Thursday, 2 November 2023

शांतीसुखाचा संदेश प्रसारित करत ७६ वा निरंकारी संत समागम संपन्न !!


शांतीसुखाचा संदेश प्रसारित करत ७६ वा निरंकारी संत समागम संपन्न !!

*पुण्यासह महाराष्ट्रातील लाखो भाविकांचा सहभाग ; जगभरातून दररोज सुमारे १० लाख भाविक उपस्थित*

सर्वांशी प्रेमपूर्ण व्यवहार केल्यास अवघ्या विश्वात शांतीमय वातावरण निर्माण होईल - निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज

पुणे, दि. ०१ नोव्हेंबर : ‘‘सर्वांभूती परमात्म्याचे रूप पाहून प्रेमपूर्ण व्यवहार केल्यास विश्वात शांतीमय वातावरण निर्माण होईल.’’ असे प्रतिपादन निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी ७६ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या समापन सत्रामध्ये उपस्थित विशाल मानव परिवाराला संबोधित करताना व्यक्त केले.

‘शांती- अंतर्मनाची’ या मुख्य विषयावर आधारित हा तीन दिवसीय संत समागम निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा, हरियाणा येथे आयोजित करण्यात आला ज्यामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच जगभरातून लाखोंच्या संख्येने भाविक भक्तगण सहभागी झाले होते. पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून या संत समागमामध्ये सुमारे २ लाख भाविक भक्तगण सहभागी झाले होते ज्यामध्ये सुमारे २० हजार सेवादल स्वयंसेवकांचाही समावेश होता. दररोज सुमारे १० लाख भाविक या समागमामध्ये भाग घेत होते.

सद्गुरु माताजींनी  सांगितले, की विश्वामध्ये जी प्राकृतिक व सांस्कृतिक स्वरुपातील बहुमुखी विभिन्नता आहे ती सुंदरतेचे प्रतीक आहे. वास्तविक या संपूर्ण सृष्टीचा निर्माता हा निराकार परमात्मा असून सर्वांभूती त्याचेच रूप सामावले आहे. या परम तत्वाचा बोध झाल्यानंतर सहजच आपण एकतेच्या धाग्यात गुंफले जातो आणि आपला दृष्टीकोन विशाल होतो. मग आपण संस्कृती, खाणे-पिणे इत्यादिंच्या कारणावरुन असलेले समस्त भेदभाव विसरुन सर्वांशी प्रेमपूर्ण व्यवहार करु लागतो.  

मानवतेच्या नावे संदेश__

समागमाच्या पहिल्या दिवशी २८ ऑक्टोबर रोजी समागमाच्या शुभारंभ प्रसंगी निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी मानवतेच्या नावे दिलेल्या संदेशामध्ये म्हटले, की ‘‘विश्वामध्ये शांतीसुखाचे वातावरण निर्माण होण्यासाठी प्रत्येक मानवाच्या अंतर्मनात शांती यायला हवी.’’ 

समर्पणाची गरज__

पहिल्या दिवशीच्या मुख्य सत्राला संबोधित करताना उपस्थित लाखोंच्या जनसागराला संबोधित करताना सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज म्हणाल्या, की ईश्वराच्या प्रति समर्पित मनुष्यच मानवतेची यथार्थ सेवा करु शकतो आणि एक सच्चा मानव बनून अवघ्या विश्वासाठी कल्याणकारी जीवन जगू शकतो. सेवा वं समर्पणाची भावना अंगीकारल्यानेच जीवनात शांतीसुखाचा अनुभव येऊ शकतो तथापि, एखादी वस्तु, मान-प्रतिष्ठा किंवा उपाधिच्या प्रति जर आपली आसक्ती जोडली़ असेल तर आपल्या अंतर्मनात समर्पण भाव उत्पन्न होऊ शकत नाही. 

ईश्वराच्या प्रति कृतज्ञता बाळगा__

दुसऱ्या  दिवशी सायंकाळी सत्संगाच्या मुख्य सत्रामध्ये उपस्थित लाखोंच्या मानव परिवाराला संबोधित करताना सद्गुरु माताजी म्हणाल्या, की जर आपण शांतीसुखाचे जीवन जगू इच्छित असू तर ईश्वराची ओळख करुन त्याच्या प्रति निरंतर कृतज्ञता व्यक्त करत राहणे नितांत गरजेचे आहे

सद्गुरु माताजींनी पुढे प्रतिपादन केले, की जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर आपल्या मस्तकातील ज्या केंद्रातून कृतज्ञतेचा भाव प्रकट होतो त्याच केंद्रातून चिंतेचा भावही उत्पन्न होत असतो. आता कोणता भाव ग्रहण करायचा हे आपल्यावर अवलंबून आहे. जर आपण कृतज्ञतेचा भाव धारण करु तर निश्चितच आपल्या अंतर्मनात चालू असलेली चलबिचल हळू हळू संपून जाईल आणि त्या जागी केवळ शांतीसुखाचा निवास होऊ लागेल.

सेवादल रैली : 

समागमाच्या दुसऱ्या दिवसाचा प्रारंभ एका आकर्षक सेवादल रैलीने झाला.  या रॅलीमध्ये भारतभरातून व विदेशातूनही हजारोंच्या संख्येने निरंकारी सेवादलाचे बंधु-भगिनी सहभागी झाले. भारतातील पुरुष स्वयंसेवकांनी खाकी तर महिलांनी निळी-श्वेत वर्दी परिधान केली होती तर विदेशातील सेवादल बंधु-भगिनींसाठी निर्धारित केलेली वर्दी त्यांनी परिधान केली होती.

सेवादल रैलीला संबोधित करताना सद्गुरु माताजी म्हणाल्या, की समर्पित भावनेने केली जाणारी सेवाच स्वीकार्य असते. जिथे कुठेही सेवेची आवश्यकता असेल त्यानुसार सेवेचा भाव मनात ठेवून जेव्हा आपण सेवेमध्ये भाग घेतो तेव्हा ती सेवेची शुद्ध भावनाच महान सेवा गणली जाते. 

बहुभाषी कवि दरबार__

समागमाच्या अंतिम सत्रात ‘सुकून - अंतर्मन का’ (शांती अंतर्मनाची) या विषयावर आयोजित बहुभाषी कवी संमेलन समस्त भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनून राहिले. या कवी संमेलनामध्ये  देश-विदेशातून आलेले जवळपास २५ कवींनी आपल्या सुंदर भावना हिंदी, मराठी, पंजाबी, उर्दू, नेपाळी, आणि इंग्रजी भाषांच्या माध्यमातून सादर केल्या.
उल्लेखनीय आहे, की यावर्षी समागमाच्या पहिल्या दिवशी बाल कवी दरबार तर दुसऱ्या  दिवशी महिला कवि दरबार देखील आयोजित करण्यात आले ज्याचा भक्तगणांनी भरपूर आनंद प्राप्त केला. 

भगवान बाळू म्हात्रे यांचे दुःखद निधन !!

भगवान बाळू म्हात्रे यांचे दुःखद निधन !!

ठाणे, (शांताराम गुडेकर) :

          नांदिवली पंचानंद येथील रहिवाशी भगवान बाळू म्हात्रे यांचे दिनांक ३० ऑक्टोबर  २०२३ रोजी  वयाच्या ८९ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी दुपारी नांदिवली येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी सुमन, मुलगा भास्कर, विश्वनाथ, सदानंद, मुलगी उषा मधुकर भोईर ,सरस्वती वासुदेव भोईर ,जनता विजय पाटील, अनिता (जाई) अरविंद भोईर, गीता प्रभाकर पाटील, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी बुधवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२३ रोजी खिडकाळेश्वर मंदिर, कल्याण-शीळ रोड डोंबिवली पूर्व येते आयोजित करण्यात आला असून उत्तरकार्य (तेरावा विधी) मल्हार कृपा नांदिवली येतील राहत्या घरी करण्यात येणार असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून कळविण्यात आले.आहे. उत्तरकार्यनिमित्त दिनांक ११ नोव्हेंबर  रोजी सकाळी १० वाजता ह.भ.प. श्री. गुरुवर्य अशोक महाराज गायकवाड यांच्या सुश्राव्य कीर्तनरुपी सेवेचे आयोजन करण्यात आले आहे.

वाहतूक पोलिसांच्या अधिसूचनेवर खासदार श्रीकांत शिंदे यांचे स्पष्टीकरण !!

वाहतूक पोलिसांच्या अधिसूचनेवर खासदार श्रीकांत शिंदे यांचे स्पष्टीकरण !!


ठाणे , सचिन बुटाला : ठाणे वागळे इस्टेट लुईसवाडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मूळ घर लुईसवाडी, वागळे इस्टेट, ठाणे येथे असून मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे तिथे कुटुंबीयांसह राहतात. त्यांच्या घराकडे जाणारा सर्विस रोड बंद करण्यासाठी वाहतूक शाखेने अधिसूचना काढली.

त्यामुळे प्रसिद्ध माध्यम, सोशल मीडियावर मुख्यमंत्री व त्यांच्या कुटुंबीयांना ट्रोल करण्यात आले. त्यावरून खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले, मी किंवा आमच्या कुटुंबायानी ह्या संदर्भात कोणतीही विनंती किंवा सूचना केली नव्हती, तसेच अशा प्रकारची अधिसूचना काढण्यापूर्वी आम्हाला कल्पना दिली नव्हती. आमचे येणे- जाणे सुकर व्हावे यासाठी सर्वसामान्य जनतेचा रस्ता अडविण्याचा अधिकार आम्हाला मुळीच नाही. ते व्हीआयपी कल्चर आम्हाला मुळीच मान्य नाही. 

पोलिस आयुक्तांना खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्र लिहून “पोलिसांच्या या पत्रकबाजीमुळे आमच्या कुटुंबियांना जो मनस्ताप सहन करावा लागलाय याची कल्पना पत्रक काढणाऱ्या अधिकाऱ्यांना कदाचीत नसावी. त्यामुळे आम्हाला कोणतीही कल्पना नसताना परस्पर अशा पद्धतीने वाहतूक बदलाचे परिपत्रक काढणारे पोलिस उपायुक्त विनयकुमार राठोड यांच्यावर आपण तातडीने कठोर कारवाई करावी. तसेच, यापुढे अशा पद्धतीने कोणतेही परिपत्रक काढले जाणार नाही याबाबतची समज संबंधित अधिकाऱ्यांना आपण द्यावी” अशी मागणी केली आहे.


Wednesday, 1 November 2023

श्री गजानन विद्या प्रसारक मंडळ- निवोशी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा मुबंईत मोठ्या उत्साहात संपन्न !!

श्री गजानन विद्या प्रसारक मंडळ- निवोशी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा मुबंईत मोठ्या उत्साहात संपन्न !!
मुंबई, उदय दणदणे :

गुहागर तालुक्यातील निवोशी येथील सामाजिक/शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या श्री गजानन विद्या प्रसारक मंडळ (निवोशी) या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच रविवार, दिनांक-२९ ऑक्टोबर-२०२३ रोजी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली- मुबंई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. संस्थेचे प्रथम अध्यक्ष पद भूषविलेले निवोशी गावचे जेष्ठ कार्यकर्ते धाकटु होरंबे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून सदर कार्यक्रम आणि सभेला सुरुवात करण्यात आली.तद्नंतर संस्थेचे सचिव सुरेश होरंबे यांनी सन-२०२२-२३ चे कार्यअहवाल वाचन केले, तर संस्थेचे पदाधिकारी नारायण अवेरे, दिलीप होरंबे, मोहन धावडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर संस्थेचे विद्यमान अध्यक्ष दत्तात्रय होरंबे यांनी संस्थेची उद्दिष्टे, गावातील मुलांची शैक्षणिक प्रगती, भविष्यातील संस्थेची वाटचाल, विविध शैक्षणिक योजना, या विषयी आपल्या मनोगतातून प्रभावीपणे मौलिक मार्गदर्शन केले. अनेक विषयांवर आत्मचिंतन होत खेळीमेळीच्या वातावरणात, दोन सत्रात पार पडलेल्या ह्या सभेला मुंबईस्थित बहुसंख्य कार्यकर्ते/ पदाधिकारी व सदस्य उपस्थितीत होते, संस्थेचे सचीव सुरेश होरंबे यांनी उपस्थितांचे आभार मानत सभेची सांगता केली.

पवईतील हॉटेल टुरिस्ट बेकायदा १४ वाढीव खोल्या व स्टुडिओ बांधकामाविरोधात डॉ. माकणीकरांचा अमरण उपोषणाचा इशारा !!

पवईतील हॉटेल टुरिस्ट बेकायदा १४ वाढीव खोल्या व स्टुडिओ बांधकामाविरोधात डॉ. माकणीकरांचा अमरण उपोषणाचा इशारा !! 

मुंबई, (प्रतिनिधी) : शहरातील पवई येथील हॉटेल टुरिस्टमध्ये वाढीव बेकायदा बांधकाम करून १४ खोल्या व स्टुडिओ ची उभारणी करण्यात आलेली आहे, या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकाकडून मुंबईला पाणी पूरवणाऱ्या पवई तलावला प्रश्नचिन्ह उपस्थित करून एखादी दुर्दैवी घटना घडल्यास या प्रकरणाला पोलीस आणि पालिका प्रशासन जबाबदार राहील का? असा खडा सवाल रिपब्लिकन पक्ष संविधानचे सचिव डॉ. राजन माकणीकर यांनी केला आहे.

सदर हॉटेल कायमस्वरुपी बंद करण्यात यावे, - या बेकायदा बांधकामावर कारवाई झाली नाही व हॉटेल मालक अशोक रायला अटक नाही झाली तर अमरण उपोषण करण्याचा इशारा माकणीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात केला आहे             

पवईतील हॉटेल टुरिस्ट हे परदेशी देशी पर्यटकांसाठी खुले आहे त्या ठिकाणी अल्पवयीन जोडप्यांना काही तासांसाठी ठराविक भाडे आकारून वासना शमविण्यास खोली दिली जाते या हॉटेलचे मालक के अशोक राय यांनी तर कहरच केला आहे पोलीस आणि पालिका अधिकारी माझ्या खिशात आहेत असे सांगून त्याने प्रशासकीय यंत्रणेची खिल्ली उडवली आहे असाही माकणीकर यांनी गंभीर आरोप केला आहे.

हॉटेल टुरिस्टच्या मालकाने मागील खुल्या जागेवर बेकायदा बांधकाम करून स्टुडिओ उभारला आहे, माकणीकर यांनी सांगितले हा स्टुडिओ भाड्याने देऊन त्यातून लाखो रुपयांची माया जमवली जात आहे बाजूलाच तलाव आहे त्या पिण्याच्या पाण्यात कुणी काही टाकलं आणि एखादी दुर्घटना घडल्यास कोण जबाबदारी घेणार याचाही प्रशासनाने खुलासा करावा असेही माकणीकर यांनी  मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

महापालिकेकडे हॉटेल टुरिस्टचे ऑडिट बाकी असताना यामध्ये कोणत्या अधिकाऱ्याचा छुपा पाठिंबा आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी तसेच कर्तव्यात कसूर केल्याचाही पालिका अधिकाऱ्यांवर त्यांनी आरोप केला आहे, या विरोधात कठोर कारवाई न झाल्यास ५ नोव्हेंबर रोजी राजभवन येथे अमरण उपोषण करण्याचा इशारा रिपब्लिकन संविधान पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉ माकणीकर यांनी दिला आहे.

नागपूर येथील महायोगोत्सवात मुंबई जिल्हा समूहाचे रिद्मिक योगचे उत्कृष्ट सादरीकरण !!

नागपूर येथील महायोगोत्सवात मुंबई जिल्हा समूहाचे रिद्मिक योगचे उत्कृष्ट सादरीकरण !!

मुंबई, उदय दणदणे : 

रविवार दिनांक २९ रोजी, महाराष्ट्र योगशिक्षक संघचे महायोगोत्सव २०२३ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संथापक डॉ. हेडगेवार भवन मध्ये संपन्न झाले!

योगशिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर जिल्हा तर्फे नागपूर येथे महायोगोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले होते, महाराष्ट्र योगशिक्षक संघ हे राज्यातील योगशिक्षकांच्या हिताचे काम गेल्या अनेक वर्षापासून करत आहे. योगशिक्षकांच्या अनेक अडीअडचणी जाणून घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे हे महाराष्ट्र संघाचे मुख्य हेतू आहे. तसेच या महायोगोत्सव मध्ये अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार यांनी महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा अध्यक्षांसोबतच्या बैठकीत सर्वानुमते महाराष्ट्र राज्य मध्ये योग आयोग पारित व्हावे हे ठराव मंजूर करून घेतले, तसेच ह्या बाबतचे पत्रही लवकरच महाराष्ट्र योगशिक्षक संघाकडून शासनाकडे पाठविण्यात येईल अशी घोषणा केली.  दरवर्षी महायोगोत्सव साजरा करण्याचा मुख्य हेतू हाच असतो की राज्यातील सर्व योगशिक्षक एकाच छताखाली येऊन एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करतील व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील सदस्यांची ओळख होईल. 

ह्या दोन दिवसीय महायोगोत्सव मध्ये योग संबंधी अनेक व्याख्याने व योग आसनांचे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. महायोगोत्सवात एकूण १२०० योगशिक्षक सदस्य उपस्थित होते, उपस्थित सदस्यांसाठी प्राणायाम, ष्टकर्म, सूर्यनमस्कार घेण्यात आले, तसेच काही महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधून रिद्मिक योग, आर्टिस्टिक योग, मंगळागौर, पंढरीच्या वारीचे सादरीकरण करण्यात आले. मुंबई जिल्ह्यातर्फे महायोगोत्सव मध्ये मंगळागौरच्या माध्यमातून योग आसनचे अतिशय उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले, यावेळी मुंबई जिल्हा उपाध्यक्षा व योग नृत्य दिगदर्शिका हेमवंता जिजाबाई, उपाध्यक्षा श्वेता पिसाळ, साक्षी कलगुटकर तसेच सचिव सुषमा माने, विजयालक्ष्मी शर्मा, अमित चिबडे, वर्षा शर्मा कोषाध्यक्षा रिद्धी देवघरकर, लीगल प्रभारी ऍड. माया देसाई, मीडिया प्रभारी निलेश साबळे, संघटन सचिव विकास ओव्हाळ, सोशल मीडिया प्रभारी प्रशांत मकेसर, कार्यालय सचिव जयदीप कनकिया, राज्य महिला प्रकोष्ठ प्रभारी सदस्य शर्मिला चंदा, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष विश्वास शिर्के, पालघर जिल्हा अध्यक्ष आनंद मिश्रा, मुंबई जिल्हा सदस्य कृष्णकुमार शिंदे, विष्णू सुतार, चंद्रकांत सदाफुले, मीनल काळे, रोहिणी सोनावणे, शालिनी भंडारी, गेयता कदम, प्रियांका खाडे, राधिका केतकर, मीना घनवट  व महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे मुंबई जिल्हा अध्यक्ष संतोष खरटमोल उपस्थित होते.

रतनलाल सी बाफना ज्वेलर्सचे कर्मचारी राजेंद्र शेनपडू कोळी यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते प्रधान !!

रतनलाल सी बाफना ज्वेलर्सचे कर्मचारी राजेंद्र शेनपडू कोळी यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते प्रधान !!

मुंबई , प्रतिनिधी :  “जळगाव” येथील रतनलाल सी बाफना ज्वेलर्स नयनतारा अँड सन्स चे कर्मचारी व श्री गुरुदत्त बहुउद्देशीय संस्था, कांचन नगर, जळगावचे अध्यक्ष, राजेंद्र शेनपडू कोळी यांना कामगार मंत्रालयाचे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत सण २०२१-२०२२ चा राज्यस्तरीय गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार ३० ऑक्टोबर २०२३ रोजी गिरणा कामगार क्रीडा भवन प्रभादेवी मुंबई येथे महामहीम राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते देण्यात आला. 

यावेळी कामगार मंत्री मा. नामदार डॉ. सुरेश खाडे, मा. नामदार शालेय शिक्षण मंत्री दिपक केसकर, कामगार सचिव मा. विनिता वैद्य सिंगल, कल्याण आयुक्त रविराज इळवे यांची उपस्थिती होती. गुणवंत कामगार पुरस्कार राजेंद्र कोळी यांन पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या सोबत ज्ञानेश्वर कोळी, सोपान कापसे, शशिकांत भालेराव, हे स्टेजवर उपस्थित होते. 

सदरहू पुरस्कार हा राज्यस्तरीय असून या पुरस्काराचे स्वरूप रुपये २५००० चा धनादेश मानपत्र स्मृतीचिन्ह, पदक असे आहे. राजेंद्र कोळी यांनी कामगारांसाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी जनश्री विमा, आम आदमी विमा, ज्योती विमा, प्रधानमंत्री सुरक्षा विमा, व्यवसायिक व शैक्षणिक प्रशिक्षण उपक्रम, शिष्यवृत्ती, आरोग्य शिबिर, व्यसनमुक्ती कार्यक्रम, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रम, कामगार व निराधार महिलांसाठी योजनांचे मार्गदर्शन करणे त्यांना लाभ मिळवून देणे, कोरोना काळात यौद्धा म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे. इत्यादी उपक्रम राजेंद्र कोळी यांनी राबविलेले आहेत. 

पुरस्कार मिळाल्याबद्दल राजेंद्र कोळी यांचे अभिनंदन आमदार सुरेश मामा भोळे, आ. शिरीष दादा चौधरी, डॉ. उल्हासदादा पाटील माजी खासदार, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदिप पवार, रतनलाल सी बाफना ज्वेलर्स चे  संचालक तारादेवी बाफना, सुशील कुमार बाफना, सिद्धार्थ बाफना, सुनील बाफना, व्यवस्थापक प्रकाशचंदजी जैन, नथमलजी बाफना, मनोहर पाटील, महेश पाटील, लेखाधिकारी दिपक संचेती, कामगार कल्याण निरीक्षक भानुदास जोशी, केंद्र कामगार कल्याण केंद्र उपसंचालिका पुष्पलता जगताप, जॉब सर्च ग्रुपचे संचालक दिनेश सोनवणे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
 
संपर्क -
राजेंद्र कोळी (गुणवंत कामगार पुरस्कार विजेते) 
अध्यक्ष, (श्री गुरुदत्त बहु. संस्था, जळगाव)
          मो. नं. ९७६४२६५७२९

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...