरवले जाते. घोरले गावात भोईर व चौधरी असे दोन मोठे गट आहेत.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भोईर गटाचे संजय दशरथ भोईर, श्रीमती अलका भगवान घायवट, आणि कविता ज्ञानेश्वर मुकणे असे तिन्ही उमेदवार निवडून आले तर तर चौधरी गटाचे उमेदवारांचा पराभव झाला. याहूनही महत्त्वाचे म्हणजे येथील एकमेव मागासवर्गीय उमेदवार श्रीमती अलका भगवान घायवट हे एकच घर असलेल्या सदस्याला उमेदवारी देऊ नये आपण निवडणूक बिनविरोध करू असेही या गटाचे म्हणणे होते. पण गेली ३०/४० वर्षे हे घर आमच्या खांद्याला खांदा लावून काम केले. आमच्याशी एकनिष्ठ राहिले त्यामुळे आम्ही त्यांना सोडू शकत नाही अशी रास्त भूमिका भोईर गटाने घेतली व येथेच वादाला सुरुवात झाली. अखेर निवडणूका झाल्या व भोईर गटाचे पुर्ण पॅनेल निवडून आले. त्यामुळे गावातील वातावरण गरम होते.
अशा वेळी भोईर व चौधरी या दोन्ही भागाला वेगवेगळा पाणीपुरवठा होत असताना केवळ भोईरांच्या लाईनीला येणाऱ्या पाण्याचा उग्र वास येवू लागल्याचे महिलांच्या लक्षात आले. त्यांनी ताबडतोब गावातील ग्रामस्थांना व ग्रामपंचायत सदस्य यांना ही बाब लक्षात आणून दिली. त्यांनी पाण्याची टाकी तपासली परतू त्या पाण्याला वास येत नव्हता. फक्त भोईरांच्या पाईपलाईन मध्ये कोणीतरी जाणूनबुजून औषध टाकल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना, मुरबाड पंचायत समितीच्या अधिकारी रमेश अवचार, यांना सांगितले. त्यानुसार गटविकास अधिकारी रमेश अवचार यांनी घोरले गावास भेट देऊन ग्रामसेवक केवणे, आरोग्य कर्मचारी यांना पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी यांनी पंचनामा करून पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. तर हा सर्व प्रकार  निवडणूकीच्या राजकारणातून कोणीतरी केल्याचा  गंभीर आरोप भोईर कंपनीने केला आहे. तर दोषींवर कडक कारवाई करुन त्अयांचेवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराडे यांच्या कडे केली आहे. तर याबाबत येत्या एक दोन दिवसात घोरले गावातील दोन्ही गटाला बोलावून ग्रामस्थांची बैठक बोलावण्यात येणार आहे असे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराडे यांनी सांगितले. .
दरम्यान भोईर कंपनीने जातीभेद नष्ट करण्याच्या दृष्टीने मागासवर्गीय एक घर असताना त्यांना बिनविरोध सदस्य म्हणून निवडून दिले. तसेच आदिवासी समाजाला देखील प्रतिनिधित्व दिल्याने भोईर कंपनीचे मुरबाड तालुक्यातून कौतुक केले जाते आहे. 

Sunday, 24 January 2021

अप्सरा आली फेम अभिनेत्री माधुरी पवार ने जिंकली कर्जतकरांची मने, पुन्हा येण्याचे दिले आश्वासन !

अप्सरा आली फेम अभिनेत्री माधुरी पवार ने जिंकली कर्जतकरांची मने, पुन्हा येण्याचे दिले आश्वासन !


कल्याण (संजय कांबळे) : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय शो अप्सरा आली ची विजेती आणि सध्या गाजत असलेल्या तूझ्यात जीव रंगला फेम मराठी गुणी अभिनेत्री माधुरी पवार हिने आपल्या अदाकारी ने समस्त कर्जतकरांची मने जिंकली. यावेळी चाहत्यांनी केलेल्या विनंती वरून आपण पुन्हा इकडे जरुर येवू असे आश्वासन पवार यांनी दिले.


मकरसंक्रांती निमित्त आयोजित हळदी कुंकू समारंभ व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे व खास आकर्षण म्हणून झी टिव्ही वाहिनीवरील अप्सरा आली या रिअ‍ॅलिटी शोच्या विजेती आणि तूझ्यात जीव रंगला फेम मराठी गुणी अभिनेत्री माधुरी पवार उपस्थित होत्या कर्जत जिल्हा अहमदनगर येथील श्रीमती हर्षदा अमृत काळदाते व काळदाते परिवारांने आयोजित केलेल्या हळदी कुंकू समारंभात अप्सरा आली या सुपरहिट गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स दिला. यावेळी उपस्थित हजारो महिला व युवतींना अभिनेत्री माधुरी पवार हिने थिरकायला लावले. त्यामुळे उपस्थित युवती कडून वारंवार वन्समोर ची मागणी होत होती. तेव्हा चाहत्यांचे प्रेम बघून माधुरी पवार यांनी आपल्या दमदार आवाजात समस्त कर्जतकरांचे आभार मानले व पुन्हा कर्जत ला यायचे असेल तर नक्की येईन असे आश्वासन दिले. त्यामुळे उपस्थित ही भारावून गेले. अशा अंत्यत सुंदर आणि देखण्या कार्यक्रमाला महिलांची व युवतीची संख्या मोठ्या प्रमाणात होती.

नांदेडमधील कामेश्र्वर वाघमारेला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर !

नांदेडमधील कामेश्र्वर वाघमारेला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर !


नांदेड : जिल्ह्यातील घोडजच्या कामेश्वर वाघमारे या शाळकरी मुलाला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. शासनाकडून दिला जाणारा हा पुरस्कार 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी ऑनलाइन कामेश्वरला देण्यात येणार आहे. कंधार तालुक्यातील घोडज गावालगत वाहणाऱ्या नदी पात्रात बुडणाऱ्या दोन बालकांचे प्राण कामेश्वर वाघमारे या आठवीत शिकणाऱ्या मुलाने वाचवले होते. त्याच्या याच शौर्यासाठी त्याला शासनाकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

आपल्या जीवाची पर्वा न करता कामेश्वरने नदीतच्या पाण्यात उडी घेऊन बुडणाऱ्या दोन बालकांचे प्राण वाचवले. गावालगत वाहणाऱ्या नदी पात्रात दुपारच्या वेळेत तीन बालक बुडत असतांना कामेश्वरने पाहिलं. पाहताच क्षणी पाण्यात उडी घेऊन त्याने जिवाच्या अकांताने दोघांना बाहेर काढले. परंतु एका मुलाला वाचवण्यात तो अयशस्वी राहिला, त्याला न वाचवू शकल्याची खंत मात्र कामेश्वरच्या मनात सदैव असल्याचं त्यानं सांगितलं. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांचे प्राण वाचविण्यासाठी महत्वपूर्ण कामगिरी केल्याबद्दल शासनाकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. कंधार तालुक्यातील घोडज येथे या वर्षीच्या पावसाळ्यात पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या दोन बालकांचे प्राण इयत्ता आठवीत शिकणाऱ्या कामेश्वर वाघमारे याने वाचविले आहेत.

जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेला शानदार सुरुवात !

जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेला शानदार सुरुवात !


कल्याण :- संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी व स्पोर्ट्स केयर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय खेळाडू संदीप ओंबासे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वर्गीय यशवंतराव ओंबासे यांच्या स्मरणार्थ ठाणे जिल्ह्यातील चौथी 10 वर्षाखालील खेळाडूंसाठी मास्टर ट्रॉफी T-20 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून आज या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र युथ कांग्रेस चे उपाध्यक्ष ब्रिजकिशोर दत्त, आंतरराष्ट्रीय खेळाडू व ताइक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव संदीप ओंबासे, कल्याण जेल सुप्रिडेंट श्री दिलीपसिंग गिरासे, नगरसेवक श्री सुरेंद्र आढाव, दिव दमन कोर्ट चे न्यायाधीश श्री अमित कोकाटे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले  या प्रसंगी संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमीचे संचालक संतोष पाठक व प्रशिक्षक महेंद्र देशमुख, परेश हिंदुराव, मंगेश ब्रिड व आदी मान्यवर उपस्थित होते.


ही स्पर्धा 24 जानेवारी ते मार्च 15  पर्यंत संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमीचे क्रीडांगण, डॉन बॉस्को शाळे जवळ आधारवाडी कल्याण  येथे चालणार असून या स्पर्धेमध्ये ठाणे जिल्ह्यातील टॉप 16 संघांना प्रवेश देण्यात आलेला आहे.
गेल्या चार वर्षापासून ठाणे जिल्ह्यामध्ये 10 वर्षाखालील क्रिकेट खेळाडूंसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून या स्पर्धेमधून छोट्या मुलांना क्रिकेटमध्ये वाव मिळावा तसेच छोट्या खेळाडूंनी क्रिकेटमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले..असे स्पोर्ट्स केअर फाउंडेशन चे सचिव अविनाश सर यांनी सागितले..

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर ....

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर .... *चाळीसगाव, दि. ११ सप्टेंबर २०२६ :* ...