Saturday, 3 July 2021

राज्यात आज परत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ ! मृत्यूदर २ टक्क्यांवर कायम !

राज्यात आज परत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ ! मृत्यूदर २ टक्क्यांवर कायम !


मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असून या कोरोना बाधित रूग्णांचा आलेख वर-खाली होताना दिसत आहे. राज्यात महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी ९,४८९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६० लाख ८८ हजार ८४१ झाली असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख १७ हजार ५७५ वर पोहोचली आहे.

आज राज्यात १५३ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे. यासह आज ८,३९५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर राज्यात आजपर्यंत एकूण ५८,४५,३१५ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६% एवढे झाले आहे.

बल्याणीत जमिनीच्या वादातून महिलेला मारहाण.. विनयभंग प्रकरणी बांधकाम व्यवसायिक अजय सावंत यांच्यावर गुन्हा दाखल...

बल्याणीत जमिनीच्या वादातून महिलेला मारहाण..
विनयभंग प्रकरणी बांधकाम व्यवसायिक अजय सावंत यांच्यावर गुन्हा दाखल...


टिटवाळा, उमेश जाधव -: बल्याणी येथील खराडे कुटूंबियांना बांधकाम व्यवसायिक अजय सावंत यांनी धक्काबुक्की करून ज्योती खराडे यांचा विनयभंग केल्याची घटना गुरुवारी घडली आहे. महिलेचा विनयभंग करून खराडे कुटुंबियांना मारहाण केल्याची तक्रार टिटवळा पोलिसात दाखल करण्यात आली आहे.


सुभाराव खराडे व ज्योती खराडे हे बल्याणी येथे कायमस्वरूपी वास्तव्यास असून या दाम्पत्यांनी २०१४ रोजी अजय सावंत यांना दोन गुंठे जमीन विकली होती. परंतु या जागेवर अजय सावंत यांनी अधिक खोल्यांचे बांधकाम करून खराडे यांच्या जागेवर अतिक्रण केले असल्याने खराडे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाकडे चाळींच्या खोल्या हटविण्याबाबत तक्रार केली होती. पालिकेने चाळींचे अनधिकृत बांधकाम हटवून जागा मोकळी करून दिली या कारणावरून अजय सावंत यांनी संतप्त होऊन खराडे कुटुंबियांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. ज्योती खराडे यांनी अनधिकृत बांधकाम विभागाकडे तक्रार केल्यामुळे माझ्या जागेतील बांधकामावर कारवाई झाली आहे याचा राग येऊन बांधकाम व्यवसायिक अजय सावंत यांनी ज्योती खराडे व सुबराव खराडे या दांपत्यास धक्काबुक्की करून मारहाण केली. तसेच ज्योती खराडे यांचा विनयभंग केला या प्रकरणी अजय सावंत यांच्या विरोधात टिटवाळा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३२४, ५५४, ५०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक काजोल यादव करत आहेत.

भुषण अनंता जाधव यांची फळेगांव सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड !

भुषण अनंता जाधव यांची फळेगांव सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड !


टिटवाळा, उमेश जाधव -: फळेगांव सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी भुषण अनंता जाधव यांची शुक्रवारी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी आजी- माजी चेअरमन, उपचेअरमन, सदस्य व शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. 


कोरोना काळात  सेवा सोसायटीच्या निवडणूक लांबणीवर गेल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर कल्याण तालुक्यातील फळेगांव सेवा सोसायटीच्या चेअरमन व उप चेअरमन पदाची निवडणुक देखील लांबणीवर गेली होती.‌ शुक्रवारी माजी चेअरमन राजाराम चौधरी व उपचेअरमन आनंता जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यावेळी भुषण जाधव यांची चेअरमन व आत्माराम तारमळे यांची उप चेअरमन बिनविरोध निवड करण्यात आली. 


या निवडीचे काम निवडणूक अधिकारी म्हणून सस्मिशी भांगे यांनी पाहिले. ११ गाव मिळून ही सेवा सोसायटी बनविण्यात आली आहे. या ३ महीला व १० पुरूष असे मिळून १३ सदस्य मिळून या सोसायटीचा कारभार सांभाळलत आहेत. सध्या ४ पदे रिक्त असून ९ सदस्यांच्या खांद्यावर या सोसायटीचा भार आहे.. या सेवा सोसायटीत ७७१  शेतकरी सभासद असून पैकी ३५७ शेतकरी सभासदांनी यंदाच्या हंगामा करीता कर्जाचा लाभ घेतला आहे. या निवडणुकीच्या वेळी माजी चेअरमन राजाराम चौधरी, सदस्य सुदाम धर्मा पाटील,  दिनेश जाधव, दर्शना जाधव, सुनंदा देशेकर, सुनील जाधव, आत्माराम तारमळे, गोपाळ जाधव, सरपंच शारदा भास्कर जाधव, सेक्रेटरी भानुदास कोंडे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सेवा सोसायटीच्या सदस्य व शेतकरी सभासदांनी माझ्यावर जो विश्वास ठेवून माझ्यावर सोसायटीच्या चेअरमन पदाची धुरा सोपवली आहे. ती पूर्णपणे पार पाडण्यासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल : "भुषण जाधव, नवनिर्वाचित चेअरमन".

सामाजिक कार्यकर्ते महेश ऐगडे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर आयोजन ! "२६४ आदिवासी व आश्रमातील २५ बालकांनी घेतला शिबीरचा लाभ" "आदिवासी बहिणीला वाढदिवसानिमित्त मंगळसूत्र भेट"

सामाजिक कार्यकर्ते महेश ऐगडे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर आयोजन !

"२६४ आदिवासी व आश्रमातील २५ बालकांनी घेतला शिबीरचा लाभ" "आदिवासी बहिणीला वाढदिवसानिमित्त मंगळसूत्र भेट"


टिटवाळा, उमेश जाधव-: टिटवाळा येथील रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते महेश ऐगडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी कल्याण तालुक्यातील म्हस्कल येथे आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते. याचा लाभ येथील २६४ आदिवासीं व पारस बाल आश्रमातील २५ बालकांनी घेतला. यावेळी ऐगडे यांनी एका आदिवासी महिलेला मंगळसूत्र देखील भेट दिले.


सतत काही ना काही समाज कार्य करणे, गोरं गरीबांना मदतीचा हात देणे, सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक कार्याला नेहमी सहकार्य करणे, विविध समाजोपयोगी कार्यक्रम, शिबीरांचे आयोजन करणे ही महेश ऐगडे यांची खुबी बनली आहे. कोरोना काळात अनेकांना मदतीचा हात दिला. 


या पार्श्वभूमीवर कल्याण तालुक्यातील म्हस्कल गावातील आदिवासी वाडीतील लोकांसाठी शनिवार आपल्या वाढदिवशी ऐगडे यांनी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते. या शिबिराचा लाभ येथील २६४ आदिवासींनी व पारस आश्रमातील २५ बालकांनी घेतला. यावेळी महिला, पुरूष व लहान बालके यांच्या विविध तपासण्या केल्या व त्यांना गोळ्या, औषधे देखील देण्यात आली. डाॅ. अनुदुर्ग ढोणी (एम बीबीएस डीजीओ, एमडी), स्त्री रोग तज्ञ डाॅ. उज्वला ढोणी (एमएएमएस) गोल्ड मेडल प्राप्त, बाळरोगतज्ञ डॉ. राज जाधव व त्यांची टिम यांनी शिबिरासाठी काम पाहिले. तसेच या प्रसंगी महेश ऐगडे यांनी आपला वाढदिवस जल्लोषात साजरा न करता आदिवासी गरीब गरजू आदिवासी लोकांच्या करीता आरोग्य शिबीराचे आयोजन करून केले. तर एका आदिवासी बहिणीला ४ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र भेट दिले. तसेच लहान मुलांना खाऊचे वाटप देखील केले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी अमोल आरू, अमोल पाटील, आकाश गुंजाळ, सुरंज सिंग, अशोक चौरे व वासुदेव वाघे यांनी विशेष परिश्रम घेतले.

भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते कोपर -केवणी दिवे गावाच्या रस्त्याचे भूमी पूजन सोहळा संपन्न.!

भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते कोपर -केवणी दिवे गावाच्या रस्त्याचे भूमी पूजन सोहळा संपन्न.!


 अरुण पाटील, भिवंडी दि. ०३ :
               महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्याने मुंबई महानागर विकास प्राधिकरण (MMRDA) माध्यमातून मंजुर झालेल्या कोपर -केवणी दिवे रस्त्याचे भूमी पूजन सोहळा भिवंडीचे लोक प्रीय खासदार श्री. कपिल पाटील यांच्या हस्ते शनिवार दिं.०३/७/२०२१ रोजी सकाळी ११ वाजता संपन्न झाला.
              तसेच सौ. सपना राजेंद्र भोईर, माजी सभापती -महिला व बालकल्याण समिती जिल्हा परिषद -ठाणे यांच्या प्रयत्नातून ग्रामपंचायत कोपर येथील मराठी शाळे समोर लावलेल्या पेव्हर ब्लॉकचे देखील उदघाटन खासदार कपिल पाटील व सौ.सपना भोईर यांच्या हस्ते करण्यात आले.
           या उदघाटन प्रसंगी कोपर गावचे सरपंच श्री. रमेश पाटील, ग्रामसेवक श्री. काशिनाथ माळी, ग्रामपंचायत कमिटी, ग्रामपंचायतिचे वरिष्ठ लिपिक श्री. विनेश डी. पाटील, व कर्मचारी वृंद तसेच श्री. जयवंत पाटील (जिल्हा परिषद सदस्य -ठाणे), सौ. ललिता प्रताप पाटील (माजी सभापती पंचायत समिती -भिवंडी), सौ. उज्वला राम भोईर (सदस्या पंचायत समिती -भिवंडी) हे उपस्थित होते.

मुरबाड तहसिलदारांच्या अहवालानंतर जिल्हा पुरवठा अधिकां-यांची कारवाई, शिरवली येथील रेशनदुकानदाराचा परवाना रद्द !

मुरबाड तहसिलदारांच्या अहवालानंतर जिल्हा पुरवठा अधिकां-यांची कारवाई, शिरवली येथील रेशनदुकानदाराचा परवाना रद्द !


कल्याण, (संजय कांबळे) : मुरबाड तालुक्यातील शिरवली गावातील विधवेच्या नावावर असलेल्या रेशन दुकानात येणा-या धान्यांचा मोठ्या प्रमाणात अपहर होत असल्याच्या तक्रारी तहसिलदांराकडे झाल्यानंतर याची चौकशी करुन हा अहवाल जिल्हा पुरवठा अधिका-यांना प्राप्त होताच अचानक दुकानाला भेट दिली असता दुकानदार मारुती दळवी दोषी आढळून आल्याने त्याचा दुकान परवाना रद् करण्यात आला,या धडक कारवाईमुळे इतर दुकानदारामध्ये खळबळ उडाली आहे,                 

मुरबाड तालुक्यात १९६ रेशनिंग दुकाने आहेत, यापैकी १९ दुकाने ही खरेदी विक्री संघाकडे, ५५ दुकाने महिला बचत गटाकडे उर्वरित दुकाने ही आपल्याला उदरनिर्वाहाचे साधन मळावे म्हणून ३५/४० दुकानदारांनी लिलाव करुन तसे हमीपत्र तहसिलदारांना देऊन सुरु केली आहेत.                                       
असेच मुरबाड म्हसा रोडवरील शिरवली येथील विमल पांडुरंग घागस या विधवेच्या नावावर असलेले रास्त भाव दुकान मारुती दळवी हा चालवत होता. विशेष म्हणजे हा इतर चार दुकाने चालवत असून याच्याकडे सरकारचे कोणतेही अधिकारपत्र नसताना अधिका-यांच्या संगणमताने रास्त भाव दुकान आँनलाईन असताना हा आँफलाईन चालवत होता, त्यामुळे या दुकानाविरोधात तक्रारी झाल्या होत्या,या अनुषंगाने पुरवठा निरिक्षक स्मिता फडाळे यांनी या दुकानाला भेट दिली, सरकारकडून मोफत येणारे धान्य जाते कुठे? असा जाब विचारताच, दुकानात आजपर्यत किती धान्य आले,किती कार्डधारकांना वाटप केले, याचे नोंद रजिस्टर उपलब्ध नव्हते, तसेच साठा रजिस्टर, शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणा-या पावत्यांचे रजिस्टर, सरकारची नियमावली, स्थानिक दक्षता कमिटी पथक, मालाचे नमुने दर्शविणारी भांडी, अशा कोणत्याही गोष्टी दुकानात आढळल्या नाहित, तसेच ३१ शिधापत्रिका तपासून त्या कार्डधारकांचे जबाब नोंदवले. त्यापैकी १८ जणांना अल्प प्रमाणात धान्य दिले तर १३ जणांना धान्यच मिळाले नाही, साखर तर येथे येतच नाही,या सर्व मुद्यांची चौकशी करत असताना दुकान सांभाळणारे मारुती याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे धक्कादायक प्रकरण उजेडात आले.                                          
या बाबतचा अहवाल मुरबाड तहसिलदार अमोल कदम यांनी पुढील कारवाई साठी जिल्हा पुरवठा अधिकारी राजू थोटे यांच्याकडे पाठवला, त्यामुळे गोरगरिबांच्या धान्यांचा अपहार होत असल्याचे सिध्द झाल्याने त्याला एक हजार रुपयांचा दंड ठोठावला व दुकानाचा परवाना रद् केला, तर या अगोदरही त्याचेवर निंलबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.                        
*प्रतिक्रीया-या रास्त भाव दुकानाविरोधात अनेक तक्रारी आल्या होत्या त्या अनुशंगाने तपासणी केली असता त्यामध्ये तथ्थ आढळून आले तसा अहवाल तहसिलदांराकडून प्राप्त होताच कारवाई करण्यात आली,- राजू थोटे (जिल्हा पुरवठा अधिकारी)

डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दिवेटप्पा आयोजित केशव लक्ष्मण जाधव प्रथम स्मृती दिनी स्मरणिका प्रकाशनाचे आयोजन !!

डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दिवेटप्पा आयोजित केशव लक्ष्मण जाधव प्रथम स्मृती दिनी स्मरणिका प्रकाशनाचे आयोजन !! 


       बोरघर / माणगांव, (विश्वास गायकवाड) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दिवेटप्पा (रजि.) सदर समितीच्या माध्यमातून आयोजित कालकथित केशव लक्ष्मण जाधव तथा के. एल. जाधव यांच्या प्रथम स्मृतीदिन वर्षा निमित्त अभिवादन सभा आणि स्मरणिका प्रकाशन सोहळ्याचे आयोजन शनिवार दिनांक ११.०७.२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, मुक्काम - बोर्ली पंचतंन, तालुका - श्रीवर्धन, जिल्हा- रायगड या ठिकाणी करण्यात आले आहे. 
      सदर कार्यक्रम कोविड १९ पार्श्वभूमीवर शासनाने निर्देशित केलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून मा. श्रीकांत तळवटकर अध्यक्ष- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. 
       सदर कार्यक्रमात स्मरणिकेचे प्रकाशन मा. किशोर मोरे कार्याध्यक्ष- बौद्धजन पंचायत समिती,) यांचे हस्ते होणार असून सदर कार्यक्रमाला पुढील प्रमुख मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. मा.सुरेश जाधव उपाध्यक्ष - डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती. मा.मोहन चिरणकर जेष्ठ समाज सेवक, श्रीवर्धन. मा.रंजना तळवटकर ट्रस्टी - घन:श्याम तळवटकर एज्युकेशन सोसायटी मा.रवींद्र मोरे  माजी करनिर्धारन अधिकारी म.न.पा. मा.महम्मद भाई मेमन रायगड जि. नियोजन समिती वि.नि. सदस्य मा. डॉ.संजय खैरे लेक्चरर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, वडाळा. मा. विश्वास भावेकर उपाध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती. मा. नथुराम चोगले उद्योजक मा. श्रीनिवास नागावकर अध्यक्ष बौद्धजन पंचायत समिती, शाखा दिवेटप्पा.

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर ....

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर .... *चाळीसगाव, दि. ११ सप्टेंबर २०२६ :* ...