Friday, 6 June 2025

शिवकृपा कंपनी बंद झाल्यास स्थानिकांचा रोजगार अडचणीत !!

शिवकृपा कंपनी बंद झाल्यास स्थानिकांचा रोजगार अडचणीत !!

* सर्व नियमांचे पालन करून कंपनी सुरू ठेवावी हा खासदार व आमदारांची भूमिका

वाडा, प्रतिनिधी : वाडा तालुक्यातील तोरणे गावात 2008 पासून कार्यरत असलेली शिवकृपा अलाईज कंपनी ही गेल्या १७ वर्षांपासून स्थानिक नागरिकांना सातत्याने व स्थिर रोजगार उपलब्ध करून देणारी एक जबाबदार औद्योगिक संस्था आहे. या कालावधीत कंपनीने संबंधित सर्व शासकीय परवानग्या, ग्रामपंचायतीचे NOC आणि पर्यावरणविषयक मान्यताही वेळोवेळी प्राप्त केल्या आहेत.

ग्रामपंचायतीने २००८ साली कंपनीस NOC प्रदान केली होती, त्याच ग्रामस्थांनी आजवर कंपनीकडून विविध स्वरूपातील सेवा शुल्क, कामाचे मोबदले आणि इतर आर्थिक व्यवहार स्वीकारलेले आहेत, याचे अधिकृत दस्तऐवज कंपनीकडे सादर करण्यात आले आहेत.

अलीकडील काही दिवसांपासून काही व्यक्तींनी कंपनीविरोधात प्रदूषण आणि इतर कारणांवरून अर्ज करून कंपनीच्या कार्यप्रणालीत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. परिणामी, कंपनीच्या नियमित कामकाजावर व स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या रोजगारावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार  दौलतजी दरोडा व आमदार शांताराम मोरे यांनी सदर कंपनी सुरू राहावी व स्थानिकांचा रोजगार सुरळीत राहावा, यासाठी प्रशासनाला पत्र दिली आहेत.

खासदार व आमदारांनी परिस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती घेऊन स्पष्टपणे सांगितले की – "स्थानिक रोजगार बंद होणे योग्य नाही. सर्व नियमांचे पालन करून कंपनी सुरू राहावी, ही भूमिका घेतली आहे.

शिवकृपा अलाईज कंपनी ही रोजगारनिर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावत असून, ती कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर कार्य करत नाही. त्यामुळे ही कंपनी सुरळीत राहावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Tuesday, 3 June 2025

नालासोपारा टाकीपाडा येथे अनधिकृत बांधकाम सर्रास सुरूच...

नालासोपारा टाकीपाडा येथे अनधिकृत बांधकाम सर्रास सुरूच...

***अनधिकृत बांधकाम करणारा भुमाफीया ओवेस पटेल ला महापालिकेचे संरक्षण...

नालासोपारा, प्रतिनिधी : नालासोपारा पश्चिम येथिल टाकी पाडा करारी बाग येथिल इंदानी तलाव भोवती अनधिकृत बांधकाम सर्रास सुरूच आहे  

.                                                    ओवेश पटेल 

भुमाफीया ओवेस पटेल यांच्यावर अनधिकृत बांधकामाबाबत MRTP अंतर्गत गुन्हे दाखल असताना हि पाच मजली भव्य अनधिकृत इमारत उभी करण्यात आली आहे. या अनधिकृत बांधकांमावर कारवाई करण्याबाबत मागणी करून हि सहाय्यक आयुक्त अश्विनी मोरे कारवाई करण्यास टाळाटाळ करत असुन अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्याचे काम करत आहेत.

.                                   सहायक आयुक्त (प्रभाग क्षेत्र - ई)

इंदानी तलाव भोवती अनधिकृत बांधकाम उभे केल्यामुळे बांधकाम व्यवसायिक पटेल यांच्यावर MRTP अंतर्गत गुन्हे दाखल करून हि त्याठिकाणी ५ मजली भव्य अनधिकृत इमारत उभी करून सांडपाणी व इतर कचरा या तलाव सोडल्याने तलावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
यामुळे येथिल महापालिकेचा इंदानी तलावाचे लिलाव टेंडर कोणीच घेण्यास तयार नसल्याने महापालिकेचे दरवर्षी लाखो रूपयांचे नुकसान होते. 

तलावाचे संरक्षण व सुशोभिकरण करणे हि महापालिकेची जबाबदारी असताना हि महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले आहे  प्रभाग समिती ई मध्ये  अनधिकृत बांधकामाचे जाळे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशा बांधकामांवर प्रशासनाचा अंकुश न राहिल्याने शहरात बेकायदा ईमारती, गाळे, मोबाईल टॉवर उभारले जात आहे. नियमांची पायमल्ली करून बांधकामे केली जात आहेत, 
प्रभाग समिती ई मधिल अनधिकृत बांधकामे रोखण्यात आणि बिल्डरांवर कारवाई करण्यात वसई विरार महानगरपालिकेला सपशेल अपयश आल्याने रोज अनधिकृत बांधकाम वाढत चालले आहे.

प्रभाग समिती ई  क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत सर्रास सुरू आहेत. अनधिकृत बांधकामांवर कोणतेही ठोस कारवाई होत नसल्याने नागरीकांमधुन तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. केवळ गुन्हे दाखल न करता पाच मजली इमारत जमीनदोस्त करून शहराला लागलेली कीड समुळ नष्ट करा. अनेकदा अशी बांधकामे वाचविण्यासाठी नागरिकांना त्याठिकाणी आणले जाते. नागरिक रहायला आल्यामुळे मानवतेच्या भूमिकेतून कारवाई करता येत नाही म्हणूनच अशा बांधकामांचे पेव फुटले आहे. त्यामुळे अशा बांधकामांमध्ये नागरिक रहायला येण्याआधी कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरीकांनी केली आहे.

शिक्षण क्षेत्रातील सेवापुर्ती सोहळ्यानिमित्त कैलास रघुनाथ पाचरणे यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला सत्कार !!

शिक्षण क्षेत्रातील सेवापुर्ती सोहळ्यानिमित्त कैलास रघुनाथ पाचरणे यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला सत्कार !!

पुणे, स्नेहा उत्तम मडावी (प्रतिनिधी) :

कैलास भाऊ पाचारणे यांनी निस्वार्थीपणे गेले छत्तीस वर्ष शिक्षण क्षेत्रात जी सेवा केली त्यासाठी त्यांच्या या शिक्षण क्षेत्रातील सेवापुर्ती सोहळ्यानिमित्त मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा ही दिल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील सर होते. तसेच यावेळी उपस्थित सर्व मान्यवर मा. माजी खासदार आढळराव पाटील, खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. बाबाजी शेट काळे, बांधकाम समितीचे माजी सभापती मा. मंगलदास बांदल, चाकण शिक्षण मंडळाचे विश्वस्त मा. मोतीलालजी सांकला, चाकण शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अविनाजी आरगडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्रजी पवार गट), महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा सौ. राजमलाताई बुट्टे पाटील यांचे विद्यमान संचालिका, राजगुरूनगर सहकारी बँक ली व शरद क्रीडा सांस्कृतिक प्रतिष्ठान, पुणे सौ. अश्विनी पाचारणे आभार मानले.

सहभागी संस्था व मान्यवर, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य, प्राचार्यगण - चाकण महाविद्यालयाचे प्राचार्य, पाबळ महाविद्यालयाचे प्राचार्य,‌ हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पिंगळे सर, साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिभाऊ जरे सर, शैक्षणिक संघटनांचे मान्यवर, महाराष्ट्र राज्य शिक्षक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मा. प्रकाशजी म्हसे, महासचिव मा. त्रिभुवन सर, विविध महाविद्यालयांतील प्रशासकीय कर्मचारीवर्ग, खेड तालुक्यातील विविध राजकीय, शैक्षणिक व सामाजिक संस्थांचे सर्व प्रतिनिधीगण, इ. सर्व उपस्थित होते.

Monday, 2 June 2025

गृहनिर्माण संस्थेसाठी चे मार्गदर्शन शिबिर संपन्न !!

गृहनिर्माण संस्थेसाठी चे मार्गदर्शन शिबिर संपन्न !!

कल्याण, (प्रतिनिधी सुनील इंगळे) :

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ग्राहक संरक्षण कक्षा चे ठाणे जिल्हा ग्रामीण संघटक प्रथमेश पुण्यर्थी यांनी आयोजित केले होते, यामध्ये शंभर ते दीडशे विविध गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी सहभाग घेतला होता सदर शिबिरात डॉ. सिद्धार्थ मोरे प्रादेशिक संचालक श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार यांनी कम्युनिकेशन स्किल डेव्हलपमेंट वर अत्यंत सुंदर प्रकारे विषय सादर केला. 

कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेचे अध्यक्ष  ॲडव्होकेट प्रकाश जगताप यांनी गृहनिर्माण संस्थेतील, त्यातील सभासदांना येणाऱ्या विविध प्रश्न, अडचणी सादर करून विविध प्रश्नांना योग्य ती उत्तरे दिली, सरते शेवटी त्यांनी ग्राहक संरक्षण कक्षासाठी एक पंधरा-वीस वकिलांचे पॅनल बनवण्याचा सल्ला देऊन त्यासाठी सदर वकील व मी निस्वार्थ सेवा देण्याचे आश्वासन देऊन त्यासंदर्भात कसे आणि कशाप्रकारे नियोजन करावे याचे सर्व अधिकार प्रथमेश  पुण्यर्थी यांना दिले.

त्यानंतर दुसरे प्रमुख अतिथी  सुधाकर पाटील जे प्रमाणित लेखा प्रशिक्षक, गृहनिर्माण संस्थेतील पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका, शेअर सर्टिफिकेट्स कसे ट्रान्सफर करावे  त्याबाबतीत काही नियम आहेत, सोबतच सभासदांच्या पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या आदी बाबत सखोल माहिती दिली.

या शिबिरात असोसिएशनचे संस्थापक व गृहनिर्माण संस्था पुनर्विकास प्रकल्प म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट पीएमसी चे सल्लागार श्री. राजन शुल्क यांनीही डेव्हलपमेंट, कस्टर्ड प्रोजेक्ट याविषयी सखोल माहिती दिली सध्या रीडेव्हलपमेंटचा धुमाकूळ सर्वदूर पोहोचला आहे तो आपण बिल्डरला देणे अथवा स्वतःही डेव्हलपमेंट करणे या दोन्ही बाबतीतील एडवांटेजेस व डिसऍडवांटेज म्हणजे त्या संदर्भातील फायदे आणि तोटे समजावून सांगितले, व उपस्थित ग्राहकांना म्हणजे फ्लॅट धारकांना जे प्रश्न उद्भवत होते त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली.

सदर कार्यक्रमास कक्ष विभाग संघटक जयवंत टापरे, उदयभान सिंग व सौ. दक्षता तांबे यांनी प्रथमेश पुण्यार्थी  त्यांच्यासोबत सदर शिबिर संपन्न होण्यासाठी विशेष मेहनत घेतली. 

यावेळी जेष्ठ पत्रकार सुनील इंगळे यांनी असे मत व्यक्त केले की काही  सोसायटी असतात त्यामध्ये काही सभासद तात्पुरत्या स्वरूपात पद घेतात आणि स्वतःच्या घरामध्ये अनधिकृत तोडणी आणि जोडणी चे कार्य करीत असतात, आपल्यावरील थकबाकी सुद्धा माफ करून घेतात आणि ते केल्यावरती पद सोडून नामा निराळे राहतात आणि त्यावेळी चे सोसायटीचे पदाधिकारी त्यांच्याविषयी रजिस्टर निबंधकाकडे किंवा कोर्ट केसेस कडे कंप्लेंट करण्याविषयी अनुकूल नसतात कारण त्या झंझट मध्ये कोण पडेल हा सगळा प्रॉब्लेम असतो त्याविषयी या चर्चासत्रामध्ये चर्चा झाली.

आभार प्रदर्शनामध्ये श्री प्रथमेश पुण्यार्थी,कक्ष जिल्हा संघटक ठाणे ग्रामीण यांनी असे आवाहन केले आहे की फ्लॅट धारकांना कोणत्याही प्रकारची सेवा अथवा माहिती हवी असल्यास आपल्या ग्राहक संरक्षण कक्षाशी  संपर्क साधावा आपणासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ग्राहक संरक्षण कक्ष नेहमी दक्ष असेल.

हिंद भुमी टाईम्स च्या वतीने संपादक डाॅ.किशोर पाटील यांना राष्ट्रीय पत्रकार सन्मान रत्न पुरस्कार २०२४ प्रदान !

हिंद भुमी टाईम्स च्या वतीने संपादक डाॅ.किशोर पाटील यांना राष्ट्रीय पत्रकार सन्मान रत्न पुरस्कार २०२४ प्रदान !
 

मुंबई, (शांताराम गुडेकर) : हिंदी पत्रकार दिनानिमित्त  हिंद भुमी टाईम्स चे संपादक तथा समाजसेवक श्री.यूसुफ मन्सूरी
यांच्याकडून 2024 मध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना विविध क्षेत्रांतील पुरस्कार देऊन भिवंडी धामणकर नाका येथील सिटी सेंटर मॉलमध्ये उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील अग्रगण्य दै.स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील यांना राष्ट्रीय पत्रकार सन्मान रत्न पुरस्कार 2024 हिंद भुमी टाईम्स चे संपादक तथा समाजसेवक श्री.यूसुफ मन्सूरी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शहरात सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना, ज्यामध्ये डॉक्टर, पोलीस, पत्रकार, शिक्षक आणि वकील यांच्यासह इतरांचा सन्मान करणे आणि त्यांच्या कार्याला लोकांसमोर आणणे हा होता, जेणेकरून इतरांनाही सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा भिवंडी युवा मोर्चा अध्यक्ष राजू चौघुले, माजी नगरसेवक वसीम अंसारी, समाजसेवक अकरम मन्सूरी, पोलीस उपनिरीक्षक अनंता वाघ, वकील खदीजा खान (मुंबई उच्च न्यायालय), माहेनूर खान (मुख्याध्यापिका), पत्रकारांमध्ये डाॅ. श्री.किशोर बळीराम पाटील संपादक दै.स्वराज्य तोरण, फिरोज मेमन, अमृत शर्मा, आचार्य सुरजपाल यादव, संदीप गुप्ता, सोहेल अंसारी, सय्यद नकी हसन यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार यूसुफ मन्सूरी यांनी केले होते तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सज्जाद अख्तर यांनी केले.

विरार येथे कुणबी समाजाचा भव्य रक्तदान शिबिर मोठया उत्साहात संपन्न !!

विरार येथे कुणबी समाजाचा भव्य रक्तदान शिबिर मोठया उत्साहात  संपन्न !!

*** सभासदांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुणबी बांधवांनी जपला जनसेवेचा वसा

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

             कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई, विभागीय शाखा विरार, संलग्न कुणबी युवा विरार आणि कुणबी महिला मंडळ विरार यांच्या माध्यमातून विभागीय शाखा विरार चे खजिनदार  शैलेश बामणे, शाखेचे सहसचिव सिताराम नवाले तसेच पर्यावरण मित्र बहुद्देशीय संस्था, भारतचे अध्यक्ष विजय चोघळा यांच्या वाढदिवसानिमित्त विभागीय शाखा विरारचे अध्यक्ष किशोर भेरे आणि कुणबी रणरागिणी मा.नगरसेविका तथा कुणबी महिला मंडळ विरारच्या अध्यक्षा सौ. संगीताताई भेरे, कुणबी युवा अध्यक्ष अविनाशजी पाचकले यांच्या मार्गदर्शनाने बोरिवली ब्लड बँक,दहिसर यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर रविवारी ( १ जून) ज्युपिटर स्कूल, मनवेल पाडा येथे पार पडले. 
                 या कार्यक्रमाला विभागातील रक्तदात्यांनी सकाळपासूनच उत्फुर्त प्रतिसाद दिला. रक्तदात्याच्या प्रतिसादाने दिवसभरात १५० पेक्षा जास्त रक्त दात्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १०१ रक्त दात्यांनी यशस्वी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. या कार्यक्रमाला नालासोपारा विधानसभेचे मा.आमदार क्षितिज ठाकूर यांची खास उपस्थिती लाभली.कुणबी समाजोन्नती संघ, मुंबईचे सरचिटणीस  कृष्णा वणे, कुणबी युवा मुंबईचे सरचिटणीस संतोष कांबळे, समाजसेवक कुळये गुरुजी, कुणबी बँकेचे संचालक पी.डी. ठोंबरे, ज्ञानदीप क्लास विरारचे संचालक दीपक भरणकर, माणगावचे कुणबी समाज सेवक प्रकाश दसाळे, समाजसेविका सौ. पालांडे ताई, कुणबी उद्योजक अनंत फिलसे, सुप्रिया ट्रॅव्हल्सचे मालक कुणबी व्यावसायिक मस्कर, कुणबी युवा मुबंईचे शिलेदार मोरे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून रक्तदानाला उपस्थिती वि.आ.मा. युवा आमदार क्षितिजदादा ठाकूर, संघटक अजीवजी पाटील, स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत, नगरसेविका सौ.चिरायूताई चौधरी, मीनलताई पाटील, रिटाताई सावरिया, पत्रकार दिपक मांडवकर, विरारचे प्रभोधनयोद्धा आयु.विजय कदम, रिअल इस्टेटचे सल्लागार कुणबी समाज सेवक सावंत, कुणबी युवा मुंबईचे माजी अध्यक्ष अनंत साळवी, मनवेलपाडा सामाजिक संस्थाचे पदाधिकारी गणेश गावडे, परशुराम नाईक, विक्रम चाळके, कोकण नगरचे विनायक शिगवण, कार्यक्रमासाठी निःशुल्क जागा उपलब्ध करून देणाऱ्या सौ. सामंत मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
               हा भव्य दिव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागीय शाखा विरारचे सर्व पदाधिकारी, सदस्य, कुणबी युवा विरारचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सदस्य त्याच बरोबर कुणबी महिला मंडळ विरार च्या पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य याचे मोलाचे योगदान लाभले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखेचे सचिव एकनाथ डिंगणकर यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित सर्व रक्तदाते, मान्यवर, समाज सेवक, कार्यकर्ते, महिला मंडळ यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

अपना बाजार आर.सी.एफ. शाखा चेंबूरचा ५९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा !!

अपना बाजार आर.सी.एफ. शाखा चेंबूरचा ५९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
            अपना बाजार आर.सी.एफ. शाखा चेंबूर यांच्या ५९ व्या वर्धापन रविवारी (१जून) मोठया थाटामाटात संपन्न झाला. या वर्धापन दिनानिमित्त संस्थेचे संचालक श्री.अनिल ठाकूर  सपत्नीक उपस्थितीत होते. तसेच शाखेचे पालक मंत्री श्री. भीमसेन आचरेकर, अध्यक्ष सौ. शोभना हेगडे व सदस्य श्री. प्रदीप गावंड, शाखा व्यवस्थापक श्री. रवींद्र लोटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
             अपना बाजार आरसीएफचे ग्राहक निवृत्त जिल्हा न्यायाधीश श्री.सतीश चौधरी यांनी अपना बाजार आरसीएफचे कौतुक करत पुढील उपक्रम आणि लोकसेवा कार्यास यानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच या सुवर्ण दिनी शाखेचे सेवक श्री. प्रमोद महाडेश्वर यांचाही ५९ वा वाढदिवस होता. तो सेवक कु. पूजा राऊळ, कु. खेतना राणे, कु. हेमा चौहान, श्री.श्रीकांत कासार, श्री. राजू पाटील यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर ....

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर .... *चाळीसगाव, दि. ११ सप्टेंबर २०२६ :* ...