Thursday, 3 February 2022

महेंद्र तथा अण्णासाहेब पंडीत यांची *राष्ट्रीय निरीक्षक* पदी नियुक्ती !! 'स्वतंत्र संपादक पत्रकार संघ, भारत' यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.... अण्णा पंडीत.

महेंद्र तथा अण्णासाहेब पंडीत यांची *राष्ट्रीय निरीक्षक* पदी नियुक्ती !!

'स्वतंत्र संपादक पत्रकार संघ, भारत' यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.... अण्णा पंडीत.


कल्याण, बातमीदार - स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. नामदेव पां. शेलार यांनी जेष्ठ पत्रकार तथा मानवाधिकार संरक्षक महेंद्र यशवंत पंडित (अण्णा पंडित) यांची स्वतंत्र संपादक पत्रकार संघाच्या *राष्ट्रीय निरीक्षक* पदी नियुक्ती केली आहे.


अण्णासाहेब पंडीत यांचे सामाजिक कार्य आणि पत्रकारीते मधील योगदान याची दखल घेऊन त्यांची पत्रकार संघाच्या राष्ट्रीय निरीक्षक पदी नियुक्ती केली असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांनी सांगितले.
गरजवंत, वंचित, पिडीतांच्या हाकेला धावुन जाणारा एक सच्चा व आक्रमक समाजसेवक, अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारा कलमकसाई अशी ज्यांची ख्याती आहे आणि परिवर्तनवादी विचारसरणीच्या राष्ट्रपुरुष, राष्ट्रमाता आणि राष्ट्रसंताचा आदर्श घेऊन समाजातील विविध स्तरांवर कार्यतत्पर असणारे अण्णासाहेब पंडीत हे अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य. या अराजकीय सामाजिक संघटनेचे विद्यमान प्रदेश-सरचिटणीस आहेत. तसेच श्रमिक (मु) पत्रकार संघाचे ते ठाणे-जिल्हाध्यक्ष आहेत. शासकीय / प्रशासकीय यंत्रणेवर  त्यांचे कार्यशैलीचा प्रभाव असुन अण्णा पंडित सामाजिक अत्याचाराबाबतच्या घटनेत अनेक पिडीतांना न्याय मिळवून देण्यात यशस्वी ठरले आहेत. वंचित पिडीत दलित आदिवासी आणि बहुजनांच्या विविध प्रकरणांवर त्यांचेवरील अन्याय अत्याचारा वर त्यांनी आवाज उठवला आहे. सातत्याने पाठपुरावा केला आहे. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांनी अण्णा पंडित यांना राष्ट्रीय निरीक्षक पदी नियुक्ती देवुन संघटनेची मोठी जबाबदारी सोपवलेली आहे. 


पत्रकार लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. अण्णा पंडीत हे स्वतः पत्रकार असल्याने त्यांना पत्रकारांच्या अडीअडचणींची आणि समस्यांची योग्य जाण असून ते आपल्या पदाला योग्य न्याय देतील अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. संघाने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही माझ्या बांधवांच्या न्याय हक्कासाठी मी सदैव बांधिल आहे असे प्रतिपादन अण्णा पंडीत यांनी केले आहे, त्यांच्या नियुक्ती मुळे पत्रकार क्षेत्रात आनंद व्यक्त केला जात असून स्वतंत्र संपादक पत्रकार संघाच्या मान्यवर पदाधिका-यांसह श्रमिक (मु) पत्रकार संघ, अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक-अध्यक्ष रविंद्रदादा जाधव, कोकण प्रदेशाध्यक्ष संतोष चाळके, रायगड जिल्हाध्यक्ष दिनेश भालेराव, अमोल कांबळे (खारघर) अंबरनाथ तालुका अध्यक्षा माया आहीरे, निर्मला गहलोत, अंबरनाथ शहर अध्यक्षा गायत्री चव्हाण, राज्य उपाध्यक्ष वसंतराव वाघ, प्रा.प्रेमलता जाधव, रवि गमरे (कल्याण), सागर शिंदे (कल्याण) अजीत इंगळे (ठाणे), प्रशांत जाधव (भिवंडी) कामगार नेते महादेव वाघमारे (पनवेल) कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव गायकवाड (पनवेल) संजय गायकवाड (अध्यक्ष शिक्षक स्वाभिमानी संघटना), डॉ. अमित दुखंडे. (आधार इंडिया परिवर्तन संघटना) अण्णासाहेब रोकडे (आरपीआय राज्य उपाध्यक्ष) मिलींद बेळमकर (आरपीआय,(आं) ठाणे जिल्हाध्यक्ष) पत्रकार राजेश ऊंडी,(मुंबई) पत्रकार तुकाराम म्हस्के, (नवी मुंबई), पत्रकार प्रितम शहा (पुणे) पत्रकार तथा प्राचार्य योगेश गोसावी (नासिक) इत्यादी मान्यवरांनी अभिनंदनाचा वर्षाव करून अण्णासाहेब पंडीत यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

शेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला दिले जीवदान ; अमोल भातडे या तरुणाचे होतंय अनेकांकडून कौतुक !

शेवटच्या घटका मोजणाऱ्या पक्षाला दिले जीवदान ; अमोल भातडे या तरुणाचे होतंय अनेकांकडून कौतुक !


मुंबई : ( दिपक कारकर )

सोशल मीडियावर दररोज काही न काही व्हायरल होत असतं. हे व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओ नेटकर्यांच्या मनाला स्पर्श करून जातात.असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या व्हिडीओत एक पक्षी ( कबुतर ) अमोल भातडे यांच्या ऑफिसमधील खिडकीत त्याचा पाय अडकल्याने भरारी घेण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होता मात्र सुटका होत नव्हती,याक्षणी त्या पक्षाकडे अमोलचे लक्ष तिकडे वेधले आणि त्या कबुतराची सुटका केली.अमोल रत्नागिरी जिल्ह्यातील ( खंडाळा - गडनरळ ) गावचा सुपूत्र असून उत्तम कलाकार आहे.या पक्षाचे प्राण वाचवल्याने,अमोलचे त्यानं जोपासलेल्या सेवाभावी माणुसकीचे अनेकांकडून कौतुक होत आहे.

डोंबिवली, कल्याण पूर्व व उल्हासनगरच्या काही भागात शुक्रवारी वीज बंद !! *महापारेषणकडून देखभाल-दुरुस्तीचे काम*

डोंबिवली, कल्याण पूर्व व उल्हासनगरच्या काही भागात शुक्रवारी वीज बंद !!

*महापारेषणकडून देखभाल-दुरुस्तीचे काम*


कल्याण, हेमंत रोकडे, दि. ०३ : महापारेषणकडून शुक्रवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ दरम्यान २२० केव्ही पडघा ते पाल आणि २२० केव्ही पडघा ते जांभूळ या अतिउच्चदाब वाहिन्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे डोंबिवली, उल्हासनगर दोन आणि कल्याण पूर्व विभागातील महावितरणच्या काही ग्राहकांची वीज काही काळ बंद राहणार आहे. यासंदर्भात वीज ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेश पाठवून पूर्वकल्पना देण्यात आली असून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

डोंबिवली पश्चिमेतील गरिबाचा पाडा व नवापाडा फिडरवरील भागाचा वीजपुरवठा सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत बंद राहणार आहे. तुकारामनगर फिडरवरील नव चेतन, सुदंरा कॉम्प्लेक्स, लक्ष्मण रेषा, मल्हार बंगलो, गावदेवी मंदिर, अंबरयोग या भागाचा तसेच अयरेगावचा वीजपुरवठा सकाळी ८ ते १ दरम्यान बंद असेल. सावरकर रोड, गोपाल नगर, गल्ली नंबर १ आणि २, पेंडसेनगर, टिळकनगर, पोस्ट ऑफिस चौक, आरपी रोड, संत नामदेव पथ, वसंतवाडी, चार रस्ता, गोपालनगर २, ३ व ४, जिजाई नगर, अंबिका नगर, गोग्रासवाडी, पाथर्ली रोड, शिखंडेवाडी, स्टार कॉलनी, मानपाडा रोड, आर अँड टी कॉलनी, संत समर्थ मठ, हनुमान मंदिर रोड, गांधीनगर या भागाचा वीजपुरवठा सकाळी ९ ते दुपारी १ दरम्यान बंद राहील.  

कल्याण पूर्व विभागातील पुढील भागांचा वीजपुरवठा सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत बंद राहील – नांदिवली, सांदप, भोपर, उसरघर, देसलेपाडा, सोनारपाडा, मानपाडा, ललीतकाटा, लोढा हेवन, कटाई, निळजे परिसर, हेदुटणे, घेसर, उंभर्ली, कोळे, घारीवली, भंडारी पाडा, वैभव नगरी, मिलापनगर, सुदर्शन नगर, एमआयडीसी रहिवासी परिसर, सागाव खालचा पाडा व वरचा पाडा, चेरा नगर, शंखेश्वर नगर, भगवान पाटील व सुरेश पाटील कंपाऊंड, म्हात्रे नगर, तुकाराम वाडी, पाटील महाविद्यालय परिसर, रिजंन्सी, दावडी गाव, शंकरनगर, हॉरिझॉन मायसिटी व कासारिओ तसेच कासाबेला बिल्डिंग परिसर, मंगरुळ, उसटणे, उसटणे इंडस्ट्रिज पार्क, नऱ्हेन, पाली, चिरड, वाडी, करवले, पालेगाव, चिंचवणी, खोणी, काकडवाल, नेवाळी, नेवाडी पाडा, खरड, कुंभार्ली, पोसरी, शेलारपाडा, ढोका, कोळसेवाडी, म्हसोबा चौक, सिद्धार्थ नगर, मच्छी मार्केट, प्रभू राम नगर, जिम्मी बाग, शाहू गार्डन, लोकग्राम, लोकवाटिका, लोकधारा, नेतीवली नाका, मराठी शाळा, पुणे लिंक रोड, चिकनी पाडा, तिसगाव, शिवाजी कॉलनी, विजयनगर, विशालनगरी, घारडा केमिकल कंपनी, बीएआरसी, पलावा.

उल्हासनगर दोन विभागात पुढील भागात सकाळी ८ ते दुपारी १ दरम्यान वीजपुरवठा बंद राहणार आहे - प्रेमनगर, हिरापुरी, शहा मार्केट, दशहरा मैदान, ओंकारानंद आश्रम, निजधाम, तहसिलदार दुधनाका, कैलास कॉलनी, वंसतबहार, समतानगर, गायकवाड पाडा एक व दोन, आकाश कॉलनी एक, कोळेकर पाडा, दूर्गा पाडा, आकाश किराणा, जेमनानी कंपाऊंड, शांतीप्रकाश आश्रम, साई आर्केड, ओटी सेक्शन, कुर्ला कँप रोड, श्रीराम नगर, एकता नगर, आकाश कॉलनी, बारा नंगर बस स्टॉप, मानेरा, व्हिनस, संभाजी नगर, लालचक्की, गजानन नगर, कुर्ला कँप, आशेळे पाडा, आशेळे गाव, गणपत नगर, नेताजी पाणीपुरवठा, उल्हासनगर चार व पाच विभाग, बारकू पाडा, रिलायन्स, पालेगाव, अंबरनाथ एफ टाईप एमआयडीसी विभाग, इंडस्ट्रियल भाग, अतिरिक्त अंबरनाथ औद्योगिक क्षेत्र, आनंदनगर एमआयडीसी.

।। बातमीदार ।। झालेला बदल !!

कल्याण दि.3 फेब्रुवारी :
महापारेषणकडून वीज वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे डोंबिवली, कल्याण पूर्व, उल्हासनगर दोन या विभागात उद्या शुक्रवार दिनांक 04 फेब्रुवारी रोजी वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार नाही. - *महावितरणची माहिती*

मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकचा कोकण रेल्वेवर परिणाम !! "अनेक गाड्या रद्द तर काहींवर परिणाम"

मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकचा कोकण रेल्वेवर परिणाम !!
"अनेक गाड्या रद्द तर काहींवर परिणाम"


मुंबई, बातमीदार : मध्य रेल्वेच्या ठाणे जंक्शन विभागातील दिवा येथील पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे तब्बल ७२ तासांचा जम्बो मेगाब्लॉक मध्य रेल्वेवर घेण्यात येणार आहे.

हा मेगाब्लॉक ५ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत असल्याने त्याचा परिणाम मुंबईतून बाहेर जाणाऱ्या अनेक गाड्यांवर होणार आहे. कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाड्यांवर देखील याचा परिणाम होणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील एकूण २० गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ३ गाड्या या आपवल्या नियमीत वेळेत धावणार असून ६ गाड्या अंतिम थांब्यावर पोहोचू शकणार नाहीयेत.

रद्द झालेल्या गाड्या (ट्रेन) :- 

५ फेब्रुवारी आणि रविवार ६ फेब्रुवारी रोजी सुटणारी ट्रेन (क्र . २२११९) मुंबई सीएमएसटी करमळी एक्सप्रेस, ५ आणि ६ फेब्रुवारी रोजी सुटणारी ट्रेन (क्र . २२१२०) मुंबई सीएमएसटी - करमळी एक्सप्रेस, दि. ५ फेब्रुवारी, ६ आणि ७ रोजी सुटणारी ट्रेन (क्र. १२०५१ आणि १२०५२) मुंबई सीएमएसटी मडगाव जं. एक्सप्रेस, ७ रोजी सुटणारी ट्रेन (क्र . ११०८५) लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगाव जं., ८ रोजी सुटणारी ट्रेन (क्र . ११०८६) मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस, ५ रोजी सुटणारी ट्रेन (क्र . ११०९९) लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगाव जं. ६ रोजी सुटणारी ट्रेन (क्र . १११००) मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस, ५ रोजी सुटणारी ट्रेन (क्र. २२११३) लोकमान्य टिळक टर्मिनस कोचुवेली, ७ रोजीची ट्रेन (क्र. २२११४) कोचुवेली -लोकमान्य टिळक. ६ फेब्रुवारीची ट्रेन (क्र . १२२२४) एर्नाकुलम जं. - लोकमान्य टिळक टर्मिनस, ५ आणि ८ फेब्रुवारीची ट्रेन (क्र. १२२२३) लोकमान्य टिळक टर्मिनस - एर्नाकुलम जं., ४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान सुटणारी ट्रेन (क्र. १२१३३) मुंबई सीएसएमटी मंगळुरु जं. आणि ट्रेन (क्र. १२१३४) मंगळुरु जं. - मुंबई, ७ आणि ८ फेब्रुवारीची ट्रेन (क्र. ११००३) दादर सावंतवाडी आणि ट्रेन (क्र. ११००४) सावंतवाडी रोड - दादर. ५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान सुटणारी ट्रेन (क्र . ५०१०३) दिवा - रत्नागिरी पॅसेंजर आणि ट्रेन (क्र . ५०१०४) रत्नागिरी - दिवा पॅसेंजर, ४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान सुटणारी ट्रेन (क्र . १०१०६) सावंतवाडी रोड- दिवा आणि ट्रेन (क्र . १०१०५) दिवा सावंतवाडी रोड.

या गाड्या (ट्रेन) नियोजित स्थानांवर पोहचणार नाहीत -

३ ते ६ दरम्यान धावणारी ट्रेन (क्र . ११००४) सावंतवाडी रोड- दादर ही गाडी, ४ ते ७ दरम्यान धावणारी ट्रेन (क्र. १०१०४) मडगाव- मुंबई सीएमएसटी गाडी, ४ ते ६ दरम्यान धावणारी ट्रेन (क्र . १०११२) मडगाव- मुंबई सीएमएसटी गाडी, ६ फेब्रुवारी रोजी धावणारी ट्रेन (क्र. १२२०२) कोचुवेली - लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेस, ३ ते ६ फेब्रुवारी दरम्यान धावणारी ट्रेन (क्र. १६३४६) तिरुवनंतपुरम सेंट्रल - लोकमान्य टिळक टर्मिनन्स ट्रेन, ४ ते ६ फेब्रुवारी दरम्यान धावणारी ट्रेन (क्र . १२६२०) मंगळुरु सेंट्रल लोकमान्य टिळक टर्मिनन्स एक्सप्रेस, या सर्व गाड्यांचा प्रवास पनवेल येथे समाप्त होईल.

गोगटे-जोगळेकर महाविदयालयाच्या हर्ष कांबळे ला भित्तिपत्रक स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक !!

गोगटे-जोगळेकर महाविदयालयाच्या हर्ष कांबळे ला भित्तिपत्रक स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक !!
 

मुंबई, बातमीदार: मुंबई विदयापीठाच्या ५४ व्या आंतर महाविदयालयीन युवा महोत्सवामध्ये गोगटे-जोगळेकर महाविदयालयाच्या हर्ष कांबळे भित्तीपत्रके स्पर्धेत मुंबई विदयापीठात उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला आहे. ह्यासाठी सांस्कृतिक विभागप्रमुख प्राध्यापक डॉ. आनंद आंबेकर आणि प्राध्यापक शुभम पांचाळ यांनी मार्गदर्शन केले होते. तसेच प्रसाद साळवी ह्याने सहकार्य केले आहे.

स्पर्धेसाठी योगांचे फायदे हया विषयावर अत्यंत आकर्षक आणि प्रबोधनात्मक असे पोस्टर बनविले आहे. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुलदत्त कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर कला शाखेचे उपप्राचार्य डॉ.सुरेंद्र ठाकूरदेसाई वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्य डॉ. यास्मीन आवटे विज्ञान शाखेच्या उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी या सर्वांनी हर्ष कांबळे आणि सांस्कृतिक विभागाचे अभिनंदन केले आहे.


Wednesday, 2 February 2022

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या कारावाईनंतरही समीर वानखेडेंचा बार सुरूच, नोटीस आली नसल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे !!

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या कारावाईनंतरही समीर वानखेडेंचा बार सुरूच, नोटीस आली नसल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे !!


भिवंडी, दिं,03, अरुण पाटील (कोपर) :
                 एनसीबीच्या विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या एपीएमसी मधील बारचा परवाना रद्द करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही हा बार सुरूच असून, परवाना रद्द झाल्याची नोटीस आपल्याला मिळाली नसल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.


              एनसीबीच्या विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या एपीएमसी मधील बारचा परवाना रद्द करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही हा बार सुरूच असून, परवाना रद्द झाल्याची नोटीस आपल्याला मिळाली नसल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. दरम्यान, परवाना रद्दच्या निर्णयाविरोधात वानखेडे हे न्यायालयात जाणार असल्याचे बारच्या कर्मचाऱ्यांकडून समजते.
              समीर वानखेडे हे १७ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांनी त्यांच्या नावे सद्गगुरू हॉटेल आणि बारचा परवाना काढला होता. मात्र, बार परवाना मिळविण्यासाठी परवानाधारकाचे वय २१ वर्षे असणे आवश्यक असतानाही, समीर वानखेडे हे अल्पवयीन असतानाही त्यांच्या नावे बारचा परवाना कसा मिळाला ? जन्म तारखेत, वयात विसंगती तसेच सज्ञान नसताना देखील परवाना दिलाच कसा असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी उपस्थित केला होता.
               त्यानंतर १४ डिसेंबरला उत्पादन शुल्क विभागाने वानखेडेंना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर दीड महिन्यांनी बारचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परवाना मिळवण्यासाठी अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला आहे. मात्र, अशा प्रकारचे कोणतेही आदेश मिळाले नसल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.
              मागील १८ वर्षांपासून नियमित प्रतिवर्षी परवाना नूतनीकरण केला जात आहे. शिवाय प्रत्येक तीन महिन्यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बारची पाहणी व परवान्याची पडताळणी केली जाते. यावेळी देखील अधिकाऱ्यांच्या नजरेतून ही बाब निसटली कशी, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
             वाशी येथे एनसीबीचे मुंबईचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या नावावर सद्गुरु नावाचे एक रेस्टोरंट बार आहे. ठाणे जिल्हाधिकारी श्री. राजेश नार्वेकर यांच्या कारावाईनंतरही समीर वानखेडेंचा बार सुरूच असून नोटीस आली नसल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. त्याचे लायसन्स ठाणे जिल्हाधिकारी यांनी रद्द केले  आहे.                     
               उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार या बारसाठीचा परवाना ऑक्टोबर १९९७ ला दिला होता. परंतु, त्यावेळेस वानखेडे हे सज्ञान नसल्याने त्याचा परवाना लायसन्स रद्द केल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. राजेश नार्वेकर यांनी दिली. तसेच १९९६ मध्ये सिडकोने जी एनओसी दिली होती, त्यात या जागेत केवळ रेस्टाॅरंटला परवानगी असून, मद्य विकण्यास मनाई होती. तरीही तिथे मद्यविक्री सुरू होती. या बारचा परवाना ३१ मार्चपर्यंत वैध आहे. शाहरुखच्या मुलाला अटक केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आरोप केले होते.
                 सज्ञान नसताना बारचा परवाना घेतल्याच्या आरोप होता. यासाठी वानखेडेंच्या जन्मतारखेत म्हणजेच वयात विसंगती असल्याचे कारण दिले आहे. बारला परवाना दिला होता, त्यावेळेस वानखेडे हे सज्ञान नसल्यानेच तो रद्द केला आहे.

कल्याण तालुक्यातील सरकारी शाळां करा कॉन्व्हेंट; शिक्षण करा मातृभाषा सह इंग्रजीतून! - प्रहार ची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी - डॉ. आदर्श भालेराव

कल्याण तालुक्यातील  सरकारी शाळां करा कॉन्व्हेंट;  शिक्षण करा मातृभाषा सह इंग्रजीतून! - प्रहार ची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी - डॉ. आदर्श भालेराव 


सरकारी शाळांमधील शिक्षकांना इंग्रजीचे शिक्षण देणे बंधनकारक करा- डॉ आदर्श भालेराव 


इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्ञानाची, तंत्रज्ञानाची आणि सर्व प्रकारच्या सत्तेची भाषा असल्याने आपल्या विद्यार्थी ती सहजत्या बोलू शकतील आणि लिहू-वाचू शकतील इतपत क्षमतेचे शिक्षण देणे गरजेचेच आहे. समाजाच्या सर्व घटकांतील मुला-मुलींना इंग्रजीतून संभाषण करता यावे यासाठी सर्व शाळा इंग्रजी माध्यमाच्या करण्याचाच पर्याय उपलब्ध आहे काय, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. अशी मागणी कल्याण तालुक्यातून प्रहार जन शक्ती पक्षाचे कल्याण तालुका संघटक यांनी  शिक्षण मंत्र्या सह मविआ कडे केली आहे. 
कल्याण तालुक्यात मराठी व उर्दू शाळेत इंग्रजी शिक्षण देण्यात यावे यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष   ठाणे/पालघर संपर्क प्रमुख मा हितेश जाधव ,ठाणे जिल्हा अध्यक्ष ऍड स्वप्निल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  प्रहार मविआ पाठपुरावा करणार आहे.

मराठी /उर्दू शाळांना कुलूप लावावे लागत असून गरीब- श्रीमन्त सगळे पालक इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे धावू लागलेत. एकट्या मुंबईत मराठी शाळांमधली विद्यार्थी संख्या गेल्या दहा वर्षात एक तृतीयांश झालेली आहे

संस्कृतीकरणाच्या सिद्धांतानुसार सगळे खालचे जात-वर्ग वरच्यांचे अनुकरण करतात. मालकांची मुलं जर इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकणार असतील तर कामगार, मोलकरणी, हमाल, रिक्षावाले, मजूर, गरीब त्यांचेच अनुकरण करणार. मराठी शाळा का ओस पडताहेत? कारण इंग्रजीला प्रतिष्ठा आहे. आपला पाल्य इंग्रजीतून शिकला की त्याला चांगली नोकरी मिळेल अशी आशा (गाजर) यात महत्वाचे आहे. 
जी भाषा रोजगार देत नाही ती मरते. जिला प्रतिष्ठा, मानसन्मान नसतो तिकडे पालक जात नाहीत. त्यामुळे मातृभाषा सह सरकारी शाळेत इंग्रजी शिकविण्यात आलं पाहिजे.
कामगार, मोलकरणी, हमाल, रिक्षावाले, मजूर, गरीब  ह्याच्या ही मुलाना मोफत मातृभाषा सह इंगजी माध्यमाचा शिक्षण मिळण्यास जास्त मदत होईल.
महाराष्ट्रात अनुदानित मराठी माध्यमांच्या बऱ्यांच शाळा डबघाईला आल्या आहेत. त्यामुळे हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी दरवर्षी अतिरिक्त ठरत असल्याने त्यांचे समायोजन करणे ही सरकारची डोकेदुखी वाढत चालली आहे. त्यामुळे अनुदानाचे स्वरूप कायम ठेवून मराठी माध्यमांच्या शाळांना पूर्ण इंग्रजी माध्यमात परावर्तित करण्याचा पर्याय राज्य सरकारने सुचविला आहे. तसे अधिकृत पत्र शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी काढले आहे. पालकांची आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमातून शिकविण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे की काय व त्याकरिता लाखो रुपये मोजण्याची त्यांची तयारी असते. त्याचाच परिणाम म्हणजे अनुदानित मराठी शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. ज्यामुळे हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त होत असून, बऱ्यांच शाळांतील भौतिक सुविधा व मनुष्यबळाचा पाहिजे तसा उपयोग होताना दिसत नसल्याचे चित्र समोर आले आहे.

कॉन्व्हेंटमध्ये जाण्याचे, इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. हे स्वप्न आता राज्य सरकार पूर्ण केले तर. विद्यार्थ्यांचे हे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी राज्य सरकारने शाळांचे "कॉन्व्हेंट' करण्याचा पर्याय सुचविला आहे. यामुळे शाळांची पत वाढेल आणि विद्यार्थ्यांचे संपूर्ण शिक्षण इंग्रजीतून होईल.

 इंग्रजी शाळांचे पेव आत्ता खेड्यापाड्यातही पसरले आहेत. त्याचा सर्वाधिक परिणाम सरकारी मराठी शाळांवर झाला. कारण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांना या इंग्रजी शाळांना पळवून नेत आहेत. पालकांची इच्छा नसेल, तरीही त्यांना वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवून, त्यांच्या मुलांना मोफत दप्तर, वह्या, पुस्तके आणि येण्या-जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करून पालकांना आकर्षित करण्याचे काम केले जात आहे. याउलट, सरकारी शाळेत शासन सर्व सुविधा अगदी मोफत देत असते. तरीही ग्रामीण भागांतील पालकों इंग्रजी शाळांवरील लक्ष अजूनही कमी झालेले नाही. 

दुरुन डोंगर साजरे' या म्हणीनुसार इंग्रजी शाळा पालकांना आकर्षित करतात. पण त्यांचे आकर्षण फार काळ टिकत नाही. विविध कारणांमुळे एक-दोन वर्षांत ही मुले पुन्हा सरकारी शाळेत प्रवेश घेतात. काही पालकांना या शाळेचा खर्च झेपत नाही. त्यांच्या शाळेचा गणवेष, वह्या आणि इतर खर्च आणि त्याचबरोबर न झेपणारा अभ्यास या सर्व बाबींना कंटाळून पालक आपल्या मुलांना जवळच्या शाळेत घालतात. इंग्रजी शाळेतील अभ्यास मुलांना समजण्यास अवघड जाते. घरात बोलली जाणारी भाषा एक, शाळेत बोलली जाणारी भाषा दुसरीच! त्यामुळे मुले गोंधळून जातात. 'इकडे आड, तिकडे विहीर' अशी मुलांची अवस्था होते. 

मातृभाषा सह इंगजी शिक्षण का गरजेच- डॉ आदर्श भालेराव 

मुलांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेतून म्हणजेच मराठीतून होणे प्रगतीसाठी आवश्‍यक आहे. एखाद्या विषयाचा गाभा किंवा मूळ संकल्पना कळाली, तर त्याचा अभ्यास करून कोणत्याही भाषेत व्यक्त होता येते. पण मूळ संकल्पनाच कळाली नाही, तर पोपटपंची करून इतर भाषेत व्यक्त करता येत नाही. मातृभाषेतून शिकल्याने वाचनाची आवड निर्माण होऊन उत्तम ज्ञान, संशोधक वृत्ती व उच्च अभिरुची संपन्न व्यक्तिमत्व तयार होते. आकलन शक्तीस भरपूर चालना मिळते. तसेच, स्वयंअध्ययन करण्यास मदत मिळते. सभोवती मराठीचे वातावरण असल्याने पाठांतर करण्याची गरज भासत नाही. तसेच, मराठीत जे बोलले, तसेच लिहिले जाते; पण इंग्रजी बोलणे वेगळे आणि लिहिणे वेगळे असते. त्यामुळेही मुलांना गोंधळून जायला होते. त्यांना शब्दार्थ पाठ केल्याशिवाय गत्यंतर नाही. त्याचमुळे इंग्रजी शाळेत शिकणारी मुले नेहमी घोकंपट्टी करताना दिसून येतात. कधी कधी काही पाठ झाले नाही, तर वैतागतात, निराश होतात; तर काही मुले व्यसनाधीन होतात. 

फाडफाड इंग्रजी बोलता आले, की आयुष्यात यश मिळते' हा साफ चुकीचा समज आहे. पण सध्या असा समज प्रत्येक घरात आहे. घरातलं मूल 'रेन रेन, कम अगेन' म्हणालं, की आई-वडिलांची छाती अभिमानाने भरून येते. 'लेकरू इंग्रजी गाणे म्हणत आहे' म्हणून कौतुक करतात. पण खरोखर त्याचा अर्थ त्याला कळतो का? तर उत्तर आहे 'नाही'!
मुलांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेतून  इंग्रजी सह होणे प्रगतीसाठी आवश्‍यक आहे. मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित होत असल्याच्या सध्याच्या काळात आंध्र प्रदेशातील सर्व सरकारी शाळा इंग्रजी माध्यमाच्या करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आंध्रातील मंडळ प्रजा परिषद आणि जिल्हा परिषद शाळा इंग्रजी माध्यमांच्या केल्या आहेत. २०२०-२१ पासून सर्व शाळात इंग्रजी हीच ज्ञानभाषा असणार आहे. पहिलीपासून इंग्रजी माध्यमातूनच विद्यार्थ्यांना शिकावे लागणार आहे. याबाबतचा सरकारी आदेश जारी करण्यात आला आहे. तेलगू आणि ऊर्दू या दोन्ही भाषा शिकविणे सर्व शाळांसाठी सक्तीचे असणार आहे.  
भाषा केवळ अस्मितेचा मुद्दा असून भागात नाही, तर तो पोटापाण्याचा मुद्दा झाला पाहिजे. मात्र आपल्याकडे केवळ अस्मिता आणि भावनेच्या बांधावरच भाषा अडकून आहे
इंग्रजी शिकल्याने पुढे अनेक संधी निर्माण होतात, मराठीतून शिकून पुढे संधी मिळत नाहीत, हे मराठी लोकांच्या डोक्यात घट्ट रुजले आहे. म्हणून मध्यमवर्गीय सोडा गरीब घरातील मुलांनाही त्यांचे पालक कसोशीने प्रयत्न करून, दिवस रात्र राबून इंग्रजी शाळेत टाकण्याचा प्रयत्न करतात. आणी शिक्षण विकत घेत पोटाचा आळा पिटा करत आपल्या मुलाना इंग्रजी शाळेत शिकवत असतात.   जर सरकारी शाळेत इंग्रजी शिक्षण लागू केलं तर आर्थिक दुर्बल घटकातील प्रत्येक मुलाना  शिक्षण मिळण्यास मदत होईल व मातृभाषा असलेल्या  शाळेत शिक्षण घेण्यासाठी मुलाना जास्त प्रमाणत आवड निर्माण होण्यास सुरुवात होईल असे ही मत भालेराव यांनी व्यक्त केले.
सरकारी शाळेत मातृभाषा सह इंग्रजी शिक्षण देण्यात यावे ह्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष कल्याण  तालुका संघटक डॉ आदर्श भालेराव यांचया नेतृत्वाखाली समाजसेवक नईम खान तालुका सचिव प्रदीप सोनवणे,  कल्याण पश्चिम अल्पसंख्याक अध्यक्ष बशीर काझी कल्याण शहर संघटक नरेश मुस्ताक अन्सारी अजीम साखरकर अस्लम सोयान फिरोज खान इमरान बेग अकदास मजिद अहमद खान  हे पाठपुरावा करणार आहेत.

आदर्श भालेराव :- +91 80707 05552

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...