Monday, 4 March 2024

समेळगाव येथे सखी ग्रुपच्या हळदी कुंकू सोहळ्यास १५०० महिलांनी घेतला सहभाग....

समेळगाव येथे सखी ग्रुपच्या हळदी कुंकू सोहळ्यास १५०० महिलांनी घेतला सहभाग....

*आशा सातपुते ठरल्या मानाचा पैठणीचा मानकरी*

नालासोपारा, प्रतिनिधी :- सखी ग्रुप यांच्या वतिने व मा.नगरसेवक धनंजय गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी हळदी कुंकू सोहळ्याचे समेळगाव नालासोपारा येथे आयोजन करण्यात आले होते. आजच्या या आनंदाच्या सोहळ्यास जवळपास १५०० महिलांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.

सदर कार्यक्रमात महिलांना त्यांचा कला गुणांना वाव मिळावा रोजच्या दगदगीतुन थोडासा आराम आणि मनोरंजन व्हावे म्हणुन विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. हळदी कुंकू कार्यक्रमात विविध स्पर्धा घेण्यात आल्या जसे की, उखाणे स्पर्धा, संगीत खुर्ची, लकी ड्राॅ घेण्यात आल्या. उखाणे स्पर्धेत प्रथम क्रमांक आशा सातपुते, व्दितीय क्रमांक कल्पना गवस, तृतीय क्रमांक रूहिता गमरे व प्रियंका कांबळे यांनी बक्षिसे पटकाविले संगीत खुर्ची स्पर्धेत प्रथम क्रमांक सुरेखा कारंडे व पैठणी चा मानकरी आशा सातपुते या विजेत्या ठरल्या.

विजेत्या स्पर्धकांना संस्थापक अध्यक्ष रूचिता नाईक व जेष्ठ पत्रकार रविंद्र माने यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
सोहळ्यास मा.नगरसेवक धनंजय गावडे, जेष्ठ पत्रकार रविंद्र माने, आर पी आय उपाध्यक्ष सुरेंद्र राऊत दत्त मंदिराचे ट्रस्टी हेमंत कर्णिक, लीनाताई कर्णिक रूचिदा माने यांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी अध्यक्षा रूचिता नाईक, रूचिदा माने, प्राजक्ता कापसे, आशा सातपुते, संगिता पासी, कांचन नवले, आशा आदिवाल, सपना सिंग, ममता गुजर, मोसमी कुन्नत, भाविका चावडा, रूहिता गमरे, प्रियंका कांबळे, वंदना ढगे, धनश्री शिंदे, रोशनी केमसे, अमृता सुळे, स्नेहल मडगावकर, निर्मला माने, दिपाली कानडे, गिता भाटी, समशाद पटेल, सुरेखा कारंडे, कल्पना गवस, श्रध्दा मोरे, दीक्षा नारकर, पुजा भंडारे, शालिनी सनंसे, कविता धनगर, श्रुती माने, वैष्णवी बेलेकर, प्रियंका काठले, प्रांजल खानविलकर, तन्वी कासारे, तनया कासारे यांनी मेहनत घेऊन सोहळा यशस्वी पार पाडला.

नालासोपारा निळेगावात शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उध्दघाटन....

नालासोपारा निळेगावात शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उध्दघाटन....

*महिला व युवकांचा प्रवेशाने वातावरण शिवसेनामय*

नालासोपारा, प्रतिनिधी : नालासोपारा पश्चिम मधिल निळेगाव  येथे शिवसेना जनसंपर्क कार्यालय उध्दघाटन व कार्यकर्त्यानच्या जम्बो प्रवेशाने येथील वातावरण शिवसेनामय झाले. अनेक राजकीय पक्षांना भगदाड पडत असताना दुसरीकड़े शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग ही सुरु आहे.

महाराष्ट्राचे राज्याचे *मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब* यांचा विचाराने  प्रेरित होऊन आज निळेगाव मधिल महिला व युवा कार्यकर्ते यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला. शिवसेना शहरप्रमुख आनंद नगरकर व शिवसेना महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक यांच्या हस्ते महिलांचे प्रवेश करून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

राजकारणातील घडामोडींनी आता वेग घेतला आहे. शिवसेना पक्षाने  पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आपली बांधणी सुरु केली आहे. यावेळी जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर यांनी शिवसेना नेहमीच समाजकारणाला महत्व देते असे सांगून या नालासोपारा शहरातील समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले.  शिवसेनेची घोडदौड अशीच सुरु राहणार असून येणार्‍या सर्व निवडणुकीत शिवसेना चांगल्या प्रकारे यश प्राप्त करेल असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी शिवसेना लोकसभा समन्वयक नविन दुबे, अल्पसंख्यक जिल्हाप्रमुख शाहरूख भाई, उपतालुकाप्रमुख अजितभाऊ खांबे, उपतालुकाप्रमुख अतुल पाटील, उपशहरप्रमुख महेश निकम, शहर सचिव राजेश उत्तेकर, विभागप्रमुख दानिश करारी, विभागप्रमुख जयराम पंडीत व  शाखा प्रमुख, महिला संघटक, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते..

Sunday, 3 March 2024

मार्लेश्वर क्रिकेट क्लब आयोजित मार्लेश्वर चषक-२०२४ विजेतेपदचा मानकरी जय माता दि क्रिकेट क्लब !!

मार्लेश्वर क्रिकेट क्लब आयोजित मार्लेश्वर चषक-२०२४  विजेतेपदचा मानकरी जय माता दि क्रिकेट क्लब !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

        मार्लेश्वर क्रिकेट क्लब ने विलेपार्ले प्लेग्राउंड येथे दिनांक ३ मार्च २०२४ रोजी मार्लेश्वर चषक चे आयोजन केले होते. क्रिकेट स्पर्धेसाठी विशेष सहकार्य  भाजपा नगरसेवक श्री.अभिजितजी सामंत यांचे लाभले. संगमेश्वर तालुका ओबीसी तालुकाध्यक्ष श्री.अमित रेवाळे यांच्या हस्ते कर्णधार अनिल पाटील यांच्या जय माता दि क्रिकेट संघाला विजेता चषक आणि रोख दहा हजार रुपये देऊन गौरवीण्यात आले. दिवेश जाधव यांच्या स्ट्रायकर संघाला उपविजेता पदावर समाधान मानावे लागले. उपविजेता स्ट्रायकर संघाला रोख सात हजार आणि चषक देऊन गौरविण्यात आले. मालिकावीर म्हणून  जय माता दि संघाचा रंजित याला चषक, उत्कृष्ट फलंदाज स्वप्नील, उत्कृष्ट गोलंदाज स्ट्रायकर संघाचा साजिद याला चषक देऊन गौरविण्यात आले. सदर स्पर्धेसाठी मेहनत मार्लेश्वर क्रिकेट संघाच्या सर्व खेळाडूंनी केली. विशेष विजय एरोलो यांच्या अथक प्रयत्नाने स्पर्धा पार पडली. कोकणातील सर्व सामान्य तरुण मुंबई सारख्या महानगरात अश्या आर्थिक पाठबळाशिवाय उत्तमरीत्या क्रिकेट स्पर्धा राबणारे अजित गोरूले हे क्रिकेटवेडे तरुण घडणे कठीणच असे अमित रेवाळे यांनी श्री. गोरूले यांचे कौतुक केले. सूत्रसंचालन करताना श्री.अजित गोरुले यांनी पंच म्हणून कामगिरी करणाऱ्या आणि स्कोरर आणि स्वयंसेवक म्हणून जबाबदारी यशस्वी रित्या पार पाडल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

जागतिक महिला दिनानिमित्त महिला सन्मान मॅरेथॉन संपन्न !!

जागतिक महिला दिनानिमित्त महिला सन्मान मॅरेथॉन संपन्न !! 

**** आजी माजी आमदारांच्या हस्ते बक्षीस वितरण

कल्याण, (संजय कांबळे) : जीवनदीप शैक्षणिक संस्था जागतिक महिला दिनानिमित्त दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतात यावर्षी ग्रामीण भागातील महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समस्त महिला सन्मानार्थ, जीवनदीप शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून  टिटवाळा येथे महिला सन्मान मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉन चे उदघाटन मुरबाड विधानसभेचे आमदार किसनजी कथोरे व कल्याणचे माजी आमदार  नरेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

टिटवाळा येथे महिला मॅरेथॉन मध्ये जवळपास 300 हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला होता. सहभागी महिलांचे 18 ते 30 वयोगटातील 'गट-अ' आणि 30 पेक्षा अधिक वयोगटातील 'गट ब'असे दोन गट करण्यात आले होते. यावेळी सहभागी महिलांना मोफत टी-शर्टचे वाटप करण्यात आले. या मॅरेथॉनमध्ये गट-अ मध्ये प्रथम क्रमांक संगीता जंगले व द्वितीय क्रमांक तेजस्वी चौधरी यांनी पटकावला तर तृतीय क्रमांक रियानी गायकर व उत्तेजनार्थ समीक्षा चौधरी आणि वैष्णवी म्हात्रे यांनी पटकावला. तसेच गट ब मध्ये प्रथम क्रमांक दर्शना मगर व द्वितीय क्रमांक वृषाली मानूसकरे यांनी पटकावला तर तृतीय क्रमांक सुशीला बांभेरे व उत्तेजनार्थ मीनाक्षी मगर आणि अनिता कुंदे यांनी पटकावला. विजेत्या महिलांना रोख रक्कम, पैठणी साडी आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विजय सोनार, उपप्राचार्य हरेन्द्र सोष्टे यांनी केले. या कार्यक्रमास जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे, संचालक प्रशांत घोडविंदे, सौ. स्मिता घोडविंदे, प्राचार्य डॉ. के.बी कोरे तसेच प्रकाश गाडे (भाजपा सोशल मीडिया प्रमुख) योगेश धुमाळ (कृषि उत्पन्न बाजार समिती कल्याण),  राजाभाऊ चौधरी, भूषण जाधव, सुनिल सूरोशी, चंद्रकांत भोईर, अनंत डोरलेकर, प्रमोद नांदगावकर, सौ.वनिता जाधव (सरपंच वासुंद्री), सौ.निकिता पाटेकर (महिला बचत गट), श्री.मयूर सुरोशी (सरपंच रायते), सौ दिपाली बुटेरे (सरपंच पोई), जयराम लोणे, सुयोग मगर (माजी सरपंच घोटसई), दिलीप बुटेरे, जयेश शेलार (सामाजिक कार्यकर्ते) आणि इतर उपस्थित महिलांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी यांचे महत्त्वाचे योगदान लाभले.

Saturday, 2 March 2024

आशा कर्मचाऱ्यांची निराशा होणार नाही, मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने आंदोलन स्थगीत !!

आशा कर्मचाऱ्यांची निराशा होणार नाही, मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने आंदोलन स्थगीत !!

आता जीआर काढा - कॉम्रेड अमृत महाजन 

चोपडा, प्रतिनिधी... महाराष्ट्र राज्यातील ७० हजार आशा व ४५०० गटप्रवर्तक या कर्मचाऱ्यांनी १८ ऑक्टोंबर २३ ते आठ नोव्हेंबर २३ या कालावधीपर्यंत आपल्या मागण्यांसाठी संप केला होता. या संपातील मागण्या महाराष्ट्र राज्य सरकारचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मध्यस्थी करून आशांना किमान १० हजार रुपये गटप्रवर्तक यांना १५ हजार रुपये पर्यंत शासकीय मानधन अधिक कामाचा मोबदला जो असेल तो मान्य करून आनंदाचा धक्का दिला होता, याच्याबरोबर जे एस वाय लाभ घेताना एपीएल बीपीएल करण्यात येणार नाही भाऊबीज दोन हजार रुपये दिवाळी यादी देण्यात येतील. आरोग्यवर्धिनीच्या मोबदला मिळेल गटप्रवर्तक यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात येईल अशा आशयाच्या  मागण्याही मंजूर केल्या होत्या प्रत्यक्षात दोन महिने वाट पाहूनही मागण्यावर जीआर न निघाल्यामुळे आशा कर्मचाऱ्यांनी १२ जानेवारीपासून एक मार्चपर्यंत बेमुदत संप पुकारला. तसेच ०९ फेब्रुवारीपासून ०१ मार्चपर्यंत आजाद मैदानावर राज्यातील आशांनी आशा व गटप्रवर्तक कर्मचारी संघटना कृती समितीचे नेते कॉम्रेड एम ए पाटील राजू देसले, आयटक सुमन पुजारी, आयटक  भगवानराव देशमुख, शोभा शमीम सिटु ,आनंदी अवघडे आदींचे नेतृत्वाखाली आझाद मैदानावर मुंबईला ठाण मांडले. 

या संपात मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी अंदाजपत्रकीय अधिवेशनाचा समावेश समारोप करताना आशांची निराशा केली जाणार नाही अशी घोषणा केल्याने आशा कर्मचाऱ्यांचा संप तहकूब करण्यात आलेला आहे, तथापि सरकारच्या आशा व गट पुरवठा मागण्यांच्या प्रश्न मागील आश्वासनाच्या अनुभव लक्षात घेता या घोषणेने आशा कर्मचाऱ्यांमध्ये सांशकता कायम आहे तरी सरकार जीआर काढत नाही तो पर्यंत या घोषणेला काहीच किंमत नाही अशी आशा गटप्रवर्तक यांची खात्री झाली असून त्यांचेतील असंतोष मिटलेला नाही तरी माननीय मुख्यमंत्र्यांनी आचारसंहिता अगोदर घोषणेनुसार  परिपत्रक काढावेत अशी मागणी करणारे पत्रक जिल्हा आशा व गटप्रवर्तक संघटनेचे अध्यक्ष काँ अमृत महाजन, सचिव सुलोचना साबळे, मीनाक्षी सोनवणे, प्रतिभा पाटील, भारती कोळी, विद्यादेवी बाविस्कर, जाहिरा फारुकी, गटप्रवर्तक संघटनेच्या सुनिता ठाकरे, मनिषा बैरागी यांनी काढलेले आहे या मागणीच्या पृष्ठतेसाठी आशा व गट प्रवर्तक संघटने तर्फे लवकरच आंदोलन केले जाईल असा इशारा दिलेला आहे

Friday, 1 March 2024

वंदना विष्णू गुडेकर यांचे निधन

वंदना विष्णू गुडेकर यांचे निधन 
---------------------------------------
मुंबई - प्रतिनिधी 

           रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर परिसरातील मु. पो. बोंड्ये गावच्या मूळ राहिवाशी व कासार कोळवण गावचे माजी पोलीस पाटील स्व.रामचंद्र करंबेळे व चंद्रकांत करंबेळे यांची बहीण वंदना विष्णू गुडेकर (वय-६० वर्ष) यांचे  शुक्रवार दि.१ मार्च २०२४ रोजी अल्पशा आजाराने ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये पहाटे जोगेश्वरी येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्यामुळे त्यांचा परिवार वरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना दुःख पचविण्याची शक्ती परमेश्वर देवो गुडेकर कुटूंबाच्या दुःखात बोंड्ये गावचे सर्व नागरिक त्याजबरोबर बोंड्ये गावचे मुंबईस्थित ग्रामस्थ व कासार कोळवण हे माहेर असल्यामुळे  दोन्ही गावचे पोलीस पाटील व भाऊ, भाचे मंडळी, आंगवली रेवाळे वाडी गावाचे दत्ताराम लक्ष्मण गुडेकर, तुकाराम ल. गुडेकर, शांताराम ल. गुडेकर व बोंड्ये गावचे सर्व गुडेकर घरची दीर मंडळी, माहेवाशिनी व इतर नातेवाईक मंडळी, समाजसेवक मोहन कदम आणि परिवार, करंबळे परिवार त्यांच्या दुःखात सहभागी आहेत. अंत्यविधीमध्ये मुंबई /गाव मधील नागरिक मोठ्या संख्येने त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सहभागी झाले होते. त्याचा अंत्यविधी संस्कार जोगेश्वरी पूर्व हायवे स्मशान भूमी येथे पार पडला. सर्व स्थानिक राहिवाश्यानीही मोठ्या संख्येने  उपस्थित राहून सहकार्य केले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करून सर्वानी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. समाजसेवक मोहन कदम यांनी त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, नातवंडे व गुडेकर हे मोठे परिवार आहे. त्यांचे उत्तर कार्य मंगळवार दि.१२ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबईत राहत्या घरी होणार आहे.

बारामतीत शासकीय दौऱ्यावर येणाऱ्या मा.मुख्य मंत्री व उप मुख्य मंत्र्यांना मा.शरद पवारांना कडून अतिथ्य भोजनाचे निमंत्रण !!

बारामतीत शासकीय दौऱ्यावर येणाऱ्या मा.मुख्य मंत्री व उप मुख्य मंत्र्यांना मा.शरद पवारांना कडून अतिथ्य भोजनाचे निमंत्रण !!

** अखेर दुसऱ्या निमंत्रण पत्रिकेत मा.शरद पवारांचे नाव.

भिवंडी, (कोपर), दिं,१, अरुण पाटील :
          बारामती दौऱ्यावर येणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गोविंदबाग निवासस्थानी अतिथ्य भोजनाचे निमंत्रण दिले आहे. शरद पवार यांची आणखी एक गुगली राज्यभरात चर्चेचा विषय बनला आहे. 
           शरद पवार यांनी यासंबंधी मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात शरद पवार म्हणतात, शनिवारी आपण बारामती येथे शासकीय दौऱ्यानिमित्त येत असल्याचे समजले. या शासकीय कार्यक्रमप्रसंगी संसद सदस्य या नात्याने मला आणि सुप्रिया सुळे यांना उपस्थित राहायला आवडेल. तसेच यादिनी महारोजगार मेळाव्याचे आयोजन मी संस्थापक अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान येथील मैदानात करण्यात येत असल्याने संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी आपले संस्थेच्या प्रांगणात यथोचित स्वागत करू इच्छितो.
            आपण मुख्यमंत्रिपदी झाल्यानंतर बारामती शहरात प्रथमच येत आहात, याचा मला मनोमन आनंद आहे. बारामती येथील गोविंदबाग या माझ्या निवासस्थानी अतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्यावा, असे मी आपणास दूरध्वनीवरून निमंत्रण या पूर्वीच दिले आहे. मंत्रि मंडळातील मेळाव्यानंतर सहकाऱ्यांसह आपण या निमंत्रणाचा स्वीकार करावा, असे पवार यांनी पत्रात म्हटले आहे. या पत्राची प्रत मा.शरद पवार यांच्याकडून फडणवीस व अजित पवार यांनाही देण्यात आली आहे.
            मात्र जुलै २०२३ मध्ये मा.शारद पावरांन  विरोधात जाणारे मा.अजित पवार या सस्नेह भोजनाला जाणार की नाही ते महत्त्वाचे ठरणार आहे. बारामतीत आयोजित  शनिवारी दिलेली महारोजगार मेळावा  कार्यक्रम पत्रिकेत मा. शरद पवार यांचे नाव नमूद नव्हतं त्या नंतर सरकारवर टीका करण्यात येत होती .ते राज्याचे खासदार असून ते राज्य सभेचे प्रतिनिधित्व करतात.या कार्यक्रमाला राज्यातील लोक प्रतिनिधींना निमंत्रण नाही असा त्याच अर्थ होतो,असे मा. सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते.त्या नंतर सरकारने सारवासारव करत दुसरी नवीन निमंत्रण पत्रिका काढून त्यात  मा.शरद पवार यांचे नाव टाकले आहे.
             बारामतीत शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना रंगला आहे. त्यात आता शरद पवार यांनी विद्या प्रतिष्ठानमध्ये स्वागत करण्यास आनंद होईल आणि गोविंदबागेत आतिथ्य भोजनाचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांना व दोन्ही उप मुख्यमंत्र्यांना दिले आहे. त्यांच्या या नव्या गुगलीमुळे पुन्हा उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे निमंत्रण स्वीकारतील कि नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

नवतरुण मित्र मंडळ पाणजेच्या वतीने वृक्षारोपण व स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न !!

नवतरुण मित्र मंडळ पाणजेच्या वतीने वृक्षारोपण व स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न !! ४२ वर्षे परंपरा जोपसणारे मित्र मंडळ. उरण दि २८...