Friday, 21 August 2020

कल्याण तालुक्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कोरोना काळातील कामांचा अभिमान वाटतो - महिला व बालकल्याण सभापती !!

कल्याण तालुक्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कोरोना काळातील कामांचा अभिमान वाटतो - महिला व बालकल्याण सभापती !!


कल्याण (संजय कांबळे) : मी जा भागातून आले तो आदीवाशीचा डोंगराळ व द-या खो-याचा मागास भाग आहे. तेथील पालकांना रोजगाराची मोठी चिंता असते. त्यामुळे तिकडे कुपोषणाचे थोडेसे जास्त प्रमाण आहे. त्या मानाने कल्याण तालुक्यातील पालक जागृत व सक्षम आहेत. त्यामुळे कोरोनोच्या वाढत्या काळात देखील येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी खूपच चांगले काम केले आहे. याचा मला अभिमान वाटतो असे ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या सभापती श्रीमती रत्नप्रभा तारमळे यांनी तालुक्यातील कांबा ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी केंद्रात आयोजित कोरोना कोव्हीड सुरक्षा साहित्याचे प्रातिनिधिक स्वरूपाचे वापट प्रसंगी गौरवोद्गार काढले.
याप्रसंगी व्यासपीठावर महिला व बालकल्याण समितीच्या व ठाणे जिल्हा परिषदेच्या सदस्या श्रीमती जयश्री सासे, वृशाली शेवाळे, सभापती मॅडमचे पती भगवान तारमळे, कांबा गावचे ग्रामस्थ धिरडे महाराज पत्रकार संजय कांबळे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती उषा लांडगे, सुपरवायझर निलिमा घनगाव आणि जांभूळ बिटातील म्हारळ वरप कांबा येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.


तत्पूर्वी महिला व बालकल्याण सभापती रत्नमाला तारमळे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला तर सदस्या जयश्री सासे, व वृशाली शेवाळे यांनी दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली.
आपल्या भाषणात सभापती रत्नमाला तारमळे पुढे म्हणाल्या ", मी नुकताच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदाची सूत्रे हाती घेतली असून जिल्ह्य़ात सर्व बीटनां भेटी देऊन अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कोरोनोच्या संकट काळात अंगणवाडी सेविका व कर्मचारी यांनी आत्मविश्वासाने काम केले. आपल्या परिसरातील स्वच्छता व रोगप्रतिकारक शक्ती महत्त्वाची आहे. कारण तूम्ही सतत लहान बालकाच्या संपर्कात येतात. त्यामुळे तुम्ही आईचे काम करता. कारण आई ही आई असते दुधावरची साय असते. त्यामुळे तूमचे काम मोठे आहे. मी ज्या भागाचे नेतृत्व करते तो मागासलेला परिसर आहे. तेथील लोकांना पोट कसेही भरायचे याची चिंता वाटत असते त्यामुळे बालकाकडे त्यांचे दुर्लक्ष होते आणि म्हणूनच तिथे सॅम व मॅम च्या बालकांचे प्रमाण जास्त आहे. पण तुमचे काम अभिमानास्पद आहे. असे सांगून तूमच्या अडी अडचणी, समस्या अथवा नाविन्यपूर्ण काही योजना राबविण्याची असल्यास मी सदैव तुमच्या पाठीशी आहे असे त्या म्हणाल्या व कल्याण एकात्मिक बालविकास विभागाच्या कार्याचे कौतुक केले.
तर जिल्हा परिषद सदस्य श्रीमती जयश्री सासे आपल्या भाषणात म्हणाल्या, तालुक्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कामाचे खरेच कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्याचे प्रश्न सोडविण्यासाठी मी जिल्हा परिषदेच्या बैठकीत सतत तत्पर असते. तर सदस्या श्रीमती वृशाली शेवाळे म्हणाल्या ', तुमच्या कामापासून आम्ही प्रेरणा घेतो. इतक्या अडचणी काळात देखील कोणत्याही प्रकारची तक्रार न करता तूम्ही काम करत आहेत. तूमचे आभार मानायला हवेत, तुम्ही काळजी घेऊन काम करावे असा सल्ला त्यांनी दिला.
तर याप्रसंगी पत्रकार संजय कांबळे म्हणाले, आज कल्याण तालुक्यातील कोरोनोच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. आज तालुक्यातील १९ गावात एकही कोरोनाचा पाॅझिटिव रुण्ग आढळून आला नाही. यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सिंहाचा वाटा आहे. या घर सांभाळून कोरोचे काम करित असून याच ख-या कोरोना योध्दे आहेत. त्यामुळे शासनाने यांच्या कामांची दखल घ्यायला हवी. असे बोलून त्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी नुकताच पदभार मिळालेल्या कल्याण एकात्मिक बालविकास अधिकारी उषा लांगडे यांनी सांगितले की कल्याण तालुक्यात नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येतात. त्यामुळे कल्याण तालुका ठाणे जिल्ह्यातील पहिला तालुका आहे. अशा योजना राबविणारा आहे असे सांगून तालुक्यात ८ बीट असून यातील जांभूळ बीटा अतर्गत येणाऱ्या म्हारळ वरप कांबा येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सॅनिटायझर, हॅन्डवाॅश, मास्क आणि फेससीड चे प्रातिनिधिक स्वरूपात वापट करण्यात आले असून हा कार्यक्रम संपूर्ण तालुक्यात राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी म्हारळ येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना कोरोना योद्धा म्हणून प्रमाणपत्र देण्यात आलेल्या ललिता पाटील, अलका भोईर, दिपिका विंचू, योगिता जाधव, संगीता म्हात्रे, जयश्री देशमुख, जयश्री सुर्यराव, रोहिणी सुर्यराव, राखी बुरांडे, सुरेखा धनगर, सुजाता सुर्यराव आदी चा गौरव करण्यात आला. या छोटेखानी व सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुपरवायझर निलिमा घनघाव यांनी केले. 
यावेळी म्हारळ वरप कांबा पावशेपाडा या परिसरातून अंगणवाडी सेविका व कर्मचारी उपस्थित होत्या. 
 

Thursday, 20 August 2020

सुभाषनगरात सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था महिला व ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय !!

सुभाषनगरात सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था महिला व ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय !!
   
                       
उल्हासनगर, सिध्दांत गाडे  -  सुभाषनगर उल्हासनगर नं . ३. पॕलन .नं. ९. या परिसरात  सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था झाल्याने तो धोकादायक शौचालय केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत असल्याने सुभाषनगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


दुसरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे या परिसरातील सार्वजनिक शौचालयाला दरवाजे नाहीत तसेच शौचालयाचे भांडे सुध्दा तुटलेलीच आहेत आणि पाण्याची सोय नाही. त्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांची मात्र मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. याकडे मात्र उल्हासनगर महापालिका प्रशासन आणि नगरसेवक, मुकादम  सफाई कामगार, यांचे  मात्र दुर्लक्ष होत असून या सुभाषनगरात मात्र नेहमी  विविध मुलभूत सुविधांची बोंब होत आहे. पॕनल नं .८. व. ९. सुभाषनगर या परिसरात रस्त्यावर नेहमी पाणी गळतीने भर रस्त्यात तळे निर्माण झाले  असून डबक्यातून नागरिकांसह वाहनांना सुध्दा जावे लागत आहे. शिरसाट गल्ली येथे रस्याचे काम त्वरित करण्याची मागणी करून सुध्दा विकास कामे होत नाही. उल्हासनगर महापालिका प्रशासन, स्थानिक नगरसेवक याकडे दुर्लक्ष करीत आहेत. असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. नागरिकांच्या विविध सुविधांची बोंब म्हणजे  सुभाषनगरात नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन सुध्दा गटारातून गेल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

याबाबत येथील रहिवाशांनी स्थानिक लोक प्रतिनिधीला वारंवार तक्रारी अर्ज करुनही याकडे मात्र दुर्लक्ष केले जात असल्याने येथील रहिवासी यांनी मात्र तीव्र  संताप व्यक्त करीत आहेत. 

सुभाषनगरात नागरिकांना  आपला जीव मुठीत धरुन चालण्याची वेळ आलेली आहे तसेच मूलभूत सुविधांपासून सुभाषनगर  वंचित आहे. नेहमी रहिवाशांचा आक्रोश  असतो आणि स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सुभाषनगराच्या  समस्येकडे लक्ष दिले नाही तर आंदोलनाचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

आयडीएफ व साईटल फॅमिलीचा पार्कसाइट करांना मदतीचा हात !!

आयडीएफ व साईटल फॅमिलीचा पार्कसाइट करांना मदतीचा हात !!


मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना महामारी पासून बचाव करण्यासाठी सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन केले. आज चार महिने चाललेल्या लॉकडाऊनच्या काळात मोलमजुरी करणारे हातावरचे पोट असणाऱ्यांचे रोजगार बंद झाले हाताला काम नसल्यामुळे या कष्टकऱ्यांची उपासमार होऊ नये यासाठी अनेक सामाजिक संस्थांनी ‌किंवा दानशूर व्यक्तीनी संपुर्ण देशात आपआपल्या परीने ‌मदतीचा हात पुढे केला. असाच मुंबईतील आय डी एफ फॅमिली व साईटल फॅमिली यांनी विक्रोळी पार्क साइट, वर्षा नगर येथील नागरिकांना मदतीचा हात पुढे केला व गरजवंतांना रेशनचे किट सॅनिटायझर मास इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचे सामाजिक कार्यकर्ते बाळू म्हस्दे, सोनाली म्हस्दे यांच्या सहकार्याने मोफत वाटप केले यावेळी आयडीएफ फॅमिली सिईओ डॉ. नारायण, मॅनेजर अनिस ,सितेल फँमिलीचे व्यवस्थापक उझैर सर ,सम्राट मित्र मंडळाचे कार्यकर्ते अंकुश जगधने , तुशांत मिठभावकर, पंकज कदम, संजय पाटील आदींसह असंख्य मान्यवर उपस्थित होते वर्षा नगर विभागातील सुमारे 125 कुटुंबांनी या मदतीचा लाभ घेतला.

Wednesday, 19 August 2020

कल्याण पश्चिम येथील आदर्श कुटुंब उतेकर परिवार यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर .‌‌...

कल्याण पश्चिम येथील आदर्श कुटुंब उतेकर परिवार यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर .‌‌...


कल्याण : मुळ कोकणातील उतेकर कुटुंब रोजगाराच्या निमित्ताने कल्याण पश्चिम येथील बिर्ला कॉलेज परिसरातील भवानीनगर येथे अनेक वर्षांपासून रहात आहेत. 
मुळचा समाजसेवेचा पिंड यांनी ‌इथे पण जोपासला बिर्ला कॉलेज परिसरातील वार्ड क्रं. १६, भवानीनगर येथे १९९० भवानीनगर विभाग स्थापनेपासून ते आजपर्यंत उतेकर कुटुंब सामाजिक क्षेत्रात अग्रेसर काम करत आहेत. कुटुंबातील एक सदस्य कैलास वासी विजय शंकर उतेकर जे ग्रेट मराठा कोकणचा राजा या नावाने फिरणाऱ्या रिक्षाचे मालक यांचे १० ऑगस्ट २०२० रोजी दुपारी साडेचार वाजता ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तसेच कै. विजय उतेकर यांचे सख्खे मेहुणे कैलास वासी प्रदीप मानाजी जाधव रा. खडकपाडा पण मिलिंद नगर सामाजिक क्षेत्रात काम करणारे मराठा समाजाचे खंदे समर्थक यांची गेले एक महिन्यापासून रुग्णालयातील मृत्युशी चालू असलेली झुंज अपयशी ‌ठरून १२ ऑगस्ट २०२० रोजी स्वर्गवासी झाले. कै.विजय उतेकर यांच्या मातोश्री ज्यांना ०३ ऑगस्ट २०२० पासून रुग्णालयात दाखल केले होते त्यांना भवानीनगर येथील नागेश्वर सोसायटीतील रहात्या घरी आल्यानंतर दोनच दिवसात मातोश्रींची ज्योत मावळली. परिसरात अनेक सामाजिक कार्यकर्ते घडविणारी तसेच आयुर्वेदाचे ज्ञान असणारी काविळीचे औषध शहरातील नागरिकांना देऊन बरे करणारी माऊली. 


कल्याण शहरातील एक मान्यवर उतेकर कुटुंबातील ‌तीन सदस्यांचे पंधरा दिवसात‌ मृत्यू झाले असल्याने सर्वत्र हळहळ व दुःख व्यक्त करण्यात येत आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्तींनी उतेकर कुटुंबाची भेट घेऊन तसेच पुणे, नासिक, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील नातेवाईक व मित्रपरिवार यांनी फोन तसेच इतर मार्गाने सांत्वना ‌व्यक्त केली व करत आहेत.
आता या कुटुंबातील जबाबदार व्यक्ती सुनील उतेकर हे या सर्वांचे दुरध्वनी वरून किंवा प्रत्यक्ष भेटून आभार व्यक्त करत आहेत. सुनील उतेकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त करुन कै. विजय उतेकर व त्यांच्या मातोश्री यांचे दहाव्या व बाराव्याचे विधी २१ ऑगस्ट २०२० रोजी रहात्या घरी नागेश्वर सोसायटी, भवानीनगर येथे आयोजित केले आहेत असे सांगितले.

बारवीचे पाणी पुन्हा पेटले,प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण !! *जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी दिली भेट*

बारवीचे पाणी पुन्हा पेटले,प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण !! 
*जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी दिली भेट*


मुरबाड-{ मंगल डोंगरे }
बारवी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन न करता बेकायदेशीर धरणाची उंची वाढवून अनेक गावे व पाड्यांमध्ये धरणाचे पाणी शिरले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यासंदर्भात वेळोवेळी चर्चा करूनही एमआयडीसी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने प्रकल्पग्रस्तांच्या काही पदाधिकाऱ्यांनी 19 ऑगस्ट रोजी उपोषण सुरू केले आहे.या उपोषणाला जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांसह रामभाऊ दळवी,माजी उपसभापती अनिल देसले,मोहन भावार्थे, चंद्रकांत बोष्टे आदींनी भेट दिली.


*बारवी प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या *

सरसकट खावटी वाटप त्वरीत झाले पाहिजे,नोकऱ्यांचे नियुक्त आदेश लवकरात लवकर मिळाले पाहिजे,काही प्रकल्पग्रस्तांच्या घराचा राहिलेला मोबदला मिळाला पाहिजे,भूखंडाचे पेमेंट वाटप,संपादित न केलेल्या जमिनीवर धरणाचे पाणी बसलेले आहे त्या शेतकयांना नुकसान भरपाई देवून वरील जमीन भुसंपादित करून पेमेंट देण्यात यावे,पाण्याच्या साठ्यामुळे ज्या जमितीत शेतकरी पिक घेवू शकत नाहीत त्या जमिनी संपादित करून पेमेंट करण्यात यावे,काही घराचे मोजमाप झाले असून मुल्यांकन यादीत दिसून येत नाही त्याची त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी, सर्व नवीन गावठाणामध्ये सामाईक सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी,सन २००२ ते आजपर्यंत काही जमिनीचे पेमेंट बाजार भाव ठरवून आजपर्यंत झालेले नाही,आजपर्यंतची तफावत देण्यात यावी,कलम ३५ सेक्शनच्या जमिनींचे सर्व शेतकयांना पेमेंट करण्यात यावे,शेतघराचे मुल्यांकन करून पेमेंट करण्यात यावे, बारवी धरण टप्पा क्र .१ मधील ३४ प्रकल्प ग्रस्तांच्या मुलांना मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमल बजावणी करून नोकरीत समाविष्ट करून घेण्यात यावे,ज्या प्रकल्पग्रस्तांच्या घराचे मुल्यांकन शुन्य आले आहे त्याचे फेरमुल्यांकन करून पेमेंट करण्यात यावे,बुडीत क्षेत्रातील जमिनीवरील झाडोऱ्याचे पेमेंट करण्यात यावे,तळ्याची वाडी व देवराळवाडी या गावांचे पुनर्वसन करण्यात यावे,बारवी धरणामध्ये बाधित होणाऱ्या सर्व प्रकल्प प्रस्तांच्या मुलांना नोकरीत समाविष्ट करून घ्यावे.यावेळी प्रकलग्रस्त समितीचे कमलाकर भोईर,हरेश भोईर,चंद्रकांत बोष्टे,संतोष चौधरी, परेश कडव,भास्कर खंडागळे,दीपक भोईर,गोविंद गोरड,लक्ष्मण खोडका, शनील कोळेकर आदी सहभागी होते.

२० ऑगस्ट पासून एसटीची राज्यांतर्गत आंतरजिल्हा बससेवा सुरु होणार !! "परिवहन मंत्री, ॲड.अनिल परब"

२० ऑगस्ट पासून एसटीची राज्यांतर्गत आंतरजिल्हा बससेवा सुरु होणार !! "परिवहन मंत्री, ॲड.अनिल परब" 
  
       बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) कोरोनाच्या तथा कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर  टाळेबंदीमुळे गेली ५ महिने एसटीची आंतरराज्य व राज्यांतर्गत सेवा बंद करण्यात आली होती. त्यापैकी राज्यांतर्गत सेवा म्हणजेच आंतरजिल्हा बससेवा उद्या दि. २० ऑगस्ट २०२० पासून सुरू होणार आहे.
 त्यामुळे गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो प्रवाशांना दिलासा मिळेल. अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
     श्री. परब म्हणाले, उद्यापासून एसटीची साधी, निमआराम, शिवशाही, शिवनेरी यासर्व प्रकारच्या बस सेवा (मूळ तिकीट दरात) टप्याटप्याने सुरु होत असून त्यापैकी लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. एसटीच्या प्रवासासाठी ई -पासची आवश्यकता नाही.  
      प्रवासात प्रवाशांनी  कोविड - १९ च्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.  
  दि.२३ मार्चपासून कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यातील एसटी सेवा बंद करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार एसटीने परप्रांतीय मजुरांची वाहतूक, कोटा येथून महाराष्ट्रीयन विध्यार्थाना त्यांच्या घरी सुखरूप पोहचविणे, कोल्हापूर - सांगली येथील ऊसतोड मजुरांना त्यांच्या मूळ गावी सोडणे, अशा प्रकारे समाजातील सर्व घटकांना  सुरक्षित दळणवळण सेवा पुरविली आहे. 
      दि.२२ मे  पासून शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरु करण्यात आली  आहे. त्याद्वारे दररोज सुमारे १३०० बसेसमधून सरासरी ७२८७ फेऱ्यातून अंदाजे दीड लाख प्रवाशांना  सुरक्षित प्रवाशी सेवा एसटीने पुरविली आहे. 
      उद्यापासून सुरु होणाऱ्या आंतरजिल्हा बससेवेचा कोविड - १९ च्या काळातील शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री.परब यांनी यावेळी केले.

आजी, माजी सैनिकांना ग्रामपंचायत मालमत्ता कर माफी मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांच्या घोषणेमुळे आजी माजी सैनिकांत आनंदाचे वातावरण !

आजी, माजी सैनिकांना ग्रामपंचायत मालमत्ता कर माफी मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांच्या घोषणेमुळे आजी माजी सैनिकांत आनंदाचे वातावरण ! 


       बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) राज्यातील आजी आणि माजी सैनिकांना ग्रामपंचायतीच्या मालमत्ता करातून माफी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी केली. यासंदर्भातील शासन निर्णय ग्रामविकास विभागामार्फत काल निर्गमित करण्यात आला असून देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या राज्यातील सर्व आजी, माजी सैनिकांसाठी हा निर्णय लागू करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आजी माजी सैनिकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
       राज्याचे कृषी आणि माजी सैनिक कल्याण मंत्री श्री. दादाजी भुसे यांनी या मागणीसंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यांच्या विनंतीस अनुसरुन निर्णय घेण्यात आला.
     मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, संरक्षण दलातील शौर्य पदकधारक, सेवा पदकधारक यांना तसेच अशा पदकधारकांच्या विधवा किंवा त्यांच्या अवलंबितांना त्यांच्या वापरात असणाऱ्या एका निवासी इमारतीस ग्रामपंचायत मालमत्ता करातून माफी देण्याची तरतूद सध्या आहे. आता ही तरतूद व्यापक करुन राज्यातील सर्व आजी, माजी सैनिकांना मालकत्ता करातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
     ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या आजी, माजी सैनिकांनी देशासाठी प्राणाची बाजी लावून जिवाची पर्वा न करता निःस्वार्थपणे देशाचे संरक्षण केले आहे. त्यांनी केलेली देशाची सेवा विचारात घेता सर्व आजी, माजी सैनिकांना भावनिक दिलासा देणे व त्यांचे मनोबल उंचावून त्यांना उचित सन्मान देण्याच्या अनुषंगाने शासनाने हा निर्णय घेतला, असे मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले. अशा करमाफीस पात्र ठरणाच्या व्यक्तींनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर ....

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर .... *चाळीसगाव, दि. ११ सप्टेंबर २०२६ :* ...