Wednesday, 4 November 2026

कल्याण-डोंबिवलीकरांना दिवाळीपूर्वी दिलासा; ३६ तासांची पाणी कपात २४ तासांवर, सणासुदीला कपात रद्द !!

कल्याण-डोंबिवलीकरांना दिवाळीपूर्वी दिलासा; ३६ तासांची पाणी कपात २४ तासांवर, सणासुदीला कपात रद्द !!

*कल्याण डोंबिवली दीपक इंगळे*

*कल्याण-डोंबिवली :* कल्याण-डोंबिवलीकरांसाठी दिवाळीपूर्वी आनंदाची बातमी आहे. शहरातील ३६ तासांची पाणीपुरवठा कपात आता २४ तासांवर आणण्यात आली असून दिवाळीच्या सणासुदीच्या काळात ही कपात रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

पावसाळ्यानंतर कमी पाऊस, एल-निनोचा प्रभाव आणि मान्सूनने लवकर माघार घेतल्यामुळे बारवी धरणातील पाणी साठ्याचे ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत नियोजन करण्यासाठी शासन निर्णयानुसार पाणी कपात करण्याचे नियोजित होते. मात्र ऐन दिवाळीत ही कपात महिलांना, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना त्रासदायक ठरणार असल्याची बाब लक्षात घेऊन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती.

दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी उद्योगमंत्री उदय सामंत यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या उपस्थितीत शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, महापौर हर्षाली थविल, अरुण आशान, राजेश कदम, गजानन पाटील, प्रभाकर जाधव आदी उपस्थित होते. ही मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती.

या निवेदनाची तातडीने दखल घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक निर्णय घेत पाणी कपात कमी करण्यास आणि सणाच्या काळात रद्द करण्यास मान्यता दिली.

या जनहिताच्या निर्णयाबद्दल उद्योगमंत्री उदय सामंत आणि सहकार्याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

बी. के. बिर्ला स्कूलच्या अब्दुल राफे राठोडची किक बॉक्सिंगमध्ये चमक; जिल्हास्तरीय स्पर्धेत कांस्यपदकाला गवसणी !!

बी. के. बिर्ला स्कूलच्या अब्दुल राफे राठोडची किक बॉक्सिंगमध्ये चमक; जिल्हास्तरीय स्पर्धेत कांस्यपदकाला गवसणी !!

*कल्याण डोंबिवली दीपक इंगळे*

*कल्याण, दिनांक ०३ नोव्हेंबर २०२६* कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत बी. के. बिर्ला स्कूलचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अब्दुल राफे राठोड याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कांस्यपदक पटकावले आहे. त्याच्या या यशामुळे ठाणे जिल्ह्यासह कल्याण-डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील खेळाडूंनी सहभाग घेत आपले क्रीडा कौशल्य दाखवले. चुरशीच्या लढतींमध्ये अब्दुल राफे राठोड याने आत्मविश्वास, जिद्द आणि उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तृतीय क्रमांक मिळवला आणि कांस्यपदकावर आपले नाव कोरले.

स्पर्धेतील यशानंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते अब्दुल राफे राठोड याला कांस्यपदक प्रदान करून गौरव करण्यात आला.

अब्दुल राफेच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे बी. के. बिर्ला स्कूलचाही गौरव वाढला आहे. त्याच्या यशाबद्दल शाळेचे शिक्षक, पालक, मित्रपरिवार आणि क्रीडाप्रेमींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून भविष्यातही असेच यश संपादन करावे, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

मोठागाव रेल्वे क्रॉसिंगवरील चार पदरी उड्डाणपुलाला स्थायी समितीची मंजुरी; १९ वर्षांच्या पाठपुराव्याला यश, संपूर्ण डोंबिवलीला मिळणार दिलासा - दीपेश म्हात्रे

मोठागाव रेल्वे क्रॉसिंगवरील चार पदरी उड्डाणपुलाला स्थायी समितीची मंजुरी; १९ वर्षांच्या पाठपुराव्याला यश, संपूर्ण डोंबिवलीला मिळणार दिलासा - दीपेश म्हात्रे

*कल्याण डोंबिवली,  दीपक इंगळे*

*कल्याण-डोंबिवली :* कल्याण-डोंबिवलीच्या दळणवळण व्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मोठागाव रेल्वे क्रॉसिंगवरील चार पदरी रेल्वे ओव्हर ब्रिजच्या (ROB) प्रस्तावाला आज स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मोठागाव रेल्वे क्रॉसिंगवरील पुलाची संकल्पना सर्वप्रथम २००७ मध्ये तत्कालीन महापौर पुंडलिक म्हात्रे यांनी मांडली होती. त्यांनी हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला असता २३ कोटी रुपयांचा निधी मंजूरही झाला होता. मात्र केंद्र सरकारच्या DFCCIL प्रकल्पामुळे या कामाला स्थगिती मिळाली. सुरुवातीला हा पूल सिंगल लेन करण्याचे नियोजन होते.

मात्र २०१३ पासून दिपेश पुंडलिक म्हात्रे यांनी या पुलासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू केला. भविष्यातील लोकसंख्या आणि वाहनांचा ताण लक्षात घेता सिंगल लेन पूल अपुरा ठरेल, अशी भूमिका घेत त्यांनी चार पदरी उड्डाणपुलाची मागणी लावून धरली. त्यांच्या पाठपुराव्यानंतर २०१७ मध्ये चार पदरी पुलाच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आणि पालिकेमार्फत जागाही निश्चित करण्यात आली.

या प्रकल्पासाठी तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी निधी आणि मंजुऱ्यांसाठी सहकार्य केले.

या पुलासाठी लढताना २०१९ मध्ये महापालिका सभागृहात भूमिका मांडताना झालेल्या वादातून दिपेश म्हात्रे यांच्यावर भादंवि कलम ३५३ अंतर्गत गुन्हाही दाखल झाला होता. तरीही त्यांनी पाठपुरावा थांबवला नाही.

मानकोली पूल सुरू झाल्यानंतर मोठागाव क्रॉसिंगवरील ताण वाढला आहे. हा चार पदरी पूल पूर्ण झाल्यानंतर केवळ मोठागावच नव्हे, तर माणकोली, डोंबिवली पूर्व-पश्चिम आणि आसपासच्या परिसरातील वाहतूक कोंडी कमी होणार असून नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे.

स्थायी समितीच्या मंजुरीबद्दल दिपेश म्हात्रे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार रवींद्र चव्हाण, एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्थायी समिती सदस्य आणि प्रशासनाचे आभार मानले असून काम लवकर सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.

Tuesday, 3 November 2026

उरणचे सुपुत्र डॉ. मोहम्मद आमिर शेख यांची पिल्लई एच.ओ.सी. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या आय टी विभागप्रमुखपदी पदोन्नती !!

उरणचे सुपुत्र डॉ. मोहम्मद आमिर शेख यांची पिल्लई एच.ओ.सी. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या आय टी विभागप्रमुखपदी पदोन्नती !!

उरण दि ३(विठ्ठल ममताबादे ) रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्याचे सुपुत्र डॉ. मोहम्मद आमिर शेख यांची पिल्लई एचओसी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुखपदी (एचओडी) पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या यशामुळे उरण परिसरासह शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

डॉ. मोहम्मद आमिर शेख यांनी या पदोन्नतीबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. वासुदेवन पिल्लई सर, प्राचार्य डॉ. जगदीश डब्लू. बाकल सर आणि फ्रनव पिल्लई सर यांचे मनःपूर्वक आभार मानले. या मान्यवरांनी दाखविलेला विश्वास, दिलेले प्रोत्साहन आणि सातत्यपूर्ण सहकार्य याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

विभागप्रमुख म्हणून नवीन जबाबदारी स्वीकारताना विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आधुनिक बदलांशी त्यांना अवगत करणे तसेच संशोधन, नवोपक्रम आणि शैक्षणिक प्रगतीला चालना देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार डॉ. शेख यांनी व्यक्त केला.

त्यांच्या या पदोन्नतीमुळे उरण, रायगड परिसराच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या यशाबद्दल विविध स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत. त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्वत्र अभिनंदन होत आहे

शेखर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप !

शेखर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप !


उरण दि ३, (विठ्ठल ममताबादे ) :

शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस ऍड शेखर पाटील यांचा यांच्च्या वाढदिवसानिमित्त उरण तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद पिरकोन शाळा येथे वह्या वाटप खाऊ वाटप व शाळेला पंखा भेट देण्यात आले.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका नीलिमा मॅडम यांनी वाढदिवसानिमित्त औक्षण केले.प्रास्ताविकात जेएनपीटीचे  शाळेचे प्राचार्य गिरीश पाटील यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. मुख्य अतिथी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विलास गावंड यांनी शेखर पाटील यांच्या कार्याचा गौरव करून समाजाची सेवा करण्यासाठी शतायुषी व्हा अशी प्रार्थना केली. यावेळी शेखर पाटील आपल्या भाषणात म्हणाले माझ्या गावाने वाढदिवसानिमित्त माझा सत्कार केलेला आहे त्याबद्दल मी आपला ऋणी आहे समाजाचे सेवा करण्याचे व्रत कायम जोपासले जाईल. 

यावेळी सामाजिक संस्थेचे विभाग प्रमुख दिलीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य अंकित पाटील, ग्रामपंचायत सदस्य निखिल गावंड,पिरकोन अध्यापक विद्यालयाचे व्हाईस चेअरमन आनंत गावंड मुख्याध्यापका नीलिमा म्हात्रे, सहशिक्षिका ज्योती बामणकर, स्कूल कमिटीचे अध्यक्षा आयुश्या गावंड, ग्रामस्थ व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

Monday, 2 November 2026

डोंबिवलीच्या Rule The Ropes चा नांदेडमध्ये डंका; २४ पदकांसह ऐतिहासिक कामगिरी !!

डोंबिवलीच्या Rule The Ropes चा नांदेडमध्ये डंका; २४ पदकांसह ऐतिहासिक कामगिरी !!

*डोंबिवली, राजू नलावडे :* डोंबिवलीच्या Rule The Ropes संघाने राष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी करत २४ पदकांचा ऐतिहासिक धमाका केला आहे. नांदेड येथे झालेल्या २३व्या Sub-Junior National Jump Rope Championship 2026-27 आणि पहिल्या Ultimate Team Championship मध्ये या संघाने १३ सुवर्ण, ६ रौप्य आणि ५ कांस्य पदके पटकावली आहेत.

२९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत देशभरातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. याच स्पर्धेत पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या Ultimate Jump Rope Team Championship मध्ये Rule The Ropes ने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपदावर आपले नाव कोरले.

*Individual Championship मध्ये १५ पदके*

प्रशिक्षक श्री. अमन वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी Speed, Freestyle आणि Double Dutch प्रकारात चमकदार कामगिरी केली.

- *दक्षिता देवकते :* १ सुवर्ण
- *ग्रिष्मा जोशी :* १ सुवर्ण, १ रौप्य
- *सुकृता बेंडले :* १ रौप्य
- *अनिरुद्ध ध्वाडे :* १ कांस्य (DDSS)
- *शौनक शुक्ला :* २ कांस्य (DDSS आणि 30 Sec Speed Sprint)
- *अंगद हरड :* १ सुवर्ण (Double Under)
- *वेदांत बरगुडे :* ३ सुवर्ण (30 Sec Speed Sprint, Double Under Pair), २ रौप्य (3 Min Speed, Speed Relay)
- *अक्षांक गायकवाड :* १ सुवर्ण (Double Under Pair), १ रौप्य (Freestyle), १ कांस्य (DDSS)

या गटाने वैयक्तिक प्रकारात एकूण ६ सुवर्ण, ५ रौप्य आणि ४ कांस्य अशी १५ पदके मिळवली.

*पहिल्या Ultimate Team Championship मध्ये Rule The Ropes चॅम्पियन*

या स्पर्धेचे मुख्य आकर्षण असलेल्या Ultimate Team Championship मध्ये ९ वेगवेगळ्या Jump Rope Events च्या आधारे संघांची चाचणी घेण्यात आली. यात डोंबिवलीच्या संघाने उत्कृष्ट Teamwork च्या जोरावर पहिला क्रमांक पटकावला.

*विजेता संघ :* भूमिका नेमाडे, तन्वी नेमाडे, ईशान पुथ्रन, रौनक साळवे, पारुल झंकार, पद्माक्षी मोकाशी

या संघाने ७ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य अशी एकूण ९ पदके जिंकत पहिल्या वहिल्या चॅम्पियनशिपची ट्रॉफी नावावर केली.

या यशानंतर Rule The Ropes चे खेळाडू आता आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यास सज्ज झाले आहेत. २७ आणि २८ नोव्हेंबर २०२६ रोजी सिंगापूर येथे होणाऱ्या सिंगापूर ओपन जंप रोप स्पर्धेत हे खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

*रसिकोत्सव मराठी सहावे साहित्य संमेलन २०२६ ; नागपूर येथे आयोजित.!

.
*रसिकोत्सव मराठी सहावे साहित्य संमेलन २०२६ ; नागपूर येथे आयोजित.!

२१ नोव्हेंबर २०२६ रोजी नागपूर येथे शुभंकरोति साहित्य परिवार च्या माध्यमातून रसिकोत्सव मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन होत आहे. विदर्भाचे सांस्कृतिक नेते आणि समाजसेवक रसिकाग्रणी
मा. डॉ. गिरीश गांधी संमेलनाध्यक्षपदी राहणार असून, उद्घाटक म्हणून इमव्हर्स ए-आयच्या संस्थापक अध्यक्ष आणि साहित्य रसिक मा. प्रीती रामकृष्णन राहतील.

प्रामाणिक साहित्य रसिक हा अव्यक्त प्रतिभावंतच असतो अशी भूमिका घेणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे महाकवी मा. डॉ. सुधाकर गायधनी यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार मा. विकास झाडे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

नवोदित साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत मराठी साहित्याचा प्रचार, प्रसार आणि वाचनसंस्कृतीच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या शुभंकरोति साहित्य परिवार मुंबई, या संस्थेच्या वतीने या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘रसिकोत्सव २०२६’ असे या संमेलनाचे नामकरण करण्यामागची भूमिका म्हणजे साहित्य रसिकांमधूनच या संमेलनाचे अध्यक्ष, उद्घाटक या मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. अशाप्रकारचे हे कदाचित साहित्य विश्वातील पहिलेच संमेलन असावे.

संमेलनाच्या स्वागताध्यक्षापदी डॉ. माया दिलीप यावलकर राहतील.
कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी मा. श्रीनिवास नार्वेकर, तर गझलरंग कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी कोकण विभाग पत्रकार संघाचे अध्यक्ष मा. संजय हंडोरे पाटील हे मान्यवर राहतील.

याप्रसंगी साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय रसिक आणि साहित्यिकांच्या योगदानाची दखल घेत सहा मान्यवरांना ‘शुभंकरोति गुणगौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये मा. राजश्री पाटील, मा. सना पंडित, डॉ. मेधा कानेटकर, न्यायमूर्ती मा. किशोर रोही, डॉ. मीना सु. बंदे आणि मा. धनश्री कि. पाटील यांचा समावेश आहे.

वाचनाची आवड जोपासण्यासाठी आणि वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी शुभंकरोति साहित्य परिवारातर्फे महिनाभर ‘वाचनयात्रा’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातील उल्लेखनीय सहभागाच्या आधारे वाचकांना ‘वाचनरत्न पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.

याशिवाय महाकवी डॉ. सुधाकर गायधनी यांच्या ‘महाकाव्य समग्र देवदूत’ या जगप्रसिद्ध महाकाव्याचे समूहामध्ये अभिवाचन करणाऱ्या मान्यवरांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात येईल. 

समूहात सातत्याने उत्तम कार्य करणाऱ्या आणि आपल्या लेखनातून साहित्यसेवा करणाऱ्या गुणीजनांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

मराठीचे वैभव श्री चक्रधर स्वामी, संत गाडगेबाबा, आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या या पावन विदर्भभूमीत होणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून साहित्यिक, पत्रकार, कवी, गझलकार, वाचक आणि साहित्य रसिकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देणे, वाचनसंस्कृती रुजविणे आणि मराठी साहित्याची समृद्ध परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे, हा या संमेलनाचा प्रमुख उद्देश आहे

शुभंकरोति साहित्य परिवाराच्या संस्थापिका आणि प्रमुख मार्गदर्शीका सौ. सोनाली जगताप, मुख्य प्रशासिका डॉ. माया दि. यावलकर, अध्यक्षा प्रा. सुमती पवार आणि प्रशासक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाची तयारी अतिशय उत्साहाने सुरू आहे. विदर्भ-नागपूरातील साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ‘रसिकोत्सव २०२६’ यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
.

सौजन्य - मा. संजय पाटील (हंडोरे) जेष्ठ पत्रकार (संपादक), अध्यक्ष (कोकण विभाग पत्रकार संघ)

पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न सोडवा; मंत्रालयीन संघटनेची संसदीय समितीकडे मागणी !!

पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न सोडवा; मंत्रालयीन संघटनेची संसदीय समितीकडे मागणी !! *मुंबई (महेंद्र उर्फ अण्णा पंडीत) :* म...