Friday, 3 December 2021

कल्याण तालुक्यातील शाळेचे बेकायदेशीर शुल्कवाढ व शैक्षणिक साहित्यांची बंधनकारक खरेदी विरोधात प्रहार चा जनता दरबार* - *डॉ. आदर्श भालेराव*

कल्याण तालुक्यातील शाळेचे बेकायदेशीर शुल्कवाढ व शैक्षणिक साहित्यांची बंधनकारक खरेदी विरोधात प्रहार चा जनता दरबार* - *डॉ. आदर्श भालेराव*


कल्याण, बातमीदार : लॉकडाऊन संकटात अनेक खासगी शाळांनी फीसमध्ये भरमसाठ वाढ केली होती तसेच फीस न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गात सामावून न घेणे, आरक्षित जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश न देणे अशा कृत्यांनी विध्यार्थी आणि पालकांचा मानसिक छळ केला होता. लॉकडाऊन Lockdown कालावधीत फी वाढ करणे, पालकांकडे फी भरण्यास तगादा लावणे फी न भरल्यामुळे निकालपत्र रोखून ठेवणे, विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात बढती न देणे, फी न भरल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून कमी करणे शाळेने शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित आणि दुर्बल घटकातील २५ विद्यार्थ्यांना खासगी शाळेत प्रवेश देणे बंधनकारक असतानाही हे प्रवेश नाकारल्याचे  समोर आले आहे. बेकायदेशीर शुल्कवाढ व शैक्षणिक साहित्यांची बंधनकारक खरेदी असा प्रकार कल्याण  शहरातील इंग्रजी, मराठी माध्यमाच्या शाळा चर्चेत असतानाच प्रहार जनशक्ती पक्षाच्या निदर्शनास आले आहे. काही परिसरातील ही इंग्रजी माध्यमाची शाळा मनमानी कारभार करीत असल्याची तक्रार पालकांनी केली आहे. या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्ष कल्याण तालुका कमिटी तर्फे *महाराष्ट्र राज्य मंत्री शिक्षण विभाग मंत्री महोदय मा. नामदार ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू* यांच्या निर्दशनास आणून देण्याकरिता सदर कल्याण तालुक्यात सुरू असलेल्या मनमानी कारभार व मनमानी कारभार दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी बेजबाबदारीपणा उघड करण्यासाठी *प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख हितेश जाधव ठाणे जिल्हा अध्यक्ष ऍड स्वप्नील पाटील त्यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण तालुका संघटक डॉ. आदर्श भालेराव याच्या प्रयत्नाने कल्याण तालुक्यात जनता दरबार घेण्याचे ठरवले जात आहे*    

त्याकरिता कल्याण तालुक्यातील सर्व पालकांनी शाळेतील पॅरेन्ट्स असोशिएशनच्या माध्यमाने प्रहार जनशक्ती पक्ष कल्याण तालुका कमिटीकडे  लेखी स्वरूपात तक्रात करावी आता पर्यत पालकानी प्रशासनास केलेल्या पत्रव्यवहार माहिती अर्जा सोबत द्यावी. 

मागील अनेक दिवसांपासून पालकांकडून होत असलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शिक्षण विभागाने 'महाराष्ट्र शैक्षणिक शुल्क विनयमन अधिनियम' समितीची स्थापना केली आहे. मागील वर्षभरापासून कोरोना महामारीत शाळा बंद असताना सुद्धा शाळांनी फी वाढवल्याचा तर काही शाळांनी फी वसुली करण्याबाबतच्या तक्रारी पालकांकडून शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या आहेत. मात्र, पालकांनी न्याय मिळावा यासाठी अशाप्रकारची कोणत्याही समितीचा गठन केलेले नसल्याने शासन निर्णय काढून सुद्धा काही शाळांनी फी वाढ केल्याचा आणि मनमानी कारभार सुरू ठेवल्याचा समोर येते होते.

फी वाढीबाबत न्याय मागण्याची तरतूद 'महाराष्ट्र शैक्षणिक शुल्क विनियमन अधिनियम,2011 (2014 चा महा.7) (1)' याद्वारे कायद्याने प्रदान करण्यात आली आहे

सदरच्या समितीमध्ये सेवानिवृत्त न्यायाधिश, शिक्षणक्षेत्रातील तज्ञ अधिकारी यांचा समावेश असून सनदी लेखापाल यांची नियुक्ती केली आहे. सनदी लेखापालाच्या नियुक्तीमुळे शैक्षणिक संस्थेचे आर्थिक व्यवहार तांत्रिकदृष्ट्या तपासण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे संस्थेच्या मनमानी कारभारावर सुद्धा लक्ष घालता येणार आहे. 

या समितीच्या स्थापनेने ज्या शाळा फी वाढ करतात त्यांच्या विरोधात तक्रार करून पालकांना सुद्धा न्याय मिळणार आहे. शाळांचा ऑडिट सुद्धा होईल जेणेकरून शाळांचा मनमानी कारभाराला चाप बसेल. महत्त्वाचे म्हणजे आता शुल्क नियंत्रण कायद्यामध्ये बदल करावा ही मागणी राहील. कारण शुल्क नियंत्रण कायद्यानुसार 25 टक्के पालक एकत्र येऊन या समितीकडे न्याय मागण्यासाठी जाऊ शकतात. त्यामुळे 25 टक्के पालकांनी एकत्र येणे महत्वाचे आहे. कोणीही वैयक्तिक पालक न्याय मागू शकत नाही.

सर्व पालकांनी व विद्यार्थ्याने पुढे येऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाकडे लेखी स्वरूपात तक्रार करावी जेणेकरून सदर तक्रार "महाराष्ट्र राज्य मंत्री शिक्षण विभाग नामदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू" यांच्या माध्यमाने मनमानी करणाऱ्या शाळेवर योग्यरीत्या कारवाईसाठी निर्णय घेण्यात यश येईल. कल्याण तालुक्‍यात शिक्षण क्षेत्रात मनमानी कारभार करून पालक व विद्यार्थ्यांची आर्थिक छळ करणाऱ्या शाळेवर आळा बसेल त्यामुळे सर्व पालकांनी व संघटनांनी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांचा जनता दरबार घेण्यास आपली तक्रार नोंदविण्यास पुढाकार घ्यावा.

तक्रार नोंदवण्याचे स्थळ :-
प्रहार जनशक्ती पक्ष कार्यालय : गाळा नंबर B4 फर्स्ट अवेन्यू बिझनेस पार्क दुर्गाडी चौक साई आरोग्यम हॉस्पिटल शेजारी सीएनजी पंप वाडेकर रोड कल्याण पश्चिम 421301 

तक्रार नोंदविण्याचा कालावधी :-
दिनांक : 7 डिसेंम्बर 2021 ते 10 डिसेंम्बर 2021
सकाळी 11 ते 2   सायंकाळी 4 ते 8 पर्यत 

अधिक माहिती साठी संपर्क साधावा :- 
डॉ. आदर्श भालेराव 8070705552 
प्रदीप सोनवणे  8652696744 
बशीर शेख  +91 98704 61983 
मोहम्मद शेख +91 91675 95140 
अस्लम सोयान +91 92214 39786 
मुस्ताक चौधरी +91 93265 01182 
आजीम साखरकर 9664980328 
सिद्धार्थ बोराडे, +91 89766 44819

ग्रामपंचायतीचा विकास आराखड्यात समाविष्ट करा .....

ग्रामपंचायतीचा विकास आराखड्यात समाविष्ट करा .....


कल्याण, ऋषिकेश चौधरी :- महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतीचा शासनाच्या विकास आराखड्यात समाविष्ट कारण्याची मागणी सहयोग सामाजिक संस्थेने राज्याचे ग्रामविकास मंत्री यांच्याकडे निवेदना द्वारे केली आहे 


महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख शहरांचा झपाट्याने विकास झाला असून मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. शहरालगत असलेल्या गावांतील ग्रामपंचायती मध्ये झपाट्याने नागरीकरण होत असून शासनाच्या विकास आराखडा म्हणजेच डीपी प्लॅन अभावी नियोजनाचा फज्जा उडाला असून गावातील मोकळ्या जमिनीवर भूमाफियाकडून अनधिकृतपणे चाळी व दाटीवाटीने बेकायदेशीर इमारती उभारल्या आहेत. कालांतराने या ग्रामपंचायती पालिकेत समाविष्ट केल्यावर या भागांना नागरी सुविधा पुरविताना पालिकेला अनेक समस्यांना अडथळे पार करावे लागत आहे. पालिका विकास आराखड्या नुसार विकास करताना नागरिकांना सुविधा पुरविताना रस्ता रुंदीकरण करताना तोडफोड करावी लागते त्या वेळी या अनधिकृत बांधकामाचा मोठा प्रश्न उपस्थित होते. उल्हासनगर, दिवा, कल्याण, डोंबिवली महानगरपालिकेतील २७ गावे या ठिकाणच्या विकसित भागात अश्या भेडसावत आहे. राज्याच्या नगर विकास विभागाने प्रत्येक ग्रामपंचायतींना विकास आराखडा  मंजूर करावा जेणेकरुन परवानगी शिवाय घरे किंवा इमारती जाणार नाही व अनाधिकृत बांधकामांना आळा बसेल व या ग्रामपंचायती मध्ये भवितव्यात पुढे रस्ते, पाणी, लाईट, उदयाने, मैदान इ. सुविधा निर्माण करण्यास कुठलीही अडचण निर्माण होणार नाही. 


'सहयोग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले' यांनी महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतीचा शासनाच्या विकास आराखड्यात समाविष्ट कारण्याची मागणी सहयोग सामाजिक संस्थेने राज्याचे ग्रामविकास मंत्री यांच्याकडे निवेदना द्वारे केली आहे.

अपंग विकास महासंघाकडून जागतिक अपंग दिन साजरा !!

अपंग विकास महासंघाकडून जागतिक अपंग दिन साजरा !!


कल्याण, ऋषिकेश चौधरी : 3 डिसेंबर हा जागतिक अपंग दिन शासनाने घोषित केला आहे, त्या निमित्ताने अपंग विकास महासंघ अध्यक्ष अशोक भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक अपंग दिन सोहळा कायैक्रमाचे आयोजन कल्याण येथील कायैलयात करण्यात आले होते.


दिव्यांग बंधू व भगिनींच्या उपस्थित मध्ये केक कापून व खाऊ वाटून अपंग दिन साजरा करण्यात आला, तसेच अपंग विकास महासंघाकडून दिव्यांगाना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.


तसेच जागतिक अपंग दिनानिमित्त जिल्हा निवडणूक अधिकारी, ठाणे व निवडणूक कार्यालय, कल्याण यांच्या सहकार्याने दिव्यांग बांधवांचे नवीन मतदार नोंदणी फॉर्म भरण्यात आले, निवडणूक विभागाच्या अधिकारी वषै टाळकर, रवि खटावकर यांनी सहकार्य केले.


जागतिक अपंग दिन कार्यक्रमाला अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष अशोक भोईर, माधुरी क्षीरसागर, रोहिणी घोलप, तेजक्षी बेहेरे, राजू दांडगे,समीर चौधरी, जिलाना शेख ,कैलास गायकवाड महेश पाटकर सागर चौधरी गोरख सफाळे,जगदीश चौधरी, सुरेंद्र वाघ,राजू मोमतकर आदि उपस्थित होते.


Thursday, 2 December 2021

सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांचा राष्ट्रवादीत प्रवेश !! "सर्व चर्चांना पुर्णविराम"

सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांचा राष्ट्रवादीत प्रवेश !! "सर्व चर्चांना पुर्णविराम"


मुंबई, बातमीदार : ठाणे जिल्ह्यातील दिग्गज नेते, ठाणे जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे, भिवंडी शिवसेना विभाग अध्यक्ष भालचंद्र भोईर, राहनाळ उपसरपंच किरण नाईक, गुंदवळी उपसरपंच विलास पाटील, यांनी 


अनेक समर्थकांसह राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव व ठाणे महानगरपालिकेचे गटनेते नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश प्रवेश केला.

सुरेश म्हात्रे यांनी गेल्या पाच ते सहा महिन्यांपूर्वी त्यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला नव्हता. तेंव्हापासून होत असलेल्या चर्चांना पुर्णविराम देत गुरुवारी ( आज ) त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी सुरेश म्हात्रे म्हणाले की , राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्यावर दाखविलेला विश्वास आपण पूर्णपणे सार्थ ठरवू आणि पक्ष जी जबाबदारी देईल ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करू.

मुंबई, ठाणेसह अर्धा महाराष्ट्र गारठला !! 'अवकाळी पाऊस व बोचरे वारे ठरले कारणीभूत'

मुंबई, ठाणेसह अर्धा महाराष्ट्र गारठला !! 'अवकाळी पाऊस व बोचरे वारे ठरले कारणीभूत'


कल्याण, बातमीदार : अर्ध्या महाराष्ट्राने बुधवारी गारठलेल्या वातावरणाचा अनुभव घेतला. पहाटेचा काळोख सायंकाळपर्यंत कायम होता. त्याला कारण ठरला तो अवकाळी पाऊस आणि त्याच्या जोडीला बोचरे वारे.

पहाटेपासूनच पावसाची संततधार लागली ती रात्री उशिरापर्यंत कायम होती. अशीच स्थिती 3 डिसेंबरपर्यंत राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, 17 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बुधवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, कसारा, कर्जतसह, रायगड, पालघर पुणे, सातारा जिल्ह्यासह कोकणातील अनेक भागात अवकाळी पाऊस सुरू झाला. मुंबईसह उपनगरांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण आणि पावसाची रिपरिप सुरू होती. पाऊस मुसळधार नसला तरीही सर्वत्र धुक्याची चादर आणि कमालीचा गारठा असे वातावरण होते. अनेक ठिकाणी धुक्यामुळे समोरचे काहीच दिसत नव्हते. मुंबईत लोकलमधून पाऊस आणि झोंबणार्‍या वार्‍यामुळे अनेकांनी स्वेटर घातल्याचे चित्र होते. चाकरमानी कामावर जाताना छत्री आणि स्वेटरसह घराबाहेर पडले होते.

राज्यापालांच्या हस्ते ‘वंदे किसान कृषी सन्मानाने ; 'जिल्हाधिकारी सुनील चव्हाण सन्मानित'

राज्यापालांच्या हस्ते ‘वंदे किसान कृषी सन्मानाने ; 'जिल्हाधिकारी सुनील चव्हाण सन्मानित'


औरंगाबाद, दि. 02 : औरंगाबाद व रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकारी म्हणून अनेक समाजभिमुख बदल घडविले. या काळात हजारो शेतकऱ्यांना आधार, दिशा दिली व त्यांचा आत्मविश्वास वाढविला. या भरीव योगदानाबदल महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना सपत्निक ‘वंदे मातरम कृषी सन्मान 2021’ ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सोहळा राजभवनात पार पडला. 


वंदे भारत विकास फाउंडेशन व ॲडराईज इंडिया यांनी शेतकऱ्यांच्या शिक्षण, प्रशिक्षण व कौशल्यवर्धनासाठी विकसित केलेल्या 'वंदे किसान ॲप'चे लोकार्पण राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले. 

यावेळी आमदार आशिष शेलार, ॲडराईज इंडिया व वंदे भारत विकास फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद कुलकर्णी, व्याव्स्थापकीय भागीदार अनिरुद्ध हजारे, प्रगतिशील शेतकरी व पद्मश्री राहीबाई पोपेरे, डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजय सावंत प्रामुख्याने उपस्थित होते. 

यावेळी राज्यपालांच्या हस्ते विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी धीरज जुनघरे, डॉ सदानंद राऊत, शेती हवामान तज्ज्ञ डॉ उदय देवळाणकर, ज्ञानेश्वर बोडके, डॉ  सूर्यकांत गुंजाळ, नारायणगाव ग्रामोन्नती कृषी मंडळ संस्थेचे अनिल मेहरे, कृषी पर्यटन तज्ञ चंद्रशेखर भडसावळे, कुलगुरू डॉ संजय सावंत, व पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Wednesday, 1 December 2021

ठाण्यात फेरीवाल्याच्या हल्ल्यात बोटं छाटलेल्या कल्पिता पिंपळे इज बॅक, अनधिकृत फेरीवाले व बांधकामांवर धडक कारवाईचे दिले संकेत !!

ठाण्यात फेरीवाल्याच्या हल्ल्यात बोटं छाटलेल्या कल्पिता पिंपळे इज बॅक, अनधिकृत फेरीवाले व बांधकामांवर धडक कारवाईचे दिले संकेत !!


भिवंडी, दिं,2, अरुण पाटील (कोपर) :
             फेरीवाल्याच्या हल्ल्यात बोटं छाटलेल्या कल्पिता पिंपळे इज बॅक, धडक कारवाईचे दिले संकेत कल्पिता पिंपळे यांनी पुन्हा सहाय्यक आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला असून अनधिकृत फेरीवाला आणि अनधिकृत बांधकामां विरोधात पुन्हा एकदा धडक कारवाईचे संकेत दिले आहे.
         ठाणे येथे अनधिकृत फेरिवाल्यांवर अतिक्रमणाची कारवाई करत असताना एका माथेफिरू फेरिवाल्याने ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात त्यांना आपली बोटे गमवावी लागली होती.याच कल्पिता पिंपळे आता पुन्हा सेवेत रुजू झाल्या असून आपण पुन्हा जनतेच्या सेवेकरता तयार आहोत, असं जाहीर करत कल्पिता पिंपळे यांनी ठाणे महानगरपालिकेत आज 3 महिन्यांनी ठाणे महानगर पालिकेत पदार्पण केले आहे.
          कल्पिता पिंपळे यांच्याकडे पुन्हा सहाय्यक आयुक्त पदाचा पदभार असून अनिधिकृत फेरीवाला आणि अनधिकृत बांधकाम या विरोधात कल्पिता पिंपळे या पुन्हा एकदा धडक कारवाई करणार आहेत. ३० ॲागस्ट २०२१ या दिवशी कर्तव्यावर असताना माजीवडा भागांत अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत होत्या. ही कारवाई करत असताना वाहतुकीस अडथळा निर्माण होणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यां विरोधात कल्पिता पिंपळे यांनी धडक कारवाईला सुरुवात केली होती.
          हेच कर्तव्य बजावत असताना माजीवडा येथे अमरजीत नावाच्या एका माथेफिरु अनधिकृत फेरीवाल्याने कल्पिता पिंपळे यांच्यावर मागून हल्ला चढवला. सुरुवातीला धक्काबुक्की करत होता पण अचानक तो इतका हिंसक झाला की, त्याने त्याच्या जवळील धार धार शस्त्राने हल्ला केला तो हल्ला परतवून लावत असताना त्यांच्या उजव्या हाताची दोन बोटे त्यात छाटली गेली. तरी देखील हल्लेखोर कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करतच होता. या हल्ल्यात पिंपळे यांच्या डाव्या हाताच्या मनगटाला गंभीर जखम झाली तसंच त्यांच्या डोक्यात देखील अमरजीतने हल्ला केला.
          तसंच, कल्पिता पिपंळे यांचा सुरक्षा रक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर ही अमरजीतने हल्ला केला ज्यात त्यांचे ही एक बोट छाटले गेले. जवळपास ५-६ मिनिटे चाललेल्या हल्यात कसं बसं पिंपळे यांनी अमरजीतच्या तावडीतून सोडवण्यात पालिका कर्मचाऱ्यांना यश आले आणि त्यांनी वेळ न दवडता त्यांची तात्काळ वेदांत हाॅस्पिटलमध्ये रवानगी केली. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांना हाताची बोट गमवावी लागली.
            हे उपचार घेवून पुर्णपणे बरे होवून दोघेही आज पुन्हा सेवेत रुजू झाले असून सोमनाथ पालवे यांनाच कल्पिता पिंपळे यांचा सुरक्षारक्षक म्हणून पुन्हा नेमण्यात आले असून कल्पिता पिंपळे यांना पुन्हा सहाय्यक आयुक्तपदाचा पदभार देण्यात आला आहे. आता सिंघम लेडी कल्पिता पिंपळे या पुन्हा धडक कारवाई करणार असून त्या अनधिकृत फेरीवाले मुक्त ठाणे करणार आहेत.

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...