Wednesday, 2 June 2021

उद्धव -राज एकत्र येणार का ? राज ठाकरे म्हणतात, “परमेश्वरालाच ठाऊक” !

उद्धव -राज एकत्र येणार का ? राज ठाकरे म्हणतात, “परमेश्वरालाच ठाऊक” !


अरुण पाटील, भिवंडी :
        मराठी माणसाच्या मुद्द्यांवरून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही नेते एकत्र येतील अशी चर्चा नेहमीच राज्यात रंगत असते. दोन्ही नेत्यांना हा प्रश्न वारंवार विचारला जातो आणि ह्या दोन्ही नेत्यांकडून उत्तरेही तितकीच गंमतीदार मिळतात. याच पार्श्वभूमीवर, एका दिलेल्या मुलाखतीत ‘राज आणि उद्धव एकत्र येणार का?’ या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे यांनी मिश्किल उत्तर दिले आहे.
            राज-उद्धव दोन्ही भाऊ एकत्र येणार का?, असा प्रश्न विचारला असता राज ठाकरे यांनी आपले दोन्ही हात आकाशाकडे दाखवत “परमेश्वरालाच ठाऊक” असे उत्तर दिले आहे. त्यावर तुम्ही परमेश्वराला मानता का? असा प्रश्न विचारल्यावर राज ठाकरे म्हणाले की, “हो म्हणजे काय? परमेश्वराला मानतो म्हणूनच परमेश्वरालाच ठाऊक असे म्हणालो”, असे उत्तरही राज ठाकरे यांनी झटकन दिले.
         येणाऱ्या महापालिका निवडणुकीत कुणाशी युती करणार का ? या प्रश्नला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, निवडणुकीपर्यंत वाटचाल करताना पक्षाची स्वत:ची भूमिका असेल. बाकी पुढचे प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी पाहू. सर्व महापालिका निवडणुकीसाठी पक्षाची स्वत:ची भूमिका असेल असेही राज.

Tuesday, 1 June 2021

विरार येथील विष्णू पाटील यांनी वाढदिवस थाटात साजरा न करता केले अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना अन्नाचे वाटप.!

विरार येथील विष्णू पाटील यांनी वाढदिवस थाटात साजरा न करता केले अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना अन्नाचे वाटप.!


विरार प्रतिनिधी :- विष्णू पाटील हे विरार चे राहणारे असून प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहेत, नवदुर्गा मित्रमंडळ विरार येथील उपाध्यक्ष असून ते नेहमी गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी पुढाकार घेतात. लॉक डाऊन मध्ये त्यांनी लोकांना सेवाभावी पध्दतीने मदत केली आहे.


१ जून रोजी त्यांचा वाढदिवस असून त्यांनी आपला वाढदिवस थाटात न साजरा करता अत्यावश्यक सेवेतील पोलीस, महावितरण, महापालिका सफाई कर्मचाऱ्यांना अन्नाचे वाटप केले. वाढदिवस थाटात साजरा करणार्‍यांनी विष्णू पाटील यांकडून धडा घेतला पाहिजे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना विष्णू पाटील असे म्हणाले की त्यांना ही प्रेरणा आपल्या आई वडिलांकडून मिळाली आहे, सोबत काका गजानन पाटील व भाऊ सदानंद पाटील हे सुध्दा उपस्थित होते आमचा संपूर्ण परिवार लोकांच्या अडीअडचणीत नेहमीच मदतीला पुढे असतो म्हणून अन्नदान आणि लोकांच्या सेवेसाठी नेहमी पुढाकार घेतो असे ते म्हणाले.

मृतांच्या संख्येत पुन्हा वाढ ! रुग्णसंख्येत घट; रिकव्हरी रेट ९४.२८ !! तरी मृत्यूदर चिंताजनक !!!

मृतांच्या संख्येत पुन्हा वाढ ! रुग्णसंख्येत घट; रिकव्हरी रेट ९४.२८ !! तरी मृत्यूदर चिंताजनक !!!


मुंबई : महाराष्ट्रात काही भागांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आल्याने लोकांची आणि वाहनांची मोठी गर्दी यला मिळत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यातच कोरोनाबाधित मृतांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मंगळवारी ४७७ जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला. सोमवारी हा आकडा १८४ पर्यंत घसरला होता. परंतु, मंगळवारी हा आकडा पुन्हा वाढलेला दिसला. त्यामुळे सध्या राज्यातील मृत्यूदर १.६७ टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत ९६ हजार १९७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच राज्यात गेल्या २४ तासांत १४ हजार १२३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले.

राज्यात रुग्ण मोठ्या प्रमाणात बरे होताना यला मिळत आहे. मंगळवारी राज्यात ३५ हजार ९४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ५४,३१,३१९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९४.२८ टक्के एवढे झाले आहे. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ लाख ३० हजार ६८१ झाली आहे.

लोकलमध्ये मोबाईल चोराच्या झटापटीत 3 महिन्याच्या बाळंतनीचा मृत्यू, बाळ झाले पोरके मन हेलावून टाकणारी घटना !

लोकलमध्ये मोबाईल चोराच्या झटापटीत 3 महिन्याच्या बाळंतनीचा मृत्यू, बाळ झाले पोरके मन हेलावून टाकणारी घटना !


अरुण पाटील, भिवंडी :
            लोकलमध्ये चोरांसोबत झटापटीदरम्यान लोकलमधून पडून डोंबिवलीत राहणाऱ्या एका 35 वर्षीय महिलेचा धक्कादायक मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, बाळाला जन्म दिल्यानंतर नोकरीवर रूजू होण्याचा पहिलाच दिवशी त्यांच्यासोबत ही घटना घडली.
           पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्या पाटील असं या महिलेचं नाव आहे. त्या डोंबिवलीतील राहत होत्या. अंधेरी येथे खाजगी कंपनीत कामाला असलेल्या विद्या पाटील या नुकत्याच बाळांतीन झाल्या होत्या. बाळंतपणानंतर आपल्या तीन महिन्याच्या मुलीला घरी वडिलांकडे सोडून विद्या पाटील या कामाला जात होत्या. चार दिवसांपूर्वी त्या कामावरून घरी परत येत असताना कुर्ला रेल्वे स्थानकावरून त्यांनी डोंबिवली च्या दिशेने जाणारी रेल्वे गाडी पकडली. त्यावेळेस महिला डब्यात चार ते पाच महिला प्रवासी होत्या.
         रेल्वे गाडी कळवा रेल्वे स्थानकावर पोहोचताच एका तरुणाने महिला प्रवाशांच्या डब्यात प्रवेश केला. त्याने विद्या पाटील यांचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस विद्या पाटील यांनी प्रतिकार केला. अगदी 15 ते 30 सेकंदाच्या दरम्यान ही झटापट दोघांमध्ये सुरू असताना मोबाईल खेचून चोर गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करत असताना विद्या पाटील यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळेस त्याने जोराने विद्या पाटील यांना धक्का दिला आणि धावत्या रेल्वेगाडीतून विद्या पाटील खाली पडल्या रेल्वे ट्रॅकवर पडल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
           ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात दिसणारा चोर हा सराईत गुन्हेगार असून याआधी देखील त्याने अशा प्रकारे रेल्वेत चोरी केलेले आहेत. हे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी फैजल शेख नावाच्या 31 वर्षे तरुणाला मुंबईतून अटक केली. धक्कादायक म्हणजे, फैजल शेखवर अशाच प्रकारचे अनेक गुन्हे असून देखील फैजलची पुन्हा रेल्वेत येऊन चोरी करण्याची हिंमत करतो कशी, असा सवाल निर्माण झाला.
        खरंतर रेल्वे प्रवास करताना महिला डब्यात सदैव विशेष करून संध्याकाळी सहानंतर जीआरपी किंवा आरपीएफ दलाचे महिला किंवा पुरुष जवान असणे हे बंधनकारक असते. असं असतानाही विद्या पाटील ज्या महिला प्रवासी डब्यातून प्रवास करत होत्या. त्या महिला प्रवासी डब्यात जीआरपी किंवा आरपीएफचा जवान का नव्हता, असा सवाल उपस्थितीत झाला आहे.

ज्येष्ठ पत्रकार " राधाकृष्ण नार्वेकर "यांचे पत्नी पाठोपाठ निधन.!

ज्येष्ठ पत्रकार " राधाकृष्ण नार्वेकर "यांचे पत्नी पाठोपाठ  निधन.!


अरुण पाटील, भिवंडी :
              ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांचं   दुःखद निधन झाले आहे, ते 82 वर्षाचे होते. कोरोनावर मात करून गेल्याच आठवड्यात ते घरी परतले होते. सोमवारी रात्री अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना रूग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तीन आठवड्यांपूर्वी त्यांच्या पत्नी क्षमा नार्वेकर यांचंही कोरोनानं निधन झालं होतं.
            नार्वेकर यांनी मराठी पत्रकारितेत सुमारे पाच तप कार्य केले. त्यांनी बातमीदारपासून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर संपादक म्हणून त्यांनी अनेक दैनिकांचे काम पाहिले. निवृत्त झाल्यावर नार्वेकर यांनी लिहिलेले `सेवानिवृत्त झालात, आता पुढे काय?’ हे पुस्तक लोकप्रिय ठरले. उर्दू भाषेत त्याचे भाषांतर झाले तसेच साहित्य अकादमीचा पुरस्कारही लाभला होता. हिंदी व इंग्रजी भाषेतही त्याचे भाषांतर झाले आहे.
         त्यांनी लिहिलेले ‘मनातली माणसं’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. मुंबईतील अनेक नामवंत  पत्रकार आणि संपादक घडविण्यासाठी नार्वेकर यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. कोकणातील आरोंदा या गावातून मुंबईत आलेल्या नार्वेकर यांनी आपली कोकणची बांधिलकी अखेरपर्यंत जपली.  माथाडी कामगारांना त्यांचे हक्क मिळावे, गिरणी कामगारांना न्याय मिळावा, नवी मुंबई मधील प्रकल्पग्रस्तांच्या हक्काचे रक्षण व्हावे यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.
      वसई–विरार, मुरबाड, उल्हासनगर, ठाणे, नवी मुंबई, पालघर, शहापूर या शहरांच्या विकासाकरिता मुंबई सकाळच्या माध्यमातून विशेष पुरवण्या प्रकाशित करून या शहरांच्या विकासातील आपली जबाबदारी त्यांनी पार पाडली होती. त्यांच्या  या उपक्रमांची शासनाने देखील दखल घेतली आहे. या पुरवण्या निश्चितच मार्गदर्शक व संग्राह्य ठरल्या आहेत.
       दूरदर्शनचा सह्याद्री वाहिनीचा नवरत्न पुरस्कारासह अनेक महत्वाचे पुरस्कार प्राप्त झालेले नार्वेकर संपादक या नात्याने अमेरिका, जपान, रशिया, इस्राएल, बांगलादेश, सिंगापूर, मलेशिया, थायलंड अशा  विविध देशात महत्वाच्या घटनांचे साक्षीदार राहिले आहेत.लोणावळा येथील दि. गो. तेंडुलकर स्मृती मंदिर उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. किंबहुना, त्यांच्याच पुढाकाराने निसर्गरम्य परिसरातील पत्रकार संघाची ही वास्तू उभी राहिली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष आणि विश्वस्त म्हणून काम केलेल्या राधाकृष्ण नार्वेकर यांनी पत्रकार हिताच्या अनेक योजना राबवल्या होत्या.
        मुंबईतील मराठा हायस्कूलमध्ये  शिक्षक म्हणून काम केल्यानंतर पत्रकारितेचा मार्ग स्वीकारून समाज हितासाठी झटणारे आणि अनेकांना तसं झटण्याची, लोकाभिमुख पत्रकारितेची प्रेरणा देणारे नार्वेकर म्हणजे पत्रकारितेचे विद्यापीठ होते, त्यांच्या जाण्याने मराठी पत्रकारितेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कोविड नियमानुसार नार्वेकर यांच्यावर मुलगी जयश्री, शिल्पा आणि जावई बिमल पारिख या निकटवर्तीयांच्या उपस्थितीत आज अंत्यसंस्कार झाले, असे नार्वेकर यांचे कौटुंबिक स्नेही शिवाजी धुरी यांनी कळवले आहे.

अदाणी इलेक्ट्रिसिटी दक्षिण विभाग मुख्य कार्यालय येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना !

अदाणी इलेक्ट्रिसिटी दक्षिण विभाग मुख्य कार्यालय येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना !


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
 महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुनर्स्थापना  सोहळा ४ था मजला, एल एँन्ड टी, सिटी -२, कुर्ला कलिना रोड, सांताक्रूझ (पूर्व) येथील अदाणी इलेक्ट्रिसिटी दक्षिण विभाग मुख्य कार्यालय येथे करण्यात आली. यासमयी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना खासदार श्री.गजानन कीर्तिकर तसेच  मानव संसाधन विभागप्रमुख श्री. मनोज शर्मा तसेच आमदार श्री. विलास पोतनीस व अदानी एच.आर प्रमुख श्रीमती चंदा वनमाळी, शिवसेना प्रणित महाराष्ट्र विद्युत जनरल कामगार सेना अध्यक्ष मान. श्री. कुणाल सरमळकर यांची उपस्थिती होती.

निशा परूळेकर (उपाध्यक्षा- चित्रपट कामगार आघाडी महाराष्ट्र) तर्फे मदतीचा हात !

निशा परूळेकर (उपाध्यक्षा- चित्रपट कामगार आघाडी महाराष्ट्र) तर्फे मदतीचा हात !


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
         भारतीय जनता पार्टी (मागाठाणे विधानसभा) प्रभाग क्र.२५ तर्फे निशा परूळेकर (उपाध्यक्षा-महाराष्ट्र) भाजपा चित्रपट कामगार आघाडी यांना जानूपाडा येथील काही रहिवाशांनी संपर्क करून नुकत्याच झालेल्या वादळी पावसाने घराचे पत्रे उडून गेल्याचे सांगितले. झालेले नुकसान लक्षात घेऊन परुळेकर यांनी त्यांना या बिकट परिस्थितीत हातभार म्हणून स्वखर्चाने पत्र्यांसाठी आर्थिक मदत केली. त्यांनी केलेल्या या मदतीबद्दल लाभार्थीने निशा परुळेकर यांचे आभार व्यक्त केले. तर लक्ष्मण  यादव (वाॅर्ड अध्यक्ष) यांच्यासह स्थानिकांनी परळेकर यांना धन्यवाद देत पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...